लुटा लुफ्त शेतीभातीचा - भाग दोन

0
0

पहिला भाग

तर १. नमनाचं ३.१४ घडेभर तेल मी खर्च केलं आहेच, २. आमचे रा.को. डान्राव यांनीही विकीपीडीयावर भर घालण्यासाठी हा लेख लिहीण्यासाठी उद्युक्त केलं आहे, तेव्हा मी आता काही टीप्स लिहीते.

-१.अगदी सुरूवातीला आपल्याला ६ नांगरलेले वाफे मिळतात. आपली पत असेल त्याप्रमाणे जास्त वाफे नांगरून पेरणी करावी. फार्मव्हिलंच्या मुख्य खिडकीत डाव्या बाजूला खाली हिरव्या रंगाचं नांगरणीचं बटण आहे.
०. वाफे डाव्या आणि वरच्या कोपर्‍यातून लावावे, म्हणजे जास्तीत जास्त वाफे माववता येतात. उदाहरणार्थ नंदनचं शेत पहा. (पक्का मुंबईकर आहे हा! ह्याच्यासाठी एखादी नोट ठेवायलाही जागा सोडली नाही आहे याने!!)

१. जे काही फुकट मिळेल ते घेऊन टाकायचं:

  • लोकं फुकट तेल देतात, आपल्याकडे गाड्या नसल्यातरी ते घेऊन ठेवायचं.
  • लोकांच्या शेतांवर अचानक पाठलाग न करणारे प्राणी येतात, ते आपल्या शेतात घेऊन जायचे
  • लोकांना रिबिनी मिळतात त्याची जाहीरात आपल्या बोर्डावर होते, त्या रिबीनीच्या चित्रावर लगेच क्लीक करायचं; त्यातून आपल्याला नाणी मिळतात.
  • लोकं आपल्या शेतातली कोंबड्यांची अंडी इतरांना वाटतात, ती लगेच आपल्याकडे घ्यायची.

२. रोजच्या रोज आपण ठराविक लोकांच्या शेतात खतं टाकू शकतो, ती टाकायची. आपल्याला नाणी आणि अनुभव गोळा करता येतो.
३. थोडं पुढच्या लेव्हलला गेल्यावर कोंबड्यांचं खुराडं घेता येतं ते घ्यायचं आणि त्यात कोंबड्या टाकायच्या! त्यातून अंडी गोळा करता येतात.
४. जी काही झाडं, प्राणी गिफ्ट म्हणून मिळतात ते सगळे गोळा करून शेतात "इन्स्टॉल" करायचे. त्यातून त्यांच्या मॅच्युरिटी पिरिअडप्रमाणे आपल्याला नाणी मिळतात.
५. जी काही पिकं लावली असतील ती आपल्या वेळेप्रमाणे मॅनेज करावीत. म्हणजे पुढचे चार तास फेसबुकावर खेळायला मिळणार नसेल तर मी स्ट्रॉबेर्‍या लावते. स्ट्रॉबेर्‍या ४ तासात पिकतात. दोन तासांनी वेळ मिळणार असेल तर रास्पबेरी लावली की पटकन कॅश वाढते. पण याच रास्पबेर्‍या पिकल्यावर आणखी दोन तासांनी (२*२) खराब होतात. त्यामुळे रात्री झोपताना रास्पबेर्‍या लावण्यात अर्थ नाही, तेव्हा बारा तासात पिकणारा भात किंवा मॉर्निंग ग्लोरी लावावी.
पिकं खराब होण्याचा वेळ, हा पिकण्याच्या वेळेएवढाच असतो. म्हणजे आज दुपारी एकला भात लावला तर तो रात्री एकला तयार होईल; दुसर्‍या दिवशी दुपारी एकपर्यंत काढला नाही तर तो फुकट जातो. तेव्हा अंमळ म्यानेजमेंट केलीत तर पटापट नाणी आणि अनुभव वाढतील.
६. आता एक टीप अंहनंकडून मिळाली होती ती अशी: शेतकरीदादा/ताईला शेताच्या मध्यभागी वई(हेज), कुंपण(फेन्स), बेल (bale) यांच्यापैकी कशानेही बांधून ठेवायचं, नाहीतर त्याच्या चालण्या-फिरण्यानं डोकं उठतं.

आत्ता सुचल्या तेवढ्या टीपा दिल्या आहेत; पुढच्या टीपा प्रतिसाद इ. मधून देता येतीलच.

एवढं सगळं करून कुंपणी, अभ्यास, घरची कामं यांची बोंब लागली तर माझ्याकडे तक्रार करू नये.

हे पहा

1

हे पहा माझं आत्ताचं शेत

पावर नाय

2

आम्हाला एवढी पावर नाय.
सध्या आमची लेव्हल ५ का काहितरी आहे.

बरं ती नाणी कशी गोळा करायची ? कॅश कोठुन आणायचा ?

हा हा हा..

3

मी तर सहाव्या लेव्हलला आहे...

डान्राव,

4

डान्राव, आधी शेती करा ... तिकडे या अंमळ!

अरेरे..

5

>>>थोडं पुढच्या लेव्हलला गेल्यावर कोंबड्यांचं खुराडं घेता येतं ते घ्यायचं आणि त्यात कोंबड्या टाकायच्या! त्यातून अंडी गोळा करता येतात.

थोडा उशीर केलास... मी ते खुराडे बियाणं घेण्यासाठी विकून टाकले....

स्वगतः लवकरच नसलेल्या लाखाचे बारा हजार करणार वाटते मी!!!! Sad

मांडवली

6

करुन मिळवुन देऊ का ?
काय देणार बदल्यात आम्हाला कॅशमध्ये ?

तुझा चेपु

7

तुझा चेपु आयडी काय आहे बे?

???

8

आम्हाला उर्दु/अरबी/फारसी समजत/उमजत नाही.
कॄपया चेपु म्हणजे काय ते सांगावे, एक्सेल शीट पाठवण्यात येईल.

चेपु

9

चेपु म्हणजे चेहरापुस्तक म्हणजे फेसबुक

पावर नाय

10

हापिसातुन ओपन करायची.

आयडी तोच आहे, वरिजनल नावाचा.
उगाच आपली निवडणुकांपुरते शेती करताना फोटो काढायचे म्हणुन आयडी घेतला आहे, बाकी आमचे पहिले प्रेम "ऑर्कुटच".

हापीसातुन ब्लॉक आहे पण. नंदनच्या आणि टार्‍याच्या लिस्टमधेय सापडेल.

अ‍ॅड केले

11

अ‍ॅड केले आहे. स्वीकार करा सवडीने.

अवांतर: आत्ताच अदितीच्या शेतावर जाऊन आलो. तिथल्या कोंबड्या सटासट अंडी घालत आहेत.

वोक्के

12

घरी गेल्यावर अ‍ॅडवतो.

बाकी अदितीने म्हणे रासबेरीची झाडे लावली होती, मग कोंबड्या अचानक कशा अंडी घालु लागल्या ?
कोड गंडला की काय ?

अहो

13

अहो डान्राव, रासबेरीची झाडं काही वाफ्यात, काही वाफ्यात कापूस, काही ठिकाणी कोरफड, एका कोपर्‍यात कोंबड्या, एक कोपर्‍यात गायी असं खटलं आहे पहा आमचं!

वा, वा!

14

छान आहे की शेत.

डान्राव,

15

डान्राव, तुम्ही 'मयत री कर्न्रर क' असा संदेश पाठवला आहे. याचा अर्थ काय ते समजून घ्यालच!

नक्की

16

घरी गेल्यावर समजुन घेतो.
अजुन (कंपनीच्या)दुर्दैवाने मी हापीसातच आहे.

मायला आम्हाला काही एकर शेत उधार देउन पाठिंबा वगैरे द्या राव, नाहितर आम्हाला कोंबड्या पळवुन वुडस्टॉक व्हिलावर लपवुन ठेवावे लागतील

एक काम करा.

17

एक काम करा. घरी गेलात की चेपुवर जा! तिथे जाऊन मी, बिका, मकी वगैरे दिग्गजांशी मयत री मैत्री करा, आमचे शेजारी व्हा, आमच्या शेतात खतं टाका, कोल्हे, कावळे लागले असतील तर त्यांना हाकला, अंमळ गब्बर व्हाल. मग थोडे वाफे नांगरून घ्या आणि मग तिथे बी टाका.
मयतरी झाली की तुम्हालाही एखादं बोकड, शेरडू, कोंबडं पाठवून देतो आम्ही लोकं, मग अंमळ तुम्हीही त्यांचा आस्वाद घ्या ... म्हणजे प्राणीपालनाचा हो ...

..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... ..... .....

अशी ही साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

आपण सगळे

18

आपण सगळे लोक सेकंड लाईफ मधील शेतीबाबत बोलत आहात काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

नाही...

19

नाही... चेपुवरची शेती.

कार्यकर्त

20

कार्यकर्ते भौ,''चेपुवरची' म्हणजे कोणती?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

चेहरा-पुस्

21

चेहरा-पुस्तक = फेसबुक wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद

22

धन्यवाद



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आँ!!

23

हे काय चाललंय ते अजूनसं नीट ध्यानात येत नाहिये, परंतु,

आपल्या पतीप्रमाणे जास्त वाफे नांगरून पेरणी करावी.

हे पहिल्याच परिच्छेदातलं वाक्य जरा अश्लील वाटलं...
इथे बरेच जाणकार आहेत त्यापैकी कोणी खरा अर्थ सांगेल काय मज अडाण्याला?
हास्य
औधत्याबद्दल माफी असावी!!!

हो, हे

24

Laughing out loud Laughing out loud

हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही ... आपली पत असेल त्याप्रमाणे ....

ता.क. सुधारणा केली आहे.

-१

25

संपादकिय हक्कांचा गैरवापर केल्याबद्दल मी हरकतीच्या प्रस्तावाखाली हक्कभंगाचा हराव मांडत आहे.
आवाजी मतदान घेतले जावे अशी पुरवणी प्रश्नाद्वारे मागणीही करत आहे.

हे

26

हे संपादकीय अधिकार नसून याला स्वतःची चूक मान्य करून सुधारणे असं म्हणतात.

+१

27

डांबिसकाकांचा मुद्दा योग्य आहे.

शुन्य प्रहराला हा मुद्दा औचित्त्याचा प्रश्न म्हणुन सभागॄहाच्या पटलावर ठेवावा अशी मी विनंती करत आहे.

वा, वा

28

उत्तम उपक्रम दुर्बिटणेबै! आकाशात उगवणार्‍या तार्‍यांपासून जमिनीखाली उगवणार्‍या बटाट्यांपर्यंत काकूंची सर्व 'क्षेत्रां'त झेप आहे. (क्षेत्र --> खेत्र --> शेत्र --> शेत; पहा संस्कृत -- अर्धमागधी -- पाली -- मराठी शब्दकोश). काही काही लोकांकडे एवढी विविधक्षेत्रज्ञानवृत्ती सुकासुकी, आपलं सुखासुखी कशी असते हे पाहून विस्मय वाटतो wink

असो, आज-उद्याकडे अजून काही टिप्सची भर घालतोच.

पुन्हा एकदा

29

नंदनभौ _/\_ हास्य

आमी पन

30

आमी पन शेती करायचो एकेकाळी... २२ बाय २२ चं भलं म्होटं वावर होतं. नंतर इकून टाकलं, आन आता झ्याक स्कार्प्यो गाडी घेऊन बोकाळतो...

चेपु

31

मला पण चेपु शेती आवडते.

सेव्हिंग

32

सेव्हिंग युवर फार्म ने २ वेळा विष्वासघात केला. २दा ५व्या लेवल ला पोच्लो होतो. खल्लास केले. परत ४थि लेव्हल.


-पुण्याचे पेशवे

???

33

च्यायला , हा काय नवा शॉट ?

अबे ते "सेव्ह" चे बटन कुठे आहे ?
मला वाटले की आटोमशिक सेव्ह होते म्हणुन.

मला पण

34

;( मला पण द्या ना १-२ एकर

तू आहेस का

35

तू आहेस का चेपुवर?

चेपुवर ये

36

चेपुवर ये आणि सुरू कर तू पण चुचु-आत्ते!

शेतीभातीच्या नोंदी

37

१. फेसबुकबाह्य अ‍ॅप्सच्या भेटी बनावट असतात.

२. <प्रवीण दवणे मोड सुरू>
पैशापेक्षा अनुभवाला मोल जास्त आहे. पैशाच्या श्रीमंतीची ऊब बाजारू, कधी गारठाल नेम नाही. अनुभवाचा लामणदिवा आयुष्यभर तुमच्या वाटेवर तेवत राहतो.
<प्रवीण दवणे मोड बंद>
--- थोडक्यात, पुढच्या लेव्हलला जायचं असेल तर xp कमवा. सोयाबीन पेरल्यास वाफ्यामागे २ xp मिळतात, वाटाणे पेरल्यास ३ xp इ. इ. xp मिळवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे गवताच्या पेंढ्या/हे बेल्स. शंभर दमड्यांत पाच xp.

३. सर्वात किफायतशीर पिकांची यादी इथे आहे.

धन्यवाद

38

प्रविण दवणेंचे मनोगत वाचुन सोयाबिनच्या पिकात लोळ लोळ लोळलो.
असो, बदलीन , पुढच्या वेळी रासबेरीच्या झाडावर चढेन.

भेटी बनावट असल्याच्या खुलाश्याबद्दल आभार.
आम्ही आत्ताच नोकरीचा राजिनामा देऊन व्हिलात रहायला जाण्याचे योजले होते, वेळीच डोळे उघडलेत हो !

लवकरच आम्ही सामनामध्ये ह्याबाबत "उप्स, दिवास्वप्न भंगले हो ! " असे मनोगत लिहणार आहोत. जमल्यास तुम्हालाही एखादे प्त्र पाठवु

भावना..

39

भावना फोचल्या!!!

फोचल्या

40

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

फोचल्या आणि फाफलल्या

डान्राव,

41

डान्राव, तुम्ही रासबेरीच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका; ही विरोधकांची चाल आहे!

शंकर्‍या

42

शंकर्‍या धोंडोपंत जोशीनंतर रासबेरीवर जीव असणार्‍या जोजोकाकूच हास्य

(विषय दिलेला नाही)

43

Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud
नंद्या..नंद्या...._/\_ पक्का कोटीकेसरी आहेस रे बाबा.

नंद्या ना

44

नंद्या ना आमच्या ... कुणाच्या अध्यात ना मध्यात! आता डोकं असेना का टकलं ....

हॅ हॅ हॅ

45

पाताळधुंडी आत्या ते आकाशधुंडी काकू, सगळ्यांची मतं अशी जुनाटच हास्य.

आय टेल

46

Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

आय टेल यु पन्त्.....

नंद्या, तू

47

नंद्या, तू कितीही आकाशपाताळ एक केलंस तरीही मला राग येणं अंमळ कठीण आहे. पण (तुझ्या नसलेल्या) केसांनी मात्र तुझा गळा कापला गेलेला दिसत आहे!

हॅ हॅ हॅ

48

>>> तरीही मला राग येणं अंमळ कठीण आहे.
--- हॅ हॅ हॅ, अंमळ इनोदीच बॉ तुम्ही. असतात लोकांचे आपल्याबद्दल गैरसमज. असो बदलणार नाही हास्य

आरं कुणी

49

आरं कुणी तरी खतपाणी घाला रं!!!!!!!!!!!!!!!

फेसबूकातल

50

फेसबूकातले फार्मविले चांगलेच फार्मात दिसतेय..! असो.. मला काही शेजारी हवे आहेत..

--सुहास००७

"शेजारी

51

"शेजारी हवे आहेत" असा धागा काढून टाका!

हम्म्म..

52

हम्म्म.. चांगली कल्पना आहे..!

बपरे

53

केवढा तो रिसर्च केलाय आदिती तै..

हेहेहेहे,

54

हेहेहेहे, वेळ जात नाही आणि वर ऑक्यूपेशनल हॅझर्ड! ;-)

शेतकरी..

55

त्याला कितीही बांधून घातला.. तरी थोड्या वेळाने तो बाहेर पडतो.... त्याला कायमचा बांधून कसा घालायचा??

+१

56

असेच विचारतो.
त्याचे तंगडे तोडुन ठेवावे का ?
होय असल्यास कसे ?

माझा

57

माझा प्रॉब्लम जरा वेगळाच आहे... माझा शेतकरी.... मी जेथे सोडलेलो असतो तिथेच सापडतो... शेताचं राखण कोण करणार मग thinking


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अच्छा .

58

म्हणजे तुमचा शेतकरी "पळुन " वगैरे जात नाही काय ?
अभिनंदन !
प्रगती आहे की राव, लोकं उगाच बोंबा मारतात की आंतरजालावर विधायक असे काही होत नाही.

शेतकरी

59

बाय डिफॉल्ट, शेतकरी शेताच्या बरोबर मधल्या वाफ्यात असतो. मकामावशींच्या वाफ्यांची जागा जुळलेली नसल्यामुळे, तो दोन वाफ्यांच्या मध्ये येतो आहे. उपाय म्हणजे खेळ पुन्हा सुरू करा आणि शेतकरी ज्या मूळ जागेवर असेल तिथे वाफा तयार करा आणि त्या वाफ्याच्या कडा १२ हे बेल्सनी लिंपून टाका.

खेळ परत

60

खेळ परत सुरू करा म्हणजे काय? आता पर्यंत केलेली सगळी मेहेनत वाया जाणार का?

१२ हे बेल्सनी लिंपायचे.... म्हणजे एकावर एक अशा लावायच्या का?

माझे शेत बघून घ्या एकदा आणि सल्ला द्या.

अ‍ॅप

61

ओह, तसं नाही. म्हणजे फार्मविलचं अ‍ॅप बंद करून पुन्हा सुरु करा हास्य
तसं केल्यावर, तुमचा शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीच्या (खत घातलेल्या) वाफ्यात उभा असलेला तुम्हांला दिसेल. तो वाफा उडवून त्याच्या चारही कडांना हे बेल्स एकालगत एक ठेवून द्या (उदा. माझं शेत). शेतकरी त्यातून बाहेर पडू शकणार नाही आणि कामं वेगाने होतील.

यांत्रिकीकरण

62

जिवंत माणसाच्या हालचालींवर बंधने आणुन त्याचे यांत्रिकीकरण करु पाहणार्‍या ' हे बेल्स सम्राट नंदन" ह्यांचा जाज्वल्य निषेध !
असल्या गोष्टी मानवतेच्या दॄष्टीने शरमनाक आहेत. असो.

क्युब

63

>>> जिवंत माणसाच्या हालचालींवर बंधने आणुन त्याचे
अहो, ज्याची त्याची क्युबिकल हास्य. शेवटी 'उंबरी करिती क्रीडा'च.

वाह,

64

वाह, नंदन-जी... सुंदर प्रतिसाद. आणि हो, क्रीडा हा शब्द कोणत्याही दुसर्‍या शब्दाशी न जोडता लिहिल्याबद्दल धन्यवाद.

असो.

65

भापो.

बकी एक वेळ शेत विकुन टाकेन मायला कवडीमोल भावात पण शेतकर्‍याचे असे यांत्रिकीकरण करनार नाही असे म्हणतो.
अरे शेतकरी म्हणजे काय चेष्टा समजलात काय लेकांनो ?

ह्म्म.... तुम

66

ह्म्म....
तुम्ही मार्क्सवादी की तृणमुलवाले हो?

काय फरक पडतो ?

67

मार्क्सवादी असो वा तॄणमुलवाले, शेवटी आम्ही तुम्हा काँग्रेजी भांडवलशाहवाद्यांच्या विरोधात बंगालमध्ये लढ देतोय हे महत्वाचे.

हां, सध्या आपली युती आहे खरी तात्पुरती पण असो.

नक्की काय

68

नक्की काय ते आधी ठरवा साहेब, इथे काँग्रेजी म्हणताय तिथे लाठ्याकाठ्यावाले म्हणताय...काय तुमचाही शपथराव भालेराव झाला काय? Laughing out loud

अज्ञान

69

लाठ्याकाठ्यांच्या गटात "काँग्रेजी" लोकांना बंदी आहे ही नवी माहिती कळाली.
तसेच इकडे "पक्ष" वगैरे बघतात हे ही नव्यानेच समजले. असो.

तुमचा कोण झाला आहे हे इथे लिहणे प्रशस्त नाही.

नाही, त्या

70

नाही, त्या गटात खायला फारसं मिळत नाही त्यामुळं पांढरे बगळे चुकुनही तिकडं फिरकत नाहीत हे एका आमदाराला आमच्यासारख्या ग्रामपंचायतीच्या क्षुल्लक तराळानं सांगायला लागावं???
आरारारा....च्छ्या च्छ्या:!!

डॉन राव

71

डॉन राव तुम्ही शेतकरी बांधला म्हणे तुमचा


-निखिल

कळले,

72

कळले, धन्यवाद. औंदाचे पीक कापले की करतोच व्यवस्था. बाकी फाट्यावर मारणार्‍यांच्याच शेतात अशी व्यवस्था दिसेल बघा लवकर.

मा. श्री.

73

मा. श्री. नंदन, जेरबंद केले हो... Big smile

आलोच

74

मोर्चा घेऊन, उभं पीक झोपवतो बघा आता.

ओ...चाल्ला

75

ओ...चाल्ला कुडं? बसा गप!
मोर्चा घिऊन चाल्लेत!
तुमच्या कारभार्‍यानं मोर्चासाठी गोळा केल्याल्या गर्दीला आधीच चपट्या वाटल्यात...तुमचा सगळा मोर्चा आमराईत झोपिवलाय पघा....

तुझ्या शेतात...

76

तुझ्या शेतात मशागत करायला आले तर खूप वेळ लागतोय.... मजूरी वाढव नाहीतर शेतकर्‍याला बांधून ठेव!!!! 8)

पावर नाय

77

"एक वेळ शेत विकुन टाकेन मायला कवडीमोल भावात पण शेतकर्‍याचे असे यांत्रिकीकरण करनार नाही" असे पुन्हा सांगतो.

स्वगतः मायला झाली का गोची, आता जर शेतकरी पॅक केला तर बाकीचे कावले मरोस्तोवर कलकलाट करतील.
रात्री कुनी नस्ताना करुन टाकावा काय ?

गावगाड्या

78

गावगाड्याच्या उलटं कराया जाल..तं इजारीत पाय र्‍हायचं न्हाईत!!!
येक जन रानात खतं टाकायला यिऊ द्यायचो न्हाई, का कोंबड्यास्नी दानं टाकाया मानुस मिळू द्यायचो न्हाई!!!

इच्चार करा...आन सांच्याला या वाड्यावर काय त्यो निर्नय सांगायला.

अरं जा

79

असल्या सहकारसम्राटांच्या खुराकावर पोसल्या जाणार्‍या गावगुंडांच्या मस्तीला आणि धमकील घाबरणारी ही डानराव कांबळ्याची अवलाद नव्हं.

मागचा जरा पेप्राचा गठ्ठा काढा, आम्ही मिलेट्रीत होतो तेव्हा दुश्मनांना कसा मार दिला हुता त्याच्या बातम्या पानापानावर सापडतील.

आनि हो, आम्हा मिलेट्रीवाल्यांना २ खुन माफ असत्यात हे इसरु नका.

आमचा

80

आमचा शिरपतराव कुटं ग्येला?
गेल्या टायमाला गावात कुजबुज व्हती 'मारुती कांबळेचं काय झालं?' ह्या टायमाला त्येवडं बी झालं नाय पायजे!!

आन...डानराव, दोन खुन माफ असत्यात न्हवं? हॅहॅहॅहॅ!!! बरं झालं सांगितलंसा...पन तुमी आज रातच्याला तुमच्या वस्तीत दोन गरीब धनगरास्नी का म्हनुन मारुन टाकनार? आन त्ये बी त्यांच्या ब्वॉड्या सोत्ताच्या घरामागं का पुरनार???
हॅहॅहॅ....या आता!

चालुद्या

81

चालुद्या चालुद्या. तुमची शेतं कुठं आहेत बरे.


-पुण्याचे पेशवे

अंमळ शिळी

82

अंमळ शिळी बातमी:

डान्रावांना शेवटी जाणीव झाली की शेतकर्‍याला शेताच्या मध्यात सुपरव्हीजनसाठी उभे करावे आणि यंत्रांना कामाला लावून काम करवून घ्यावे.

चुकीचे असे टाचण

83

चुकीचे असे टाचण दिले गेले आहे.

अवांतर खुलासा :
आम्ही वर्ल्ड बँकेकडुन आधुनिकशेतीसाठी निधी मंजुर करुन आणला व त्या पैशातुन एक ट्रॅक्टर आणि एक हार्वेस्टर खरेदी केला. आता शेतकर्‍याला काय तरास नको म्हणुन त्याला मधी हुबे केले व शेजारी एक स्मॉल मिनिईबार लाऊन दिला.
एक टाटा स्कायचे कनेक्शनही जोडुन दिले आहे मायला ...
हुन्न जाऊ द्या आता धगाटा.

वर्ल्ड

84

वर्ल्ड ब्यांक म्हणजे हिरवा माज दिसत आहे!
असो; शेतकर्‍याला मोबाईल नाही का दिला?

कर कर..

85

मी नाही सांगणार कोणाला.....फक्त जीटॉकवर बिकांना तेवढे सांगेन!!!

बिकांना ?

86

अहो मग विषयच संपला की !

त्यापेक्षा तुम्ही त्यावर एक लेख लिहुन समस्त आंतरजालावर चिटकवला तरी ही बातमी कमी लोकाम्पर्यंत पोहचेल.
बिका म्हणजे विषयच संपला ...

:)

87

बिका.. आहात ना इथेच???
आता पुन्हा विचारू नका... काय?? म्हणून!!!!

एक शंका

88

एक शंका आहे.

हा "हिरवा माज" काय प्रकार आहे ? तो वाढवायचा कसा ?
तो कधी कधी वाढलेला दिसतो पण काय केल्यावर वाढतो याबद्दल तज्ञ मंडळी प्रकाश टाकतील काय>


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

लेव्हल

89

एक लेव्हल पार केली की १ फार्म कॅश मिळते. नाहीतर पैसे (खरे) मोजून विकत घेण्याचा पर्याय आहे.

हे कस शक्य

90

हे कस शक्य आहे?
मी अजुन १८ व्या लेव्हल वर आहे आणि परवाच जेव्ह मी १६व्या लेव्हल वर होतो तेव्हा २० FV मोजुन शेत वाढवल..
मी आज वर कधी खर्‍या दमड्या मोजुन विकत न्हवते घेतले FV मग हे कस शक्य आहे?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

काही पटले

91

काही पटले नाही हो wink

कारण मी पण जवळ जवळ २०-२२ FV खर्च केले आहेत व मी १८ व्या लेव्हलवर आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

त्यामुळेच

92

च्यायला ही ही अशी माण्सं शेतीत घुसल्याने शेतीचे वाट्टोळे झाले बरं का.
कशाच काय माहित नाही आणि चाल्ले शेती करायला, ते काय इतकं सोप आहे व्हयं ?

असो. ते हिरवे डॉलर्स मात्र आणि मात्र 'लेव्हल अप' झाल्यावरच मिळतात. बाकी इतर मार्ग म्हणजे खरे पैसे मोजुन विकत घेणे.
जेव्हा तुम्ही गेम सूरु कर्ता तेव्हा सदिच्छा म्हणुन तुम्हाला बिनबोभाट ३ का ५ कायतरी डॉलर्स मिळाए असतात, तेच तुम्ही वापरले आहेत,थोडक्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत. असो.

आता एक तर ते जपुन वापरा किंवा खरे पैसे मोजुन विकत घ्या.
घ्या घ्या, तसेही तुमचा २ नंबरचा पैसा जाणार तरी कुठे ?

मला फसवलं की काय ?

