एकत्र कुटुंबपध्दती - महागाईवर मात ?
म्रुण्मयीचा महागाईचा मुद्दा लक्शात घेता माझ्या मनात एक विचार आला.
जर एकत्र कुटुंबपध्दती परत सुरु झाली तर काही खर्च आप्ल्याला कमी करता येतिल.
टेलिफोन
इले़क्ट्रिसिटी
मेन्टेनन्स
अजुन बरेच काही
पण एकत्र राहायचे म्हणजे त्यातही तडजोड आलिच, ति कशी टाळता/ कमीकरता येइल वैग्रे वैग्रे...
तुमची मते मांडा.
.jpg)
{मला तर}
वाडा संस्कृतीच आवडते. त्यावर आधारित बृहत् कुटुंबाची एक कल्पना मी मागे मांडली होती. झाडून सगळे मित्र सहमत झाले होते. अर्थात त्यापैकी बहुतेक सारे आता गावातल्या गावात आईवडिलांपासून वेगळे राहतायत.
आपण विकत घेतलेल्या बहुसंख्य गोष्टी या अंडरयुटिलाईज्ड (मराठी?) राहतात. अशा बृहत् कुटुंबात त्यांचा पुरेपूर वापर करणे शक्य होते. विभक्त कुटुंबात सार्याच अपेक्षा जोडीदाराकडून पुर्या व्हाव्यात अशी अपेक्षा वाढीला लागते ती नेहमीच पुरी होईल असे नाही. कारण दोघांच्या काही आवडी-निवडी, कुवत सारखीच असेल असे नाही. अशा वेळी जिथे जोडीदार कमी पडेल तिथे बृहत् कुटुंबातील एखादा ती उणीव भरून काढू शकतो. अनेकदा हे काम मित्रमैत्रिणी करत असतात. परंतु अति पजेसिव होऊन जोडीदार - खास करून पुरूष - त्याबाबत नाखूष, नाराज नि बहुतेक वेळा आक्रमक सुद्धा असू शकतो. अशा स्थितीत कुटुंबातच असा मित्र वा मैत्रिण असेल तर ही समस्याही उद्भवत नाही. बरेच लिहिता येईल. तूर्तास इतकेच.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अंडरयुटिलाईज्ड= वापर}
अंडरयुटिलाईज्ड= वापर नस्ल्याने पडुन राहतात
{सॉल्लिड}
किती हुशार आहेस गं तू. मला सुचलंच नाही हे.
असो. अगं बाई एक शब्द हवा.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{चुचुमावशी, तू महान आहेस! ररा,}
चुचुमावशी, तू महान आहेस!
ररा, संस्कृतात 'निमयुज्यित' वगैरे असू शकतो.
{ह्म्म}
किंवा प्राकृतात 'निरुपयोगी'च्या चालीवर 'निमउपयोजित' म्हणावे?
लै जड वाटले हे म्हणून नाही लिवले. सोपा शब्द हवा.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{कुठल्याही}
बायकांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली दिवसातून तासभर तर बरेचसे प्रश्न सुटु शकतात असे घरातील वडिलधारे म्हणत.
हे हे हे
{ह्म्म अगदी मान्य माझी आइ}
ह्म्म अगदी मान्य
माझी आइ म्हणते कि २ हि फॅमिलिजना थोडे समजंस वागावे लागते.
{एकत्र कुटुंब पद्धती आधी देखील}
एकत्र कुटुंब पद्धती आधी देखील श्रेष्ठ होती, आता तर ती खरं तर गरजेची आहे. पण आजकालच्या मुलांना हम दो - हमारा एक अशी सिस्टम आवडते हे दुर्दैव.
{सहमत आहे, तसेच धार्मिक}
सहमत आहे, तसेच धार्मिक वातावरण घरांमधून कमी होत चालले आहेत त्याचा देखील फरक पडत असावा.
