डिसक्लेमर : आमचा हा लेख वाचुन एखाद्याने कपाळावर हात मारुन 'या रब्बा' म्हणल्यास आम्ही जबाबदार नाही.
संगीताविषयी आम्हाला लहानपासुन प्रंचड प्रेम आणी आदर आहे, ते प्रेम भाषेच्या,प्रांताच्या,जातीच्या आधारवर विभागलेले नाही,मग ती संगीता जाधव असो वा जोशी,यच्च.संगीता असो वा कंदास्वामी नागार्जुना सिंथेल रेड्डी असो...अरे हे काय बोलतोय..सॉरी-सॉरी ..बाकी संगीता जाधव होती मात्र खंमग, म्हणजे कस सगळ जागच्या जागी,बांधा,नाक-डोळे,कांती,केशसंभार वगैरै कस एकदम बघत रहाव अस, एकदा तिला गाठुन (हो हो गाठुनच ,सध्या बया युरोपात 'जिलब्या' तळते असे एकुन आहे.) विचारायल हव की तुझ्या पत्रिकेत एकुण किती ग्रह आहेत ते ? म्हणजे बायकोला सांगुन त्या त्या ग्रहांची शांती करून घ्यायला,पण नको , स्साल ! ऊद्या टीव्हीवर 'मेरे काले घने लंबे बाल !! शनी ग्रह-शांती का कमाल !! किंवा 'कांती का निखार !! किसने लाई है ये बहार !! ये तो गुरु ग्रह-शांती की धार !! अश्या प्रकारच्या जाहिराती यायला सुरुवात व्हायची.
ईथे आधीच सध्याचे टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रम पाहुन ,ईकड,बँगलोरच्या रूम वर टीव्ही घ्यावा की नाही असा प्रश्न विचाराधीन आहे,पुण्यात आम्ही चांगला फ्लॅट-स्क्रीनचा टीव्ही घेऊन स्वताच्या व माझ्या घरातील समस्त पुरुषवर्गावर पायावर धोंडा (धोंडा कसला !! आख्खा 'गोवर्धन'च म्हणा ना !!) पाडुन घेतला आहे.आमच्या घरातील टीव्हीचा ऊपयोग केवळ आमचे खिसे रिकामे करण्यासाठी होतो,आमच्या घरातील समस्त स्त्री-वर्ग संध्यासमयी ७ ते ११ या' प्राईम टाईमच्या वेळात अतिशय व्यस्त असतात,(अश्या वेळेस 'कमर्शियल ब्रेक' नावाचा प्रकार किती बरा वाटतो नाही),साड्यांचे पॅटर्न,पडद्याचे रंग, ड्रेस मटेरियल्स,दागिन्यांचे पॅटर्न वगैरै-वगैरै ,मग काय ? गेला आमच्या गरीब पाकिटाचा बळी!!
असो...
तर काय सांगत होतो ? हां !! संगीताविषयीच आमच लहानपासुनच प्रेम !!
आमच्या प्रेमाची सुरवात होते, ती मी ,तिशली 'ढ' मध्ये असताना, 'अमिताब'च्या 'आखीरी रास्ता'तल्या एका गाण्यापासुन ,त्यातल एक गाण 'वो जा रही है मेरी हिरोईन' मधील एक कडवं होत ..'ती : याद करो तुम फिल्मोंमै क्या-क्या सीन दिखाते है , तो : लेटके बाते करते है ,दौडके गाना गाते है ' यातील 'दौडके गाना गाते है' ही ओळ आम्ही वर्गात ,शिरा ताणुन-ताणुन म्हणत असु कारण आमच्या वर्गात एक सुमित्रा दोडके नावाची 'वजनदार'मुलगी होती. तसेच 'सांवतसरांचा' हिन्दी'चा तास व्हायच्या आधी 'तुम्हे गींतोमें ढा दुंगा,सावन को आने दो ' ही ओळीच मोठमोठ्याने लांबलचक पारायण करायचो. असो ते आमच बालपण होतं बालपणात विरलं,पुढे निसर्ग-नियमाने अंगाने मोठा झाल्यावर(आम्ही फक्त अंगानेच मोठे झालो आहोत असे काही मिमकरांचे मत आहे .)आम्ही संगीतावर नितांत प्रेम करायला लागलो..पण मुद्दा आहे आजकालच्या हिन्दी चित्रपट संगीताविषयी..
