रमताराम
Offline
शेवटची नोंद: १ दिवस 21 तास
Joined: 17/02/2010
प्रकाशन:
.jpg)
यातली सर्वच मुले गोरी का
यातली सर्वच मुले गोरी का आहेत?
काळी मुले गोड नसतात का?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
मला माहित नाही
यातील गोरी मुले सुद्धा गोड आहेत की नाही मला माहीत नाही, मी एकालाही चाटून पाहिलेले नाही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
वाट्लच व्हत ...ह्येच उत्तर
वाट्लच व्हत ...ह्येच उत्तर यिल म्हुन......आव शब्दांवर जावु नगासा.....त्ये कुनीतरी म्हण्तल्याल हाय न्हवं ...शब्द म्हनं भावनांचे वाहक अस्त्यात.....आसच काय्तरी.......
तुमी मोट्ठी मानस....म्हाय्ती आसलच........
नाय बा
आपन कोन्त्याच भावनाला ओळखत नाही का भवानीला. उगा खोटं कशाला बोला.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बार्र्र्र......... शुद्ध
बार्र्र्र......... शुद्ध मराठितल्या emotions = भावना
ठीक
त्यांवर 'इन्वर्ट कलर' करून पहा.
२ नावे
१. निरागस
२. कोवळीक
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लहान मुलांची छायाचित्रे
लहान मुलांची छायाचित्रे
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
.
चुचुची फुले!
हॅ हॅ हॅ
चुकुन चुचुची मुले असं वाचलं!
चुचु तु हे वाचलस का ग?
चुचु तु हे वाचलस का ग?
(विषय दिलेला नाही)
चित्रे एकापेक्षा एक सुंदर
चित्रे एकापेक्षा एक सुंदर आहेत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
'दो पंछी..दो तिनके'..
'दो पंछी..दो तिनके'..
(कुठेतरी भविष्यातील ‘आशियॉ’ त्यांच्या डोळ्यासमोर तरळत असेल म्हणून..एरवी त्यांनासुध्दा मोठं व्हायचंच आहे.बचपन के दिन भुला ना देना म्हणण्यासाठी.आयुष्याची कडू गोड चव चाखण्यासाठी.)
श्रामोसाहेब त्यांना सांगू शकतील का, “मोठे होऊ नका” म्हणून?
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
चला
सापडले शीर्षक. 'मोठे होऊ नका' हेच बेष्ट आहे. धन्यवाद निपो. बदल केला आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्त चित्रे आहेत
मस्त चित्रे आहेत
रमताराम
चित्रे एकापेक्षा एक सुंदर आहेत. खास विजुभाऊंसाठी माझ्या कडुन काही भर

१. जागेश्वर (उत्तरांचल)
२. कदम कदम बढाये जा.............किंवा (ताल से ताल मिला) नैनिताल

३.सगला संपवला................नैनिताल

४.हिच नाव "यांगचीनी" वय ९ महिने .............सिक्कीम फोटो बाय केके

५.फोटो बाय केके

६. हा "सनी" मुरबाडच्या एका फार्म हाउस माळ्याचा नातु प्रचंड बडबड्या होता.

फ्लॅशबॅक मधे जायच अस्ल्यास ईथे क्लिक करा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त रे
अरे तुझं पोरगं लै हुशार आहे बे. बहुतेक नवशिके फोटो काढता समोरून (थोडक्यात टांगण्यासाठी काढायच्या फोटोची पोज) काढतात अट्टाहासाने. केकेने नॅचरल अँगल राहू दिलाय. लै अक्कल हाय पोराला. माझ्यातर्फे दणदणीत थाप हाण त्याच्या पाठीवर.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
'सनी'चा फोटो मस्तच आहे!
'सनी'चा फोटो मस्तच आहे!
छान आहेत चित्रे!
छान आहेत चित्रे!
आर्र
आर्र तिच्या... म्हटलं आपल्यावर काय आफत आली ही! पण तसं नाही. ररा माझा मित्र आहेच. त्याची खात्री पटली.
बाकी फटू छान आहेत!
हॅ हॅ हॅ
'घाबरू नका'.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
लय भारी !! ररा दा , जयपा दा
लय भारी !!
ररा दा , जयपा दा मस्तच
छान गोड मुले गोरी आहेत का
छान गोड मुले गोरी आहेत का काळी हा विचार मी करत नाही. गोड मुले गोड असतात.
-पुण्याचे पेशवे
मी पाहिलेल्या कोणत्याच
मी पाहिलेल्या कोणत्याच ढकलपात्रात गोड ( क्यूट) लहान मुले म्हनून काळ्या अफ्रीकन/भारतीय मुलांची चित्रे नव्हती. कधितरी जपानी मुले होती.
क्यूट म्हणून केवल गोरी( व्हाईट) मुले दाखवणे हे बायस्ड रंगभेदासाठी अप्रत्यक्षरीत्या बुद्धीभेद करण्यासारखे आहे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
विजुभाऊ
तुमच्या पहिल्या प्रतिसादाला वळसा घालून मी चर्चा टाळली होती. परंतु धाग्याच्या उद्देश लक्षात न घेता तुम्हाला वादच घालायचा असेल तर उत्तर देतो
१. चित्रातील मुले क्यूट, गोड वगैरे आहेत याबद्दल मी काहीही लिहिलेले नव्हते.
२. तुम्हाला आवडो न आवडो, कातडीने काळ्या वंशातही सौंदर्यकल्पना या गोरेपणाशी निगडित होतातच. उगाच का आठवड्यात गोरे बनविण्याचा दावा करणारी क्रीम खपतात. (विचार घरात नि छातीठोकपणे सांगा, तुमच्या घरात कधीही खरेदी केली गेली नाहीत म्हणून)
३. चित्रकार स्वतः गोरा असेल (असा माझा अंदाज) आणि त्याच्या आसपास गोरी मुलेच असतील त्यांचे पोर्ट्रेट्स त्याने बनविली त त्यात काय चुकले. काय कलेमध्येही 'राखीव जागा' असायला हव्यात (अलिकडेच शिल्पकलेबद्दल टाकलेल्या धाग्यात असाच आमची कला त्यांची कला असला निरर्थक वाद सुरू झालेला आठवतो) कि दर चार गोर्या पोर्ट्रेट्स मागे एका काळ्या मुलाचे पोर्ट्रेट केलेच पाहिजे म्हणून?
४. माझ्याकडे आलेली पोर्ट्रेट्स मी इथे दिली. ती सगळी गोर्या मुलांचीच होती. ती इथे टाकण्यापूर्वी मी ही कुणीतरी काळ्या मुलांची पाठवेपर्यंत वाट बघायची होती का, रेशिअल बॅलन्स साधण्यासाठी?
५. ती चित्रे मी टाकली ती चित्रकाराची दृष्टी नि कला यांचा आस्वाद इतरांनाही घेता यावा म्हणून. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्राच्या विषयाबद्दल - एक नाही दोन - प्रतिसाद देताना तुम्हाला कलेबद्दल कणभर लिहावे (म्हणजे तुमची आवड व जाण असेल तर ) असे लिहावेसे वाटले नाही. याबद्दल मी निषेध करू का. मी नक्कीच तसे करणार नाही कारण तो तुमचा प्रश्न आहे. आवडले/नावडले तर लिहा अथवा नका लिहू त्याबद्दल मी तुम्हाला बाध्य कसे करू शकेन. हेच स्वातंत्र्य त्या चित्रकाराला द्यायला तुमची हरकत का असावी बरे? त्याला नसतील आवडत (धरून चला मलाही नसतील आवडत) काळी मुले नि फक्त गोरी मुलेच आवडतात, तर ही आमची आवड आहे, त्याला आक्षेप घेणारे तुम्ही कोण टिकोजीराव (ह. घ्या हो). आम्हालाही विजुभाऊंचे असे भलत्या ठिकाणी भलते प्रतिसाद लिहिणे आवडत नाही. सबब तुम्ही आमचा निषेध करा आम्ही तुमचा करतो. क्विट्स!
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ररांशी सहमत आहे. (काय दिवस
ररांशी सहमत आहे. (काय दिवस आलेत हल्ली कोणाशीही सहमत व्हावे लागते)
-पुण्याचे पेशवे
छान
काय दिवस आलेत हल्ली कोणाशीही सहमत व्हावे लागते
तुमची पेशवाई बुडण्याच्या मार्गावर असावी बाकी काही नाही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
रमताची मुले छानच आहेत
रमताची मुले छानच आहेत
सहमत
एवढ्या
गोडपोरांची आई पोरांना बापावर सोडून कुठे उलथली आहे कोणास ठाऊक. भेटली कुठे तर पत्ता द्या बरं का.__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
च्यायला
च्यायला धृतराष्ट्रानंतर (लालूच्याही आधी) तुम्हीच की.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
पुणेरी पेशव्यांशी ( कंसातील
पुणेरी पेशव्यांशी ( कंसातील वाक्यासहीत) सहमत
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
र रा जी चित्रे छानच आहेत. मला
र रा जी चित्रे छानच आहेत.

