आपण ढोस हा शब्द बरोबर वाचलात्..उच्चभ्रु भाषेत ह्यालाच धमकी देणे म्हणतात...पण भांडणाची सुरुवात होताना एक डायलॉग मारायची परंपरा खुप जुनी असावी.घरातही तिर्थस्वरुप/मातोश्री/मोठा भाउ वा बहीण आपल्या नकळत धमकावतेच की...त्यात सगळ्यात कॉमन म्हणजे..***ला सांगु का ?
जगात कुठेही ,कुठल्याही भाषेत भांडणे झाली की माणुस सगळ्यात पहिले देतो तो म्हणजे ढोस...त्यातल्या पहिल्या शब्दातच समोरच्याला आपल्या बायकोचा भाउ बनविने तर एकदम कॉमन..
पण तो असे का करतो...सोप्प आहे...आता एखाद जनावर उदा.कुत्रा दुसर्या जनावराकडे उदा. मांजर हाणामारीच्या उद्देशाने बघतो तेव्हा मांजर देखील अलर्ट होते..अंगावरचे केस ताठ करते...पण मानवप्राण्याकडे तोंड नावाचा भारदस्त अवयव असल्यावर केसांची काय गरज...
आपल्या पर्याने एकाला दिलेला ढोस वाचल्यावर मी लई हसलो होतो...तो खालील प्रमाणे..
" नाय त्याचा नातलग केला तर नावाचा पर्या नाय ? "
तर असे काही एकलेले,एखाद्याला दिलेले ढोस आठवा आणी करा कलेक्शन.प्रसंगही सांगीतला तर उत्तम
अरे हो...शिवीगाळ-बाचाबाची आणी ढोस सभ्य भाषेतही देता येतात बर का !!
सुरुवात माझ्या कडुन...
१) सौताच्या फोटोवर हार घालायची लय घाई झालीय काय रे !!
२) बुक्कीत भुगा करीन !!
एक प्रसंग ::
आमच्या ईथला एक सरकारी नोकर आणी एक कोकणी मुस्लीम(व्यवसायाने खाटीक) सख्खे आणी भांडखोर शेजारी...एकदा असेच वाजलेले असताना
सरकारी नोकर : साल्या मर्डर करीन तुझ
खाटीक : तुझ्या बापाने कधी कोंबड तरी कापलया का ?
१)
१) सौताच्या फोटोवर हार घालायची लय घाई झालीय काय रे !!
चालु द्या जसे आठवतील तसे अॅड करत जाणार
-निखिल
मस्त विषय....
माझा मुलगा त्याचं ऐकलं नाही की मला ढोस देतो: "नका ऐकु तुम्ही माझं. मग मी रडलो की सगळे मला वाईट समजतील. मला शाळेत पण घेणार नाहीत. मोठा झाल्यावर मी चोर होईन."
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
ऑबॉबॉबॉबॉ
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ......ह्याला धमकी म्हणायची का काय आक्रित?
अवघड आहे रे बाबा तुझं!
पुणे
पुणे सातारा बस मध्ये घडलेला किस्सा..
एकाने दुसर्याला दम दिला
यका फैटीत सगळे दात पाडीन
ऐकणाराने शांतपणे ऐकले आणि म्हणाला
तू लय पाडशील रे दात. पण उद्या सकाळ मिशरी काय तुझ्या दाताला लाऊ काय?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
निख्या...तु
निख्या...तु अजुन कोणालाही ढोस दिला नाही ? काय सांगतोस असे कसे..
असो अजुन एक आठवला..
" कवळी ची सवय लावुन घे साल्या "
लहानपणी
लहानपणी माझा ठरलेला ढोस : पळून जाईन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आई तक्रार
आई तक्रार करायची, "तुम्हाला प्रत्येक जेवणाला ताज्या, गरम पोळ्याच हव्या असतात!" मी आईलाच समजावायचे, "सवय कोणी लावली? चूक कोणाची आहे??"
आरारारा...
हि म्हणजे हाईट झाली ढोस द्यायची
नतमस्तक,
टुकुल
श्री.
श्री. ३_१४-जी अदिती, आपले अजूनही असेच काही पराक्रम नक्कीच असतील. वाचायला आवडतील.
आमचा एक
आमचा एक मित्र, स्वतःच्या मुलींसमोर उगाच डींग मारत होता. हळूच मुलींना शिकवलं, "बाबाला जर्मनमधे 'नाच रे मोरा' म्हणता येतं."
असो. मी आणि माझा भाऊ एकदा कोणा शिक्षकांना नावं ठेवत होतो. आई-बाबा दोघेही शिक्षकच, बाबांनी लॉजिकली तिढा सोडवायचं ठरवलं. "तुमच्या आईबाबांना कोणी नावं ठेवली तर?" "तुम्ही बेक्कार शिकवत असाल तर ठेवली असतीलच. पण मग "ट्यूशन घेणार का" असं विचारायला घरी का येतात?" नंतर कधी क्रीएटीव्ह नावं ठेवण्याबद्दल बोलणी नाही खाल्ली!
"बाबाला
"बाबाला जर्मनमधे 'नाच रे मोरा' म्हणता येतं."
