एक प्रश्न

0
0

आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी.

गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात.

फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे.

आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल")

ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?

{गांधीजींच्या तत्वा विरुध्द}

1

गांधीजींच्या तत्वा विरुध्द जाऊन नथुराम गोंडसे ह्यांना फाशी दिली त्यांचा विरोध कॉग्रेस मधून झाला का ? हे शोधण्याचा विषय आहे.
शक्यतो, नाही. कारण गांधी तो पर्यंत एवढे मोठे झाले होते की त्यांची हत्या करणार्‍याला फाशीच योग्य असे त्यांच्या अनुयायींचे देखील मत झाले असावे.

****

सर्वसामान्य लोकांचे तत्वज्ञान खुप लवचिक असते व त्यांचे विश्व हे घरापुरते मर्यादित, त्यामुळे त्या क्षणी त्यांना काही फोलपणा जाणवण्यापेक्षा चिंता लागून राहत असेल, की माझ्यानंतर ह्यांचे काय होणार इत्यादी. पण जे एका उंचीवर पोहचले आहेत ( मोठा नेता, आध्यात्मिक गुरु इतर) त्यांना नक्कीच फोलपणा जाणवत असेल कारण तो क्षण येऊ पर्यंत, त्यांने निर्माण केलेल्या तत्वांची हेटाळणी / गैरवापर त्याच्याच समर्थकांकडून सुरु झालेली असेल अथवा होणार हे कळलेले असते.

श्री सर्वसाक्षी, ह्यांचे आभार http://www.mimarathi.net/node/4027 त्यांच्या ह्या लिंकमुळे http://www.mimarathi.net/node/1354 हा सुरेख लेख व प्रतिसाद वाचावयास मिळाले.

आभारी आहे.

{पुनश्च हरिओम !!}

2

कारण गांधी तो पर्यंत एवढे मोठे झाले होते की त्यांची हत्या करणार्‍याला फाशीच योग्य असे त्यांच्या अनुयायींचे देखील मत झाले असावे.>>>

हे सयुक्तीक आहे, वास्तव नाही. गांधी खरोखरच मोठा झाला का ? मुळात हाच प्रश्न आहे. पण तो पहिला प्रश्न आणी दुसरा जर झाला तर कसा काय ?

माझे मत, दोन्ही व्यक्तींविषयी आदर आहे. ज्याने ज्या वेळेला जो विचार करून कृत्य केले त्या-त्या कालात नक्कीच समर्थनीय किंवा काहींच्या मते असमर्थनीय असु शकते, दोघांनी मात्र भारताच्या इतिहास शिक्का ऊमटवला हे नक्की !(दोघांनाही जनमानसात पाठिंबा होता हे विसरून चालणार नाही.) पण म्हणुन मी आज कोणी जर, जो खरोखरच गांधीच्या विचाराने चालतो म्हणुन त्याला गोळी घालत असेल तर मी त्याच समर्थन करणार नाही वा तसेच कोणी कोणालाही गोळ्या घातल्या म्हणुन फाशी दिली जाणार असेल तर त्याचही समर्थन ही करणार नाही, अर्थात कसाब, अफजलगुरु यांसारखे नराधम सोडुन.

याऊलट एक सवाल असाही येतो. गोडसेंनी हत्या करून एका अर्थाने गांधीना 'अजरामर' च केले नाही का ?

{>> गोडसेंनी हत्या करून एका}

3

>> गोडसेंनी हत्या करून एका अर्थाने गांधीना 'अजरामर' च केले नाही का ?

हत्या झाली तरी तरी ते अजरामर झाले होते. त्यांचे कार्य कोणीही नाकारु दे, पण भारतीय समाजाने त्यावेळी त्यांना आपल्या ह्दयात स्थान दिले होतेच.

{>>त्याविरुद्ध आंदोलन केले}

4

>>त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे.

+ १

खरं आहे.


Hope is a good thing...

{चर्चा वाचतो आहे, योग्यवेळी}

5

चर्चा वाचतो आहे, योग्यवेळी तलवार घेऊन मैदानात येऊ.


___________________________________
योगेश नाईक

{नथुराम गोडसे आणि}

6

नथुराम गोडसे आणि 'पुण्य'तिथी???? झेपलं नाही. गुन्हेगाराच्या मृत्युदिनाला 'पुण्य'तिथी म्हणत नाही आमच्याकडे.
बाकी चर्चेबद्दल आमची हाताची घडी तोंडावर बोट.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{नथुराम गोडसे आणि}

7

नथुराम गोडसे आणि 'पुण्य'तिथी???? झेपलं नाही. >>>
कस व्हायचं काकांच ? ईल्युमिनाटि हा शब्द विसरलात !