मॅडकॅप ३

0
0

नियमात राहुन नियम मोडणे नेहेमीच आवडते.
आजची गोष्ट घ्या.
बुधवार, मासळीचा वार.
दुपारी एका प्रख्यात हॉटेलात जायचे ठरले.
मित्र पण बरोबर होता.
'पापलेट थाळी' मागवली.
थाळी सुंदर सजवलेली होती.
तोंडाला पाणी सुटले.
पहीला तुकडा तोंडात टाकला.
निराशा झाली.
पापलेट ताजे नव्हते.
कालचा माल होता.
वेटरला बोलवले.
मित्र अस्वस्थ.
आता मी भांडण करतो की काय ह्या विचाराने.
तुकडा तोडल्यावर तक्रार करण्यात अर्थ नाही असा सुर त्याने लावला.
'पहीले इस्तेमाल करो फिर विश्वास करो' हा नियम हॉटेलात नाही हे मला पण समजत होते.
पण फुकट तर जेवत नव्हतो ना.
निषेध नोंदवायला काय हरकत?
वेटर आला.
तोडलेला तुकडा बघितल्यावर त्याने मॅनेजर ला बोलवले.
आपला माल ससुन डॉक वरुनच रोज सकाळी येतो ह्याची खात्री मॅनेजर देउ लागला.
आता कोकण्याबरोबर 'मासळीवाद' जिंकणे कसे काय शक्य होते.
मॅनेजर सभ्य भाषा ऐकेना.
शेवटी बापाला 'कुटूंब कल्याण' शिकवायचे नाही हे वाक्य काढल्यावर मॅनेजर भानावर आला.
लगेच प्लेट बदली करुन फ्राय च्या ऐवजी पापलेट करी आली.
अगदी मनसोक्त जेवण झाले.
आदल्या दिवशीचा माल फ्राय मधे निघतो हे मला माहीत होते.
मित्राने जेवण झाल्यावर साष्टांग घातले.

शेवटी

शेवटी बापाला 'कुटूंब कल्याण' शिकवायचे नाही हे वाक्य काढल्यावर मॅनेजर भानावर आला.

शाब्बास... लातों के भुत बातों से नही मानते हेच खरे.

+ १

असेच म्हणतो.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ह्म्म नाही

ह्म्म नाही पटले...

-निखिल

काय?

काय पटले नाही ते तरी सांगा.

शेवटी

शेवटी बापाला 'कुटूंब कल्याण' शिकवायचे नाही हे वाक्य काढल्यावर मॅनेजर भानावर आला.

हे वाक्य वापरणे नाही पटले... बाकी प्रत्येकच गोष्ट पटायला पाहिजे असे थोडीच असते हास्य

-निखिल

श्री.

श्री. निखिल-जी यावाक्याचे बरेच व्हेरियंट्स आहेत आणि सगळेच लोक ते पदोपदी वापरत असतात. असो.

ह्या

ह्या वाक्याचे किति वॅरिअ‍ॅणट्स आहेत त्याचाशी माझे काही घेणे देणे नाही..
जर लोग त्याचा पदोपदी वापर करीत असतील तर त्यांची मर्जी..
मला जर एखादी गोष्ट पतली नाही तर तसे म्हणायचा मी हक्क मला आहे असे मी समजतो. दुसरी बाजु चुक का बरोबर असे मी म्हणत नाहिए.. फक्त मला पतले नाही मी ते व्यक्त केल. असो मतमतांतर तअर असायचीच. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे जे वर वापरलेले वाक्य आहे त्याचे अ‍ॅप्लिकेशन माझ्या मनाला पटले नाही. आता माझे असे म्हणने जर तुम्हाला पटले नसेल तर दॅट्स युवर विव्ह अ‍ॅण्ड आय अ‍ॅक्सेप्ट ईट. असो

-निखिल

(विषय दिलेला नाही)

;(

वेरियन्ट

इथे लिहिताना तारतम्य बाळगले.
पण मुळ शब्दच वापरला.

शंका

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
शंका होती, खात्री पटली wink

जय हो !!!

जय हो !!!

जय हो !!! लिहीणं पटलं नाही; बाकी चालू द्यात.

चि./कु./श्रीमती

अदिती-जी-जय हो चे बरेच व्हेरियंट्स आहेत आणि सगळेच लोक ते पदोपदी ऐकत असतात. असो.

---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

या संपूर्ण प्रतिसादाचे कॉपीराईट्स श्री. रा.रा. नि.दे. यांना.

ह्या वाक्याचे किति वॅरिअ‍ॅणट्स आहेत त्याचाशी माझे काही घेणे देणे नाही..
जर लोग त्याचा पदोपदी वापर करीत असतील तर त्यांची मर्जी..
मला जर एखादी गोष्ट पतली नाही तर तसे म्हणायचा मी हक्क मला आहे असे मी समजतो. दुसरी बाजु चुक का बरोबर असे मी म्हणत नाहिए.. फक्त मला पतले नाही मी ते व्यक्त केल. असो मतमतांतर तअर असायचीच. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे जे वर वापरलेले वाक्य आहे त्याचे अ‍ॅप्लिकेशन माझ्या मनाला पटले नाही. आता माझे असे म्हणने जर तुम्हाला पटले नसेल तर दॅट्स युवर विव्ह अ‍ॅण्ड आय अ‍ॅक्सेप्ट ईट. असो

(विषय दिलेला नाही)

;(

---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

चूक! हा

चूक! हा प्रतिसाद मला प्रतिप्रतिसाद म्हणून यायला हवा होता! ;-)

लुटा लुफ्त

लुटा लुफ्त प्रतिसादांचा.

बा.झ.शिं.न. वर जोरदार चर्चा होऊन जाऊदे.

-पुण्याचे पेशवे

आदल्या

आदल्या दिवशीचा माल फ्राय मधे निघतो हे मला माहीत होते.

हे माहित होते तर फ्राय मागवलाच कशाला?*

*याचे इतर कोणतेही व्हेरीअंट्स नाहीत.

-Nile

येस्स

येस्स. माहिती होते तर फ्राय मागवलाच कशाला? आणि ही चूक चिचैचो यांनी करावी? गडबड आहे...

चिचैचोंचे

चिचैचोंचे वय झाले असे समजावे काय ?

नाही "पा"

नाही "पा" झाला ... शरीराने वाढले तरी अंगातल्या खोड्या कमी झाल्या नाहीत.

पा झाला

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

-निखिल

वयाने?

तुम्हाला वयाने म्हणायचे असेल बहुतेक.
शरीराची वाढ १८ लाच बंद झाली

या बाबतीत

या बाबतीत तुमचं म्हणणं प्रमाण ... असं म्हणायचा मोह टाळत आहे. चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या वाढत नाही आहेत का आता?

वेल

यू नो द रिअलिटी बेटर दॅन मी!!! wink

(विषय दिलेला नाही)

Big smile

चिचैचो

चिचैचो हे मास्तुरे आहेत काय?

आला रे आला,

आला रे आला, लेट करंट आला!

हॅ हॅ हॅ

एकम सत् बहुधा 'विप्रा:' वदन्ति हास्य

हीही

:8

विप्र आणि टिंग्या

मपल्याला सौंशय व्हताच ऽऽऽऽ स्मायलीमुळे फिक्स झालं

असो

असो चालुद्या wink

-निखिल

विप्र आणि

विप्र आणि टिंग्या

तरीच.....

कधी कधी..
मला असे वाटायचे..
असावे काहीतरी..
लफडं.. चालू.
पण एक कधी
बंद असतो
तर कधी एक
चालू त्यामुळे
शंकेला वाव होता
कधी कधी...
मला देखील असे वाटायचे.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे........... त

राजे...........
तुमची गोळ्या-औषधं घ्यायची वेळ झाली...

तुमची

तुमची गोळ्या-औषधं घ्यायची वेळ झाली...>>>
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud