हेल्प

0
0

मैत्रीनींनो
माझी एक खुप छोटी पण BIG समस्या आहे, माझा मुलगा ४ वर्षाचा आहे तो अजिबात जेवत नाही.
खुप अशक्त झाला आहे. तुमच्याकडे काहि उपाय असेल तर सांगा.

टिव्हीवर डोरेमॉन चालु करा

1

Big smile टिव्हीवर डोरेमॉन चालु करा ..आपोआप जेवेल.
माझा भाचा असाच जेवतो...एक घास डोरेमॉनचा करुन घाबरगुंडी

मुलाचा कल ध्यानात घ्या

2

होमिओपॅथीचे एक टॉनिक येते अल्फा-अल्फा या नावाचे.
माझ्या लहानपणी मलाही हाच प्रॉब्लेम होता. हे टॉनिक सुरु करताच माझा खुराक वाढला होता हास्य

डॉक्टरांचा सल्ला घ्या आधी मगच द्या.

दुसरे असे की तीच तीच चव मुलांना आवडत नाही. चमचमीत खायला द्या त्याला. त्याची आवड लक्षात घ्या आणि द्या. गोड आवडत असेल तर गोड द्या. पण त्याआधी रोजचे जेवण संपवायची कंडीशन पण ठेवा त्याच्यापुढे, एखादा खेळ वा कार्टून आवडत असेल तर आधी जेवायला भाग पाडत जा. नाहीतर मिळणार नाही असे स्पष्ट सांगा. आवडीच्या गोष्टीसाठी मुले ऐकतात.

तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

+ 1 सहमत आहे.

3

+ 1
सहमत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे काय सहमत? तुम्हाला काय

4

राजे काय सहमत? तुम्हाला काय अनुभव?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आयला

5

मला वाटल राजे "छान लेख/ऊत्तम/ किंवा आवडल" अस काही तरी लिहील पण चक्क +१ नंतर "सहमत आहे" हे पण लिहेल हो (ह.घ्या.)


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अभिनंदन राजे.

6

अभिनंदन राजे.


पुष्करिणी

:(

7


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अभिनंदन राजे.

8


+१

wink


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

अरे

9

स्त्रीविश्व मधे एक चुचु सोडून बाकी बाप्येच बोलताय्त.

यावर एक धागाच काढावा म्हणतो!

10

यावर एक धागाच काढावा म्हणतो!


*****

भाज्यांचे पराठे बनवू

11

भाज्यांचे पराठे बनवू शकता.

पुलाव, सँडविच, इडली असे चमचमीत पदार्थ भाज्या घालून केले की मुले आपसूक खातात

माझी लेख पण साडे चार वर्षाची

12

माझी लेख पण साडे चार वर्षाची आहे...त्यामुळे अनुभवावरून सांगते,
वेगवेगळे पराठे, पास्ता, कमी तिखट खिचडी, उपमा, शिरा, वेगवेगळ्या पिठांच्या आंबोळ्या , इडली, डोसा, उत्तपा आणि वेगवेगळी फळे असे देत चला..

आणि एक दिवस हे एक दिवस ते असे विभागून द्या म्हणजे आवडेल..वेगवेगळी फळे तर द्याच...घास घास खाऊन चव लागेल मग खात जाईल..
शाळेत जात असेल तर डब्यात असेच वेगवेगळे पदार्थ देत जा...आणि काहीच नाही तर कॉम्पुटर किंवा टीव्ही वर कार्टून लाऊन बघत बघत खात जाईल...थोडं रागावून खायला भाग पाडा...हळूहळू चव लागेल एकेका पदार्थाची..

आणि हो खूप गोड देत जाऊ नका...दात खराब होतील...मग dentist कडे गेल्यावर मुलाला कसे शांत करावे असा धागा काढावा लागेल.

जयश्री, माझी मुलगीही ४

13

जयश्री, माझी मुलगीही ४ वर्षांची आहे. ती पण जेवणाचा खुप कंटाळा करते. तिलाही टिव्ही बघताना भरवावे लागते. कधी मुड असला तर स्वतः हाताने चांगली जेवते. हल्ली तिला गवारीची भाजी, भेंड्याची भाजी, ओल्या नारळाची चटणी, साधा वरणभात, पराठे आवडतात. भात खाण्याचा कंटाळा करते.

जयश्री, तुझा मुलगा दिवसभर काय

14

जयश्री,
तुझा मुलगा दिवसभर काय काय करतो ? शरीर खूप जास्त दमले किंवा अजिबात दमले नाही तर मुले जेवणाचा कंटाळा करतात.
त्याचे वजन त्याच्या गटानुसार योग्य असेल, त्याची वाढ व्यवस्थित असेल तर निवांत रहा. खूप मागे लागल्यामुळे त्याच्या मनात जेवण या विषयाचीच नावड निर्माण होऊ शकते. त्यामुळे गप्पागोष्टी करत, एका जागेवर बसून ( मागे फिरत नाही ! ) तो जेवढे खाईल तेवढे दे. वेळा ठरवून घे आणि त्याच वेळेला खायला दे.
खाणं डोळ्यांना आवडायला हवं. चवीत विविधता हवी. त्याला हातात धरून खाता येईल असे काहीतरी दे. ( वडे, शेंगोळे, पराठा, पोळी रोल, भाज्यांच्या फोडी इ. )


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

धन्यवाद

15

प्रतिक्रियां दिल्याबद्दल आभार..
तुम्ही दिलेल्या पर्यायांचा मी जरूर उपयोग करेन.


जय हो

माझा मुलगा 'चापटी खाणार का

16

माझा मुलगा 'चापटी खाणार का चपाती खाणार?' असं विचारल्यावर चुपचाप खायला बसतो wink


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

छान

17

छान


जय हो

अरे मुलावर अन्याय करतो हा,

18

अरे मुलावर अन्याय करतो हा, धमकवतो आहे..... अरे कोणी मानवाधिकारवाला मीमवर नाही आहे काय रे Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."