-

{वाह व्वा!}

1

चाल लावलेली दिसते तुम्ही या गीताला..
जरा आम्हाला पण ऐकवा की...

{माझ्याकडून गाणे ऐकणे हा}

2

माझ्याकडून गाणे ऐकणे हा तुमच्यावर अन्याय होवू शकतो. प्राणीहत्त्येचे पाप माझ्या माथी लागेल. हास्य
आपले एक सदस्य चाल बांधीत आहे. लवकरच येथे टाकतील ते.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{वा वा...}

3

चाल लागतेय ना... आम्हाला त्यात जास्त रस.
तुम्ही वेगवेगळे गीत प्रकार लिहिता.. हे फार कौतुकास्पद आहे.
गीताला चाल लावणे, आणि लावलेल्या चालीवर गीत लिहिणे, ह्यातले दोन्हीही करता का? (अरे तुरे चालणार असेल तर, 'करतोस का?')
लिहीत रहा,
मनमेघ.

{कौतूकाबद्दल धन्यवाद. गीत अन}

4

कौतूकाबद्दल धन्यवाद.

गीत अन चाल असा जाणीवपुर्वक प्रयत्न करत नाही. पण कधी कधी तसे घडते. आता या नाट्यगीताचेच बघा ना. माझ्या बर्‍याचशा कवितांमध्ये 'हातामध्ये हात' येवून गेलेले आहे. या वेळी 'हातामध्ये हात' घेतले अन नाट्यगीतात कसे टाकायचे हा विचार करत होतो. अग विचार केला की 'हातामध्ये हात' घेतले तर ते सोडवायला पाहीजे. अन नाट्यगीतात अशी गोड्ड गोड्ड तक्रार चालते. मग गीत पुर्ण केले अन चालीत येण्यासाठी होssओssहोssओ किंवा आssआssआssआss म्हणून बघीतले तर मिटरमध्ये बसले.

>>> अरे तुरे चालणार असेल
चालणार? अरे पळणार बाबा पळणार. मागे माझी सही पण तशीच होती की 'मला अरे तुरे करा. आपलं तुपलं नको' अशा अर्थाची.

आस्थेवाईक चौकशीबद्दल धन्यवाद.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{पाषाणा}

5

मस्त आहे रे नाट्य गीत. (पाषाणास प्रेमाचे झरे फुटले वाटत wink )
>>प्राणीहत्त्येचे पाप माझ्या माथी लागेल.
मनमेघा पाषाणाने तुला प्राणी म्हणुन बरोबर ओळखलय रे.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{बघा जयपाल राव}

6

तुम्हाला फुलांचे फोटो काढून सवड झाली की माझा फोटो पण काढायला यावं लागेल.
आहे तयारि?

{गाण्याची चाल}

7

गाण्याची चाल लावून झाली आहे.
कशी वाटते पहा. कुठे सूर ढळला असेल तर तेवढं पदरात घ्या.

{श्री. निल्या यांचे आभार. मुळ}

8

श्री. निल्या यांचे आभार.

मुळ तूनळीवरची साखळी ही आहे:
http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&feature

चाल एकदम झकास जमली आहे. अगदी व्यावसायीक तर्‍हेचे संगीत, चाल अन गायकी आहे.
योग्य तिथे आलाप घेतलेले आहे. काही ठिकाणी बदल केले असते तरी माझी काही हरकत नव्हती.
(मुल अन गाणे जन्माला आले की सार्वजनीक होते, अशा अर्थाची माझी मागे सही होती!)

अवांतर: श्री. निल्या यांना एक विनंती आहे की युट्युब वरील हा व्हिडीओ ईडीट करून काही टॅग (जसे Soda) इ. काढून टाका अन Natya sangeet रिलेटेड टॅग टाका. बाकी एकदम मस्त!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{छान जमले आहे गीत !}

9

छान जमले आहे गीत !


Hope is a good thing...