अपेक्षा!!!!, समज्-गैरसमज

0
0

काका(मनातल्या मनात): माझ्या ओळखीमुळे त्याला नोकरी मिळाली, मग मला दोन चार वेळा गिफ्ट घेऊन भेटायला नको यायला त्याने?
पुतण्या: किती वेळ/वर्ष उपकाराचे ओझे वाहु? आणि अपेक्षा तरी किती ठेवावी त्याने?

मित्र १: चायला, ह्याचं लोन पास होत नव्हतं, मी शब्द टाकला तेव्हा पास झालं. आधी चार वेळा यायचा, फोन करायचा आता नाव काढत नाही.... हरामखोर साला..........
मित्र २: आता माझं काय चाल्लय मलाच नाहित, उपकार म्हणुन आता काय पाय धुवुन तिर्थ घेऊ का? काय कळत नाही ब्वॉ..

मित्र१: "चॅट" वर हॅलो...
मित्र२: "ऑफलाईन"
मित्र१: माजला साला, चार पैसे मिळाले, नोकरी मिळाली तर लगेच ऑफलाईन, गरज पडु दे.. मग बघतो.

मित्र१: फोनवर - अरे कुठे आहेस लेका..
मित्र२: अरे मीटींग मधे आहे, नंतर फोन करतो... कॉल ड्रॉप... परत फोन येत नाही..
मित्र१: याचा फोन परत आला तरी उचलणार नाही.. अगदी पक्कं.. साला समजतो काय स्वतःला?

भाऊ१: अरे, बहिणिला घेऊन येशील का? मी जरा बिझी आहे.
भाऊ२: पैसे वाचवतोय, आता एवढा पण वेळ नाही का, आणि ही महामाया काय १ किमी चालत नाही येऊ शकत?

मॅनेजरः हा साला कधीच काम करत नाही, काय करावं ह्याचं?...
नोकरदारः मी राब राब राबतो, पण माझं काम कधीच ऊठुन दिसत नाही, हा मॅनजर बायसड् आहे पक्का..

प्रेषक१: माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?
प्रतिसादक: हा धागा जर माझ्या मित्राने टाकला असता तर कदाचित शंभरी नक्कीच गाठली असती, जाऊ देत. असे अनेक धागे निघतात, जातात, हा पण तोच एक.. wink

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

आपला,
(प्रामाणिक)मराठमोळा.

साला ममोचा धागा आहे म्हणुन

1

साला ममोचा धागा आहे म्हणुन प्रतिसाद देतो आहे. उगा गैरसंबंधसमज नकोत wink

ममो थोडक्यात पण खुमासदार लिहिले आहेस लेका. आवडेश आणि पटेश एकदम.

छान

2

छान छान.
बराच वेळ दिसतो आहे. बाकी जेवणाबिवणाची सोय उत्तम आहे ना उसात. नाहीतर धागा टाक बघू आम्ही रेशिप्या सांगतो.

प्रेषक१: माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?
खरं आहे रे. आम्हालाही हाच प्रश्न पडतो बरेचा. का देत नसतील रे, का? का? का? (हो, निलाजरा लेकाचा तोंड विचार करून विचारतोय आणि. आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहा.)

प्रतिसादक: हा धागा जर माझ्या मित्राने टाकला असता तर कदाचित शंभरी नक्कीच गाठली असती, जाऊ देत. असे अनेक धागे निघतात, जातात, हा पण तोच एक..
मित्र'च्या जागी मैत्रिण असा पाठभेद सुचवतोय. आणि 'परिणामकारक धागे असते तर...' अशी कॉरोलरी सुद्धा.

छान

3

पण हे मला का असलं सुचत नाही? (जळून जळून कोळसा झालाय)


-----------------------------------------------------------------------------------------------------------

चिंगी

(विषय दिलेला नाही)

4

Big smile

(विषय दिलेला नाही)

5

हास्य