प्रिय राहुल देशपांडे,
प्रिय राहुल देशपांडे,
(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,
मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.
तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.
अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..
पण.......
दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?
मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..
सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!
मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!
राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?
अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?
कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!
मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)
अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?
तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?
अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!
दोन सूर धडपणे नाही गाता आले तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!
तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!
असो..
जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!
तुझा,
तात्या.
.jpg)
द्या सोडुन..
द्या सोडुन..
मुद्दे पटले.
मुद्दे पटले.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
झकास
तात्या तुमच्याशी १००% सहमत. उघड फ्लेक्स लावून 'आपल्या' कलाकाराला एसेमेस करण्याचे आवाहन जिथे केले जाते, असंख्य प्रीपेड मोबाईल कार्ड्स खरेदी करून एकच व्यक्ती अनेक एसेमेस पाठवून मतांची संख्या वाढवतो अशा तथाकथित स्पर्धेत राहुलला परीक्षकाच्या खुर्चीत पाहून व्यथित झालो. ती खुर्ची अवधूत गुप्ते नि वैशाली सामंतसारख्यांनाच ठीक आहे.
काय आहे तात्या, आम्हाला संगीतप्रेमी म्हणून मिरवायचे असते, पण ते समजून घेण्यासाठी लागणारे कष्ट घ्यायची तयारी नाही (क्वचित कुवतही) मग आम्ही संगीताची व्याख्याच मुळी आमच्या नि बहुसंख्या़कांच्या समजुतीच्या पातळीवर खाली आणतो (हीच गोष्ट आम्ही विद्यापीठाच्या सिलॅबस कमिटीतही पाहिली होती, मुलांना अवघड जातो असे सांगून सिलॅबस सोपा करण्याचा आग्रह शरला जाई, पण ज्यांना हे जमत नाही ते त्या पदवीला नालायक नाहीत का असा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला उद्दाम ठरवले गेले) नि मग 'अहो रूपम.ह अहो ध्वनिम.ह' जे संगीताचे तेच साहित्याचे नि तेच संस्कृतीचेही. या सार्यांना आम्ही आमच्या पातळीपर्यंत खाली आणतो नि मग त्याचा अभिमान बाळगायला आम्ही मोकळे. मुटेसाहेबांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे तणे माजली आहेत, इथे वृक्षांना जागा नाही. पण एखादे वृक्ष होण्याची कुवत असणारे झाड असे झुकून तणांशी मैत्री करू लागले तर ते अधिक दुर्दैव म्हटले पाहिजे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मुटेसाहेबांच्या कवितेत
मुटेसाहेबांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे तणे माजली आहेत, इथे वृक्षांना जागा नाही. पण एखादे वृक्ष होण्याची कुवत असणारे झाड असे झुकून तणांशी मैत्री करू लागले तर ते अधिक दुर्दैव म्हटले पाहिजे.
सुंदर..!
तात्या.
+१
+१ मुट्यांच्या कवितेतील ओळींचा इतका समर्पक उपयोग!!!
तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत
तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे तात्या....
स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा ...
आणि या आधीचे सारेगमप चे निकाल पहिले तर ती स्पर्धा म्हणजे निव्वळ पोट भरण्याचा धंदा वाटतो , जिथे परीक्षकाच्या मताला शून्य किंमत असते... सारेगमप बघणे म्हणजे आपला वेळ वायाघालवण्यासारखे आहे.. यावेळी तरी मी शहाणी होणारे...
राहुल पण त्याचा वेळ वाया घालवतोय...
आज कधीतरी मी तात्याशी सहमत
हो
१००% सहमत.
१००% सहमत.
प्रसन्न
http://www.prasannap.co.nr/
मस्तं रे तात्या. सहमत आहे
मस्तं रे तात्या. सहमत आहे तुझ्याशी. वाईट वाटले राहुलला तिथे बघून.
-पुण्याचे पेशवे
मोजके शब्द आणि अचुक आशय
पोचला.
भावनिक पातळीवर पोचलं,पटालं आवडलं.
व्यावहारिक पातळीवरः-
मी सदर कार्यक्रम कधी पाहिलेला नाही.
देशपांड्यांना गाताना ऐकलय.(मला शास्त्रिय कळत नाही, पण तरीही ऐकायची खोड्/आवड आहे)
हे सगळं करुन देशपंड्यांना काहीही मनःस्ताप होत नसावा.
झी टीव्ही खुश आहे.स्पर्धक आणि प्रेक्षक(श्रोते नाही) तर अगदि तल्लीन झालेत.
असं दृश्य आहे.
बरं, हे सगळं करुन देशपांड्यांना भावी वाटाचालित/करिअर मध्ये काहीही अडचण येइल असं (मला)वाटत नाही.
इथुन पुढही ते उत्तरोत्तर प्रगती करतच राहतिल, आणि त्यांचं आणखीही चांगलं सादरीकरण भविष्यात आपल्याला मिळणार आहेच.
(त्यावर "झी"ने काहिही मर्यादा घातलेल्या नाहित.(एका सुप्रसिद्ध(आणि माझ्या लाडक्या) पियानो वादकाला करारबद्ध करुन खरोखरच "बद्ध" केलं होतं एका पंचतारांकित हॉटेलानं. इतरत्र कार्यक्रम कराय्ला बंदी घातली होती.) तसं तर झी नं काही केलेलं नाहिये.(करुही शकत नाहित लेकाचे.))
मग अडच्ण आहे कुठे?
ज्याचं त्याचं,झी, देशपांडे,स्पर्धक्,प्रेक्षक अगदि सुरळित(म्हणजे त्यांना हवय त्या दिशेनं) सुरु आहे.
आपणच कशाला इश्यु करा आणि वाइट वाटुन घ्या?
मन्या, त्या लिटील चॉम्पवाल्या
मन्या,
त्या लिटील चॉम्पवाल्या ५ही मुलांना पुढे कार्यक्रम करण्यासाठी झी मराठीला मध्यस्थ ठेवण्याची अट होती. ६ लाख रु एका कार्यक्रमाचे झी वाले घेत असत. असो.
-पुण्याचे पेशवे
आपणच कशाला इश्यु करा आणि वाइट
आपणच कशाला इश्यु करा आणि वाइट वाटुन घ्या?
हे जास्त बरोबर आहे.
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
पण
उत्कृष्टपणाच्या ज्या व्याख्या आहेत त्याच बदल्ता आहेत असल्या सुमार कार्यक्रमांमुळे त्याचे काय? मला ही त्यात कळत नाही पण एस एम एस पद्धत वापरुन गायक निवडायचे म्हणजे अतीच आहे. एस एम एस पाठवनार्या किती लोकांना राग,ताल कळतात?
तात्यांशी सहमत. परिक्षकांच्या
तात्यांशी सहमत.
परिक्षकांच्या गुणदान करतांनाच्या वेळी दुरनियंत्रकाची मुक कळ दाबणे हा एक आधुनिक उपाय आहे.
असे करणे आपला रक्तदाब वाढू देत नाही.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
त्यांना काय
कुठ गाणि-गिणी घालायची का काय करायच ? ते त्यांच त्यांना ठरवुद्या की वो म्हणतो मी. आपल्या मर्जीने दुसरं कस काय वागतील वो. आपण आपल त्यांच गाण ऐकाय्च नाहीतर तंबोरा घेऊन गळा घाशित बसायच बघा. वाद असला तर तो घाला बघु तिकड बारागडगड्याच्या हिरीत.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
च्यायला
हे रावसायब येकदम कळीचा मुद्दा मांडतं नेहमी. चला जरा अण्णांचा 'गोकुल गांव का छोरा' ऐकतो आता गोकुळाष्टमीच्या मूहूर्तावर (तसा उशीरच झालाय म्हणा, पण चालेल)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
असेही होऊ शकते ..
सगळे स्पर्धक आता मारवा चान्ग्ला शिकतील ..
काय हो र.रा. ...
बराबर
येकदम बराबर बोल्ला तुमी. हे सगळं आजीमुळे बरं का रे पामरा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आणी मग ..
मग त्या मुलान्चे कार्यक्र्म होतील तेव्हा ..
आपापले विचार कळवणा-या सर्व
आपापले विचार कळवणा-या सर्व प्रतिसादींचे आभार..
मीम मालक-व्यवस्थापक,
येथील काही अवांतर प्रतिसाद-उपप्रतिसाद, आपसातील गप्पा इत्यादी अप्रकाशित करावे ही नम्र विनंती..
तात्या.
तात्या
भानावर या साहेब!!! इथे अजून तरी अवांतरबंदी नाही. त्यामुळे असे प्रतिसाद (आमच्याच प्रतिसादाकडे रोख आहे असे वाटले म्हणून) उडवण्याला आमचा ठाम विरोध आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मी पूर्ण भानावर असून फक्त
मी पूर्ण भानावर असून फक्त विनंती केली आहे. अंतीम निर्णय अर्थातच व्यवस्थापकांचा..
तात्या.
थट्टा मस्करीला ना नाही आहे
थट्टा मस्करीला ना नाही आहे तात्या.
अती झाले की व्यवस्थापन पाहते आहेच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओके..
ओके..
तात्या, तुमचा मुद्दा पटला,
तात्या, तुमचा मुद्दा पटला, राहुलला तिथे बघून थोडं वाईटही वाटलं. पण मग एक स्वार्थी विचार मनात आला...
चला, हि गोष्ट पुर्णपणे मान्य की एका ठराविक काळानंतर राहुलच्या मतापेक्षा तिथे प्रेक्षकांच्या (आंडुपांडु) मतांना जास्ती महत्व येइल, जे खरोखर चुकीचेच आहे. पण या कालावधीत जी खरोखर गुणी बाळं या स्पर्धेत आहेत, जी लहानपणापासुन गाण्यावर मेहनत घेताहेत. त्यांना राहुलच्या अनुभवाचा, ज्ञानाचा केवढा मोठ्ठा फायदा होइल. स्पर्धेच्या सगळे दोष एका बाजुला आणि हा एक गुण एका बाजुला ठेवून पाहा.
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन