फुकट ओ.एस. आणि इतर सॉफ्टवेअर विषयी माहीती हवी आहे
मला नवीन कॉम्पुटर घ्यायचा आहे व्यक्तीगत वापरासाठी, पण त्यावर चे सगळे सॉफ्टवेअर फुकटवाले हवे आहेत.
मला त्या ओ.एस. ची नाव माहीती आहेत, पण ते कुठे मिळेल सी.डी. वर? नेटवर बघितल मॅन्ड्रीव्हा च तर च्यायला ते ४.३ जी.बी. आहे. तसेच रेड हॅट, मॅन्ड्रीव्हा, उबंटू पैकी नक्की कोणत सोप आहे, किंवा त्यापैकी कोणत्या ओ.एस. ला सपोर्ट चांगला मिळेल.
तसच ओ.एस. शिवाय बाकि जे जे लागेल, जस की ऑफीस, मीडीया प्लेयर वगैरे.
भारतात सर्वसाधारपणे हे वापरायला काही समस्या येतात का. या सगळ्याविषयी मार्गदर्शन हव आहे. यासंदर्भातील कोणतीही माहीती स्वागतार्ह आहे.

.jpg)
{उबंटू छान}
उबंटू छान आहे, वापरावयास सुटसुटीत आहे.
Hope is a good thing...
{उबंटु}
उबंटु वापरुन बघितले आहे छानच आहे.
बाकी सॉफ्टवेअर तुम्हाला मिळतीलच
ऑफिस सॉफ्टवेअर साठी ओपन ऑफिस बेष्ट आहे.
-निखिल
{+ १ ओपन ऑफिस}
+ १
ओपन ऑफिस बेस्टच.
बाकी इनबिल्ट येतात सगळेच जवळ जवळ सॉफ्टवेअर मिळतात.
Hope is a good thing...
{उबंटू}
उबंटू च्या सी.डी.ज मी २००५ मधे मागवल्या होत्या, ते इन्स्टॉल केल पण अजिबातच वापरल नाही. ओपन ऑफीस शी थोडीफार ओळख आहे. पण बाकी सगळच (मीडीया प्लेयर, मेल वगैरे) नेहमीचच वापरल आहे.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{मदरबोर्ड आणि }
मदरबोर्ड आणि बाकिच्या गोष्टींच्या काँपॅटीबिलिटी चा काही घोळ होतो का?
कारण मी AMD घ्यायच्या विचारात आहे.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{सातारकर,}
सातारकर, नवीनतम उबूंटू घ्या. डाऊनलोड करूनही इन्स्टॉल करता येईल. घरी इंटरनेट नसेल तर आपल्या पर्याच्या कॅफेत जा!
मी स्वतः गेलं वर्षभर उबूंटू वापरत आहे, अनुभव चांगला आहेच आहे. ज्यांना लिनक्स वापरण्यात विंट्रेश्ट आहे त्यांच्या डोक्याला काही त्रास न देता उबुंटू, कुबुंटू अतिशय चांगल्या चालतात.
{हे उबूंटू}
हे उबूंटू काय असत बॉ?
{हे वाचा}
हे वाचा आणि मग पुढचे प्रश्न व्यनीने विचारा. उगाच लोकांसमोर आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन नको, नाही का!!
{मी उबंटू}
मी उबंटू वापरलेले होते. झुळ्झूळीत, हलके, चांगल्या पोताचे, स्वस्त (चकटचफू) आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{श्री}
श्री सातारकर,
पुण्यामध्ये 'पुणे लिनक्स युजर्स ग्रुप' नावाची एक संस्था आहे. त्यांच्यातर्फे माफक दरामध्ये घरपोच सिडी/डिव्हिडी मिळतात.
लिनक्सचे निरनिराळे फ्लेवर्सही निवडीचे स्वातंत्र्य आहे.
इतरांनी सुचवल्याप्रमाणे उबंटु सर्वात सोपे आणी कमी त्रासदायक आहे.
सोबत गरजेचे सॉफ्टवेअर्स/गुडीजदेखील आहेत.
कदाचित ह्याची आपल्याला मदत व्हावी.
{धन्यवाद}
धन्यवाद निखील, राजे, आदितीतै आणि धमाल मुलगा.
माझी फक्त एकच भीती होती / आहे की त्यान एखाद्या विशिष्ट हार्डवेअर ला सपोर्ट केल नाही तर सगळच मुसळ केरात, आणि मला आता खिडकीतून जग बघायच नाही.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{उबूंटुचं}
उबूंटुचं योग्य व्हर्जन घ्या, शक्यतोवर काही त्रास होऊ नये. आणि अगदीच काही होऊन लिनक्स चाललं नाही तर फक्त एक सी.डी. फुकट जाईल, बाकी काही नाही.
एका मित्राच्या स्वाक्षरीतलं वाक्य आठवलं:
Microsoft is not the answer. Microsoft is the question. "NO" is the answer.
{NO}
हा हा हा .. कोणत्याही एस्ट्याब्लिश्ड गोष्टीला किती पटापटा विरोधक तयार होतात नै !!
गंमत आहे बुवा.
{हा}
हा आनंदयात्री खरा असेल तर त्याच्याशी सहमत.
-पुण्याचे पेशवे
{विरोध}
हा जो काही 'विरोध' आहे तो एस्टॅब्लिश्ड असण्याला नाही आहे, मोनॉपोली तयार करण्याला आणि त्यातल्या नीतीशून्य राजकारणाला आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स थोडीशीच बदलून त्यासाठी लोकांकडून अवाच्या सवा पैसे घेण्याला (मूळ कर्त्याला काहीही क्रेडीट न देता) आहे. असो, भलत्या ठिकाणी भलती चर्चा नको.
(ग्नूची चाहती) अदिती
{(विषय दिलेला नाही)}
{उबंटु अनुभव}
उबंटु अनुभवावरूनचा माझा लेख आणि माहीतीपूर्ण प्रतिसाद येथे वाचा...
विकास देशपांडे
{वा! विकासरा}
वा!
विकासराव,
उपक्रमावरच्या अतिशय उत्तम चर्चेचा संदर्भ दिलात. धन्यवाद.
त्या धाग्यामुळे बरीच मदत होईल असे वाटते.
{कसच,,}
कसचं कसचं :$
विकास देशपांडे
{विकासराव}
विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद.
माझा नवीन संगणक यायला वेळ असल्याने, मी कालच प्रायोगिक तत्वावर एका लॅपटॉपवर खिडकी-अंतर्गत उबंटू टाकले आहे. थोड्याश्या प्रयत्नानंतर जालावर आलो आहे. पण माझ्याकडे असलेल एकही सॉफ्टवेअर (.exe) त्याच्यात चालत नाहिये. गाणि-चलचित्र याला तो कोडेक्स नसल्याच सांगतो, माझ्याकडे कोडेक्स आहेत, पण त्याच्या (.exe) चालतच नाहीत.
काय करावे लागेल?
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{गाणी}
गाणी एम.पी३. मधे असतील तर हे पान पहा.
http://www.psychocats.net/ubuntu/mp3
https://help.ubuntu.com/community/RestrictedFormats
इतर कोडेक्ससाठीही थोड्याशा गुगल सर्चने उत्तरं पटपट मिळतील!
exe हा फॉरमॅट फक्त विण्डोजसाठी असल्यामुळे त्याचा उबुंटूवर फायदा होणार नाही. लिनक्ससाठी ही सर्व कोडेक्स फुकटात मिळतील.
{नक्की कळले नाही, पण...}
सातारकरराव,
नक्की काय झाले ते समजले नाही. पण तुम्ही .exe म्हणजे विंडोज ची सॉफ्टवेअर्स त्यावर वापरत आहात का? तर ती चालणार नाहीत कारण ती लिनक्स सारखी प्रणाली आहे. मात्र त्यामधे मी जेंव्हा चालू केले तेंव्हा त्याची म्हणून सर्वच सॉफ्टवेअर्स होती. उ.दा. ओपनऑफिस, फायरफॉक्स आणि फोटो पहायला, व्हिडीओज पहायला आणि अर्थातच गाणी ऐकायला. जर तसे झाले नसले तर कळवा. मी अजून विस्तृत प्रतिसाद नंतर देईन.
विकास देशपांडे
{विकास}
विकास तुम्ही वुबीवरून लिनक्स टाकलं होतंत का नव्या कोर्या पार्टीशनवर सीडीवर इमेज घेऊन टाकलं होतंत? मला उबूंटू आणि त्यांच्या धोरणांबद्दल नीट माहित नाही, पण साधारणपणे रेडहॅट आणि डेबियन बेस्ड लिनक्स फ्लेवर्स (सायंटीफिक लिनक्स, फेडोरा, आणि उबुंटू) यांच्यात एम.पी.३, एम.पी.४ डीव्ह-एक्स इत्यादी फाईल्स वापरण्यासाठी कोडेक्स वेगळी टाकावी लागतात. जेन्टू या फ्लेवरमधेमात्र या गोष्टींचा अंतर्भाव एका विशिष्ट फाईलमधे केल्यास वेगळं काही टाकावं लागत नाही.
{बरोबर}
मी उबुंटू वुबीवरूनच टाकले आणि काही कटकट झाली नाही. तुम्ही अवश्य तसे करून पहा. सर्व आपोआप करता येते. कोडेक्स वगैरे काही लागत नाही. (कारण मी काहीच वेगळे वापरले नाही). शिवाय सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरने अजून बरेच काही घालता येऊ शकते.
विकास देशपांडे
{हो.}
तुम्ही .exe म्हणजे विंडोज ची सॉफ्टवेअर्स त्यावर वापरत आहात का?
होय. मी हाच प्रयत्न केला. मला हे माहीतच नव्हत की .exe त्यात चालतच नाही. आत्ता तुमचा आणि आदितैंचा प्रतिसाद वाचल्यावर कळल. चलचित्र आणि गाणि काल चालत नव्हती, पण नंतर ते अपडेट केल्यावर मात्र चालू लागली. पण तरी माझ्याकडे बरीच सॉफ्टवेअर्स आहेत जी आता मला त्यांच्या साईट्वरती जाउन बहुतेक लिनक्स साठीची व्हर्जन उतरून घ्यावी लागतील.
------------------------------------------------------------
समाज किर्तनाने सुधारत नाही आणि तमाशान बिघडत नाही
This is imperfect universe
{वाईन टाकून}
वाईन टाकून पहा, इंटरनेट एक्सप्लोररची अगदीच गरज* पडत असेल तर चालवता येईल.
ब्यांक ऑफ इंडीयाच्या वेब-बँकींगसाठी फक्त आय.ई.च लागतो.
{आंतरजाल}
आंतरजाल जोडणीचे काय? मी कालच टाकले ऊबुंटु परंतु जालावर जाणे जमत नाही. बी.एस.एन.एल. ची जोडणी आहे तसेच टाटा फॉटॉन वायरलेसही आहे. मार्गदर्शन करावे ही विनंती.
माझे लिखाण
{काही विशेष करायची गरज नाही}
बीएसएनएल चे माहित नाही पण टाटा फॉटॉन , एअरटेल ब्रॉडबँड काही न करता चालू होतात.
फक्त मोडेम चालू करा... फॉटॉनचे युएसबी प्लग इन करा.. आवश्यक प्रणाली फोटॉन उतरवून घेऊन व चालू होईन...
माझ्याकडे एअरटेल ब्रॉडबँड आहे. ते उबंटू वर काही न करता व्यवस्थितपणे कनेक्ट झाले.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{नाही होत}
मी पीपीपीओईकॉन्फ केले तर वरच्या उजव्या कोपर्यात दिसणार नेटवर्क आयकॉन गायब झाला. इंडिकॉम युएस्बी जोडुनही काही फरक नाही. क्रुपय मदत कर.
माझे लिखाण
{कठीण कठीण कठीण किती!!!!}
कठीण कठीण कठीण किती!!!!
माझे लिखाण
{झाल झाल झाल}
अखेर ईंटर्नेट चालू झाल.आता मझ्या डेस्कटॉपवर एक्स.पी., विंडोज ७ आणि उबुंटु तीनही आहे. मज्जा. उबुंटुसाठी काही खास सूचना आहेत का? म्हणजे एखादी गोष्ट विंडोजपेक्शा जास्त छान आणि लवकर होते???
मराठी कस लिहिता येइल ते ही सुचवा, म्हंजे बरहा सारखे एखादे सॉफ्टवेअर आहे का?
माझे लिखाण
{>> उबुंटुसाठी काही खास सूचना}
>> उबुंटुसाठी काही खास सूचना आहेत का? म्हणजे एखादी गोष्ट विंडोजपेक्शा जास्त छान आणि लवकर होते???
साधारण ३ एक आठवड्यांनी आपण Update manager मध्ये जाऊन Updates check करा .
वेग खरे तर आधीच वाढला असणार पण अजून काही करायचे असेल तर एक Ubuntu tweak म्हणून Software येते. ते वापरून पाहू शकता. (मी वापरलेले नाही)
>> मराठी कस लिहिता येइल ते ही सुचवा
मी "गम भन " डौनलोड करून फायरफॉक्स मधून वापरतो. कदाचित यापेक्षाही चांगला उपाय असेल.
{आभार}
आभार अभिमत.
टाटा फॉटॉन+ वायर्लेस ब्रॉडबँड्विषयी मदत करु शकाल क? म्हंजे, ते कसे कॉन्फिगर करून चालवता येईल?? तसेच,मी बीएसएनएल वायर्ड ब्रॉडबँड कऑन्फिगर केल्यावर उजव्या बाजूला वर दिसणारा नेट्वर्क्चा आयकॉन गायब झाला, तो परत कसा आणत्ता येईल??
माझे लिखाण
{कॉन्फिगर }
मी BSNL वापरतो. टाटाबद्दल काही सांगता येणार नाही.
पण Terminal window वर खालील कमाण्ड एकदा चालवून बघा ..
sudo poff -> To disable internet first
sudo pppoeconf
-> यात तुम्हाला तुमचा युझरनेम पासवर्ड टाकावा लागेल.
sudo pon-dslprovider
-> मघाशी Disable केलेले Internet पुनः enable करण्यासाठी
मला BSNLच्या अडचणी याने गयब झाल्या ..
आयकॉन परत कसा आणण्यासाठी बहुदा desktop वर right click करून create launcherम्हणावे लागते. व Launcher मध्ये नेटवर्कची कमांड स्पेसिफाय करावी लागते.
{झाल फोटॉन+ पण चालू}
आभार पुन्हा एकदा.
माझे लिखाण
{मराठी साठी}
इथे बघा. अगदी डिटेल माहिती मराठी मधून आहे. आता itans कि inscript की बराहा हे तुमचे तुम्ही ठरवा
तुषार
विश्व जालावरील मराठी जग
{काहो फुकट ते पौष्टिक का ????}
काहो फुकट ते पौष्टिक का ????
{अर्थातच }
गंमतीचा भाग सोडला, तर फूकट सॉफ्टवेअरची चळवळ त्या क्षेत्रातील लोकांनीच चालू केली. म्हणजे वापरकर्त्यातील कुणी ही सुरु केली नाही. म्हणूनच ह्या चळवळीने जोर धरला कारण संगणकक्षेत्रातील्च अनेकांना असे वाटत होते की अव्वाच्या सव्वा किंमतीला सॉफ्टवेअर विकणे योग्य नव्हे.
माझे लिखाण
{उबुंटू चांगलेच तरीही ..}
माझी ही प्रतिक्रिया नवख्यांसाठी आहे.
वरील सार्या प्रतिक्रिया वाचून आपण Windows ला एकदम रद्दबादल करून उबुंटू टाकनार असेल तर सावधान !
अपेक्षाभंग होण्याआधी उबुंटूचे फायदे / तोटे लक्षात घ्या ..
उबुंटूचे फायदे
१ स्पीड -- लई भारी फायदा .. तोच संगणक जो विंडोज वर स्लो वाटतो .. तो लिनक्स एक्दम फास्ट करून टाकते .. फारच डॉकेबाज सिस्टम
२ नो व्हायरस - विंडॉजवर जाम वैताग .. लिनक्स वर अजाबात ताप नाय ..
३ स्टॅबिलिटी - खरोखर क्वचित हॅण्ग होतो ..
आता आपण (तुम्ही आम्ही आम आदमी !) घरगुती संगणाक कोणत्या कारणांसाठी वापरतो .. त्याची यादी करू
१ इंटरनेट
२ पिच्चर बघणे / गाणी ऐकणे
३ वर्ड / एक्सेल / पावरपॉईण्ट
४ गेम्स खेळणे ..
५ अजून ??
यात पहिल्या दोन कारणांसाठीच जर संगणक वापरणार असेल तर उबुंटू बेष्ट आहे.
आता वर्ड / एक्सेल / पावरपॉईण्ट वगैरेसाठी म्हणायला ओपन ऑफिस उंबूटू वर आहे .... पण मला ते तितकेसे आवडले नाही. यात मायक्रोसोफ्ट ऑफिसच माझे आवडते सॉफ्तवेअर .. मग काय करावे ???
वाईन नावाचे एक सोफ्ट्वेसर आधी लिनक्स वर टाका .. मायक्रोसोफ्ट ऑफिस त्यावर अगदी आरामत चालते www.winehq.org/
या सोफ्ट्वेसरमुळे तुमच्या .EXE files चालू लागतील.
मी स्वतः लिनक्स वापरतो पण उबुंटू नव्हे तर Linux Mint .. Mint खरे तर उबुंटू वरच आधारित आहे पण यात mp3 किंवा इतर कोडेक्स बसवायची झंझट नाही .. अक्षरशः out of box चालते. नवख्यांनी Linux Mint च वापरावे असा आमचा (फुकटचा) सल्ला
पण जर तुम्ही गेम्स (त्यातही High end games) चे चाहते असाल तर Windows Linux च्य जोडीने असू द्या .. आज तयार होणार्या बहुतांश गेम्स (दुर्दैवाने केवळ) Windows साठीच तयार होतात.
शुभस्ते सन्तु लिनक्सपन्थानः !
{छान माहिती दिलीत. Linux Mint }
छान माहिती दिलीत.
Linux Mint काय आहे ?
जरा दुवा द्या..
Hope is a good thing...
{हे घ्या}
www.linuxmint.com/
टीप : मिण्ट वापरताना काही समस्या आल्या तर गुगलताना Search query मध्ये Ubuntu असेच लिहा. मिण्ट व Ubuntu बरेचसे सारखेच आहे. त्यामुळे Ubuntu चे समस्यानिवारण उपाय Mint ला चालतात.
{सहमत}
अगदी सहमत!!!!
नक्की ट्राय करेन.
वाईनच्या माहीतीबद्दल आभार....
ऑपन ऑफीसविषयीही सहमत!!!
मिंटविषयी वाचून तेच टाकायला हवे होते असे वाटले.
माझे लिखाण
{मी साबायोन चा चाहता आहे .बघा}
मी साबायोन चा चाहता आहे .बघा तुम्हाला आवडेल .ते सर्वच बाबतित इतरानपासुन हट्के आहे .
http://sabayonlinux.org/
अधिक महिति youtube वर सबयोन(sabayon) ने सर्च करा
{http://www.punekar.net/}
http://www.punekar.net/
उबंटू वापरुन जर मराठीत लिहायच असेल( सर्वत्र फक्त ब्राऊझर मधे नाही) तर वर दिलेल्या साईटवर जा.तिथे तुम्हाला मराठी वापरण्या करीता काय करावे लागेल याची पुर्ण माहिती आहे.इतरही अने गोष्टी दिल्या आहेत उबंटू बद्दल.मी तिथुनच ते केल आणि उबंटू वर सगळी कडे (म्हणजे ओपन ऑफिस मधेही) मराठी व्यवस्थित वापरत आहे
{लिनक्स वापरतांना}
लिनक्स वापरतांना मल्टीमिडियाशी संबंधीत सॉफ्टवेअरचा उपयोग खूप मोकळेपणाने करता येत नाही.खूप लिमिटेशन्स येतात.कारण विंडोजमधे जितकी छोटीछोटी पण अतिशय उपयोगी सॉफ्टवेअर आहेत तशी लिनक्स मधे सहज मिळत नाही. मला त्याच खूप काम पडत आणि मग विंडोजला शरण जावच लागत.
{येस्स .. }
Audio editing वा Video editing यासारख्या कामासांठी Software च्या अभावामुळे Linux तितकासा योग्य पर्याय नाही पण नुसती गाणी वा व्हिदीओ बघायचे / ऐकायचे अस्तील तर पुरेसे पर्याय आहेत. j जसे vlc, banshee , totem , xmms