सौंदर्याचा चाहता नाही असा माणूस दुर्मिळच आणि म्हणूनच Beauty is an object of joy foreverअशी इंग्रजीत म्हण आहे. आपल्याला लाभलेल्या निसर्गदत्त रुपरंगाला प्रसाधनांच्या सहाय्याने खुलविण्याचा मानवी अट्टाहासही पुरातन आहे.
स्त्रियांचा तर हा खास आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रांत.
एका तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे ,There is no ugly woman ,but there are women who do not know how to look beautiful .
याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते.
ज्योतिषशास्त्राचा संशोधक व २५-३० वर्षाचा अभ्यासक या नात्याने पत्रिकेच्या माध्यमातून सौंदर्यवृध्दीला सहाय्यभूत घटक शोधून काढणे ,सौंदर्यविषयक निदान आणि उपाय यांचा ज्योतिषशास्त्रीय परामर्श घेणे ,मला आव्हानात्मक वाटले व म्हणून इतर अनेक प्रांतांमध्ये संशोधन पूर्ण केल्यानंतर मी सौंदर्य व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घालणारा "रुपांगी ज्योतिष " हा विषय निवडला.
संशोधनाला सुरुवात झाली तीच मुळात विषयाच्या नावापासून .
ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून रुपवर्धन चिकीत्सा करणारा म्हणून रुपांगी = रुप +अंग(रुप ज्याने अंगी भिनते) ज्योतिष असे शिर्षक दिले. अंगलक्षण होराशास्त्र , देहबोली, (बॉडी लॅंग्वेज) मेडीकल पामीस्ट्री अशा संलग्न विषयांच्या आधारे संशोधनाला अधिक आखीव ,रेखीव व उपयुक्त करण्याची प्रक्रिया अव्याहत चालू आहे.
रुपांगी ज्योतिषाची तोंडओळख तुम्हा जिज्ञासू वाचकांना व्हावी ,ज्ञानाची काही नवी क्षितीजे पाहण्यास तुम्ही उद्युक्त व्हावे एवढाच या लेखाचा माफक उद्देश आहे.
सौंदर्याचे तीन प्रमुख घटक (असे की ज्यात बदल घडवणे शक्य असते.) म्हणजे सतेज कांती-नितळ कांती.तजेलदार काळेभोर केस ,व सुडौल बांधा.
आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा वेध घेऊ या.
सतेज कांती:
कातडीचे दोन स्तर असतात . बाह्य व अंतर्गत.
बाह्य कातडी शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर अंतर्गत कातडी बुध हा ग्रह दर्शवितो.
हे दोन ग्रह पत्रिकेत कोणत्या राशीत व कोणत्या भागात आहेत यावरून व्यक्तीच्या कांतीचे स्वरुप ठरते.
जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture)
तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत.
पृथ्वीतत्वाच्या राशी (वृषभ ,कन्या ,मकर )कांतीचा घोटीवपणा (tenacity) दर्शवितात,
तर वायुतत्वाच्या राशी (मिथून तूळ ,कुंभ) शुष्क व निबर कांती देतात.
पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे.
कांतीचा तलमपणा (smoothnes.) छिद्रे (porasity) चिवटपणा (elasticity), घोटीवता (tenacity) तापमान (heat level )आर्द्रता (moisture level) या सहा घटकांचा अभ्यास पत्रिकेवरून व अन्य परिक्षण निरीक्षणातून करता येतो व त्यातील असंतुलन झालेले घटक योग ध्यानधारणा घरगुती उपाय व विशिष्ट प्रसाधनांच्या सहाय्याने संतुलीत करता येतात.
चेहेर्यावर उठणार्या तारुण्यपिटीकांचे कारणही अनेक वेळा पचन प्रक्रिया ,मासिक धर्म, अथवा त्वचेच्या छिद्रांचा मोकळेपणा यांच्याशी निगडीत असतो. व त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो.
चंद्र हा मासिक धर्माचा कारक
गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक.
केतू हा त्वेचेवरील छिद्रांचा कारक.
चेहर्यावरची अती तैलता (ऑयली फेस) बुध व शनीच्या कुयोगामुळेसंभवते.
तर जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.
अडथळ्यांचे कारण व निराकरण
सतेज कांती प्राप्त होण्यासाठी आड येणार्या गोष्टींमध्ये काही शरीरांतर्गत आहेत ,तर काही बाह्य घटक आहेत.
मानसिक तणाव (चंद्र )
कोठासाफ नसणे (गुरु)
रक्त दोष आणि सदोष मासिक धर्म (शनी )
अष्टम स्थान ही चार प्रमुख कारणे आहेत.
बाह्य घटकांमध्ये चेहेर्याची व सर्वांगाची अस्वच्छता ,उन ,धूळीचे कण व प्रदूषक घटकांचा प्रभाव प्रसाधनांची अॅलर्जी कातडीला होणार्या जखमा ही प्रमुख कारणे आहेत .या कारणांचे निराकरण करण्यासाठी अष्टौ प्रहर जागरुकता लागते.
आहार -विहार - निद्रा यांचाही कांतीवर प्रभाव पडतो.
सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात.
पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा .
तोपर्यंत हा भाग वाचा आणि प्रश्न विचारा.
वाचतो आहे, महिला मंडळांच्या
वाचतो आहे, महिला मंडळांच्या प्रतिसादांची प्रतिक्षा करतो.. आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तच.... आवडिचा विशय
छान............
छान............
प्र्श्न विचारले तर उत्तरे
प्र्श्न विचारले तर उत्तरे देता येतिल का ? तेन्टेतिव्ह चालतिल
मजेशीर
मेडीकल पामीस्ट्री
ज्ञानाची काही नवी क्षितीजे पाहण्यास तुम्ही उद्युक्त व्हावे
मस्त करमणूक होते आहे.
बाह्य घटकांमध्ये चेहेर्याची व सर्वांगाची अस्वच्छता ,उन ,धूळीचे कण व प्रदूषक घटकांचा प्रभाव प्रसाधनांची अॅलर्जी कातडीला होणार्या जखमा ही प्रमुख कारणे आहेत .या कारणांचे निराकरण करण्यासाठी अष्टौ प्रहर जागरुकता लागते.
आहार -विहार - निद्रा यांचाही कांतीवर प्रभाव पडतो.
बहुमूल्य माहिती.
या सहा घटकांचा अभ्यास पत्रिकेवरून व अन्य परिक्षण निरीक्षणातून करता येतो व त्यातील असंतुलन झालेले घटक योग ध्यानधारणा घरगुती उपाय व विशिष्ट प्रसाधनांच्या सहाय्याने संतुलीत करता येतात.
म्हणजे निराकरण घरगुती उपाय नि प्रसाधने करणार नि फुकटचे श्रेय त्या पत्रिका पाहणार्याला.
तारुण्यपिटीकांचे कारणही अनेक वेळा पचन प्रक्रिया ,मासिक धर्म, अथवा त्वचेच्या छिद्रांचा मोकळेपणा यांच्याशी निगडीत असतो. व त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो.
तसाच तो समाजमान्य उपचारपद्धतीतूनही घेता येतो, मग पत्रिक हवी कशाला.
तर जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.
अधिक अवतरणे देत बसत नाही. एकुणच आरोग्यविषयक सामान्यज्ञान नि मेडिकल सायन्सेसने दिलेले ज्ञान यांच्या पाठीवर तुमचा पत्रिकेचा बेडून छान बसतोय प्रत्येक उदाहरणात. दाद द्यावीशी वाटतेय.
बाकी ज्योतिष, नाडी, इलॅस्टिक म्हटले की आमचा पॉपकॉर्नचा स्टॉल जोरात चालतो. चालू द्या.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मनोरंजन
फलज्योतिष हा विषय हल्ली मनोरंजन सदरात मोडतो. उदा. राशीचक्र शरद उपाध्ये यांच्या नंतर तशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आले
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
नाय ओ
आम्ही कशाने मनोरंजन होते आहे ते उद्धृत केले आहे. उगाच सर्व फलज्योतिषाबद्दल बोललेलो नाही. (त्याने आमचे मनोरंजनसुद्धा होत नाही हे घाटपांडेंना कशाला सांगू?)
अवांतरः मालक पां. शा. किंवा एकुणच रंग चालत नाहीत असे दिसते. आमच्याकडे आयई आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
माझी रास कर्क असुन त्वचा पोत
माझी रास कर्क असुन त्वचा पोत मिडियम आहे ना फार ड्राय ना फार तेलकट. पोअर्स आहेत बरेच
. मला पोअर्स नाहि आवडट अजिबात. काहितरी उपाय सान्गा.
पत्रिकेचा फोटो टाक चुचु, असं
पत्रिकेचा फोटो टाक चुचु, असं फक्त कर्क रास आणि त्वचेचा पोत वाचून कसं सांगणार ते?
पुष्करिणी
चश्मा बदलायला झालाय
मी चुकून मला पोरं आवडत नाहीत अजीबात असे वाक्य वाचले.
आणि...
म्हातार्या डोळ्यात पाणी चमकले
काय हे
सुनेला का चिडवताय हो काका. बघ तुझ्याकडचे सगळे मेले अस्सेच असे नवरोबाला फणकारून सांगेल ना. त्याला बिचार्याला उगाच त्रास.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बाप रे हे देखील
बाप रे हे देखील ज्योतिषशास्त्राद्वारे सांगता येतं
इथे रास कुठून आली?
......सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात.
हे यच्चयावत सर्व राशींना लागू आहे.
मला वाटतं नवर्यावर प्रेम केलं तर त्वचा नक्की उजळते (नवर्याची तरी नक्की
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
सहमत
सहमत
माझे मत.
संजय क्षीरसागर यांच्याशी पूर्णपणे सहमत. बहुतेक प्रश्न हे वागणुकीत (म्हणजे अप्रोच) योग्य बदल केल्यास सुटतात.
पण वागणुकीतील बदलाने यश प्राप्ती झाली हे माणसाला आवडत नाही. त्याला गूढतेचा स्पर्श हवा म्हणून तो ज्योतिषशास्त्रातले स्पष्त्टीकरण
त्याला लावतो. मग त्याला समाधान वाटते. असो. याबाबात मतं वेगळी असणारच.
अरूण कोर्डे.
छान आहे विषय...चालू दे
छान आहे विषय...चालू दे
----निवेदिता--------
छान आहे विषय...चालू दे
छान आहे विषय...चालू दे
----निवेदिता--------
च्यायला.. ह्ये प्रा. पलिकडं
च्यायला.. ह्ये प्रा. पलिकडं "दिनांक गुरुवार, 02/09/2010" या दिवशी लेख टाकुन पळुन गेलय.. ते अजुन एका प्रतिसादालापण सापडलं नाय..आन हिकडं तेच डकवुन मजा बघतंय..
काय पांचटपना लावलाय ह्यो..