आज सकाळी ऑफिसला यायचा मुड नव्हताच.. पण घरी बसून काय करायचे हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता??? मग काय कसे बसे उठलो पेपर हातात घेऊन रमत गमत कसे बसे तयार होत होतो तेवढ्यात झेंडा चित्रपटातल्या गाण्यांची सिडी हातात आली. मराठीत हार्ड रॉक का काय तरी आणायचे असे अवधूत गुप्ते म्हणत होता ते एकूण उगाचच झेंडाची सिडी घेतली पण फार वेळेस काही ऐकणे झालेच नव्हते. गाणे ऐकत ऐकतंच घाई घाईत आवरले पाहतो तर घडाळ्यात ९ चा आकडा दिसला. पळत पळतच चार मजले उतरलो सोसायटीच्या बाहेर आलो.. उशीर झाल्यावर जे होते तेच ऑटो स्टॅण्ड वर एक पण ऑटो नाही. चार ऑटोंना मुलुंड चेक नाका विचारले एक पण यायला तयार नाहीच. खरे पाहता ठाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत जायचंय तरीही हे रिक्षावाले का तयार होत नाहीत हे कळतच नाही. शेवटी कसा बसा ऑटोत बसलो.. कानात झेंडा चित्रपटातले ज्ञानेश्वर मेश्राम ह्याने गायलेले "झेंडा" हे गाणे अजूनही घोळत होतेच.
आपलीच माणसे आपलीच माती
तरी मेंढराला कळपाची भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
खरच कोणता झेंडा घेऊन चालायचे हे एक कोडच आहे... ह्याच विचारात पोहचलो मुलुंड चेक नाक्याला.. हा चेक नाका म्हणजे मुंबई आणि ठाण्यातली हद्द. काही दिवसांनी इथे सामाना सोबत पासपोर्टही मागतील का काय... एक रिक्षा सोडून मुंबईच्या बाजूची रिक्षा पकडण्यासाठी चालत पुढे रिक्षा स्टॅण्ड पर्यंत आलो. इथेही रांग होतीच पाच मिनिटात रिक्षा मिळालीच साधारण अर्ध्या तासाचा रस्ता. रिक्षा सुरू होवून पहिला सिग्नल जेमतेम ओलांडला लगेच रिक्षावाल्याने टेप सुरू केला. रिक्षा मधल्या म्युझिक सिस्टम मध्ये एक जादू असते. काही गाणे केवळ रिक्शात वाजवण्यासाठी तयार केलेले आहेत की काय असे वाटावे असेच असतात. टेप सुरू झाला म्युझिक ऐकून गाणे ओळखायचा प्रयत्न केला आणि गाणे एकदम डोळ्या समोरच आले. काय सांगावे ह्या गाण्याबद्दल.. छायागीत आणि चित्रहार मध्ये हे गाणे तर वाजायचेच नेहमी. "जान तेरे नाम" चित्रपटातले "फर्स्ट टाइम देखा तुझे" ह्याचे गायक तर आठवत नाहीत पण रिक्शांत एकदम काहीतरी वेगळाच आनंद देऊन जात होते.
फर्स्ट टाइम देखा तुझे हम खो गया
सेंकड टाइम मे लव हो गया
ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पै मरता है
दिल क्या चीज हे जानम जान तेरे नाम करता हे
ह्या गाण्याचा लुफ्त लुटल्यानंतर पुढचे गाणे कोणते असेल विचार करत होतोच.. त्यात अचानक ओळखीचे स्वर आले आणि सुरू झाले हसन जहांगिराचे हवा हवा. अरे काय जादू होती ह्या गाण्यात एका जमण्याला वेड लावले होते ह्या गाण्याने.. अर्थात रिक्शात ऐकायची मौज काही औरच.. कॅसेट नेहमी प्रमाणे घासलेलीच पण जर कॅसेट घासलेली नसेल तर रिक्शांत गाणे ऐकण्यात काय मजा??? पण हवा हवा जोरातच होते. खरे तर हा पाकिस्तानी कलाकार पण ह्यालाच भारतात पॉप गायकी पॉप्युलर करणारा मानला पाहिजे.
हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे
कहा खुली हा खुली, जुल्फ बता दे
अब उसका पता दे, जरा मुझको बता दे
मै उससे मिलुंगा, एक बार मिला दे
यार मिला दे, दिलदार मिलादे
गाण्याचा शेवटी शेवटी कॅसेट अडकत होतीच.. रिक्षावाल्याने काहीतरी केले आणि पुढचे गाणे सुरू झाले. हे पण एक रिक्षा स्पेशल गाणे... मोहरा चित्रपटातले " ना कजरे की धार"... साधना सरगम आणि पंकज उदास ह्यांनी गायलेले हे गाणे ऍनादार रिक्षावाला'स फेवरीट...
ना कजरे की धार, ना मोतियोंका हार
ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो
मन मै प्यार भरा, और तन मैन प्यार भरा
जीवन मै प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो
जेम तेम हे गाणे सुरू होते आणि पुढच्या चौकातला पोलिस हवालदार पाहून रिक्षावाल्याने गाणे बंद केले. तो चौक गेल्या नंतर साधारण पाच एक मिनिटाने मीच त्याला गाणे सुरू कर म्हणून सांगितले. पुढचे गाणे असेच एक गाणे दिलवाले चित्रपटातले गाणे "इक ऐसी लाडकी थी" कुमार सानू ह्यांनी गायलेले गाणे नेहमीच रिक्शांत ऐकायला मिळते.
जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था
एक ऐसी लाडकी थी जिसे मै प्यार करता था.
हे गाणे संपायच्या आतच आमची कॅसेट अडकली... ती बाहेर काढण्याचा नादात रिक्षावाल्याकडून तुटली पण... ऑफिस जवळ आले होते. पण अशी कॅसेट खराब होवून हा प्रवास संपणे काही केल्या मनाला पटत नव्हते.. आज रिक्शात बसल्या बसल्या ही गाणी मला एका वेगळ्याच आठवणीत घेऊन गेली..निदान माझा कंटाळा तरी घालवला. तर सांगा मंडळी तुमची रिक्शातल्या स्पेशल मुजिक सिस्टम वर ऐकायची आवडती गाणी कोणती.
खरे पाहता
खरे पाहता ठाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत जायचंय तरीही हे रिक्षावाले का तयार होत नाहीत हे कळतच नाही.
माणुस पाहुन ते येणार की नाही असे सांगतात
शेवटी कसा बसा ऑटोत बसलो
तरी सांगतो जरा आकार कमी करा
पण अशी कॅसेट खराब होवून हा प्रवास संपणे काही केल्या मनाला पटत नव्हते..
बापरे अरे देऽवाऽऽऽ आता कसं होणारऽऽ.. असं कर येतांना देवाला जावुन ये, नारळ,पेढ्याचा नेवैद्य दाखव. सगळं नीट होईल बाबा
(हे गंमतीत आहे. काही होणार नाही.. चिलॅक्स )
अरे हो
अरे हो लेखाबद्दल बोलायचेच राहिले.. उगाच प्रतिसाद अवांतर ठरायचा.
लेख छान ! उत्तम...
+१
सहमत.
वाह वाह
गाणी छानच. नंदनकाकांना कदाचित ही सगळीच नवीन वाटतील.
खरे तर हा पाकिस्तानी कलाकार पण ह्यालाच भारतात पॉप गायकी पॉप्युलर करणारा मानला पाहिजे
बहुतेक तो मान मरहूम नाझीया हसन तैंना जातो
लेटेस्ट
लेटेस्ट मधे हिमेश भाईचं .........'आशिक बनाया' आपने आणी 'एक बार आजा आजा आजा'............
आणी स्पेशली सोनू निगमचे वडील अगम कुमार निगम यांची गाणी...
रिक्षात फिरण्याची वेळ येत नाही...
पण कारमधे फिरताना गाणी ऐकायला आवडतात. बहुतेकदा मी आनंद शिंदे-मिलींद शिंदेंच्या लावण्याच्या कॅसेट्-सीडी विकत घेऊन लावतो. मस्त टाईमपास होतो अन ड्रायव्हर पण एंजॉय करतो. झालंच तर निवृत्ती महाराज देशमुखांची कीर्तन्-प्रवचनं पण भारी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
शी: काय घाण
शी: काय घाण गाणी एकतोस रे....
त्यापेक्षा सकस असे शास्त्रिय संगीत / मल्ल्हार राग / बंदिश असले काही कानावर घातले असतेस तर तुझ्या ह्या जन्माचा उध्द्दार झाला असता, असो.
बदला आता.
लहान नाही राहिलात.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोणतेही
कोणतेही गाणे घाण नसते मित्रा...
ह्यात माझ्या बरोबर ह्या रिक्षावाल्याचाहि आवडी लक्षात घ्याव्याच. खरे तर क्रिक्षावाला रागदारीच संगीत एकु शकतो का??? त्याला त्याचे ज्ञान उपलब्ध असु शकते का??? त्याला शास्त्रिय संगिताच्या कॅसेटी स्वःस्तात उपलब्ध आहेत का??
अरे संगीत हे संगीत असते....
आम्हाला तर ब्वॉ मेटेलिका, निर्वाणा, ग्रीन डे द्या... किंवा किशोर्ची गाणी द्या.. वसंतरावचे नाट्यसंगीत द्या.. संदीप सलील ची गाणि द्या नाही तर प्रितम ने चोरलेले गाणे द्या आम्ही त्याच शांततेने ऐकु शकतो.
असो कुल शेकराचे नमामी नंद नंदनम् हे गाणे एका बरे आता...
-निखिल
अरे,
अरे, चांगल्या कले साठी चार पैसे खर्च करावे लागतात नाही तर कमी पैशात माडी तर चढावी लागेल.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे परत
राजे परत तेच..
आहो कला कोणती चांगली हे सापेक्ष आहे..
आणि सध्याचा जमान्यात जे विकल्या जाते ते चांगले आहे...
त्यामुळे माडीवर चालणारी कला चांगली का वाईट असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाच्या आवडीनुसार कुवतीनुसार जो तो आपला कला प्रकार निवडतो त्या मु़ळे त्याल हिणवण्यात काहिच अर्थ नाही.
-निखिल
निख्या
निख्या तुझ्या प्रतिसादात प्रा डॉ आणि राजाच्या प्रतिसादात मालक दिसले.
-पुण्याचे पेशवे
शेवटी आमची
शेवटी आमची डिग्री पन डॉ बामु (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) ची हाय... मंग थोडी तरी प्रॉ डॉ ची छाप येईलच ना
-निखिल
मस्त विषय निक्स!
राजा हिंदुस्तानी चित्रअटातलं पर्र्देसी पर्र्देसी जाना नहींSSSS
हम्म्म्म!
खरे आहे. आता इथुन पुढे यमन राग ऐकत जाईन. आता फक्त सकस शास्त्रीय संगीत, अगदी कसकस आली तरी.
असो बदलिन
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
रिक्षा,कार,
रिक्षा,कार,ट्रक टुव्ही...कसाही गेलो तरी आप्ल्याबरोबर.नेहमी असते ते म्हणजे एफ्.एम्....आणी काही किशोर काही नवीन आणी कार्तीकीची दोन ...आर आर पावट्या आणी लिंबोणीचा डोंगर...
बाकी लिखाणाबद्दल..
निखील वेगळा विषय आनी व्यवस्थित हाताळलेला
+ १
निखील वेगळा विषय आनी व्यवस्थित हाताळलेला
असेच म्हणतो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
+२
सहमत आहे. विनोद राठोडची 'छुपाना भी नहीं आता' टाईपची गाणीही इथेच ऐकायला मिळतात.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे का
अरे का साल्यानो असल्या गाण्यांची आठवण करून देता रे... नतद्रष्टांनो...
अरे वा
अरे वा नंदन साहेब छुपाना भी नही आता काय आठ्वण करुन दिली आहे...
असो बिका काका अजुन आम्ही आशिकी आणि बेवफा सनम ची आठवण काढलेली नाहिए
-निखिल
पण काहीही
पण काहीही म्हणा, सोनू निगमच्या आवाजातल्या बेवफा सनम ची जादू काही औरच आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
टंकनिकेची आठवण झाली का?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
टंकनिका
टंकनिका नाही हो... अंमळ च आहे तिथे.
अहो
अहो प्रसनदा, आठवण त्यांची होते जे लांब असतात ...