{अर्थशास्त्रीय ...}
पण एकत्र राहायचे म्हणजे त्यातही तडजोड आलिच, ति कशी टाळता/ कमीकरता येइल.
अर्थशास्त्रीय दृष्टीकोन ...
समजा ३ भाऊ लग्न झाल्यावर (जोडपी) एकत्र कुटुंबात रहात आहेत. प्रत्येकी १/२ मुले आहेत (गृहीत धरुया). व आईवडील (त्या तिन्ही भावांचे) आहेत. म्हंजे घरात ४ सज्ञान स्त्रिया, ४ सज्ञान पुरुष व मुले आहेत. तसेच कार्यक्षम प्रजासत्ताक राष्ट्राचे कवच आहे.
१) या तिन्ही जोडप्यांची आमदनी एकसमान असण्याची शक्यता फर कमी आहे. ज्या जोडप्याची आमदनी जास्त त्या जोडप्याला जास्त अधिकार (पैश्याच्या विनियोगात) हवे असतील तर संघर्ष निर्माण होऊ शकतो. उदा. मुलांना कोणत्या शाळेत घालायचे - सरकारी की प्रायव्हेट, मुलांचे कपडे खेळणी (उंची/महागडी की सस्ते-मे-मस्त वगैरे.), विशेषतः "त्या" जोडप्याची आमदनी तुलनेने खूप जास्त असेल तर व त्यांना जास्त अधिकार हवे असतील तर व उरलेली २ जोडपी समानतेचा आग्रह धरत असतील तर फारच संघर्ष. "त्या" जोडप्याच्या मनात अन्यायाची भावना वाढीस लागु शकते. व "ते" जोडपे फुटुन निघण्याचा विचार करते. यावर उपाय - एकत्र कुटुंबात विलीन होणे व्/वा फुटुन निघणे हे वैकल्पिक असावे. अर्थात यातही समस्या आहेत. यातून संधीसाधूपणा (Opportunism ) वाढीस लागतो. पण संधीसाधूपणा हा व्यक्तीचा मूलभूत गुणधर्म असतो. संधीसाधूपणा (Opportunism ) हा शब्द बर्याच वेळा नकारात्मक Connotation ने वापरला जातो. पण त्याचा खरा अर्थ = Opportunism = Propensity of the individual to seek and pursue options.
२) कुटुंब हा अलिखित करार आहे. सध्या त्याला कायद्याचे पाठबळ मिळालेय - त्यामुळे कुटुंब हा लिखित करार झालाय. पण कायदा हा देखील करार आहे. जवळपास सर्व (नैतिक) मूल्ये (अलिखित) करार असतात. कुटुंबाची उत्पत्ती ही कालमर्यादित आहे. आईबडीलांच्या मृत्यु नंतर कुटुंब संपते व मुलांचे वेगवेगळे कुटुंब सुरु होते. कुटुंबाच्या करारच्या किंवा कोणत्याही कराराच्या अनेकविध लिखित्/अलिखित शर्तींमुळे क्लिष्टता निर्माण होते व या तपशीलाकडे लक्ष देण्यासाठी सामान्य व्यक्ती ला वेळ नसतो. खरे म्हंजे काही सामान्य व्यक्तींची कुवतही नसते. (हे मी obnoxious पणे/condescending पणे म्हणत नाहिये.). व अनेकांच्या बाबतीत ही क्लिष्टता व गुंतागुंत समजून घेण्याच्या श्रमाचे फायदे अत्यल्प असतात. या वेळेच्या व कुवतीच्या अभावाला Bounded Rationality म्हणतात. Bounded Rationality and opportunism (वर म्हंटल्याप्रमाणे) are the facts and they collectively give birth to transaction costs. (http://www.sjsu.edu/faculty/watkins/coase.htm ). कायदा, (नैतिक) मूल्ये, कंपन्या, Organizations, hierarchies, Institutions, कुटुंबे यांच्या अस्तित्वामागचे एक महत्त्वाचे explanation म्हंजे transaction costs कमी ठेवण्याचा उद्देश. पारस्परिक व्यवहारात transaction costs शून्य असुच शकत नाहीत व म्हणून त्या मर्यादित ठेवणे हा एकच पर्याय उरतो.
३) या एकत्र कुटुंबात एकच फोन आहे असे गृहित धरुया. टेलिफोन चे बिल वापरावर अवलंबुन असते. किति STD/ISD केले ? किति वेळ बोललात ? त्यावर महिन्याचे बिल येते. "त्या" जोडप्याला जर जास्त फोन करायचे असतील तर त्याचा भार (विभागुन सुद्दा) इतर २ जोडप्यांवर पडतो (समानतेचा आग्रह धरल्यास). यातून फोन चा (अ)अतिवापर (थोडेसे Moral hazard सारखे) किंवा (ब) rule-based असल्यास जरूरीपेक्षा कमी वापर (निमयुज्यित - वर म्हंटल्याप्रमाणे) हे दोन परिणाम होऊ शकतात. "जरूरीपेक्षा कमी" हे less than your true willingness to pay for it या अर्थाने.
४) वीज - यात सुद्धा बिल वापरावर अवलंबुन असते. पण यात बरीच बचत होऊ शकते. (एकच) फरनेस, एकच पाणी तापवायचा मोठ्ठा गिझर वगैरे. केंद्रिय वातानुकुलीत सिस्टीम मध्ये मात्र प्रत्येकाचा इष्ट तापमानाचा आग्रह वेगवेगळा असतो त्यामुळे त्यातून खटके उडु शकतात. त्यामुळे काही खोल्या रिझर्व करुन त्यात हिटर चे आउटलेट चालु ठेवुन तापमान जास्त व काही खोल्यांमध्ये हिटर चे आउटलेट बंद ठेवुन कमी तापमान ठेवुन एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
५) एकत्र कुटुंब पद्धतीत economies of scale चा फायदा स्वैपाकाच्या बाबतीत होऊ शकतो. पण एका व्यक्तीला आजच्या जेवणात इडल्या, दुसरीला श्रीखंड, तिसरीला भरीत, चौथीला कारल्याची भाजी हवी असेल तर तडजोडी कराव्या लागतील. समस्या काय बनवायचे ही आहेच. पण त्याहूनही कोण ठरवणार ही जास्त मोठी समस्या आहे. कोणत्याही निर्णयात preferences, कौशल्ये(skills), जोखीम व Incentives हे महत्त्वाचे घटक असतात. आजच्या जेवणाला काय बनवायचे यावर प्रचंड मतभेद होऊ शकतात कारण यात प्रत्येकाचे preferences वेगळे असतात. त्यातून आपल्या या घरात ४ स्त्रिया कुशल आहेत व काही पुरुषही हौशी स्वैपाकी असु शकतात. म्हंजे ४ वा ५ माणसे निर्णय घेण्यास समर्थ आहेत. खमंग वास येतो - मग ऐनवेळी काही व्यक्तीचे preferences बदलतात. मग "कमी पडले" व/वा "खुप उरले" या समस्या निर्माण होतात. ज्यांची मने मारली जातात ते नाराज होतात. माझ्या मते एकत्र कुटुंब पद्धतीच्या र्हासामागे हे एक कारण आहे. आपल्याकडे पूर्वी हॉटेलात जाउन खाणे हे थोडेसे चुकिचे मानले जायचे त्याचे एक कारण हे ही होते की जी व्यक्ती हॉटेलात जाते ती स्वतःच्या आवडीनिवडीला फार प्राधान्य देते व तडजोड करण्यास राजी नसते असे मानले जायचे. त्या "जुन्या" काळी मर्यादा, तडजोड हेच आदर्श होते. मन मारणे, इच्छेला मुरड घालणे ही सामाजिक (संयम, त्यागरूपी) मुल्ये होती. अर्थात गरिबी हे मुख्य कारण होते.
