कृष्णलीला---अशीही.....

0
0

.
.
कृष्णलीला---अशीही.....
.
अर्जुन आणि कृष्ण एकदा सन्यासी वेषात भटकंतीला निघाले.एका गर्भश्रीमंताघरी जाऊन भिक्षा मागितली.....तो म्हणाला, "फ़ूटा इथून.....माझ्याकडे काही नाही...व्हा चालते....." कृष्णाने आशिर्वाद दिला, "तुझ्याकडे जे आहे ते हजारपट वाढो "
.
मग ते एका म्हातार्‍या जोडप्याच्या झोपडीत पोचले. एका गायीशिवाय त्यांच्यापाशी काही नव्हतं. ती गायहीफ़क्‍त अर्धा शेर दूध रोज देई. त्यावरच ते क्षुधा शांत करीत.सन्याशांना पाहून त्यांनी आत बोलावलं, इथेच रात्री रहा म्हटलं, त्या दिवशीचं दूध सन्याशांना देऊन स्वत: उपाशी झोपले.सकाळी निघतांना कृष्णाने आशिर्वाद दिला " तुमची गाय मरो "
.
आता मात्र अर्जुनाला राहवेना....." देवा, ज्याने हाकललं, सगळं असून नाही म्हटलं, त्याला भरभराट, आणि ह्या बिचार्‍यांनीस्वत:चा घास दिला, त्यांचं एकमेव साधन हिरावता ? काय म्हणू तुम्हाला ? "कृष्ण हंसला. म्हणाला, " वेड्या, अरे, तो कर्मजंजाळात अडकून आहे, इअतरांची जराही पर्वा नाही, अजून धन आलं, की अजून अडकेलचक्रात फ़िरत राहील...मुक्‍ती दूरच...म्हणून त्याला तो वर दिला. ह्या जोडप्याची संपूर्ण तयारी आहे मोक्षाची. सगळं पुण्य गाठीशी आहे.अडकले आहेत, फ़क्‍त त्या गायीच्या मोहात...तो अखेरचा पाश तुटावा म्हणून मी हे केलं, आता त्यांच्या मुक्तीत काहीच अडथळा नाही "
.
हेच ते....कुणाला काय द्यायचं, काय घ्यायचं ते " त्या" ला ठाऊक. आमच्या ह्रस्व दृष्टीला जो 'लाभ' दिसतो, तो लॉंग टर्म बेसिस वर 'हानी' असू शकतो,जी आत्ता हानी वाटते, ती अंतत: फ़ायद्याची ठरू शकते. तो तर जग्न्नियंता आहे, एखाद्या पालकाप्रमाणे बाळांची किती आणि केवढी परीक्षा पहायची, किती लाड करायचे, केव्हा व किती शिक्षा द्यायची हे त्याला ठाऊक आहे.
.
खरं तर तो " परीक्षा पहातो " हे तरी कितपत खरं आहे ? " गॉड फ़िअरींग " हा शब्दच चुकीचा आहे.आपण गॉड लव्हींग असावं. तो पिता आहे, माता आहे....प्रेम देतो, प्रेम घेतो. आपली "कर्मं" आपण करतो. त्याचं "फ़ळ" भोगताना मात्र देवाला दोषी ठरवून मोकळे होतो. हे कितपत योग्य आहे ?
"त्या"चं काम त्याला करूदे. आमचं काम आम्ही करूया.कर्मण्ये वाधिकारस्ते !
होय ना ?????
.
---प्रभा.
.

छान लिहिलं आहे.फ़क्त शेवटच्या

1

छान लिहिलं आहे.फ़क्त शेवटच्या दोन परिच्छेदात काहीतरी वेगळं आहे.
शेवटी गाडी “लाभ” व “हानी” ह्या टर्म वर घसरायला नकॊ होती.
गॉड फ़िअरींग आणि गॉड लव्हींग ह्या दोन्ही शब्दात जास्त फ़रक नाही(खरं तर अजिबातच नाही)..कारण ….हेतू एकच…


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

+१ कधी आई-वडिलांनी प्रेमानं

2

+१

कधी आई-वडिलांनी प्रेमानं सांगून भागतं तर काही कार्ट्यांना धाकच असावा लागतो..हास्य


पुष्करिणी

नाही समजलं!

3

नाही समजलं!


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

>गॉड फ़िअरींग आणि गॉड लव्हींग

4

>गॉड फ़िअरींग आणि गॉड लव्हींग ह्या दोन्ही शब्दात जास्त फ़रक नाही(खरं तर अजिबातच नाही)..कारण ….हेतू एकच

ह्याला सहमती म्हणून म्हट्लं की काही मुलांना धाक वाटतो ( गॉड्-फिअरिंग) काहींना धाक नसतो नुसतं प्रेमळपणा चालतो .. रिझल्ट एकच..


पुष्करिणी

इथे हेतू आईबापांचा नाही,

5

इथे हेतू आईबापांचा नाही, कार्ट्यांचा आहे.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

हो, आईबापांचा हेतू एकच असतो.

6

हो, आईबापांचा हेतू एकच असतो. काही मुलांना तो धाक वाटतो काहींना नाही


पुष्करिणी

काहीतरी ट्वीस्ट् झालं आहे.

7

काहीतरी ट्वीस्ट् झालं आहे.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....