चल पुन्हा आपुल्या देशी, चल पुन्हा आपुल्या देशी,
वाट पाहतो रस्ता जिथला, तशाच जिथल्या वेशी ॥ चल पुन्हा ...॥
वाट पाहते सकाळ तिथली तुझी चहाला,
काम थांबते जरा, सांग रे सांग कशाला?
क्षणोक्षणी तव भास वाहती, येत्या वार्यासरशी ॥ चल पुन्हा .. ॥
हरेक श्वासावरी काढते दृष्ट माउली
मिळते तुजला तिच्या प्रार्थनांचीच सावली,
चाहूल लागता तुझी, धावते ती रे दारापाशी ॥ चल पुन्हा... ॥
तिथे न तू, पण तिथेच तू रे त्यांच्यासाठी
इथेच तू, पण इथे न तू रे तुझ्याहिसाठी
क्षणात कितिदातरी मनाने जिकडे जाशी ॥ चल पुन्हा... ॥
करशिल सार्या पूर्ण अपेक्षा, त्यांच्या आशा ,
जाशिलही तू अजून दूरच्या परक्या देशा
पण मातीसुद्धा जिथली, तुजला वैभवराशी ॥
चल पुन्हा आपुल्या देशी, चल पुन्हा आपुल्या देशी॥
आधी तुझ्या आवाजात ऐकली होतीच
आधी तुझ्या आवाजात ऐकली होतीच तूनळीवर.. खुप मस्त आहे..
इथं दुवा टाक की.
क्या बात है, अतिशय सुंदर !
क्या बात है, अतिशय सुंदर !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त
मस्त लिहलि आहेस.
मस्त
मस्त!
छान आहे
छान आहे.
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
माझा नवरा वरिल कवितेचे सार
पण मग लाल रंगाचा मोह मला आवरत नाही म्हणुन मग मी दामटवतेय त्याला
आयला चुचु तर पक्की 'समाज'वादी
आयला चुचु तर पक्की 'समाज'वादी आहे....
(समाजवादी पण 'लाल' असतात ना?
)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
छान.
छान.
मस्त
मस्त