हल्लीच संगीत 'टेक्नो' असत म्हणतात.म्हणजे संगीत आणी टेक्नॉलॉजीचा संगम , हाच संगम कधी-कधी सुसह्य होतो तर कधी-कधी कर्ण-कर्कश्श !! टेक्नो संगीताचा जन्म नेमका कधी,कसे कुठे झाला ते नक्की सांगता येणार नाही पण त्याचा उपयोग होण्याआधी आम्हाला 'मोहम्मद अजीज'ने गाणे गाऊन कानठाळल्याचे आठवते,रफीच्या आवाजात कोमलता आणी पौरुष्याच कमालीच मिश्रण होतं म्हणतात, त्यापैंकी ह्या गायकाने फक्त 'पौरुष्य' ऊचलले असावे बहुतेक ,कारण मला तो रोमॅन्टिक गाणे गाताणा देखील हिरोईनची गंचाडी पकडुन ,तिला बाहु-बेडकुळ्या दाखवत किंवा कचा-कचा दातओठ खात गाणे गातोय की काय असे वाटायचे.तर,आता हेच पहा ना'कामरान अकमलने गायलेल्या,'जन्नत चित्रपटातील 'चार दिनों का प्यार' च रिमिक्स वर्जन,सुसह्य असलं तरी , सहाव्या वेळेस मी ते एकु शकत नाही, याऊलट वेक-अप सिड या चित्रपटातलं, कविता सेठ नी गायीलेल्या 'ओ रे मनवा तु तो बांवरा है' ह्या ओळी मला भावुन जातातच, शिवाय कधीही एकु शकतो.
पण टेक्नोचा खरा उपयोग सुरु झाला ते रिमीक्सच्या जमान्यात, गाण्याची शक्ल कशी का असेना , तरुण पिढीला तो प्रकारच एकुण भावला म्हणा.तस रिमिक्स,डिजे-गिरी ही अतिशय अवघड कला आहे(ईट जस्ट नॉट अ गेम,वॉर ऑफ द डिजे एकदा अटेन्ड केलय मी). असो त्यातली किशोरच्या गाण्याला ,'कह दु तुम्हे'ला, रिमीक्स मारताना, डिजे अकीलला भयानक त्रास झाला असणार, कारण एखाद मिडीयम स्लो रोमॅन्टिक गाणं,'डान्स नंबर मध्ये बदलायच म्हणजे कमालच आहे.त्याच सुमारास सरेल गाणे ही येत असत.ऊदाहरणार्थ ' हॅरीसन फोर्डच्या 'विटनेस' चित्रपटावरुन कॉपी केलेला " जॉन अब्राहम च्या ' एका फडतुस 'पाप' नावाच्या चित्रपटातील (ईथे मी चित्रपटाला फडतुस म्हणतोय बर का ! जॉन ला नाही ,लगेच नंग्या तलवारी ऊपसुन,आमच्या खव चा खफ बनवायच कारण नाही.) 'लागी तुमसे मनकी लगन'ला जो काही सुर दिलाय'राहत फतेह खाननी की, गाण टेक्नो असुन देखील 'रिफ्रेशिंग' वाटत.त्याच सुमारास आलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी ' ह्या अल्ताफ राजाच्या गीत-संग्रहानी धुमाकुळ घातला होता,अर्थात त्यातल्या एका गाण्यामधली शेरो-बाजी मला आवडली होती ब्वा !!
'तुम्हारे घर को दरवाजा है'
'लेकीन तुम्हे खतरे का अंदाजा नहीं है'
"हमें खतरे का अंदाजा है लेकीन'
'हमारे घर को दरवाजा नहीं है '
आँ!! आयला काय शेर आहे का काय ? अश्लीलतेच्या मर्यादा चांगल्याच गुंडाळुन परिणाम साधला गेला होता.मला भावला ईतंराना भावेलच असे नाही..
पण मला आजकालच्या हिन्दी गाण्यातली एक गोष्ट भावत नाही ती म्हणजे हिन्दीत घुसविलेले पंजाबी शब्द (आधी शाळेत पाली-हिन्दी-मराठी-ईग्रंजी शिका,चेन्नईला गेलो की तमीळ शिका,जर्मनीत होतो तर जर्मन शिका,कर्नाटकात आहे तर कन्नडा शिका ,आणी आता पंजाबी शिका ,शिका शिका,डोक्याचा पार 'वागळे' झालाय.), आधीचे गीतकार 'रब्बा' हा शब्द वापरायचे,हा शब्द 'डब्बा' ह्या शब्दाशी किती जवळीक साधतो ना !!काही गीतकार 'वैरिंया वै " वापरायचे,या एका शब्दाचे विमान आजही माझ्या डोक्यावरून जातं.काय अर्थ घ्यायचा त्या शब्दाचा, तो जन्मोजन्मीचा वैरी झालाय का ? (मेनुं हा ही शब्द ध्यानात गेण्यासारखा आहे, मला एकदा हॉटेलात एका सरदारने'मेनुं देना' म्हटल्यावर मी त्याला 'क्या दुं' असे विचारले होते.तो स्वताच हसुन-हसुन पागल झाला.)पण पुर्णं गाण्यात पंजाबी वापरायला सुरुवात केली ते दलेर मेहंदी ह्या गायकाने , मला त्याच्या प्रकाशित झालेल्या एका गाण्यात'तुनक तुनक धुन,तुनक तुनक धुन, ता ता ता' ह्या तीन-चार शब्दापैंकी ईतर काही ही आजवर कधीच कळलेले नाही, पुढे ही कळणार नाही (त्यातला एक शब्द तुंबेवारी तार !!पण माझ्यासारखेच बरेच जण असतील)पण ह्याच गाण्यावर गणपतीत' बेधुंद' होऊन नाचलो आहे.
त्यानंतर तर मेल्या पंजाब्यांनी तर ऊत आणला.त्यातलेच एक नाव म्हणजे 'जाझी बी'.केशसंभार आणी दाढी ठेवण्याची स्टाईल करताना स्वताच्याच चेहर्यावर किती अत्याचार करावेत याच जाझी बी एक ऊत्तम ऊदाहरण आहे(त्यापेक्षा ते स्वताच्या चेहर्याचे बोकड करून घेणारे एमबीएचे स्टडस बरे !!) तर, हा बाबाजी एका गाण्यात सुरवात करताना म्हणतो, 'जिन्ने मेरा दिल लुटीया,जिन्ने मेनुं मार सुटीया' अरे बाबा, मार सुटीया म्हणजे काय ? ती तुला धरून मारत सुटली आहे काय ? आणी जर ती खरोखरच मारत सुटली असे तर तिने योग्य तेच केले असे मी म्हणेन , हा असा अवतार केल्यावर दुसरं काय करणार ?

आताच्या संगीतात तर गीतकार काय लिहीतो तेच कळत नाही. आता हेच बघा ना शाहीद कपुर ,भदाड्या करिना बरोबर नाचताना म्हणतो'जग सारा-जग सारा निखर गया, जब प्यार हवादिंविच बिखर गया' त्यापुढे मौजा ही मौजा पर्यंत गीतकार नेमकं काय म्हणतो ? तेच कळत नाही.असो..पण काल परवा एक गाणं एकल 'मेरे नाल-मेरे नाल चल सोणीये, मेनु सोहनीं लगती है तेरी 'गल' सोणीये'.. काय्य्य ? नेमक काय आवडत म्हणालास ? आणी नाल म्हणजे कुट रं बाबा, नाल्यात घेऊन चाललायस का ? काय प्रकार आहे हा . तिच गत 'लव्ह आजकल'च्या 'गड्डी ते हस बोल वे नी जिन्द सारी डोल वे !!' काय संक्रात आहे ? गड्डी ते हस ? नेमक कुठ हसायच ? ईथेच आमच गाडं अडल तर पुढील लिरिक्सची एकायची काय मजा ? खर तर गाण्यात घेतलला टेक्नोमुळे,गाण एक खतरनाक 'डान्स नंबर' बनु शकत होतं, अगदी'स्टेप-अप'या ईग्रंजी चित्रपटातल्या 'डान्स नंबर' सारख,पण ह्या गाण्यात सैफ-दिपीकाला बंद पडलेल्या स्कूटरला किका मारताना पाहुन भर थेटरात एकटाच हसत होतो.