+१
+१
सहमत. मी
सहमत.
मी टोळ
मी टोळ
मित्रांनो
मित्रांनो एक लक्षात घ्या.. कार मधे एकायची गाणे वेगळी असतात..
तिथे आपला चॉईस चालत्तो ईथे गाणे सिलेक्ट रिक्षेवाला करीतो.. त्याने वापरलेले स्पिकर युनिक क्वॉलिटि असतात जे फक्त रिक्षातच आढळतात
-निखिल
आणी त्या
आणी त्या युनिक क्वॉलिटि स्पीकर्स ना झनकार स्पीकर्स म्हणतात....
झनकार हा
झनकार हा ब्रॅण्ड आहे का जेनर???
-निखिल
अरे..त्यातू
अरे..त्यातून झन झन असा लेझीम सारखा आवाज येतो म्हणून म्हणतात....ब्रांड ब्रिंड काही नाही
अरे तु असे
अरे तु असे सांगीतलेस की ते स्पिकर घ्यायचे असतील तर दुकानात जाउन झनकार स्पिकर द्या असे म्हणावे लागते.
असो आपण त्याचे बारसे करु
-निखिल
गुलजारने
गुलजारने त्याची एक गोष्ट सांगितली होती; तो मेघना, आपल्या मुलीला म्हणाला, "एखादं गाणं 'हिट' झालं हे कसं ओळखावं? तर रिक्षातही जोरजोरात हे गाणं वाजलं पाहिजे." बोलणं संपायच्या आधीच समोरून एक रिक्षा गेली आणि आत गाणं वाजत होतं ... कजरारे कजरारे ...
मला रिक्षात गाणी ऐकायची सवय नाही, पण हैद्राबादेतले रिक्षावाले येवढ्या जोरात गाणी लावतात की ती सवय नाही याचाच आनंद होतो.
गुलजार
गुलजार साहेबांचा किस्सा मस्तच..
रिक्षात गाणे एकायला न आवडणारे खरच खुप लोक आहेत..
पण मला काही गाणे त्या रिक्षातल्या स्पिकरवर्च एकायला आवडतात
-निखिल
छूक छूक छीक
रीक्षात कोणतीही गाणी लावली तरी बाहेरच्या माणसाला फक्त छूक छूक छीक छूक छूक छीक छूक छूक छीक छीक असेच का ऐकु येते हा एक प्रश्नच आहे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
तुम्हालाच
तुम्हालाच असे होत असावे विजुभाउ... रात्री झोपतांना तेल घालुन झोपा. (कानात बर का )
(विषय दिलेला नाही)
अरेरे....निख
अरेरे....निखीलसेठ..ओ निखिलसेठ....
काळजाला हात घातला की हो तुम्ही! आहाहा...काय त्या जुन्या आठवणी...त्या छानदार खुळखुळ्या रिक्षा, त्यातले ते चालक..त्यांनी लावलेली गाणी....हाय..जीव अंमळ हळवा झाला..
बाकी, रिक्षामधली गाणी म्हणलं की
"बस एक सनम चाऽऽहियें...आशिकी के लिये"
आणि त्या आशिकीमधली इतर सर्व गाणी..
हिम्मेसभायची सगळी गाणी...आणि सर्वात महत्वाचे आणि चपखल बसणारे म्हणजे..
"तुम तो ठेहरे परद्येएएऽऽस्सी..साऽऽत्त क्या निबाओगें.."
ह्याशिवाय रिक्षाप्रवास संगितानन्योभवाची परिपुर्तता ती कशी व्हावी???
बाकी,गेल्या वर्षी भांडुपमधुन हापिसाला जाताना बर्याचदा जो रिक्षावाला आमच्यावर कृपा करायचा त्या नवनाथच्या (होय होय..चक्क मराठी रिक्षावाला..तेही मुंबईत!) रिक्षात गोरेगावला पोचेपर्यंत छान सकाळच्यावेळी 'माझे माहेर पंढरी' वगैरे चक्क चांगली देवादिकांची गाणी ऐकुन मीही भक्तीमार्गाला लागलो !
धमाल
धमाल राव
तुम्ही पण तर काय आठवणी काढल्या राव..
आशीकी चित्रपटातले सगळे गाणेच रिक्षावाला क्लासिक्स...
