अट्टल चोरटा मी........!!

0
0

अट्टल चोरटा मी........!!

नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना
कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो
ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो
आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द
कुणीतरी सहज बोलून जातो
अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो
आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात
नजर स्थिर होवून मन डोलायला लागते
कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो
आणि ती नादब्रह्माची लय चोरण्यासाठी
मी चोरी करून जातो .....!!

वार्‍यापासून बळ चोरतो, सुर्यापासून आग
ढगापासून छाया चोरतो, संतांपासून राग
चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी
सद्‍गुणांची उचलेगिरी अंतराच्या शुद्धीसाठी
असा अभय भामटा मी
असा अट्टल चोरटा मी.......!!

.
. गंगाधर मुटे
.......................................................

अरे चोरा आता बरा सापडला बघ!

1

अरे चोरा आता बरा सापडला बघ!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

खुपच छान कविता मुटेसाहेब...

2

खुपच छान कविता मुटेसाहेब... आवडली !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुंदर कविता..

3

सुंदर कविता..


धन्यवाद

4

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

सुंदर कविता!!

5

सुंदर कविता!!