ह्याच वाटचालीत शिरलेला एक प्राणी म्हणजे मिख्खा(दलेरच्या बापाच्या सप्तपुत्रांपैंकींच शेंडेफळ),एक तर करकटनी वर्तुळ काढल्या टाईपची चेहर्याची ठेवण,एखाद्या वारुळावरुन लाखो मुंगळे खाली येत असावेत असा केश-संभार,कट्ट्यावर, बिल टेबलावर आल्यावर,नेमक पाकिट विसरुन आल्यामुळे,एखाद्याच्या चेहर्यावर जसा भाव येतो तसा पडेल चेहरा,एखाद्यानी पार्श्वभागावर सुई टोचल्यावर आपल्या तोंडुन जसा आवाज निघेल तसा आवाज(राखीचा मुका घेतल्यापासुन तर अजुन अतुलनीय झालाय.) असलेल्या ह्या महाभागाला 'गायक' म्हणणं म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा,रागदारीचा अपमान करणेच होईल. नुकतीच एका किशोरच्या गाण्याची, 'अपनी तो ऐसै-तैसै' ची ,मध्ये-मध्ये 'ओ धन्नो-ओ धन्नो' म्हणुन वाट लावली. धन्य ते संगीत आणी धन्य ते संगीतकार !!

जाता जाता : लेखात ऊल्लिखलेल्या लिंका गुगलवर स्वताच शोधायच्या आहेत, उगा नंदनोबा वा सहजोबांना त्रास द्यायचा नाही, लेख थोडीसी गम्मत जम्मत म्हणुन लिहीलेला आहे,भाषेचा अपमान करण्याचा हेतु नाही.
छान विश्लेषण आहे.
छान विश्लेषण आहे.
जय हो
(विषय दिलेला नाही)
जबरा रे ! एक एक चिमटे जबरदस्त
जबरा रे !
एक एक चिमटे जबरदस्त !!!
***
बाकी आता मुद्याकडे...
अरे पंजाबी जशी मर्दांची भाषा समजली जाते तशी ती नाही आहे त्या भाषेत एक अविट गोडवा आहे
तो समजून घ्यावा लागतो कधी कधी गाणे कानावर आल्या आल्या अर्थ समजतो तर कधी अर्थ जोडावा लागतो !
>>जग सारा-जग सारा निखर गया, जब प्यार हवादिंविच बिखर गया
>>'मेरे नाल-मेरे नाल चल सोणीये, मेनु सोहनीं लगती है तेरी 'गल' सोणीये'..
गल = बोल, बोलणे !
मेरे नाल व सोहनीं = च्यायला ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही ? देवा कसे होणार हिंदुस्तानचे
>>गड्डी ते हस बोल वे नी जिन्द सारी डोल वे
गड्डी = ते गड्डी नसून कधीते असे आहे..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
च्यायला
हे बेणं कायबी ल्हिलं तरी येक लंबरच लिवतंय राव. आन् कुट्ली गोस्ट कुटंबी नेतंय, आमच्यासारक्या अवांतरसम्राटानाबी जमनार न्हाय हे.
तरुण पिढीला तो प्रकारच एकुण भावला म्हणा.
ज्येष्ठ नागरिक संघात स्वागत. वार्षिक फी रुपये पंचवीस फक्त आमच्याकडे १५ सप्टेंबरपूर्वी जमा करावी.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>अवांतरसम्राटानाबी घ्या हे
>>अवांतरसम्राटानाबी
घ्या हे आपल्या स्वतःला अवांतरसम्राट घोषित करुन मोकळे झाले..
महिला मंडळ झोपलं आहे की आय ऑ !!!!
>>>तरुण पिढीला तो प्रकारच एकुण भावला म्हणा.
तसे हे तरुण दिसायचे, असो. लपतं एकेकांचे वय चेहर्याआड !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मालक लपत नाय ...तर लपवल
मालक लपत नाय ...तर लपवल जात.......
अनुभवाचे बोल काय?
अनुभवाचे बोल काय?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बास का गुरुदेव ,,,....तुम्हीच
बास का गुरुदेव ,,,....तुम्हीच शिकिव्ल न्हव आमास्नी? इसर्लात येवढ्यात?
हरे राम हरे राम.......काय दिस आल्याती.......
(विषय दिलेला नाही)
सुहास, मस्त लेख आहे बरं का
सुहास, मस्त लेख आहे बरं का बाबा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त
मस्त लिहलं आहे.
खुप छान लिहले आहे. मला ही
खुप छान लिहले आहे.
मला ही गाणी जरा देखील आवडत नाहीत, चालू झाली की हलकेच डोक्यात कळ येत आहे की काय असे वाटत राहते.
चला धागा वर आलाच्च आहे तर
चला धागा वर आलाच्च आहे तर आभार मानुन घेतो ..
आलेल्या , आलेल्या व आलेल्याच...आपलं हे...आलेल्या,न आलेल्या व सर्व वाचकांना मनापासुन धन्यवाद !!!
वाश्या !