इतिहासाचे पुनर्लेखन
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मीमवरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
.jpg)
महत्वाच्या विषयाला वाचा
महत्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल पराचे अभिनंदन !
गेली अनेक शतके ब्राम्हणांनाच पुढे पुढे करुन इतरांना मागे मागे ठेवण्याचा पध्दतशीर प्रयत्न होतो आहे हे माझे देखिल मत आहे, अहो ऑनलाईन जमान्यामध्ये देखील ब्राम्हण वर्चस्व आपल्याला दिसून येईल, फक्त ती नजर हवी १६ आणे सच समोर येईलच
येणार्या प्रतिसादानुसार आपण प्रत्येक मुद्द्याबद्दल चर्चा करुच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एका वेळेला दोन मॅच खेळत नाही
एका वेळेला दोन मॅच खेळत नाही आम्ही.
+१
आम्हीपण.
-पुण्याचे पेशवे
विचार करायला लावणारा लेख आहे.
विचार करायला लावणारा लेख आहे.
जय हो
!
ब्रम्हा-विष्णु-महेश इ. ना इतिहासात घालण्याची हिम्मत तर मुरली मनोहर जोशींनाही झाली नव्हती.
४) एकलव्यावर अन्याय झाला अशा अर्थाचे लेखन याआधीही झालेले आहे आणि ते पटतेही.
चालू द्या.
खरचं ! एकलव्याचे पुढे काय
खरचं !
एकलव्याचे पुढे काय झाले ?
तो महाभारतात होता का युध्दसमयी ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ब्राह्मणी कावा
लोकांना ब्राह्मणी मैना, ब्राह्मणी स्वैपाक वगैरे गोष्टी माहित असतील. मला या लेखनात ब्राह्मणी कावा दिसतो.
ब्राह्मणी काव्या विषयी आम्ही पुरोगामी वैचारिक मासिक आजचा सुधारक ला लिहिले आहे. वाचा
आता क्षत्रिय राम जानव घातलेला का दाखवतात? आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
>>आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी
>>आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही
हा हा खरं आहे.
नवीन जानवंधारी
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
:)
पहिल्या वाक्यातील तुल्यबळ हा शब्द खटकला!
अमेरिका आणि सुदान हे तुल्यबळ शत्रु असुच शकत नाहीत!
(विषय दिलेला नाही)
सहमत आहे. आमचे सुदानत्व
सहमत आहे. आमचे सुदानत्व आम्हास मान्य आहे.
-पुण्याचे पेशवे
मला नेहमी एकच प्रश्न पडतो,
मला नेहमी एकच प्रश्न पडतो, ही सगळी पौराणिक पात्र इतकं वनवास, युद्ध , लढाया करतानाही एकदम कुठल्याही ब्लेडची जाहिरात करू शकतील इतकी क्लिन शेव्ड कशी दिसतात.. अगदी आधुनिक टीव्ही धारावाहिक दाखवतानाही ..
राक्षसांना मात्र दाढी नाही तरी गेला बाजार मिशी असतेच
पुष्करिणी
>> अगदी आधुनिक टीव्ही
>> अगदी आधुनिक टीव्ही धारावाहिक दाखवतानाही
आम्ही तर ब्वॉ टीव्हीवरच बघितलंय हे सगळं.. तुम्ही काय कुरूक्षेत्रावर गेला होतात काय?
मग काय, आठवतय सगळं मला पुसटस
मग काय, आठवतय सगळं मला पुसटस अजून...
बाकी टीव्हीच नाही तर देवळातल्या मूर्त्यांना पण दाढी नसते, फक्त कधी कधे शंकराला जटेबरोबर दाढी अस्ते..
पुष्करिणी
देवांचं म्हणाल तर ते अमृत
देवांचं म्हणाल तर ते अमृत पिऊन चीरतरुण झाले होते. बाकी मानवांचं माहीत नाही.
-पुण्याचे पेशवे
अवतारांबद्दल म्हणतेय मी
अवतारांबद्दल म्हणतेय मी ...म्हणजे राम, कॄष्ण इ.
आणि दाढी हे म्हातारपणाचं लक्षण कुठं आहे?
पुष्करिणी
आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध
हे मात्र ब्येश्ट बोल्लात बरका घाटपान्डे साहेब ..
पण ह्या विषयावर आपण जास्त प्रकाश टाकावा ही नम्र विनन्ती.
आपले विचार वाचायला नक्किच आवडेल..
>>>> त्यासाठी मिपावरील
>>>> त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास
समजले नाही.
बाकी लेख अन प्रतिक्रिया वाचतोय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
+१
+१