६) कुटुंबात आईवडील हे Venture Capitalist ची भूमिका करतात. व मुले Startup. असा क्षणभर विचार करा. आईवडील हे भागधारक असतात व मुले छोट्या कंपन्या ... ज्या नुकत्याच जन्माला आल्यात. त्यांना लालनपालनपोषण, handholding हे काम आईवडील करतात. मुले १८ वर्षाची झाली किंवा शिक्षण पूर्ण झाले की IPO. तुम्ही Venture Capitalist असाल तर तुम्ही काही Startup कंपन्यांना त्यांची विपणन (मार्केटिंग) सुधारायला मदत कराल व काही Startup कंपन्यांना वितरण सुधारायला व काहींना strategy मधे. काही Startup कंपन्यांमध्ये तुमची equity जास्त असेल तर काही मध्ये कमी. प्रत्येक कंपनीची गरज व preferences वेगळे असतील. तसेच मुलांचे आहे. आपल्या या कुटुंबात चार पाच मुले आहेत व त्यांना वेगवेगळे कोर्सेस करावेसे वाटत असतील व त्याच्या फिया (fees) वेगवेगळ्या असतील तर पैसे कोण देणार... एकाच्या मुलीच्या/मुलाच्या fees दुसर्याने का भरायच्या ही समस्या. व fees काका/काकू भरणार असतील तर माझी निष्ठा आईवडीलांपेक्षा काका/काकुंकडे जास्त ... ही समस्या. माझ्या मुलांना शिक्षा करण्याचा अधिकार माझ्या भावाला/वहिनिला असावा का व किती? माझ्या मते एकत्र कुटुंब पद्धतीच्या र्हासामागे मुलांचे संगोपन व त्याचा खर्च हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
खुलासा - वाचताना तुम्हाला वाटेल की गब्बर लेक्चर देतोय. विशेषतः २ मध्ये. क्षमस्व.
१,२,५ हा फक्त एक अर्थशास्त्रीय दृष्टीकोन झाला. transaction costs perspective. ६ मध्ये मी गुंतवणूक व transaction costs हे दोन perspective वापरलेत.
तसेच मी पूर्वी दरोडेखोर होतो ... नंतर "सुधरामायसिन" घेतल्यावर अर्थशास्त्राचा theoretical अभ्यास केला त्यामुळे मी फक्त High level च्या गफ्फा मारु शकतो (Ivory Tower मधुन) ....... Grass-root लेव्हल वर येऊन बोलु शकत नाही.
माझे मत - एकत्र कुटुंब पद्धती हा एक प्रकारचा socialism आहे. यात माहीती, preferences, Incentives, जोखीम, कौशल्य यात बरीच mis-alignment आहे. मला nuclear कुटुंब आवडते. पण बाकीच्यांना हवे असेल तर त्यांनी एकत्र कुटुंब आचरणात आणावे असे मी मानतो.
महागाईचेच म्हणाल तर आपली गरज कमी करणे या व्यक्तीरिक्त महागाई वर व्यक्तीगत पातळीवर फारसे काहीच करु शकत नाही. आपल्या खासदारांना सांगुन रिझर्व बँकेवर कडक नियंत्रण ठेवु शकतो. रघुराम राजन समितिचा अहवाल प्रसिद्ध होऊन २ वर्षे झालीत ... त्यावर कार्यवाही होईल ही अपेक्षा ठेवु शकतो.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{वाह...}
{संबंधित वार्ता}
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7491394.cms
"तारुण्यात आलेल्या मुलींनी चारित्र्याचे पावित्र्य राखण्यासाठी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. दैनंदिन जीवनात वावरताना मुलींचा पेहराव कसा असावा याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मिरगे यांनी सांगितले. "
हा भाग मात्र ५००% बकवास वाटला.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.