The lion king.............
The lion king.............
आज जरी हे लिहिताना इथे नसलात तरी
नेहमीच माझ्या भोवती आहात
वडील म्हणून माझ्यासाठी
माझे मित्र बनून सोबती आहात
तुमच्या समोर तुम्हाला कधी सांगू शकत नाही
माझ्यासाठी तुम्ही काय काय केले त्याचा पाढा वाचू शकत नाही
भाग्य लागत अश्या वडिलाचा मुलगा बनायला
खांद्या वर हात टाकून मित्रासारखे चालायला
तुमच्याच रक्तातला स्वाभिमान
भरभरुन आहे माझ्या नसानसात
म्हणुनच मान ताठ ठेवूनच
वावरतो मी कुठेही जगात
नसेल दिला कदाचित लहानपणी
भरपूर खाऊ आणि रासभर खेळणी
पण तेव्हा तुम्ही शिकवलेलं थोड्यातलं समाधान
पुरुन उरेल जन्मभर तुमची तीच गोड वाणी
तुम्ही पुरुष म्हणून कदाचित
जमलं नसेल आईसारख कुशीत घ्यायला
तरीही तुमच्या मूक प्रेमाची
नेहमी जाणीव नक्कीच असते मला
स्वतःहून कधीही न घडवता
आम्हाला नजरेवर घडू दिलंत
धाकाच्या पिंज-यात कधी न कोंडता
मोकळ्या हवेत मला स्वच्छंद ऊडू दिलंत
जितका अभिमान तुम्हाला वाटतो
हा माझा मुलगा आहे असं सांगतांना
त्याही पेक्षाहि जास्त मला आहे
तुम्हाला माझे बाबा म्हणताना
तुमच्या गुण दोषांसहित
तुम्ही मला प्रिय आहात
लहानपणापासून तुम्ही म्हणून माझ्यासाठी
तोच कहाणीतील lion king आहात.........
.jpg)
तुम्ही पुरुष म्हणून
तुम्ही पुरुष म्हणून कदाचित
जमलं नसेल आईसारख कुशीत घ्यायला
तरीही तुमच्या मूक प्रेमाची
नेहमी जाणीव नक्कीच असते मला
अप्रतीम!!!!!
सुरेख कविता.
सुरेख कविता.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लहानपणापासून तुम्ही म्हणून
लहानपणापासून तुम्ही म्हणून माझ्यासाठी
तोच कहाणीतील lion king आहात.........
खूप आवडली
सुरेख लिहिले आहे..
सही कविता
एकदम परफेक्ट शब्द
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त फोटो रे.. हळवा झालो
मस्त फोटो रे..
हळवा झालो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त
मस्त कविता!
सोल्लिद आहे कविता
सोल्लिद आहे कविता
मस्त !
मस्त !
कविता आवडेश. lion king ची
कविता आवडेश.
lion king ची उपमा मस्तच!
lion king
हीच गोड इमेज ठेवा
निरोप पाठवा...................
मस्त....
<<जितका अभिमान तुम्हाला वाटतो....हा माझा मुलगा आहे असं सांगतांना
त्याही पेक्षाहि जास्त मला आहे.....तुम्हाला माझे बाबा म्हणताना>>
खुप छान....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
अप्रतिम.
अप्रतिम.
फार सुन्दर लिहलयस मित्रा!!
फार सुन्दर लिहलयस मित्रा!!
मी इथेही असतो -- साधं-सरळ
मस्तच.
मस्तच.
फारच छान कविता
फारच छान कविता
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही