शेझवान ट्रिपल फ्राईड राईस
नमस्कार मंडळी,
सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा..
मीम वरील आमचे हे पहिलवहिल आपत्यं आप्ल्या सेवेसी.
आजचा मेन्यु शेझवान ट्रिपल फ्राईड राईस.
चायनिज् पदार्थ करायला खुप सोप्पे असतात. फक्त त्यांच्या पुर्वतयारीला थोडा वेळ लागतो. भाज्या निवडुन त्या निगुतीने कापणे हे खर हुशारीच काम.
ते जमल की मग बाकीच हाय काय अन नाय काय!!!!!
साहित्यः
१ वाटी चिकन चे लहान तुकडे,
कोळंबी.
१/२ गाजर.
५-६ फरसबी.
२ पातीचे कांदे.
थोडासा कोबी.
१ भोपळी मिरची.
लसुण बारीक चिरलेला.
१ इंच आल्याचे जुलियंस.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
सोयासॉस
शेझवान सॉस.
मीठ चवी नुसार.
तयार भात.
न्युडल्स्.
कृती:
न्युडल्स् आणि भात आधीच तयार करुन ठेवाव.
चिकन आणि कोळंबी यांना १-१ चमचा सोयासॉस व शेझवान सॉस लावुन १० मिनिट मुरत ठेवाव. (दोन्ही सॉस मध्ये मीठ असत त्यामुळे वेगळ लावायची गरज नाही)
एका पॅन मध्ये १ चमचा तेल घेउन त्यात चिकन आणि कोळंबी शिजवुन घ्यावी.
चिकन आणि कोळंबी एक बशीत काढुन, त्याच पॅन मध्ये शिजवलेल्या न्युडल्स परतुन घ्याव्या आणि बाजुला काढुन ठेवाव्या.
त्याच पॅनमध्ये १ चमचा तेलावर लसुण्-हिरवी मिरची, आल परतुन घ्याव.
आच मोठी करुन थोडा शेझवान सॉस आणि भाज्या टाकुन परतावे. चवी नुसार मीठ टाकावे. चिकन आणि कोळंबी टाकावी.
लगेच तयार भात टाकावा आणि नीट मिक्स करुन घ्याव.
वाढताना आधी खाली भाताचा थर लावावा, वरुन न्युडल्स पसरवाव्या, वाटल्यास एक अंड्याचा पोळा काढुन वर ठेवावा.
.jpg)
गणपा
गणपा तुझ्या पाकृ पाहुन लवकरच आता परत नॉनव्हेज खाणार असे वाटते.
असो ह्याचे व्हेज वर्जन टाक रे... चिकन ऐवजी काय टाकावे???
-निखिल
निखिल्या
निखिल्या अरे वेज मध्ये ऑलरेडी भज्या वापरल्या आहेतच.. जस्ट चिकन, कोळंबी आणि अंड काधुन टाक.. हाय काय अन नाय काय
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
खरंच...
याच्या व्हेज वर्जन मध्ये चिकन ऐवजी काय घालायचे???
पाकृ नेहेमीप्रमाणॅच जबरदस्त!!!
मके फ्लॉवर
मके फ्लॉवर आवडत असल्यास चिकनला पर्याय म्हणुन वापरता येईल.. फ्लॉवर चे लहान तुकडे (एकदम लहान नाही सधारन १ इंचाचे) थोद वेल मीठ आणि सोया सॉस लावुन मग डिप फ्राय करुन घ्या.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
>>> मके
>>> मके फ्लॉवर आवडत असल्यास चिकनला पर्याय म्हणुन वापरता येईल
--- स्वल्पविराम न टाकल्याबद्दल हाबिणंदण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दुष्ट आहेस..
मी कॉर्न नाही.. फक्त फ्लॉवरच घालून करेन हो गणपा....
अवांतरः हा दुष्ट नंदन माझ्या नावाच्या मागे का लागलाय???
मग पॉट चे
मग पॉट चे काय करणार ????
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुझ्या...
तुझ्या डोक्यात हाणणार....
पाय गेलाच आहे कामातून....(नसलेले) डोकं पण घालवावे म्हणते!!!
फाटलो !! -
फाटलो !!
- फास्त भाईंदर
फुल्ल भरलेली फास्त लोकल , ही स्लो लोकल बंद पडल्याची खुण आहे.
(विषय दिलेला नाही)
-निखिल
फास्त
फास्त भाईंदर
:-ड
फुल्ल भरलेली फास्त लोकल , ही स्लो लोकल बंद पडल्याची खुण आहे.
मी टोळ / चेटूक करणे माझा खेळ.
मी टोळ
किंवा चिकन
किंवा चिकन ऐवजी सोय चंक्स घातले तरी चांगलं लागेल ना रे गणपा?
>>>>चिकन
>>>>चिकन ऐवजी काय टाकावे???
अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा.
आपण एक काम करावे चिकन च्या जागी मटण घालून प्रयत्न करावा.
शेंळी/बकरा हिरव्या भाजी पाला / गवत खातात म्हणूण त्या शाकाहारीच मग त्याचे मटण देखील शाहकारी असेल.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोंबड्या..
कोंबड्या नि तिची पिले पण दाणे खातात तेही शाकाहारीच ठरतील ना तुझ्या व्याख्येपमाणे?
कोंबडया
कोंबडया अळ्याही खातात. पण त्या अळ्या झाडाची पानेच खात असल्याने राजेंच्या व्याख्येप्रमाणे कोंबड्या शाकाहारातच मोडतील काय?
येथेच तर
येथेच तर तुम्ही चुकता..
अहो कोंबडी व कोंबडीची पिल्ले दाण्याबरोबर किडे, मुंग्या पण खातात मग ते मांसाहारी होतात आपण शुध्द शाकाहार ह्या विषयी बोलत आहोत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सही!!!!
गणपाभौंची २०१०ची दणदणीत उतारी!
वा रे
वा रे गणपा....डबा भरून पाठव बाबा इकडे...
वा छान
वा छान गणपा......
फोटो तर जब्रदस्तच आहे...
एकदा लग्न होऊ दे बायकोला तुझ्या लेखांच्या प्रिंन्ट आउटचा बॉक्सच गिफ्ट करतो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>एकदा लग्न
>>एकदा लग्न होऊ दे
तो सुदिन २०१० मध्येच येउदे
मेल्या तो खफ चालुकर आधी ते धाग्या वरचे तिरके प्रतिसाद वाचुन मान वाकडी व्हायची
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
आता
आता लंगड्या बरोबर कोण लग्न करणार कळत नाही आहे बे
* खफ साठी नेट स्पिड हवे माझ्या मोबाईल नेटला स्पिड नाही आहे मी जरा ठिक झालो की करेन चालू तो पर धागे आहेतच खफसाथि
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मेल्या...
मेल्या तो खफ चालुकर आधी
हे शब्द भलतेच आवडले
झक्कास
झक्कास रेशिपी हो गणपासेठ. अंधेरीतल्या 'स्टमक' या चायनीज (उच्चारी चायनीस) हाटिलाची आठवण येऊन अंमळ हळवा झालो. असो, पुढच्या मुंबईभेटीत माझ्यातर्फे तुम्हांला स्टमकमध्ये एक वॉन्टॉन सूप
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वॉन्टॉन
वॉन्टॉन सूप.....एका पार्टीत समोरच्याला लुटायचा म्हणून बाकिच्या पेक्शा २० रू महाग असलेले वॉन्टॉन सूप ऑर्डर केले होते एका हाटेलात ते आठवले...
मस्त रे!
आपली मिमवरची अपत्ये अशीच उत्तरोत्तर वाढत राहोत ह्या सदिच्छा!
ही कृती
ही कृती गणपाने स्वतः केलेली आहे असे प्रतिज्ञापत्र त्याच्या बायकोने दिल्याशिवाय प्रतिसाद देणार नाही.
स्वागत आहे गणपा!
आता मिमचा बोर्ड पुर्ण झाला.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
मस्त ............ आवडली डिश.
मस्त ............
आवडली डिश.