भगवान श्रीकृष्ण सत्य की मिथ्य
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!
.jpg)
{घरुन रिप्ल्लय देइन}
घरुन रिप्ल्लय देइन
{घरुन रिप्ल्लय देइन}
घरुन रिप्ल्लय देइन
{व्हिडीओ पाहीला. सर्व प्रथम}
व्हिडीओ पाहीला.
सर्व प्रथम मी जाणकार नाही. पिंक टाकायची हौस म्हणुन दिलेला प्रतिसाद यापलीकडे सदर प्रतिसादाचे मुल्य नाही, नसावे. सहजरावांनी दिलेल्या शीर्षकात सत्य का मिथ्य असा प्रश्न आहे. व्हीडिओ हिस्ट्री ऑर मिथ असा आहे. मिथ आणि मिथ्य या दोन गोष्टी भिन्न आहे. मिथ म्हणजे रुपक, मानीव कथा इत्यादी असा अर्थ होत असावा असं माझं तुटपुंज आंग्लभाषेतील ज्ञानाने आकलन आहे. मिथ्य (योग्य शब्द मिथ्या) म्हणजे जे आहे ते आकलन न होता भ्रमामुळे दुसरे काही आहे असे वाटणे. या अर्थाने श्रीकृष्ण आपल्या समोर ज्या रुपाने येतो ते सत्य नसुन मिथ्या आहे असे अनुमान मी तरी काढलेले आहे.
{धन्यु नाना}
मिथ, मिथक, मिथ्या शिर्षकात काय लिहावे लक्षात येत नव्हते म्हणुन मिथ्य असे समजुत/ मिथक अर्थाने लिहले. हे चूक असेलही. शिर्षक मी स्वता दिले आहे. त्याचा वरवर पहाता अर्थ श्रीकृष्ण खरा होउन गेला की कल्पना आहे असा होतो असे वाटते. आख्या माहीतीपटाचा मतीतार्थही तसाच वाटतो. माहीतीपटाचे जे शिर्षक आहे ते मात्र जे आहे तसे पहील्याच वाक्यात दिले आहे.
आता नानाला तसेच इतरांनाही काथ्याकुटाला विषय. महाभारतकाल हा इसवीसनाच्या तीन हजार वर्षे ते अजुन जुना अशी माहीती विविध अभ्यासकांकडून कळते. कोणास काय ठावूक इतक्या जुन्या काळात काय होते पासुन नाही असे होते म्हणजे असे होते असा दृढ विश्वास असलेली आजची जनता. माझ्या अल्पमती नुसार संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज हे सगळे अजुनही होउन गेलेले महापुरुष म्हणुन गणले जात आहेत. समजा अजुन ५०० वर्षाने जर कोणी कोणास ठावूक इतके वर्षांपुर्वी हे संत होते की नाही? असेच लोकगीत, अभंग , लोकसाहीत्यातुन भर घालत घालत कोणीतरी हे ग्रंथ लिहले एकच असा कोणी हे ग्रंथ लिहले नसावे जसे आज महाभारत इ ग्रंथाविषयी म्हणले जाते, तसे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याविषयी कोणाचे अजुन भविष्यकालात अविश्वास होउ नये इतका की ते होते की नव्हते यापासुन चर्चा व्हावी. तर हे असे होउ नये म्हणुन केस कशी भक्कम करता येईल?
{शीर्षकाचा मुद्दा ठिक. त्यावर}
शीर्षकाचा मुद्दा ठिक. त्यावर मी उत्तर दिले आहे. पुरेसे असावे
अजुन भविष्यकालात अविश्वास होउ नये इतका की ते होते की नव्हते यापासुन चर्चा व्हावी.