अल्ताफ राजाच्या बाबतीत सुद्धा तेच मत आहे...
तुमचे खरोखर भाग्य हो... माझे माहेर पंढरी व्हाला रिक्षेवाला मिळाला ते.
-निखिल
>>मीही
>>मीही भक्तीमार्गाला लागलो !
ओक्के
नाय
नाय नाय...
'ओक्के'पर्यंत नाय, नॉर्मलच.
अरे...देऽवा
अरे...देऽवाऽऽऽ
आता ही कोण भक्ती ? आणि तिचा कोणता मार्ग ?
आमच्याकडे
आमच्याकडे आहे एक भक्ती... पण तिचा मार्ग लय डेंजर हाये... धम्या नाय तर धमीला विचारा...
तिचा डेंजर
तिचा डेंजर मार्ग आपल्याला आवडतो ब्वॉ ... अंमळ नाचणार्या जर्मन मोरासारखा आहे, नाही का बिका?
हो ना...
हो ना... वाईट संगतीचा परिणाम...
आधीच सांगत
आधीच सांगत होते, त्या द्मुपासून तिला लांब ठेव म्हणून!
हो ती
हो ती काळजी घेतली होती.. पण नेमकी तुझ्या तावडीत सापडली...
तुमचं नशीब
तुमचं नशीब बरं म्हणून मी किमान "नाच रे मोरा" शिकवलं. नायतर त्या द्मुनेपण तिला पक्षांची नावं शिकवायला सुरूवात केली होती, "नवीन पोपट हा", "कोंबडी पळाली" ...
धम्या, काय
धम्या, काय रे... तुझ्याकडे नवीन आहे म्हणे पोपट?
ए गप
ए गप ए!
उद्या विचारशील... 'कोंबडी का पळाली?'
म्हणजे
म्हणजे कोंबडी पण आहे म्हणजे!!! हम्म्म!!!
छान चर्चा
छान चर्चा
आन कोंबडा?
का तो आधीच मारीयेला आहे?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आमच्याकडे
आपुन पैलेछुट हार मान्य क्येलेली हाये! येकदम दंडवत आपला.
>>आधीच सांगत होते, त्या द्मुपासून तिला लांब ठेव म्हणून!
ह्म्म...एक म्हण आठवली... "*गुन जातो गाव आणि गुरवावर नाव"
त्या बिचार्या शहाण्या पोरीला 'बाबाला जर्मनमध्ये 'नाच रे मोरा' म्हणता येतं हे कुणी सांगितलं? मी??'
अरे कुठे फेडाल ही पापं? इवल्याशा जीवाला असं खोटंनाटं सांगुन फसवता!
असो! झालेल्या विषयांतराबद्दल क्षमस्व.
लई डेंजर आहे...
पण आवडली आपल्याला... तिच्यामते तिचे नांव भ क ती आहे
नि मी तिला मस्ती ऐकू येते असे सांगून छळत होते....
बस्स एक सनम चाहिए....
"बस एक सनम चाऽऽहियें...आशिकी के लिये" आणि त्या आशिकीमधली इतर सर्व गाणी..
"तुम तो ठेहरे परद्येएएऽऽस्सी..साऽऽत्त क्या निबाओगें.."
ही तर गाणी त्यांची नेहमीचीच.. पण धमु...
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
हे तू कसा विसरलास रे??? नि त्यानंतर त्याच कॅसेटची मराठी आवृतीपण निघाली होती...
आता त्यातलं एकच गाणं आठवतंय...
दु:ख विसराया पितो दिनरात मी शराब.... तुझी जागा दिली मी तिला माझ्या हृदयात
पहिल्यांदा ही गाणी ऐकली तेव्हा त्या रिक्षातच हसून हसून पुरेवाट झाली होती....
अंमळ असहमत
अंमळ असहमत आहे. "परदेसी परदेसी", "तुम तो ठहरे परदेसी" ही गाणी फक्त गाडीतल्या भिकार्यांसाठी रिझर्व्ह्ड आहेत ... तीसुद्धा हातात दोन दगड घेऊन टकर-टकर आवाज करत म्हणण्यासाठीच!
हा हा हा..
पहिल्यांदा जेव्हा ते पाहिले होते तेव्हा मी ती हे दगड कसे वाजवतेय हे अगदी त्या मुलीजवळ जाऊन बघत बसले होते... हे गाणं त्याआधी मी फक्त रिक्षातच ऐकले होते.... त्यामुळे तुझ्याशी सहमतही.. नि असहमतही आहे...
बाकी.. गाडीतल्या भिकार्यांविषयी असंच आठवलं म्हणून एक आठवण सांगते...
दोन-तीन वर्षांपूर्वी घरातल्यांसोबत ट्रेनने छशिट ला चालले होते... रविवारचा दिवस.. गर्दीही नव्हती.. त्यामुळे उगाच लेडिज डबा नि जनरल डबा असं न करता सगळे एकत्रच बसलो होतो.... साधारण नेरूळला एक चाळीशीचा माणूस त्याच्यासोबत १८-१९ ची मुलगी नि ३-४ वर्षांचा मुलगा यांना घेऊन गाडीत चढला... ते तिघे एका बाकड्यावर बसले नि त्या माणसाने चढता सूरज, आप यूँही अगर हमसे मिलते रहे, बंदा परवर, लाखोंहै निगाहमें.. अशी छान जुनी गाणी पेटीवर म्हणायला सुरूवात केली... त्याचा आवाजही चांगला पहाडी होता.. नि नेहेमीच्या भिकार्यांसारखा कर्कश्य नव्हता... कोरसच्या ठिकाणी बाकीचे दोघे त्याला साथ देत होते... मुलगा लाजत होता... पण हे दोघे त्याला प्रोत्साहन देत होते... त्या तिघांतले कुणीही पैसे मागायला इकडे तिकडे फिरले नाही...हळूहळू ते जिथे बसले होते, त्यांच्या आसपास लोक येऊन आपणहून बसले... ते फर्माईश करत होते.. नि त्या माणसालाही पुष्कळ गाणी पाठ होती.. तोही गात होता..अगदी शेवटच्या थांब्यापर्यंत ही मस्त संगीताची सफर चालू होती.....ऐकणार्यांनीही जेब खोलके पैसे दिले... त्यांना मिळालेली कमीत कमी रक्कम दहा रूपये असेल...
मधूनच त्या मुलाला एकट्याला गायचा आग्रह झाला.. तो गात नव्हता म्हणून मुलीने धूम मचाले गाणे चालू केले... नि तो गायला लागल्यावर तिचा आवाज खालच्या पट्टीत आला.. सगळ्यांना त्या छोट्याचे कौतुक वाटत होते.. त्याला तर त्याच्या बाबा-ताईंना मिळून एवढया सगळ्या गाण्यांसाठी जितके पैसे मिळाले असतील त्याच्या निम्मे पैसे या एकाच गाण्याला मिळाले...
त्यवेळेस मी बहुधा आयुष्यात पहिल्यांदाच न मागता भीक दिली असेल...बाहेर पडताना मात्र एकच विचार होता... आज या मुलाचे कौतुक होतेय.. पण त्याचे भविष्य काय असेल?? असाच तो आयुष्यभर ट्रेनमध्ये गाणी म्हणत फिरणार का???
असंच
असंच काहीसं मीही काही वेळा पाहिलं आहे. बर्यापैकी गाणार्या लोकांना न मागता पैसे मिळतात. पण मोठ्यांबरोबरची ती पोरं, किंवा सेफ्टीपिना-हेअरबँड विकणार्या कोवळ्या मुली पाहिल्या की त्रास होतो.
अरे कसले
अरे कसले रे हे गाणे... काहीही फालतू लेख उगाच उचलून धरता
अंमळ
अंमळ वेडझवाच आहे हा धागा.
खरं आहे!
सौ. राजकुमार फार कमी बोलतात्....पण जे बोलतात ते खरं बोलतात!
मी
मी मराठीच्या वाचकांना लेखनाचे कौतुकच नाही.
आम्ही एवढ्या महेनतीने हा धागा तयार केला आणि लोक येवुन त्याला काय काय अभद्र शब्द वापरत आहेत.
नुसत्या गप्पा पाहिजेत
-निखिल
:)
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
नंदनभौंना सहमत!
+२
टींग्या भौ शी सहमत
-निखिल