ए स्टार इज बॉर्न
लोकहो, आताच एक नितांतसुंदर टेनिस सामना पाहिला. भारताच्या सोमदेव देववर्मन याने उझबेकिस्तानच्या एस्टोमेनचा फडशा पाडून ग्वांग्झू आशियाई खेळात दुसरे सुवर्णपदक जिंकले. कालच त्याने सनमसिंगच्या साथीत पुरूष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. उणीपुरी सात सुवर्णपदके मिळवणार्या देशासाठी एकदम दोन सुवर्णपदके जिंकणारा सोमदेव हा नवा 'गोल्डन बॉय' ठरला आहे. याशिवाय पुरूष एकेरीमधे भारतातर्फे टेनिसमधे आशियायी सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. नंदन बाळ, विजय अमृतराज पासून लिएंडर पेस पर्यंत सर्वांना हुलकावणी देणारे हे पदक सोमदेवने देशासाठी खेचून आणले आहे. या दोन सुवर्णपदकांशिवाय टीम इवेंटमधे भारताने मिळवलेल्या ब्राँझपदकातही त्याचा सिंहाचा वाटा होता. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने पुरूष एकेरीत सुवर्णपदक मिळवले होते.
दुसर्या सेटमधील पहिला गेम वगळता सामन्यावर सोमदेवने संपूर्ण वर्चस्व ठेवले. जोरदार सर्विसेस, खेळाचा वेग अचानक कमी-जास्त करण्याचे तंत्र वापरून त्याने प्रतिस्पर्ध्याला लय सापडूच दिली नाही. सुरेख टेनिस पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांना मिळाले अशी खात्री आहे. मूळच्या त्रिपुराच्या असलेल्या या खेळाडूने पेस, भूपती आणि आता सानिया मिर्जा यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय टेनिसची ध्वजा ऊंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. तर मंडळी 'ए स्टार इज बॉर्न' यू जस्ट हॅव टू वॉच.
www.somdev.com हे या नव्या तार्याचे संकेतस्थळ आहे. तिथे त्याला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा देता येतील. दोन सुवर्ण नि एक ब्राँझ अशी अव्वल कामगिरी करणार्या सोमदेवचे अभिनंदन नि उत्तरोत्तर त्याची अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा.
.jpg)



{सोमदेवचे अभिनंदन नि}
सोमदेवचे अभिनंदन नि उत्तरोत्तर त्याची अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा.
असेच म्हणतो.
Hope is a good thing...
{अभिनंदन!}
सोमदेवचे अभिनंदन!
लवकरच तो पहिल्या ५० मध्ये यावा हिच इच्छा!
प्रशांत
{+१}
सोमदेवचे अभिनंदन नि उत्तरोत्तर त्याची अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा.
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{अभिनंदन}
सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सोमदेवचे अभिनंदन.
ररा यांना एक नवा हिरो मिळाला म्हणुन त्यांचेही अभिनंदन
{वेल सेड ररा}
गोल्ड्न बॉयला शुभेच्छा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{सोमदेवचे अभिनंदन!}
सोमदेवचे अभिनंदन!