सल्ला हवा आहे
मी नुकताच पुण्यात आलो.
पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो
काही ठिकाणे भाडे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या.
सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो .
एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे.
मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.
म्हणाले की फ्लॅट्चे अॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार.
माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो.
शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली.
मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्यासकट झकास पार्टी दिली.
एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली.
मैत्रीणीच्या नवर्याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली.
त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना.
घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे.
मला मार्गदर्शन हवे आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?
.jpg)
{विजुभाउ काय हा घोळ सगळाच आता}
आता निस्तरा तुम्हिच..
{गोलमाल है}
गोलमाल है भाइ सब गोलमाल है.... (सूरात म्हणा)
This is imperfect universe
{काय राव लोकास्नी घुमवताय}
काय राव लोकास्नी घुमवताय उगाच. आयला रेजिस्ट्रेशन पुरते एक दिवस बायकूला बरोबर घेऊन जायला काय झाले होते (बायकोला पुण्यातल्या घराबद्दल अंधारात ठेवायचे नव्हते ना?
)
असो. आमचा सल्ला: घ.मा. पुणेरी आहे म्हणताय ना, मग तुमचे बिंग फोडेलच तो आज ना उद्या (आम्ही पुणेकर तसे लई भोचक, आणि त्यात भानगड म्हटले की फारच चिकित्सक हॅ हॅ हॅ). त्यापेक्षा येणार्या संकटाला सामोरे जा. आज खुलासा करा (पत्पूर्वी गादी बांधून तयार रहा)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{सहमत आहे.. उगा भानगडी करता.}
सहमत आहे.. उगा भानगडी करता. नाहीतर एखादी म्हातारी बाई घेऊन जायची बरोबर आई म्हणून. आई आणि मी राहणार आहे असं सांगायचं. नंतर सोसायटी वाल्यांनी विचारलं तर सांगायचं आई मामाकडे किंवा अन्य कोणाकडे गेली आहे. आणि इतर कोणाकडे आई म्हणून दिसली तरी आई अनेक मुलांची आई असू शकते पण बायको अनेक नवर्यांची (शक्यतो) असू शकत नाही ना! काय राव तुम्ही पण.
-पुण्याचे पेशवे
{शॉल्लेट}
भानगडीची कामं कशी निस्तरावीत हे पुप्याकडून शिकावं.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{आयला रेजिस्ट्रेशन पुरते एक}
आयला रेजिस्ट्रेशन पुरते एक दिवस बायकूला बरोबर घेऊन जायला काय झाले
अहो तेवढा वेळ नव्हता ना.
घ मा पुणेरी आहे. गादी बाम्धून तयार ठेवायला जर्रा जड जातय. फ्लॅट मस्त आहे हो
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{भले!!!}
अगदी सिनेमात शोभावा असा प्रसंग आहे. जबरदस्त योगायोग वगैरे.
आणि खरा असेल तर, बहुतेक मार (virtual तरी) खायची पाळी येणार.
बायको, मैत्रीणीचा नवरा किंवा घ. मा. यांच्यातल्या एक किंवा अनेकांकडून.
विजुभाऊ ऑल द बेस्ट.
{सहमत. आणि खरी मजा तेव्हा येईल}
सहमत. आणि खरी मजा तेव्हा येईल जेव्हा मैत्रिणीच्या नवर्याला कळेल की आपली पत्नी दुसर्या कोणाची बायको बनून गेली होती तिथे म्हणून तेव्हा.
-पुण्याचे पेशवे
{मैत्रीणीच्या नवर्याला ते}
मैत्रीणीच्या नवर्याला ते माहीत आहे. त्यालाही त्या प्रसंगाची गम्मत वाटत होती. पण पुढे असे काही होईल असे कोणालाच वाटले नव्हते. जेंव्हा अॅग्रीमेन्ट साईन झाले त्यावेळेस त्याच्या हातात इन्टीरीयर डेकोरशन चे हे काम आलेले नव्हते
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{मैत्रीणीच्या नवर्याला ते}
मैत्रीणीच्या नवर्याला ते माहीत आहे. त्यालाही त्या प्रसंगाची गम्मत वाटत होती.
मग तर एकदम सोपे आहे... त्याच्या खोट्या बायकोला आजारी पाडा व खर्या (सध्या तुमच्या) बायकोला , मित्राला व तुम्ही... त्याच्याकडे जा..
{खरं सान्गा}
खरं सान्गा आणि खर्या बायकोला समोर आणा.
(रुम सोड्ण्याची मानसिक तयारी ठेवा)
{किती पैसे देणार? सल्ला देतो}
किती पैसे देणार? सल्ला देतो
{आला भानगडसम्राट नान्या आला ..}
आला भानगडसम्राट नान्या आला ..
-पुण्याचे पेशवे
{आला कमेंट्सम्राट पुप्या आला}
आला कमेंट्सम्राट पुप्या आला
{आली अनुमोदन सम्राट प्रिमो.}
आली अनुमोदन सम्राट प्रिमो.
-पुण्याचे पेशवे
{फाउल.... मी सम्राज्ञि होउ}
फाउल....
मी सम्राज्ञि होउ शक्ते सम्राट नाही.......
{हि हा हा हा हा...}
हि हा हा हा हा...
-पुण्याचे पेशवे
{आता शिक्शा म्हणुन....१ लेख}
आता शिक्शा म्हणुन....१ लेख पाड चुचुवाणित......
मी लेख म्हण्टलय बरका.....
{mar padaychi lakshane, baki}
mar padaychi lakshane, baki kay
Hope is a good thing...
{वाईट सवय हां राजे. सरळ}
वाईट सवय हां राजे. सरळ दारातून यायचं सोडून असं खिडकीतून डोकवत रहायचं हे बरोबर नाय हां.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{khidakich bari baa, aat alo}
khidakich bari baa, aat alo tar vijubhaucha dost mhanun mala be mar padayacha
Hope is a good thing...
{राजे या सदस्याना समज देण्यात}
राजे या सदस्याना समज देण्यात येत आहे कि कृपया मराठीत्(देवनागरीत)लिहावे.
अन्यथा त्यांचे सदस्यत्वाबद्दल विचार करावा लागेल.
-पुण्याचे पेशवे
{I am with Raje.}
I am with Raje.
{विमो तुम्हीसुद्धा ?}
विमो तुम्हीसुद्धा ?
छे छे छे, किमान तुमच्याकडून (एका PDP सदस्याकडून) तरी अशी अपेक्षा नव्हती.
जगदंब जगदंब!!!
पेशवे तुम आगे बढो .
This is imperfect universe
{अरेरे}
तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यानेही असे खिडकीतून प्रवेश करण्याचे समर्थन करावे हे पाहून अंमळ खंतावलो. आता या देशाचे काय होणार.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{पण हे तर पीडीपीच्या एस ओ पी}
पण हे तर पीडीपीच्या एस ओ पी मघे लिहिलेलं आहे ना?
{छे छे, तुमच्याकडे एस ओ पी चे}
छे छे, तुमच्याकडे एस ओ पी चे जुने व्हर्शन असेल. आता सर्वांना मुक्तद्वार आहे पीडीपी मधे (निवडणुक जवळ आलीये रेठरे बु.|| ग्रामपंचायतीची)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{malak, mobile varun login}
malak, mobile varun login kele aahe. mafi asavi.
kay divas aale aahet
Hope is a good thing...
{ठीक आहे माफ केले. ;-)}
ठीक आहे माफ केले. ;-)
-पुण्याचे पेशवे
{खुलासा हवा आहे. श्री पुपे हे}
खुलासा हवा आहे. श्री पुपे हे मीमराठीचे नवे मालक आहेत काय? श्री राजे यांनी खुलासा करावा. मालकीचा असा खांदेपालट झाला असल्यास आम्हालाही आमच्या सदस्यत्वाबद्दल विचार करावा लागेल. अन्यथा श्री पुपे यांनी सदस्यांना संभ्रमात पाडल्याबद्दल नि अनधिकाराने मालकांनाच धमकी दिल्याबद्दल त्यांना समज देण्यात यावी अशी शिफारस करतो.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्म्म्म्म्म}
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
{ओ मालक, बिंधास्त लिहा}
ओ मालक, बिंधास्त लिहा इंग्रजीमधुन. बघु कोण काय करतो ते
{पीडीपी अंतर्गत मीम नवनिर्माण}
पीडीपी अंतर्गत मीम नवनिर्माण सेना स्थापन करावी (जसे कॉंग्रेस अंतर्गत समाजवादी मंच होता स्वा. पू. काळात तसे) असा विचार करतो आहे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{कृती कधी करणार ?}
विचार करतो आहे.
कृती कधी करणार ?
असो, रेठर्याचा चिवडा एक नंबर असतो.
This is imperfect universe
{मोठे व्हा}
सातारकरभौ, विचार करण्यासारखी मोठी कृती नाही.
नुसती कृती काय कोणिही करेल. विचार (तोही इतक्या महत्वाच्या विषयावर) करणं सोपं आहे का?
{एक शिंपल उपाय}
एक शिंपल उपाय आहे. एकटेच जावा जेवायला बिंधास्त. बायकोला यायला जमले नाही असे सांगा. नाहीतरी बायको कायम ईथे राहणार नाही फक्त अॅग्रीमेंटसाठी आली होती हे घ.मा ला माहीत आहे. मैत्रीण व तीच्या नवर्याला ओळख दाखवा. ति मैत्रीण आहे हे ही सांगा. (म्ह्णजे घ. मा. ने कधी तुम्हाला एकत्र पाहीले आसेल किंवा नंतर पाहीले तर खोटे बोलायला नको). फक्त ती तुमच्या बायको सारखी दिसते हे सपशेल नाकारा. तुमचा व बायकोचा एकत्र फोटो दाखवा.हवे तर एखाद्या मित्राची साक्ष काढा. फक्त हे एकदम ठाम पणे सांगा. जरासुध्दा चोरटे पणा येवु देउ नका वागण्यात बोलण्यात. घ.मा वर जोरात उखडा. इतके ठाम रहा कि घ.मा ला आपणच काहीतरी चुक करत आहोत असे वाटेल.
या उपायाचा फायदा म्हणजे वरील कुठलेही विधान खोटे नाही. म्हणजे एका मुळे दुसरे , त्या मुळे तिसरे अशी खोट्यांची माळ लागणार नाही.
आता थोडा अभिनय करावा लागणार पण तुम्ही तो करालच, बायको ऐवजी मैत्रीणी ला घेउन गेलात तेंव्हा ही अभिनय केलाच की.
{राजाभाऊ, घरमालक पुणेरी(!) आहे}
राजाभाऊ, घरमालक पुणेरी(!) आहे हा महत्त्वाचा तपशील विसरत आहात तुम्ही.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{हेहेहे}
{'अडाणी गाय' आयडी आला तर नवल}
'अडाणी गाय' आयडी आला तर नवल ते काय :-/
{खर्या बायकोला घरमालकांकडे}
खर्या बायकोला घरमालकांकडे न्या आणि चुक झाली अस कबुल करा, ते मोठ्या मनाचे असतील तर माफही करतील. कितीकाळ खोटं पचवणार...
हे केले नाही तरी बॅकपसाठी नवी जागा शोधायला चालु करा :greenface
{(आज विसर्जन असल्याने) उद्या}
(आज विसर्जन असल्याने) उद्या संध्याकाळी मालकांबरोबर 'बसा', मनमोकळं करा. सगळं ठीक होईल. अधुनमधुन मालकांबरोबर अश्याच बैठका चालु राहु द्या, नाहीतर मालक फ्लॅटमोकळा करायचे.
{विजुभाउ तुम्ही घातलेला घोळ}
विजुभाउ तुम्ही घातलेला घोळ ओरिजनल विजुताइंना माहितेय का
{माझ्या सुदैवाने माहीत आहे.}
माझ्या सुदैवाने माहीत आहे.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{चला}
विजुभाऊ आपल्या पेटंट भूमिकेत परत आले वाट्टं.
बाकी फार लवकर उत्तर दिलेत हो, अजून वर्ष झाले नाही.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{घरमालकीणबाईंच्या सांगण्यावरून}
घरमालकीणबाईंच्या सांगण्यावरून घरमालकांनी आणखी एका वर्षाचे एक्स्टेंशन दिलेले दिसत आहे.
बाकी विजूभाऊंची कथा छान आहे. एखादा विनोदी चित्रपट काढावा लागेल यावर.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही