भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग – ३
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं. परंतू तिसरा भाग लिहायच्या आधीच तेलंगाणाची आणि तदनंतर वेगळ्या विदर्भाची देखील मागणी पुढे आली.
या भागात बाबासाहेबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधाची कारणं आणि ४ (३ मोठी + मुंबई) राज्यांच्या समर्थनाची कारणं आहेत.
ह्यापुढे आपण आज जी तुलना करतो मुंबईची आणि मद्रास किंवा कलकत्त्याची तिच्याच आधारान बाबासाहेब देखील अस म्हणतात की ही कॉस्मोपॉलिटन (मराठी ?) शहरं जर त्या त्या राज्यात राहू शकतात तर मुंबई का नाही, आणि ह्याच कारणासाठी कोणताही मराठी माणूस मुंबई वेगळ करण का सहन करेल? मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करावी ह्यासाठी
महाराष्ट्राच्या बाजूनी खालील मुद्दे आहेत;
१. मुंबई मराठी माणसाच्या भांडवलावरती वर आलेली नाही, मान्य, पण मग कलकत्ता फक्त बंगाल्यांच्या आणि मद्रास फक्त मद्राश्यांच्या भांडवलावर उभारले आहेत का ?
२. मुंबईला पाणि, वीज आणि मनुष्यबळ यांचा पुरवठा उर्वरीत महाराष्ट्रातून होतो (इथे मुंबई वेगळी करा म्हणणारे दाभोळकर आठवले). महाराष्ट्र कोणत्याही क्षणी मुंबईच रुपांतर मोहेंजोदोडो मधे (City of the dead) करू शकेल.
३. गुजराती लोकांची, मराठी लोक त्यांच्याशी भेदभाव करतील ही भीती निराधार आहे. घटनेन तस करता येण अशक्य आहे.
आता वरील मुद्यांच्या विरुध्द आणि मराठी लोकांसाठी विचार करण्यासारख;
१. महाराष्ट्र मुंबईच्या विकासाठी पुरेस भांडवल उपलब्ध करू शकतो काय
२. जर या शहराची आर्थिक स्थिती बिघडली तर इथे राहणार्या मराठी लोकांच्या राहणीमानाच्या स्तरावरती काय परिणाम होइल? मराठी लोकांनी हे विसरता कामा नये की महाराष्ट्र हे एक कारकून आणि भोई (coolies) लोकांच राष्ट्र आहे.
आता ह्यापेक्षा एक वेगळा मुद्दा देखील इथे येतो. तो म्हणजे अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा. इथे सर्वत्र अल्पसंख्य म्हणजे हिंदू धर्मातील क्षत्रीय सोडून इतर जाती (इतर धर्म नाही). जर संयुक्त महाराष्ट्र झाला तर त्यांना जायला कुठेही जागा उरणार नाही. ज्यावेळेला गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हणांना गाव सोडून जाव लागल तेंव्हा ते सगळे शहरांमधे जाऊन राहीले आणि आता सुरक्षित ठीकाणी पोचल्यावर तेच लोक संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत. (जर वेगळी राज्य केली तर ही समस्या कशी सुट्णार हे नक्की कळल नाही)
ह्यात मुख्य चिंता व्यक्त केली आहे ती मराठवाड्याबद्द्ल. त्यावेळेला (१९५५) पुर्व महाराष्ट्र (विदर्भ) आणि पश्चीम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा हा अत्यंत मागासलेला भाग होता. पुर्व महाराष्ट्र हा औद्योगिक, व्यवस्थापकीय (administrative), न्यायव्यवस्था, करव्यवस्था (revenue) या सगळ्याच बाजूंनी पुढारलेला आहे. या दोन प्रगत भागांच्या मधे मराठवाड्याची ससेहोलपट होण्याचीच शक्यता जास्त. निजामाच्या या भागाकडच्या २०० वर्षांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शैक्षणिक दृष्ट्यादेखील मराठवाडा इतरांच्या मागे आहे. जर भविष्यात हा भाग पुणे विद्यापिठाच्या कार्यकक्षेत गेला तर त्याची अधोगती होण्याचीच शक्यता जास्त, कारण प्राप्त काळात पुणे विद्यापिठातील आणि मराठवाड्यातील शिक्षणाच्या दर्जात फार मोठी दरी आहे. मराठवाडा हा केवळ मागासच आहे अस नाही तर येथील लोक याबाबतीत उदासीन देखील आहेत.
ह्या तिन्ही राज्यांची उपलब्ध आकडेवारी अशी;
----राज्य------------लोकसंख्या---------क्षेत्रफळ--------उत्पन्न
पश्चीम महाराष्ट्र------12677316--------30028-------262420441
मध्य महाराष्ट्र-------12409044--------55482-------216380095
पुर्व महाराष्ट्र-----------8027130--------39004--------94111012
याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड आकारामुळे देखील त्याच व्यवस्थापन अवघड होउन बसेल. संयुक्त महाराष्ट्राची खरोखर काय गरज आहे? उद्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बरोबर युद्ध करायचे आहे का?
अजून एक महत्त्वाची गोष्ट जी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात असलेली ती म्हणजे मराठा मंत्र्यांची राजकीय अक्षमता (incapability). काँग्रेसमधे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला काहीही किंमत नाही. जर तीन राज्य केली तर तीन मुख्यमंत्री आणि तिप्पट मंत्री यांना संधी मिळेल आणि जास्त मराठी पुढार्यांना संधी मिळेल, जेणेकरून अंतीमतः केंद्रात वजन वाढेल.
प्राप्त परिस्थीतीत मुंबई विधीमंडळात प्रगत असलेल्या पश्चीम महाराष्ट्रातील सदस्यांच प्राबल्य आहे. मुंबई विधिमंडळात एकूण सदस्य – ३१५ मराठी सदस्य – १४९ मंत्रिमंडळ (Council) – ७२ मराठी – ३४ या संख्याबलावरून मराठी मुख्यमंत्री व्हायला हवा हे सरळ आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उभे राहेलेल्या श्री. भाउसाहेब हीरे यांना खाली बसवून वर मोरारजी भाई देसाईंच नाव पुढे करायलाही त्यांनाच सांगितल. ही महाराष्ट्राच्या पुढार्यांसाठी अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. ह्यावरून काँग्रेसमधे मराठी पुढार्यांना काय किंमत आहे ते स्पष्ट होत. गैर्-काँग्रेसी पुढार्यांची केंद्रात फार पत आहे अशातला काही भाग नाही. आजमितीला श्री. टिळक, श्री. गोखले, श्री. रानडे यांच्या तोडीचा एकही पुढारी महाराष्ट्रात नाही.
जर पश्चीम महाराष्ट्रातील पुढार्यांची ही अवस्था, तर उद्या संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या पुढार्यांची काय अवस्था होइल.
पाली भाषेतील साहित्यानुसार पुर्वीपासून त्रै-महाराष्ट्र असा उल्लेख सापडतो. त्यामुळे ३ मराठी राज्यांचा प्रस्ताव नवा नाही. जातिंच्या आधारावर जरी विचार केला तरी,जे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्ण आहे की एका जातीतल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनादेखील एकमेकांबद्द्ल काय वाटत? सातारच्या मराठा जातीच्या माणसाला औरंगाबादच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल प्रेम आहे का? नाशिकच्या मराठा जातीच्या माणसाला रत्नागिरीच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल काय वाटत ?
सद्ध्याच्या मुंबई कॅबिनेट मधील सर्व मराठा मंत्री सातारा (= सातारा + सांगली) आणि नाशिक मधले आहेत, कोकणातील एकही नाही.
याच्याशिवाय मराठी भाषिक भाग गैर्-मराठी राज्यांना देण हा उद्योग केवळ महाराष्ट्र द्वेषातून आणि महाराष्ट्राचे पंख छाटण्यासाठी केलेला उद्योग आहे.
सारांश :
१. संयुक्त महाराष्ट्र बनवण्यामागे महाराष्ट्राचा – मराठी माणसाचा काही फायदा होणार आहे अस दिसत नाही. किंबहुना नुकसानच होण्याची शक्यता जास्त.
२. जर संयुक्त महाराष्ट्र झालाच तर मराठवाडा पुर्व आणि पश्चीम महाराष्ट्राच्या मधे भरडला जाईल.
३. एकाच महाराष्ट्रामुळे एकावेळेला एकच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ असेल पण ४ मराठी राज्य केली असता ४ मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रीमंडळ अस होइल जेणेकरून जास्त लोकांच प्रशिक्षण होइल.
४. लहान आकारांमुळे राज्य करण सोप होइल.
५. मुंबईच महाराष्ट्र शहर राज्य या नावान एक वेगळ मराठी राज्य कराव.
६. मराठी भाषकांचा इतर राज्यांना जोडलेला भाग केवळ आकसान जोडलेला असून, तो परत त्या त्या मराठी राज्यांना जोडण्यात यावा.
समाप्त
मला इथे प्रकर्षान एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, काँग्रेस नी महाराष्ट्राला कायमच डावलल आहे, अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबतीत सर्व मराठीजनात, काँग्रेसचे सोडून (…), एकमत दिसत आणि तरीही इथे सर्वात जास्त काळ तोच पक्ष सत्तेत आहे हा फारच मोठा विनोद आहे.
संदर्भ : Thoughts On Linguistic States by Dr. B.R. Ambedkar (1955)

.jpg)
{लहान आकारांमुळे राज्य करण सोप होइल....}
हे तार्किक दृष्ट्या बरोबर वाटते पण लहान आकाराच्या राज्य निर्मितीतल्या धोक्यांचं काय? लहान राज्यात लोकप्रतिनिधींची संख्या खूपच कमी असणार आणि त्यामुळेच तिथे समाजकंटक, हितसंबंध गुंतलेल्या लोकांचे गट वगैरे प्रबळ होऊ शकतील. त्यातुन ते सर्व राज्यव्यवस्थेवर कब्जा करण्याची शक्यता वाढणार नाही? उदा. उद्या मुंबई हा वेगळा केंद्रशासित प्रदेश केला तर त्यावर एखादी गँग, दहशतवादी गट तिथल्या सरकारवर कब्जा नाही करु शकणार? जर विधीमंडळात लोकप्रतिनिधी कमी असतील तर सगळेच एकत्र येऊन भ्रष्टाचार करण्याची शक्यता वाढणार नाही (उदा. कोडा प्रकरण).
त्याशिवाय अजुन एक प्रश्न उरतो तो म्हणजे केंद्र-राज्य संबंधांचा. लहान राज्ये केली तर केंद्रात त्यांचे प्रतिनिधित्व करणार्या खासदारांची संख्या विषम होईल म्हणजे मुंबईचे खासदार पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त होतील. त्या परिस्थितीत राज्य सरकार केंद्राच्या समोर दुर्बळ ठरु शकेल.
आणि सर्वात महत्वाचा भाग येतो तो या छोट्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा. ही राज्ये आर्थिक दृष्ट्या सबळ ठरतील याची खात्री कशी करता येईल याचाही विचार करावा लागेल.
हे लेख वाचल्यावर डोक्यात आलेले काही विस्कळित विचार आहेत. लेख नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारा आहे. सुंदर लेखमाला आहे अन विवेचन करण्याची पद्धत पण छान आहे. अजुन लिहा भरपुर.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{सातारकर}
सातारकर साहेब सर्व प्रथम ह्या लेखमालेचा पुढचा भाग लिहिल्या बद्दल धन्यवाद.
बाबासाहेबांचे हे जे विचार होते ते आज जर लागु करायचा विचार केल्यास असे जाणवते के जर छोटी राज्ये बनवली तर त्याचा आर्थिक स्वायत्तेचे काय??? मुंबै जर स्वता:ला आर्थिक स्वायत्त राज्य समजत असेल तरी ईतर अनेक मुलभुत बाबंई साठी जसे की वीज पाणि पुरवठा त्याला ईतर राज्यावर अवलंबुन रहावे लागेलच. मराठवाड्याला स्वतःत्र राज्य बनवायचे झाल्यास बरेच प्रश्न निर्माण होतीलच. कदाचीत तेव्हा चार राज्ये झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते. पण आज जी छोटी राज्ये बनवायची स्पर्धा चालु आहे, त्यात ही राज्ये कसे टीकु शकतील ह्याची चिंता वाटतेच.
मला इथे प्रकर्षान एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, काँग्रेस नी महाराष्ट्राला कायमच डावलल आहे, अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबतीत सर्व मराठीजनात, काँग्रेसचे सोडून (…), एकमत दिसत आणि तरीही इथे सर्वात जास्त काळ तोच पक्ष सत्तेत आहे हा फारच मोठा विनोद आहे.
ह्या वरच्या शब्दा शब्दाशी सहमत आहे..
बाकी मराठवाड्याचा लोकांची विकासाबद्दलची उदासीनता ??? ह्या बद्दल लिहायचे तर आहे पण भावनेच्या भरात सगळे वाहुन गेले. असो.
-निखिल
{साधा सरळ अर्थ}
मला इथे प्रकर्षान एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, काँग्रेस नी महाराष्ट्राला कायमच डावलल आहे, अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबतीत सर्व मराठीजनात, काँग्रेसचे सोडून (…), एकमत दिसत आणि तरीही इथे सर्वात जास्त काळ तोच पक्ष सत्तेत आहे हा फारच मोठा विनोद आहे.
याचाच साधा सरळ अर्थ असा की, मराठीजनांत काँग्रेसवाद्यांची बहुसंख्या आहे (आणि काँग्रेस विरोधी संख्येने अल्प आहेत)
{अरेच्च्या}
अरेच्च्या साहेब किंवा ईतर कुठलाच दुसरा चांगला पर्याय नसेल असे नाही का???
-निखिल
{अलबत! काँग्}
अलबत!
काँग्रेसला कधीच ५०% च्या वर मते मिळाली नाहीत. पण काँग्रेसला इतर कोणत्याही पक्षापेक्षा (एक अपवाद वगळता) नेहेमीच जास्त मते (आणि जागा) मिळाल्या आहेत.
{+ १}
प्रत्येक शब्दाशी सहमत.
Hope is a good thing...
{आणखी थोडसं}
जो मराठी भाषकांचा भाग इतर राज्यांना दिला त्यामागचे खर कारण;
गुजराती पुढार्यांच काँग्रेसमधल वजन. जर संयुक्त महाराष्ट्र झालाच तर मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागेल, त्यामुळे त्या शक्यतेलाच सुरूंग लावला तर ही वेळ येणार नाही असा साधा सरळ विचार त्यांनी केला आणि महाराष्ट्राचे लचके तोडून इतर राज्यांना जोडले. अन्यथा त्यामधे कोणतही तर्कशुद्ध कारण नाही. पण त्या एका गोष्टीचा आज त्या भागातल्या लोकांना किती त्रास भोगावा लागतो आहे.
कर्नाटक हे तर अत्यंत भांडकुदळ राज्य आहे. फुकटात मिळालेल्या बेळ्गावावर ते नागासारख वेटोळ घालून बसले आहेत. एकीकडे आपले मुख्यमंत्री (वि. दे.) छातीचा कोट करून उत्तर भारतीयांच्या रक्षण करू म्हणून सांगतात. तिकडे बेळगाव नगर पालिकेने बेळ्गाव महाराष्ट्रात विलीन करा म्हणून सांगितल तेंव्हा ती नगर पालिकाच विसर्जीत करून टाकली कहर म्हणजे त्या नगराध्यक्षांना बंगळूरात विधान सौधेत मारहाण केली.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{+१}
सहमत...
{वाचतोय}
वाचतोय लिहीत रहा !!
हा ही भाग आवडला ,तुर्तास मतप्रदर्शन करीत नाही..सगळे भाग झाल्यावर जरुर करेन
{ह्म्म....}
मुद्दा बराच विचार करण्यासारखा आहे हे नक्की.
श्री. सातारकर ह्यांनी चालु केलेली ही लेखमाला नक्कीच उत्तम आहे.
मुळात श्री.सातारकर ह्यांच्या लेखमालेचा विषय 'भाषावार प्रांतरचना आणी त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मत/मुद्दे/विचार' हा असल्याने सद्यपरिस्थितीच्या वास्तविकतेचा संदर्भ इथे लावता येणं/लाऊ शकणं मला थोडंसं अवघड वाटते आहे.
जसे की, महाराष्ट्राचे ३ विभाग/संघराज्य/राज्य/केंद्रशासित प्रदेश घडवण्यात आले तर त्यांच्या चरितार्थाची सोय काय असु शकेल?
मुंबई औद्योगिकतेच्या बळावर तरुन जाईल हे कोणीही सांगेल.
पश्चिम महाराष्ट्र ऊसा-द्राक्षाच्या नगदी पिकांवर, तंबाखूवर, सर्वदुर पसरलेल्या औद्योगिक वसाहतींच्या जोरावर निभाऊन नेईल.
परंतु मराठवाडा-विदर्भ हा प्रभाग तितका औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे काय? ते नसल्यास नगदी पिकांच्या उत्पन्नामधुन येणार्या मिळकतीचा फायदा राजशकट हाकण्यासाठी होईल काय? सद्य परिस्थितीमध्ये सदर भुभागांची राज्ये घोषित केल्यास त्यांना महसुलाचे स्त्रोत काय असु शकतील? असे काही प्रश्न पडले.
ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ह्या संज्ञेखाली कोकणही समाविष्ट होता/आहे का?
कारण माझ्या मते कोकणाचे प्रश्नही थोडे वेगळे आहेत इतर भुभागांपेक्षा.
असो,
श्री.सातारकर,
आपल्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
{काही सोडून बहुतेक गोष्टींचा संदर्भ लागेल}
मला वाटत की लहान राज्य, राज्य करण्याच्या दृष्टीन फायदेशीर ठरतील. यामधे राज्यांचा सहभाग हा फक्त administration पुरताच असावा. जेणेकरून त्यांची कार्यक्षमता जास्त असेल.
यामधे दुसरा भाग असा की कोणाचीच प्रादेषिक अस्मिता टोकाची होणार नाही. स्वतंत्र द्राविडी राष्ट्राची मागणी किंवा मुंबई मिळाली नसता स्वतंत्र महाराष्ट्र देशाची मागणी ह्या गोष्टी आपल्याला काही अपरिचीत नाहीत.
नपेक्षा सी. राजगोपालाचारीनी सुचवलेला दोन फेडरेशेन च एक कॉन्फीडरेशन हा जास्त संयुक्तीक पर्याय वाटतो. नाहीतरी त्यांनी जसा धोका सांगितला होता की पंतप्रधान नेहमी हिंदी भाषिकच राहील ते खर झालच आहे.
हे सगळ अर्थातच भारत एक देश म्हणून. कारण आत्ता या क्षणी, जर मी चूकत नसेन तर, आपण एक देश नसून राज्यांचा संघ आहे.
पच्चीम महाराष्ट्र (
) या संज्ञेखाली कोकणही समाविष्ट होतो. भाग-२ मधे या सगळ्यांचा नकाशा आहे.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{लेखमाला एवढीच होती}
मी लिहायला थोडस चुकलो बहुतेक. लेखमाला एवढीच होती.
ह्यात प्रामुख्यान बाबासाहेबांचे संयुक्त महाराष्ट्राविषयी चा दृष्टीकोन विषद करायचा होता. बाबासाहेबांनी त्यांचे दृष्टीकोन एक पुस्तक लिहून विषद केले आहेत त्यामुळे ते एकाच ठीकाणी सापडतात. पुस्तकात पुढे उत्पन्न आणि कररचना विषद केली आहे, पण त्यातले बरेच संदर्भ आज बदलले असल्यान इथे लिहिल नाही.
पुढे आचार्य अत्रेंचा दृष्टीकोन लिहायचा आहे. पण ते सगळ वेगवेगळी पुस्तक चाळून लिहायला लागेल जे थोड वेळ्खाउ होइल अस दिसतय.
------------------------------------------------------------
माझा ब्लॉग
This is imperfect universe
{ह्यात}
ओह अच्छा अच्छा! माझा कयास निराळाच होता.
असो.
पुणेरी म्हणतात त्याप्रमाणे उपसंहारही लिहा साहेब तुम्ही
आणि अत्र्यांचे विचारही जाणुन घ्यायला आवडेल.
{लेखमाला एवढीच होती पण छान होती!}
सातारकर साहेब त्यापलीकडे अजुनही काही या विषयावर देऊ शकलात तर अजुन बरे होईल, जसे याबाबत अन्य नेत्यांची मते काय होती वगैरे. कदाचित ते लेखमालेचा उपसंहार म्हणुन उचित होईल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{असेच}
असेच वाटते..
खरोखर चांगली लेखमाला..
-निखिल
{अगदी माझे ही असेच मत}
अगदी माझे ही असेच मत आहे.
लेखमाला वाचली व आवडली देखील आहे.