93

मी शेत अपग्रेड केल ... १०,००० देउन ..पण काही फरक पडला नाही ...
१४ X १४ अपग्रेड झाला नाही ... पैसे मात्र गेले ;(

ग्रागक

94

ग्राहक कोर्टात तक्रार नोदवा. केस टाका फार्मव्हीली वर. लुबाडतात म्हणजे काय?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

कदाचित आम्हीच चुकलो की काय ...

95

अपग्रेड चा अर्थ आम्हाला असा वाटलं की १४ x १४ चे वाफे तयार करून मिळ्तील ... अपग्रेड चा नक्की अर्थ काय ?

संग्रामरा

96

संग्रामराव, अहो आयते वाफे नाही मिळत हो. वाढीव जमीन मिळते.
बाकी सगळ्यासाठी आपल्यालाच खपाव लागत शेतात.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

+१

97

गणपाशेठशी सहमत.
आत्ताच आम्ही 'खपणे' कमी व्हावे म्हणौन एक 'ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर' विकत घेतला.
आवंदा उसाचे बिल निघाले की ह्यावेळी अजुन एक मिशिन घेऊ.

आमीबी

98

आमीबी कालच्याला एक टीरॅक्टर, एक कापनी येंत्र नी एक पेरनी येंत्र खरीदल..
काम सोप्प/लवकर हुतय.. पन बॅलंसचा सुफडासाफ...........


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हा हा हा!

99

हा हा हा! च्यायला अडाणि खोटे खोटे शेतकरी कुठले! wink


-Nile

इतिहासाची पुनरावृत्ती ;)

100

श्री. एस. जोशी
-- परदेशात शिक्षण
-- भारतात परत
-- प्रस्थापितांकडून आणीबाणी जारी
-- शेतकरी संघटनेची उभारणी

तीसेक वर्षांनी

श्री. एस. जोशी
-- परदेशात शिक्षण
-- भारतात परत
-- प्रस्थापितांकडून आणीबाणी जारी
-- (इ)शेतकरी संघटनेची उभारणी

नंदन शेठ

101

नंदन शेठ एक महत्त्वाचा फरक विसरु नका. आधुनिक जोशी त्यांचा अनिवासीपणाला जागुन अमेरीकन भांडवलशहासाठीच शेती करत आहेत. wink


-Nile

+ १ सहमत

102

+ १

सहमत आहे.

शेवटी हिरव्या डॉलरचा माज... आजून काय.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१/__

103
आधुनिक जोशी त्यांचा अनिवासीपणाला जागुन अमेरीकन भांडवलशहासाठीच शेती करत आहेत.

--- सहमत आहे, मात्र रिडंडंट विषय, आड्मुठे विचार आणि क्लोस्ड माइंडमुळे आम्ही या विषयावर भाष्य करणे बंद केले आहे wink

+ १
सहमत आहे.
शेवटी हिरव्या डॉलरचा माज

--- हॅ हॅ हॅ. कुलकर्ण्याने-जरी-हॉल-अर्धा-बाय-दीडचा-आहे-असं-सांगितलं-असतं-तरी-मी-'अरे वा!'-असंच-म्हटलं-असतं ह्या मोडमध्ये गेलात की काय राजे? हास्य

मात्र

104

मात्र रिडंडंट विषय, आड्मुठे विचार आणि क्लोस्ड माइंडमुळे आम्ही या विषयावर भाष्य करणे बंद केले आहे

अगदी अगदी


-निखिल

हॅ हॅ हॅ,

105

हॅ हॅ हॅ, पलायनवाद म्हणजे उत्तरे.... जाउद्या! wink


-Nile

ए गपा!

106

ए गपा! सायेबाच्या देशाला का हिरव्या नोटांच्या माजात मोजताय??

त्यातून नंद्या तुझ्या हातात आणखी एक कोलीत देते, माझ्या इनीशियल्सः एस.एम. जोशी! ;-)

(संहिता मनोहर जोशी) अदिती

अवांतरः आणखी कोलीत घ्या रे माकडांनो, आमचे बापू मास्तर होते ...

एक पसार !

107

Sad

एक पसार !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."