अशी चर्चा होईल किंवा होणार नाही. होऊ नये अशी इच्छा. भविष्य आपल्या हातात नाही. सबब आपण केवळ आज जे आपल्याला माहित आहे ते नीट जतन करुन भविष्यातल्या आपल्या वंशजांकडे यथास्थित जाईल हे पहाणे गरजेचे. यामुळे वैयक्तीक स्तरावर जरी आपण जतन करु शकलो नाही तरी अशा प्रकारच्या कार्याने उद्युक्त होऊन मनोभावे असे काम करणार्या संस्थांना द्रव्य कमी पडु नये हे जरी आपण पाहिले तरी पुष्कळ होईल. अनेक सुशिक्षित केवळ त्यांचा विश्वास नाही म्हणुन अशा गोष्टी जतन करणार्या संस्थांना मिळणार्या सरकारी मदतीबद्दल आक्षेप नोंदवतात जे अत्यंत चूक आहे. अनेक मराठी भाषेचे अभ्यासक केवळ संस्कृत, पाली या भाषांच्या अभ्यासाला मिळणारी मद्त कशी राष्ट्र विघातक आहे असे प्रतिपादन करतात तेव्हा त्यांची कीव वाटते. असो.
{आज रात्री पाहतो निवांत व}
आज रात्री पाहतो निवांत व रिप्लाय देतो तसा ही कृष्ण माझ्या आवडलीच विषय !
Hope is a good thing...
{हम्म..याआधी पण मी अशाच}
हम्म..याआधी पण मी अशाच प्रकारची माहिती वाचली होती..ग्रहांचे अनुमान वगैरे...
माझा पूर्ण विश्वास आहे कि हे सगळे आपला इतिहास आहे परंतु मूळ लेखकाने (व्यास) त्यात आपल्यापरीने काही कमी जास्त शब्द लिहिले असणार...तरीही इतिहासाचे मुल्य आहेच.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{हम्म}
माझा पूर्ण विश्वास आहे कि हे सगळे आपला इतिहास आहे
इतिहास हा विश्वासाचा विषय आहे का अभ्यास/संशोधनाचा? एखादी घटना घडली आहे असा - फक्त तुमचाच नव्हे तर - बहुसंख्य माणसांचा 'विश्वास' असेल तर ती इतिहासाचा भाग असते/असावी/मानावी का? विश्वास हा पुरेसा पुरावा आहे का? तसे असेल तर जगात अभ्यास संशोधन करायलाच नको. मटाच्या किंवा मराठी संस्थळांवर साईटवर टाकतात तसे कौल टाकावे नि निर्णय घ्यावेत. जसे आम्रिकेत 'ओबामा हा मुस्लिम आहे का ख्रिश्चन' असा कौल घेतला गेला होता (थोडक्यात तो ख्रिश्चन आहे यावर तुमचा विश्वास आहे का?). आता असणे वा नसणे हा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे(तो कोणती उपासनापद्धती प्रत्यक्षात अंगीकारतो त्यावरून त्याच धर्म ठरतो) त्याचे अस्तित्व भले इतरांचा विश्वास नसेल तरी असिद्ध होईल?
अस्वीकृती: हा प्रतिसाद फक्त शिल्पातैंच्या प्रतिसादातील एका वाक्याला आहे. मूळ विडिओ मी अजून पाहिलेला नाही त्यामु़ळे या प्रतिसादाचा संदर्भ त्याच्याशी लावू नये.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{पाण्याखाली गेलेलं शहर}
पाण्याखाली गेलेलं शहर सापडल्याचे मी आधीही discovery वर पाहिलं होतं...त्याने कदाचित द्वारका होती हे सिद्ध होईल...माझ्या मते कृष्ण वगैरे योद्धे होऊन गेले असावेत... बाकी चमत्कार वगैरे म्हणजे काही योगायोगाच्या घटना फुगवून अथवा काल्पनिक तयार करून महाकाव्यात त्या व्यक्तीला भारदस्तपणा येण्यासाठी घातल्या असाव्यात, जसे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली वगैरे....आता असे काही चमत्कार लिहिल्याने ज्ञानेश्वर झालेच नाही अन ते काल्पनिक होते असे म्हणण्यासारखे आहे.
केवळ एका महाकाव्यात लिहिले आहे म्हणून इतके हजारो वर्षे एखाद्याची "देव" म्हणून पूजा करण्याइतके लोक मूर्ख नाहीत...
राहिली गीता...त्यातील अर्थ समजावून घेऊन जमेल तेवढा चांगलेपणा ठेवावा...आपण काही देव नाही...
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{तुमचा हा मुद्दा रास्तच आहे,}
तुमचा हा मुद्दा रास्तच आहे, आहे जर आपण भारतीय इतिहास / भुतकाळ जर निट पाहिला तर आपल्याकडे ( जगात सर्वत्रच) शक्तीशाली व्यक्तीला लगेच देवपण देण्याची झुंबड उडते व त्यामुळे अनेक काळानंतर वर्षानंतर शतकानंतर जर एखादा सत्य शोधावयास गेला तर गोधळ उडतो.
आता पुरावे का मिळत नाहीत हा जरा प्रश्न अवघड झाला आहे.
द्वारका मिळाली म्हणजे कृष्ण असल्याचा पुरावा मिळाला हे मान्य करणे मला अवघड आहे, मी खालील प्रतिसादामध्ये देखील लिहले आहे.
Hope is a good thing...
{तुम्ही कृष्ण नव्हताच हे सत्य}
तुम्ही कृष्ण नव्हताच हे सत्य कशामुळे नाकारत आहात?
द्वारका सापडली म्हणजे तिथे राहणारा राजकुमार पण होताच ना? माझ्यामते अजून थोडे संशोधन व्हायला हवे...थोडे उत्खनन व्यायला हवे..आपल्याकडे जिकडे तिकडे लोकवस्ती आहे..उत्खनन करायला कुठे कुठे करणार?
केवळ व्यसनी लिहिलं किंवा पात्र उभं केलं म्हणून जनतेने त्याला देव मानलं असं होत नाही..
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{+१}
>केवळ व्यसनी लिहिलं किंवा पात्र उभं केलं म्हणून जनतेने त्याला देव मानलं असं होत नाही..
इथे एकाच वेळी, एकाच चर्चेत एखाद्या विषयावर दोन टोकाची मते आठळतात. लोक एकमेकांना फाट्यावर मारायला उतावीळ असतात. अश्यात शतकानुशतके कोणाचे नाव जर चांगले टिकून रहाणे मोठी दुर्मीळ गोष्ट आहे. त्यामागे फक्त ब्रेनवॉश किंवा सक्ती धाक नसणार तर लोकांनी ते मनातुन स्वीकारले असले पाहीजे.
ठीक आहे देवत्व,चमत्कार इ तपशीलातले फरक, मुद्दे सोडले तरी शक्य आहेत. आता तीन हजार वर्षापुर्वीचे पुरावे तरी कोणते असतील व गोळा करावे? बर जरी महाभारत सगळे एक कादंबरी मानले. जे अतिशय प्रतिभावान माणसाने लिहले असे समजले.
आज जे कोणी धार्मीक व अधार्मीक / सश्रद्ध व अश्रद्ध लोक आहेत ते माझ्यामते सात आठशे वर्षापुर्वी होउन गेलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांना ते खरेच होउन गेले आहेत असे मानतात. शिवाजी महाराजांनाही मानतात.तर आज शिवाजी महाराजांच्या किल्याची अवस्था कशी आहे हे दिसते आहेच. अजुन दोन हजार वर्षांनी समजा भूकंप व इतर नैसर्गीक अथवा मानवनिर्मीत संकटांमुळे हे नष्ट झाले तर पुरावे देणार कसे व काय?
याच अर्थ मानव इतिहास हा कायमच जसा जुना होणार तसा अविश्वसनीय होत रहाणार. दैवी, चमत्कार इ बाबी खोट्या वाटतात पण मग साधा इतिहास देखील असाच पुसला जाणार?
