कालचा काळोख माझा, आजचा अन हा प्रकाश |
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा, सावकाश ||१||
अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके,
आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके |
गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास |
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा, सावकाश ||२||
काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी,
जे जसे दिसते जगाला, ते तसे नसते मुळी,
कळुन आले, जाणिवेने बघत गेलो आसपास |
होत आहे विश्व माझे, मीही त्याचा सावकाश ||३||
काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी,
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी,
बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास |
होत आहे विश्व माझे, मीही त्याचा सावकाश ||४||
जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे, आणि माझी साक्ष मी,
कर्म त्याचा मार्ग चालो, चालतो मीही 'उदास' |
होत आहे विश्व माझे, मीही त्याचा सावकाश ||५||
लै भारी.. >>अंतरीचे सूख
लै भारी..
>>अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके,
आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके |
>>काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी,
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी,
आणि शेवट तर अप्रतीमच.. खरंच खुप छान आहे भावा.. पुन्हा पुन्हा सांगतो हे शाश्वत आहे.. हे शाश्वत आहे..
मस्त...........अप्रतिम.......
मस्त...........अप्रतिम.......
सूंदर...!
सूंदर...!
जय हो
छान
पु.ले.शु.
माझे लिखाण
अतिशय सुंदर कल्पना आहे.....
>>जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे, आणि माझी साक्ष मी,
कर्म त्याचा मार्ग चालो, चालतो मीही 'उदास' |
होत आहे विश्व माझे, मीही त्याचा सावकाश |>>
अतिशय सुंदर कल्पना आहे.....खुप छान लिहीले आहे तुम्ही....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
मस्त
काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी,
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी,
बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास |
होत आहे विश्व माझे, मीही त्याचा सावकाश ||४||
मस्तच.
अन् शेवटचे कडवेदेखील खास!
मनस्पर्शी आहात आपण
सुरेख !!! मनमेघ नव्हे !!!! मनस्पर्शी आहात आपण
काळज्या होत्याच खोट्या आणि
काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी,
जे जसे दिसते जगाला, ते तसे नसते मुळी
खरे आहे..सुरेख लिहिले आहेस.
अप्रतिम
अप्रतिम
दर वेळेस हाच प्रतिसाद लिहीण monotonus होतय, पण तुम्ही ह्याच्या खाली काही लिहीत नाही.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
कट टू कट असेच म्हणतो!
कट टू कट असेच म्हणतो!
मस्त रे
जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे, आणि माझी साक्ष मी,
मान गये मुगले आज़म.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
धन्यवाद..
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
क्या बात है!! खूपच सुंदर..
क्या बात है!! खूपच सुंदर..
- प्राजु
छान
छान
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही