एक छोटा पेच आहे हा.
अ आणि ब हे माझे मित्र आहेत. हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत असे म्हणता येणार नाही. पण दोघंही भागीदारीत व्यवसाय करतात. गेले काही दिवस व्यवसायत थोडी तंगी आहे. अर्थात, दोघांनीही प्रयत्न सोडलेले नाहीत. याच प्रयत्नांचे यश म्हणता येईल असे एक डील त्यांच्या पदरी पडण्याची चिन्हे आहेत. पेचाची सुरवात इथून होतेय.
अ चे म्हणणे आहे की हे डील पदरी पडण्यासाठी +++++ गणपतीचे दर्शन घेऊन यावे. ब चा यावर विश्वास नाही. थोडक्यात, अ श्रद्धाळू आहे तर ब (देव-परमेश्वर याबाबत) अश्रद्ध आहे. अर्थात, ब चे श्रद्धाळूंविषयी काही म्हणणे नाही. "माझ्या जगण्यात हस्तक्षेप होत नाही ना, मग झालं," असा त्याचा पवित्रा असतो. त्यामुळंच ऑफिसात रोज गणपतीची पूजा इतर मंडळी करतात त्याला त्याचा आक्षेप नाही. सत्यनारायण होतो, त्यालाहा आक्षेप नाही. कारण त्या दोन्हींत त्याला काही करावं लागत नसतं. तशी वेळ आली तर तो ते करतही नाही. अ ने हे स्वीकारले आहे.
आता अ दुसऱ्या गावात आहे, अर्थातच व्यवसायापोटीच. त्याचं म्हणणं आहे की, ब ने या विशिष्ट गणपतीचं दर्शन घेऊन प्रार्थना करून यावं.
ब ने तसे केलेले नाही. त्याचा प्रश्न असा आहे - मंदीच्या पेचातून बाहेर पडण्यासाठी डील होणे महत्त्वाचे आहे हे त्याला मान्य आहे. पण डीलचा आणि गणपतीच्या दर्शनाचा काहीही संबंध नाही. विषय नाजूक, कारण व्यवसाय आणि भागिदारी. स्थिती अशी -
१. दर्शन घेऊन येणं तत्वात बसणारं नाही, म्हणून ते होणार नाही.
२. दर्शन घेऊन आलो, असं सांगता येतं. पण दर्शन न घेताच तसं सांगणं हे असत्य.
३. अ ला "दर्शन आणि डीलचा काही संबंध नाही" हे सांगायचं तर किती नाही म्हटलं तरी नात्यात ताण येणार. पुढं डील झालं तरी किंवा न झालं तरी त्याचा संबंध गणपतीच्या दर्शनाशी जोडला जाणार. ताण वाढणार. कदाचित व्यवसायापुढे अडथळा.
ही झाली ब ची बाजू.
मी अ ला ओळखतो. त्या ओळखीनुसार ब ची ही भूमिका तो स्वीकारेलच अशी खात्री देता येत नाही. व्यवसायातील ब चे योगदान गृहीत धरून कदाचित स्वीकारेलही.
ब ने काय करावे?
तत्वांना मुरड घालून व्यावहारीक होत गणपतीचे दर्शन घेऊन यावे (म्हणजेच असत्य वागावे)? दर्शन न घेताच, असत्य बोलावे? प्रसंगी व्यवसाय पणाला लागेल हे ठाऊक असताना तत्वांशी ठाम रहावे (सत्यवादी, पण जगणं पणाला लावणारा वीर)?
(मी या दोघांमध्ये काही करावे हा पर्याय येथे खुला नाही.)
व्यवसाय पणाला लावला तर पुढच्या जगण्याचा प्रश्न आहे. नवीन सुरवात करावी लागेल. स्थिती त्या अर्थी पोषक नाही. तत्व पणाला लावले तर मानसीक स्तरावर ब ची पंचाईत होणार; कारण स्वभावाची घडण तशी आहे.
तुम्हाला काय वाटते?
मी जर ब
मी जर ब च्या जागी असतो तर व्यवसायासाठी म्हणुन गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो असतो. पण आपणच सांगितले आहे " तत्व पणाला लावले तर मानसीक स्तरावर ब ची पंचाईत होणार; कारण स्वभावाची घडण तशी आहे." मग थोडे अवघड आहे. माझ्या दृष्टीने जर अ च्या समाधानासाठी पर्यायाने व्यवसायासाठी ब ने तत्वांना मुरड घातली तर तो त्याचा पराभव ठरणार नाही.
अ ला सांगितले की डिल आणि गणपतीचा काहि संदर्भ नाही तर नात्यात तणाव येईल असे तुम्ही म्हणताय. जर अ आणि ब एकमेकांना चांगले ओळखत असतील तर ब अ ला ही बाब सांगुन केवळ तुझ्या हट्टापायी मी माझ्या तत्वात न बसणारी गोष्ट करत आहे. हे समजावुन सांगायचा प्रयत्न करु शकतो का??? अ हे समजावुन घेण्यालायक असावा असे वाटते.
दर्शन घेउन आलो हे खोटे सांगणे हे फारसे पटत नाही. तसेच ब ने जर दर्शन घेतले तर त्याला त्याचा तो पराभव वाटतो का हाही मुद्धा महत्वाचा आहेच.
-निखिल
दर्शन घेणे
दर्शन घेणे हा पराभवच - कारण ब नेहमी चारचौघांत अशी भूमिका घेतोच की परमेश्वर/देव नावाची चीज नाही. त्यामुळे त्या कर्मकांडात अर्थ नाही. (तो हेही मान्य करतो की, काही गोष्टी आजच्या मानवी बुद्धीच्या आवाक्यातील नाहीत, म्हणून अनेकांना देवाचा आधार लागतो. पण मला तो लागत नाही असं त्याचं म्हणणं.) त्यामुळं लौकीक यशासाठी देव-देव करणं त्याला पटत नाही. मग तो दर्शन घेऊन आला तर त्याच्या या भूमिकेलाच छेद जातो.
अ समजून घेईलच याची खात्री नाही. कारण, अ हा पक्का व्यवहारी आहे. तो म्हणतोच की, ही तत्वं वगैरे गुंडाळून ठेवा व्यवसाय करताना. व्यवसायात एकच तत्व - नफा! अ चा त्यातला बरा भाग म्हणजे तो न्याय्य नफावादी आहे. फसवाफसवी नाही.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म
विचार करतो आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ब ने
ब ने आपल्या तत्वांशी फारकत घेवु नये. त्याने अ ला सगळ्याची नीट कल्पना देवुन हवे असल्यास गणपतीच्या दर्शनास हापिसातील, परिचितांपैकी कुणाला पाठवुन डिल मिळावे म्हणुन प्रार्थना करण्यास सांगावे आणि तशी अ ला पूर्ण कल्पना द्यावी. कारण डिल होणे आणि गणपती दर्शन यांचा सरळ संबंध नाही. पण त्याच बरोबर जे असे मानतात त्यांच्या श्रद्धेला दुखवण्याचे, हिणवण्याचे कारण नाही. ज्या प्रमाणे काही क्षेत्रांमधे आपण केवळ पैसे पाठवुन आपल्या नावाने अभिषेक वगैरे केला जातो त्याप्रमाणे प्रतिनिधी रुपाने दुस-या कुणास पाठवता येण्यास हरकत नसावी हे ब ने अ ला समजावुन सांगावे. अर्थात ही बाब अ आणि ब यांनाच सामंजस्याने घेणे गरजेचे आहे.
मानवी नात्यातले ताण कधी कोणत्या कारणाने अव्यक्त रुपातुन व्यक्त रुपात येवुन बिघडतील अथवा कितीही मोठे कारण होवुनही तसेच घट्ट रहातील हे सांगणे ब्रह्मदेवास सुद्धा कठिण आहे. असो.
माझेही मत...
मी स्वतः अश्रद्ध नाही पण देवभोळेपणाचं अवडंबर नि त्याचं अवास्त्व स्तोम मला पटत नाही...
१. ब ने जे पटत नाही ते करू नये.. सबब गणपतीच्या दर्शनाला जाऊ नये.... यातून त्याला त्याच्या विचारांशी नि मतांशी फारकत घ्यावी लागणार नाही..
२. न दर्शन घेता घेतले असल्याचे असत्य वदन पण करू नये...
३. या उलट 'ब' ने 'अ' ला असे समजवावे की, अश्रद्ध माणसाने केलेली पूजा निष्फळ असते.. जर तुला पटते तर तू त्या विशिष्ट ठिकाणी न जाताही आहेस तिथून जर प्रार्थना केलीस तरी तुला तुझ्या मनातल्या श्रद्धेचे फळ मिळेल. 'मनी आहे भाव' तर देव कुठुनही पावेल फक्त तो नमस्कार मनापासूनचा असला पाहिजे, जुलुमाने घातलेला नको...
स्वातीशी
स्वातीशी सहमत आहे, मी.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वेल...
अवलिया आणि मक,
वाचला प्रतिसाद. समंजसपणा आणि श्रद्धेचे स्वरूप तुम्ही जे मांडले आहे, त्याचाच अभाव असेल तर...? म्हणजे अ च्या मते त्या विशिष्ट गणपतीला जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळं हा प्रश्न अधिक टोकदार होतो. मला दिसतं ते असं, की एकवेळ गणपतीची पूजा करणं ब स्वीकारेल. अश्रद्धेनंही करेल. पण विशिष्ट गणपती नाही स्वीकारणार. आणि इथं त्यानं नाही म्हटलं तर अ च्या श्रद्धेचा प्रश्न निर्माण होतोच.
फनी!!!
मोडककाका,

हा सगळा धागाच अतिशय फनी वाटतो.....
माझ्या मते ब ने अ ला स्पष्ट सांगावं की बाबारे, माझंही या धंद्यामध्ये अमूकअमूक योगदान आहे. धंदा बुडावा असं मलाही वाटत नाही. पण असं कुणाचं दर्शन घेऊन आल्याने धंद्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. तुला जर घ्यायचं असेल तर तू खुशाल अशी दर्शनं घेत बस पण माझा यावर विश्वास नाही हे तुला माहिती असतांना माझ्यामागे पिच्छा लावू नकोस!!!
अ जर समजूतदार असेल आणि जर त्याला ब च्या योगदानाची किंमत असेल तर घेईल समजून! नसेल तर तोडेल धंदा!!!
तिच्यायला, असं गळ्यात लोढणं घेऊन आयुष्यभर धंदा करत बसण्यापेक्षा ब ने नवीन सुरवात केलेली परवडली!! पहिले काही दिवस होईल त्रास पण ब ला धंदा कसा करावा हे माहिती असेल (ब चे योगदान वगैरे लक्षात घेऊन मी बोलतोय) तर तो निश्चितच परत फक्त स्वतःचा धदा वाढवू शकेल!!!
ब ने हीच भूमिका नवरा-बायको, पालक्-पाल्य, बाप्-मुलं, भाऊ/बहिणी, मित्र/ मैत्रिणी या संदर्भात घ्यावी. जी दुसरी व्यक्ती तुम्ही कोणावर तुमच्या मतांची सक्ती करत नसतानांही तुम्हाला तुमच्या मतांनुसार जगायचं स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही ती संबंध ठेवायच्या लायकीची नाही.
ब ला आनंदी पाहू इच्छिणारा,
ड
हा सगळा
असेच वाटले. माझी भागीदारी धंद्यात आहे तुझ्या श्रद्धेत नाही असे माझे उत्तर असेल.
-Nile
ब ने थोडा
ब ने थोडा समजुतदारपणा दाखवावा व अ च्या इच्छेसाठी का होईन आपला नियम थोडावेळ बाजूला ठेवावा असे मला तरी वाट आहे.
काय मोडक
काय मोडक ते ब तुम्हीच काय???
तरीच म्हटलं...
इथं अजून कसे नाही आलात तुम्ही?
या स्वागत आहे!!!
इतिहास चुकांसह पुन्हा घडत असतो याचा अनुभव देत अशल्याबद्दल धन्यवाद!!!
बचेंगे तो और भी लडेंगे
> पुढच्या जगण्याचा प्रश्न आहे. नवीन सुरवात करावी लागेल. स्थिती त्या अर्थी पोषक नाही. तत्व पणाला लावले तर मानसीक स्तरावर ब ची पंचाईत होणार
ज्या अर्थी ब अजुन धंद्याकरता ही तडजोड करायला तयार नाही त्या अर्थी त्याच्याकडे इतर ऑप्शन्स आहेत. जोवर ऑप्शन्स आहेत तोवर ब ज्या तत्वांना धरुन जगला आहे त्याला तिलांजली देणे कठीण आहे.
ऑप्शन्स नसतील तर ब तडक दर्शनाला जाईल, आज नाहीतर उद्या. शिवाय मग हे डील मिळाले तर ब अजुन एक कडवा कट्टर धार्मीक होणार. पुढेमागे मंदीर, मठ बांधणार
अ व ब यांना आपल्या स्वभावाची पहिल्यापासून ओळख होतीच त्यामुळे अ ने ब च्या पाठी लागणे अनाकलनीय आहे किंवा ही शेवटाची सुरवात आहे
------------------
श्रावण हेच नानावटी आहेत.
चांगला प्रश्न आहे....
मित्र कम पार्टनर बरोबर बिझिनेस की तत्व असा पेच आहे का?
श्रद्धा काटेरी टोकदार झाली की बोचते म्हणतात. अश्रद्धेचं पण तसंच आहे असं दिसतय!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
श्रद्धा
श्रद्धा काटेरी टोकदार झाली की बोचते म्हणतात. अश्रद्धेचं पण तसंच आहे असं दिसतय!
+१
ब हे काम
ब हे काम आऊटसोर्स करू शकतो. आणखी एक बिझनेस आयडीया द्या ब ला ...
एक पोर्टल सुरू करा. तिथे असं श्रद्धेच्या आऊटसोर्सिंगची कंत्राटं घ्यायची. जसं मेकमायट्रीपवर तिकिटं काढून मिळतात तसं या संस्थळावर अमुक एक गणपती, दुर्गा, वेतोबा, साईबाबा, म्हसोबा, लक्ष्मी इ.इ. देवांना स्वत: माणूस पाठवून तुमच्या श्रद्धेत भर टाकली जाईल वगैरे वगैरे ...
चला काढा पन्नास हजार या आयडीयेचे!! ;-)
(आयला, असल्या अमुकच देवळातल्या देवावर विश्वास ठेवणार्या लोकांबरोबर बिझनेस करणार्या अश्रद्ध ब आणि असल्या प्र्याक्टीकल आणि अश्रद्ध ब बरोबर धंदा उघडणार्या ठराविक ठिकाणीच श्रद्धा ठेवणार्या अ प्रणाम सांगा.)
वयाने,विचा
वयाने,विचारांने आणी विषेशतः बुध्दीने लहान असल्याने मत द्यायचे टाळत आहे..
बाकी अ काय ब काय आणी क्ष काय ? संस्कार - श्रध्दा - संस्कृतीचा घोळ आहे सारा..
ह्यावरन डॉनरावांचा एक लेख प्रतिसांदासकट आठवला .
हं
तिढाच आहे म्हणायचा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
या विषयावर तज्ञांची मते जाणून
या विषयावर तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडेल
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
हा पेच एव्हाना सुटला असेल! पण महत्वाचं काय आहे गणपती की रिलेशन?
माझी बायको पक्की श्रद्धाळू आहे आणि देव (मग तो कुणीही असो) निव्वळ कल्पना आहे हे मला महिती आहे. दोन महिन्यापूर्वी आमच्या लग्नाच्या वाढदिवशी ती म्हणाली `आज गणपतीला जाऊ!'
मी `सारसबाग की दगडूशेठ?'
`तुम्ही म्हणाल तो' ती
`सारसबागेत जाऊ, फिरायला बेष्ट आहे" मी
थोडा विचार करून, ती 'नको दगडूशेठला जाऊ'
`चलो'! मी
तिथे पोहोचल्यावर..
'तुझे सँडल्स इथे ठेव आणि तू जाऊन ये, मी इथे थांबतो'
` जरा आत तर चला नुसते'
मी तिच्याबरोबर आत जातो, ती शांतपणे दर्शन घेते. मी सरळ सिक्युरिटी पाशी जाऊन उभा रहातो.
ती अश्रद्ध झाली नाही, मी श्रद्धावान झालो नाही. मला फिरायची मजा आली, तिला दर्शनाची!
ती खुशीत, मी मजेत! जर देव नाहीचेयं तर मग पेच कुठेयं?
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/