हा भारी ढोस होता
-निखिल
काय आहे,
काय आहे, काम करणार्याने कार्य करत जावं, भाषेची पर्वा करू नये! ;-)
हल्ली तो मित्र त्याच्या मुलींना "अधूनमधून आत्या खोटं बोलते" असं शिकवतो असं कानावर आलं आहे! ;-)
(पळा आता.... )
हल्ली तो
हल्ली तो मित्र त्याच्या मुलींना "अधूनमधून आत्या खोटं बोलते" असं शिकवतो असं कानावर आलं आहे!
अरेरे काय वेळ हो तुमच्या मित्रावर... बिचारा कार्य करुन करुन थकत असेल आणि वरुन नाच रे मोरा आहेच.
असो पण आत्याबाई खोटे बोलतात हे शिकविणे म्हणजे अतीच हा
-निखिल
बै लै भारी ढोस
>हल्ली तो मित्र त्याच्या मुलींना "अधूनमधून आत्या खोटं बोलते" असं शिकवतो
बघा तुमचा ढोस जबरदस्त होता की हो. आला की लायनीवर दोस्त. आता सगळे काही खरे व योग्य तेच शिकवतो आहे मुलींना. बै झिंदाबाद!
कानावर कशाला???
मला प्रत्यक्ष सांगितलं त्या मुलींनी... बाबा असं म्हणाले म्हणून!!!!
"आज
"आज सक्काळचं घरनं निघताना बायकुचं कुकू पुसुनच आलायस का रं चुचनळ्या?"
- गावाकडं बांधावर ऐकलेला एक इरसाल दम!
आयला हे
आयला हे वाचलच नव्हत..
धम्या
मा. श्री.
मा. श्री. राजशेखर यांचं एक कायम स्मरणात राहिलेलं वाक्यः "इज्जारीत पाय र्हाणार न्हाइत".
अवांतरः
हा दम अतिशय गैरलागू म्हणूनच फुसका वाटतो. मर्डर कोण करणार होतं? स. नो. की स. नो. चा बाप?
इज्जारीत
इज्जारीत पाय र्हाणार न्हाइत >>
बाकी ते राजशेखर मुळे ...चंद्रकांत - सुर्यकांतची आठवण झाली...
तुमच्यावर
तुमच्यावर कविता किंवा उतारा पाडेन.
-पुण्याचे पेशवे
अरारारारा
अरारारारारा......
त्याला चाल
त्याला चाल लावेन.
ते मी
ते मी माझ्या आवाजात गाऊन दाखवेन!
हा हा हा...
नि तूझ्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तू गायला सुरूवात करण्याआधी लोक कसे जीव मुठीत घेऊन पळतात हे पाहून आम्ही फक्त राजेचं अनुकरण करू....
किंवा...
>>>नि तूझ्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तू गायला सुरूवात करण्याआधी लोक कसे जीव मुठीत घेऊन पळतात हे पाहून आम्ही फक्त राजेचं अनुकरण करू....
किंवा त्यावर एकोळी धागा टाकू. कोणी प्रतिसाद दिले नाहीत तर त्यांना व्य नि पाठवू. तरी नाही दिले तर आम्ही स्वतःच प्रतिसाद देऊ.
मी
मी त्याच्या विडंबनाचा धागा टाकेन ना!!
"उद्यां
"उद्यां दंतमंजन लावायचें आहें नां? की संपलंय म्हणुंन फुकटांत सोंय करुंन घ्यांयचींयें?"
-हॅहॅहॅ....आमी नाय सांगणार कुठं ऐकला ते
चालू द्या
चालू द्या ... वाचतोय
- (अस्थिदंत विमा एजंट) टारझन
+१
चालू द्या ... वाचतोय
सहमत.
मी टोळ
मी टोळ
राहायचे
राहायचे असेल तर रहा नाहीतर चपला घालुन चालुन पडा.
हॅ हॅ, हे
हॅ हॅ, हे तुम्हाला मिळालेले पेश्शल ढोस वाटतं?
-Nile
व्हय.....
व्हय.....
+१
व्हय.....
+२
व्हय
-निखिल
+३ व्हय.....
+३
व्हय.....
+४
व्हय.
-पुण्याचे पेशवे
राहायचे
राहायचे असेल तर रहा नाहीतर चपला घालुन चालुन पडा >.
व्हयं !!
तुमचा धागा
तुमचा धागा उडवल्या जाईल.
-पुण्याचे पेशवे
विडंबन
विडंबन पाडले जाईल.
कंपू करून मारले जाईल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
येथे चाल
येथे चाल लाउन मिळेल!
- सौ. कमोड ठेव
एका काकुंनी दिलेला ढोस..
एका लोचट मि पा कराला चुचु ने दिलेला.....
प्रेषक : पर्नल नेने मराठे, सोम, 12/28/2009 - 10:39
अय मला काकु बोल्याच काम नाहि काय
हा हा हा
हा हा हा कोण रे हा ??
तोच रे तो...
तोच रे तो...
||बोळास||
हा हा हा
हा हा हा
||खल्लास ||
ही ही ही ||
ही ही ही
|| (नुसताच) लास ||
अरे बाप रे,
अरे बाप रे, तू हा लास का काय?
(भीतीग्रस्त) अदिती