शाकाहारी विरुद्ध मांसाहारी

0
0

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद पेटला तेव्हा त्यातून उपवाद निर्माण झाला तो शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ असा. आणि उप उपवाद निर्माण असा झालाय कि माणूस निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी असा. माणूस निसर्गत: शाकाहारीच आहे, मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता.
माझ्या मते भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल ; सोवळं पाळण्यासाठी माणसांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा , सर्वांशी मिळून-मिसळून वागून पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ' भूतदया ' च अधिक श्रेयस्कर ठरेल.
माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल. हे विधान कुठल्या हि एका संप्रदायाला अनुसरून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या योग्य व सिद्ध आहे. प्राचीन काळात चातुर्वर्णाप्रमाणे समाजाची रचना होती. आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वेगळा जातीयवाद निर्माण होऊ पाहतोय. मांसाहार ठीक आहे पण त्याचे अधिक सेवन फायदेशीर नाही. शारीरिक व मानसिक दृष्ट्या हि....

just take a look through-

No deficiencies. There is no nutrient necessary for optimal human functioning which cannot be obtained from plant food.

High fat plus cholesterol. Animal foods are higher in fat than most plant foods, particularly saturated fats. Plants do not contain cholesterol.

"Carb" deficient. Meat is deficient in carbohydrates, particularly the starches which are so essential to proper health.

Vitamin deficient. Except for the b-complex, meat is largely deficient in vitamins.

Agricultural Chemicals. Being higher on the food chain, animal foods contain far higher concentrations of agricultural chemicals than plant foods, including pesticides, herbicides, etc.

Disease Inducing. The correlation between meat consumption and a wide range of degenerative diseases is well founded and includes.....

Osteoporosis

Kidney Stones and Gallstones

Diabetes

Multiple Sclerosis

Arthritis

Gum disease

Acne. Aggravated by animal food.

Obesity. Studies confirm that vegetarians tend to be thinner than meat eaters.

Obesity is considered by doctors to be a disease within itself.

Intestinal Toxemia. The condition of the intestinal flora is critical to overall health.

Animal products putrefy the colon.

Transit time. Wholesome food travels quickly through the "G.I" tract, leaving little time to spoil and incite disease within the body.

Fiber deficient. Fiber absorbs unwanted, excess fats; cleans the intestines; provides bulk and aids in peristalsis. Plant food is high in fiber content; meat, poultry and dairy products have none.

Body wastes. Food from animals contain their waste, including adrenaline, uric and lactic acid, etc., Before adding ketchup, the biggest contributors to the "flavor profile" of a hamburger are the leftover blood and urine.

सोवळं पाळण्यासाठी माणसांचा

1

सोवळं पाळण्यासाठी माणसांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा , सर्वांशी मिळून-मिसळून वागून पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ' भूतदया ' च अधिक श्रेयस्कर ठरेल.

हे मात्र खरे!!!

शाकाहारी चुचु

छे

2

माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल. हे विधान कुठल्या हि एका संप्रदायाला अनुसरून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या योग्य व सिद्ध आहे.

निराधार.

वनस्पतिज अन्नात अनेक कमतरता असतात. शुद्ध मांसाहार अगदीच कमी लोक (एस्किमो ९५% अ-वनस्पतिज अन्न) करतात. मिश्र आहारच सर्वोत्तम.

वनस्पतींमध्येही कोलेस्टेरॉल असू शकते.

मांसांत ग्लायकोजेन हा पिष्टमय पदार्थ असतो (कमी असतो हे मान्य). मिश्र आहारातून पिष्ट्मय पदार्थ मिळतातच. शिवाय उच्च प्रथिने, जीवनसत्वेही मिळतात. मांसांत अ, ड, क जीवनसत्वे प्रचंड असतात.

Osteoporosis
Kidney Stones and Gallstones
Diabetes
Multiple Sclerosis
Arthritis
Gum disease
Acne. Aggravated by animal food.
Obesity. Studies confirm that vegetarians tend to be thinner than meat eaters.
Intestinal Toxemia. The condition of the intestinal flora is critical to overall health.
Animal products putrefy the colon.
Transit time. Wholesome food travels quickly through the "G.I" tract, leaving little time to spoil and incite disease within the body.
Body wastes. Food from animals contain their waste, including adrenaline, uric and lactic acid, etc., Before adding ketchup, the biggest contributors to the "flavor profile" of a hamburger are the leftover blood and urine.

यांचे कृपया संदर्भ द्या.

वा

3

आणखी एक पॉपकॉर्न-व्यवसाय-सहाय्यक धागा. झाडाखाली दुकान थाटले आहे.

अवांतरः मृण्मयीतै. जालावर काही विषय इतके दळले गेलेत की अवोगाद्रो नंबरची नव्याने व्याख्या करायची वेळ आली आहे. हा विषय तसाच आहे. जरा मराठी जालावर फेरी मारा. तेच तेच मुद्दे, तोच अभिनिवेश, तीच 'मी शहाणा' वृत्ती इतकी दिसली आहे की वीट आलाय. "ज्ञानाला चेहरा नसतो म्हणतात पण अज्ञानाला एकच चेहरा असतो, माणूस वेगळा असला तरी" हे नक्की पटले आहे. बाकी चालू द्या.

एवढा परखड उपदेश कराल तर

4

एवढा परखड उपदेश कराल तर पॉपकॉर्नचा धंद्याचं दिवाळं निघेल असा आमचा एक परखड उपदेश.

(विषय दिलेला नाही)

5

अगायाया

6

घाबरगुंडी आवो हे ध्येनातच आलं न्हाई.
असो. पीडीपीचा प्रचार एवढा पुरे. नवीन सभासदांचे धागे काश्मीरला न्यायचे नाहीत असा दंडक पीडीपीचे अद्यक्ष मा. अर्धवटचंद्ररावजी साहेबजी यांनी घालून दिला आहे. जो काय ताप द्यायचा तो जुन्या सभासदांना(जरी नव्या आयडीने आलेले असले तरी. wink )

जग शाकाहारी होणार आहे

7

सर्व जग एक दिवस शाकाहारी होणार आहे - इति हिटलर उवाच
होय लाखोंचे बळी घेणारा हा नराधम शुद्ध शाकाहारी होता


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हिटलर शाकाहारी होता हे खरं

8

हिटलर शाकाहारी होता हे खरं नाही..


पुष्करिणी

हो मी ही असच ऐकलंय. तो

9

हो मी ही असच ऐकलंय. तो शाकाहारी वगैरे अफवा होती म्हणे.


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

अरेरे

10

शाकाहारी लोकांना राग आला बर्का. बाकी यावर सश्रद्ध/अश्रद्ध वादात सगळे सश्रद्ध सद्गुणीच असतात या दाव्याला खोडून काढण्यासाठी एखादे दुर्गुणी सश्रद्धाचे उदाहरण दिले की की तो काही 'खरा सश्रद्ध नै कै' म्हणणार्‍या तथाकथित सश्रद्धांचा आटापिटा आठवला.
(चला लागली काडी. दोन प्रसिद्ध वाद चालू करून आपले पॉपकॉर्नचे दुकान झकास चालेल आज)

ररा, मी माहीती म्हणून दिली,

11

ररा, मी माहीती म्हणून दिली, शाकाहाराचं समर्थन करण्यासठी नव्हे. किंबहुना माझ्या परिचयातले जी चिडचिडे आणि तापट लोकं आहेत त्यातील बहुतांशी शाकाहारी आहेत.
(आता तो पॉपकॉर्नचा पुडा इकडेहि सरकवा जरा)


__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:

इन्व्हर्स इज ऑल्सो

12

इन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू...

बादवे तुमच्याकडॅ पॉप्कॉर्न शा. की मां. ?


पुष्करिणी

इन्वर्स की कॉन्वर्स? (गणिती)

13

इन्वर्स की कॉन्वर्स?
(गणिती) रमताराम

बादवे तुमच्याकडॅ पॉप्कॉर्न शा. की मां. ?
जे मागवाल ते. चिकन पॉपकॉर्नवर 'शुद्ध शाकाहारी' असे लेबल लावून हवे असेल परवा मागितले होतेत तसे तरी तसे देऊ. हाकानाका. शेवती ग्राहकाचा संतोष हाच आमचा मोक्ष!
(निरपेक्ष)रमताराम

हा हा हा. ट्रान्सवर्स.

14

हा हा हा.

ट्रान्सवर्स.

आम्ही गणिती नसल्याने

15

आम्ही गणिती नसल्याने इन्वर्सच...

अय्या, कोण ही शेवंती ?


पुष्करिणी

आम्ही गणिती नसल्याने

16

आम्ही गणिती नसल्याने इन्वर्सच...
अपेक्षित प्रतिसाद (पां.शा. मधे लिहला पण होता पण मग तुम्हाला उत्तर देण्याचा चान्स देऊ म्हटलं)
हॅ हॅ हॅ. इन्वर्स हा आमच्या गणितवाल्यांचा (मॅट्रिक्स अल्जिब्रा, कॅल्क्युलस मधील) स्वामित्त्वहक्क आहे. कॉन्वर्स म्हणा बगू.

अय्या, कोण ही शेवंती ?
ते आमाला काय विचारते, ते ग्राहकला विचार ने. तेची हाय ना ती?

अवांतर: नव्या लोकांचा धागा दिल्लीपर्यंत आणला आहे त्यात आमचा हातभार लागला आहे. त्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून नि काश्मीरला जायला हातभार नको म्हणून धागामौन जाहीर करतो.

हेच ते, अशा पझेसिव्हपणामुळेच

17

हेच ते, अशा पझेसिव्हपणामुळेच प्रॉब्लेम निर्माण होतात सगळे...म्हणे गणित आमचं, शास्त्र आमचं...छे.

काय हे, ते चिनी-पाक इंचाइंचान येतात काश्मिरात आणि तुम्ही एक्दम हातभर काय जाताय


पुष्करिणी

आईशपथ

18

तै सॉल्लिड तय्यार झाल्यात हां जालावर. काय शॉल्लेट टँजंट मारलाय. Grade संबालून र्‍हायला पायजे.
पण उत्तर देणार नाही. आधीच धागा दिल्लीपर्यंत आलाय. नव्या सभासदाला आधीच भरपूर ताप दिलाय. आता चूप बसतो.

आम्ही शाकाहारी असून हिटलरला

19

आम्ही शाकाहारी असून हिटलरला आदर्श मानतो.

+१ असेच म्हणतो

20

अगदी अगदी


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

चुटादिआ. तुम्ही वर हिटलरला

21

चुटादिआ. तुम्ही वर हिटलरला क्रूरकर्मा-नराधम वगैरे संबोधिले आहे. त्यामुळे हा +१ चा प्रतिसाद फाऊल आहे. Big smile

फाऊल कसला रे मेव्या?

22

फाऊल कसला रे मेव्या?
नराधम तो लोकांची कत्तल करण्याबद्दल म्हणालो. तसा हिटलरच्या काही चांगल्या गुणांचा मी देखील चाहता आहेच.... जसे शाकाहार Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

गंडलो मी

23

(अपवादाविना)आदर्श (मेव्याचा प्रतिसाद) = काही चांगले गुण + नराधम??? माझं मराठी भाषेचं ज्ञान तोकडं पडतंय बहुतेक.

हो आणि 'लॉजिक'चंही.

24

हो आणि 'लॉजिक'चंही. समीकरणाच्या डाव्या बाजूस एक कंस आणखी हवा होता असे वाटून गेले. हास्य

गेले ना ....मग जाउदेत.....

25

गेले ना ....मग जाउदेत..... Big smile

बर्‍यांच औषधांमध्ये,

26

बर्‍यांच औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमधे प्राणीजन्य पदार्थ असतात, मग काय करायच?
पूर्ण शाकाहारी रहाणं अशक्य आहे.

माझ्या बागेत टोमॅटो लावलेत, ऑरगॅनिक खत विकत आणल तर ते माशांपासून बनवलेल आहे. आता ते टोमॅटो मी खाल्ले तर मी शाकाहारी की मांसाहारी??

मांसाहारापेक्षा दूग्धजन्य पदार्थ खाणं जास्त अनैसर्गिक आणि क्रूर आहे ; मनुष्याव्यतिरिक्त कुठलाही इतर प्राणी दुसर्‍या प्राण्याचं दूध पित नाही ( मांजराला आपण सवय लावली आहे ) आणि आयुष्यभर तर नाहीच नाही...


पुष्करिणी

कशाला वाद घालत बसले आहात.

27

कशाला वाद घालत बसले आहात. ज्यावेळी जे हजर असेल ते खाऊन घ्याव.काहीच नाही मिळाल तर ररांच पॉपकार्न आहेच.

स्रुष्टीचा तोल सांभाळणे महत्त्वाचे

28

शाकाहार असो वा मांसाहार, निसर्गाचा तोल राखणे महत्त्वाचे. माझा कयास आहे की मांसाहारावर नियंत्रण ह्याचसाठी घातले असावे. जसे अनेक वनस्पतीज खाद्य हे त्यातल्या टाकाऊ भागच्या रूजव्याने ओपोऑप उगवू, वाढू शकतात, तसे प्राण्यांच्या बाबतीत होत नाही. काही मासे, कासव व पक्ष्यांच्या काही जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आपण बातम्या वाचतोच. जसे विविध कारणांसाठी बेसुमार व्रुक्षतोड होते म्हणून व्रु़क्षपुजा सुरु झाली असावी (स्रुष्टी,व्रुक्ष हे शब्द योग्य प्रकारे कस लिहायचे? मार्गदर्शन करावे ही विनंती)

थोडी मदत

29

(स्रुष्टी,व्रुक्ष हे शब्द योग्य प्रकारे कस लिहायचे? मार्गदर्शन करावे ही विनंती)

अभिजित सोपे आहे. बघा मदत होते का हास्य

वृक्ष - दोन प्रकारे लिहिता येतो vRux किंवा vRukSha

सृष्टी - sRuShTI


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ईथेच चांचणी घेतो

30

वृक्ष्,सृष्टि....वा वा वा...आभार सागरराव.

अजून एक

31

अक्षराचा पाय मोडला की अ(a) वापरा


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

होय

32

अधे-मधे टंकायचा आळस करतो. wink

आमचे पण मत

33

इतकी चर्चा करण्या ची गरज काय. ज्या जे खयायचे आहे ते खा...... खाण्या साथि जन्म आपला.....

+१

34

वहीनींशी सहमत.

(विषय दिलेला नाही)

35

द्ळ्लेले द्ळ्ण परत परत द्ळ्ले

36

द्ळ्लेले द्ळ्ण परत परत द्ळ्ले तरी तेच ते पिठ नव्याने गरम होऊन बाहेर पड्णार ताई.... चुईंगम सारखा चघळणे चालले आहे...

आम्हाला मांसाहार मनापासून

37

आम्हाला मांसाहार मनापासून आवडतो.

अन्य चर्चेत रस नाही..

आपला,
(बोंबिलप्रेमी) तात्या.