मला त्या संदर्भात कोनताच वाद निर्माण करायचा नाहिय्ये.
पण बहुतेक चित्रातून मला जाणवलेला मुद्दा इथे मांडला.
गोरा रंग म्हणजे सुंदर हा वर्णभेद कोणी आणला ते ठाऊक नाही.
भारतीय इतिहासात जे पूज्य पुरुष आले ते राम कृष्ण हे मेघश्याम म्हणजे सावळे होते. यात रंगाचा उल्लेख नव्हताच.
असो.
एखादा लेख्/विषय मांडला की त्याला आपल्याला हवा त्याच कॅटेगरीतला प्रतिसाद मिळेल हे अपेक्षा ठेवणे गैर आहे
लेखनातील मुद्द्यांवर वाद निर्माण झाला तर लेखकाने आपल्या मगदूराप्रमाणे त्या वादाचे प्रतिपादन्/खंडन करावे.
प्रस्तूत चित्रकाराने कशाचे चित्र काढावे या ज्याचा त्याचा प्रश्न आहे
पण आत्तापर्यन्त पाश्चात्य जगतातील छायाचित्रकारानी आनन्दी बाळाचे चित्र म्हणून नेहमीच गोर्याकातडीच्या मुलांची चित्रे प्रकाशीत केली आहेत. तर कसलीशी मदत मागण्यासाठी कणव यावी म्हणून भुकेकंगाल , पीडीत म्हणून भारत बांगलादेश अथवा अफ्रीकी देशातील कुपोशीत मुलांची चित्रे दाखवतात. माझा आक्षेप या गोष्टीला आहे.
दुर्दैवाने आंतरजालावरासुद्धा हे असेच चित्र दिसते.
आनन्दी अफ्रीकन मुले असा शोध घेतला तर खालील चित्र मिळाले
प्रश्न गोरी मुले किंवा काळी मुले असा नाहिय्ये. मुले ही मुलेच असतात.
अफ्रिकी देशातील मुलाना युरोपीय देशातील मुलांपेक्षा कमी सुविधा मिळतात पण ती आनंदी नसतातच असे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे केले जाते त्याबद्दल मला वाईट वाटते
असो.
आनन्दी चेहेरा हा सर्वात सुंदर चेहेरा असतो
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
छान
मला त्या संदर्भात कोनताच वाद निर्माण करायचा नाहिय्ये.
खुलाशाबद्दल (पटण्यासारखा नसला तरी) धन्यवाद.
पण बहुतेक चित्रातून मला जाणवलेला मुद्दा इथे मांडला.
अस्थानी मांडला असे आमचे मत मांडतो. छायाचित्र+विरंगुळा असे वर्गीकरण दिलेले असताना हा मुद्दा इथे मांडणे पूर्णत: अस्थानी नि धाग्याला काश्मीरला नेणारेच असते हे तुमच्यासारख्या जुन्याजाणत्या जालकराला वेगळे सांगावे लागत नाही.
एखादा लेख्/विषय मांडला की त्याला आपल्याला हवा त्याच कॅटेगरीतला प्रतिसाद मिळेल हे अपेक्षा ठेवणे गैर आहे
अर्थातच. पण तशा प्रतिसादाला फाट्यावर मारण्यात येऊ शकते ही शक्यताही गृहित धरली जावी.
लेखनातील मुद्द्यांवर वाद निर्माण झाला तर लेखकाने आपल्या मगदूराप्रमाणे त्या वादाचे प्रतिपादन्/खंडन करावे.
आमच्या अल्पमतीप्रमाणे केले आहे, ज्याच्याकडे - अपेक्षेनुसार - तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा आमचेच खरे म्हणून घोडे दामटले आहे.
प्रस्तूत चित्रकाराने कशाचे चित्र काढावे या ज्याचा त्याचा प्रश्न आहे
हे नुसते कळफलकाने लिहिण्यापेक्षा जाणिवेने घेतले असते तर एवढे सगळे इथे लिहून धाग्याला काश्मीरला नेण्याचा विचका केला नसतात.
बाकीचे मुद्दे आमच्या धाग्याशी सुसंगत नसल्याने त्यावर प्रतिसाद देण्यास आम्ही बांधील नाही.
अवांतरः शीर्षक अंमळ लवकरच बदलले आम्ही असे आता वाटू लागले आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बाकीचे मुद्दे आमच्या धाग्याशी
बाकीचे मुद्दे आमच्या धाग्याशी सुसंगत नसल्याने त्यावर प्रतिसाद देण्यास आम्ही बांधील नाही.
धन्यवाद. इतका संयमीत प्रतिसाद वाचून अक्षरशः अवाक जाहलो.
धागा भरकटावा असा मनसूबा बाळगून प्रतिसाद लिहिला नाही. जे काही र्हदयी आले ते लिहिले. हा प्रमादच जाहला ऐसे जाणौन दिधले हे बरीक थोर केलेत.
असो. मात्र आपण आमचा प्रमाद चालवौन घेतला त्या परास येखादे कोलीत हाणले असते तर तरी चालले असते. आपला हा सहिष्णू बाणा गनीमांस भावतो ऐसे आम्ही समजून होतो. परंतु मुच्चदेगिरीत आपण नानाम्वर मात केलीत ऐसेच म्हावे लागेल. गनिमांस चर्चेस यावे ऐसे म्हणत थोपवून धरायचे आणि चर्चेच्या तैयारीत अस्णार्या गनिमाचा पाडाव त्याचेच शब्दांत करावा हे ऐसे करतब आपण दाखवता.
ये उप्पर आम्ही सादर केलेल्या उत्तराचा येक नवा धागा सादर करावा ऐसा मनसूबा करीत आहोत.
धागा दाखल झाल्यावर येण्याचे करावे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
एक मिनीट !! काय नवीन वशंवाद
एक मिनीट !!
काय नवीन वशंवाद चाललाय ईथे ??
ररा आणी जयदा !! फोटुंनी जीव घेतला रं !! पाहुन खरच वाटल की 'का मोठे झालो' ते !!