जसे भूगर्भशास्त्र, अंतराळ विज्ञानाचा वापर करुन पृथ्वीवरचे नैसगीक इथे नदी होती, समुद्र होता, अमुक भूभाग लाखो वर्षापुर्वी समुद्राखाली होता, अमुक भूभाग अमुक खंडाला जोडला होता, अमुक विवरे अशनी कोसळल्याने झाली हे जसे शास्त्राने सिद्ध होते व मानले जाते. तसे मानवाचा इतिहास जर निरपेक्षपणे कोणी लिहला जरी असेल तरी तो खरा कशावरुन असा आक्षेप कोणी ना कोणी घेणारच व सगळ्यांनी स्वीकार केला असा पुरावा कोणाला देता येणे अशक्य बाब वाटू लागतेय.
आता प्रश्न हा आहे की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व शिवाजी महाराज हे खरे होते व त्यांचे कार्य काय याचा दोन हजार वर्षांनीही नाकारला जाणार नाही असा पुरावा काय?
मग परत माझ्या डोक्यात हा प्रश्न येतो की जे आज आपल्याला अवगत आहे ते आपण मित्रांना व आपल्या पुढच्या पिढीला सांगतो. आपले आई-वडील आपल्याला जे काही सांगतात त्यावर प्रसंगी आपण चर्चा करतो, प्रश्नही विचारतो पण सगळ्यालाच पुरावा मागत नाही व बरेचसे त्यांचे ऐकतो. आणी तेही सगळे खोटे सांगत असतीलच असे नाही. त्याप्रमाणे ह्या संतांचे अस्तित्व व त्यांची ओळख आपण पुढच्या पिढीला करुन देत राहीलो व अश्या प्रकारे ही लिव्हींग ट्रडीशन प्रुफ का होउ शकत नाही? आज आपल्यापैकी कोणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना पाहीले नाही की, सगळेच त्यांच्या गावतले नाही की त्यांचे हस्तलिखीत पाहीले नाही तरी आपण मानतो व जिथवर मला माहीत आहे संत ज्ञानेश्वर काही कथाकादंबरीतले खोटे पात्र नाही.
कर्मकांड, चमत्कार इ चा प्रभाव कालानुसार ओसरत आहे. आपण आजु बाजुला हे पहात आहोतच. किंवा जबरदस्ती कोणी आपला इतिहास आपल्यावर लादत नाही आहे. त्यामुळे हा अविश्वसनीय वाटणारा तपशील काढला तरी आपल्या इतिहासात जे कोण होउन गेले, त्या सगळ्यांना पुराव्याअभावी खोटे ठरवले जाणे पटत नाही आहे.
{मी कृष्णावर विश्वास नाही असे}
मी कृष्णावर विश्वास नाही असे म्हणालो नाही आहे, माझे चार-पाच लेख ह्याच कृष्णावर आहेत हे तुम्हाला स्मरत असेल.
वर उल्लेखलेला व्हिडिओ जे बोलतो आहे ते मी सागंतो आहे.
मी पुरावा मागणारा कोण ?
पण जेव्हा अस्तित्व आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पुरावा कुठे आहे असा सर्व सामान्य प्रश्न !
* आता कित्येक डोगंर-कपार्यामध्ये फिरत असतो मी, कधी कधी भल्यामोठ्या डोंगररागेवर एक्टा भटकलो आहे लोक म्हणतात भुतं आहेत नका जाऊ ( अगदी परवा शनिवारचा अनुभव आहे हा लिहतो आहे लेख ) पण च्यामायला आम्हाला नाही दिसली भुतं कधी.. ना कधी भिती वाटली म्हणून मी भुतं नसतात असे ठामपणे म्हणून शकतो.
* तसेच देव आहे की नाही ह्या मुद्द्यावर माझे देखील एक ठाम मत आहे.
* तसेच आता कृष्णाबद्दल देखील माझे ठाम मत आहे की एक राजा होता ! बस्स ! ह्या पलिकडे त्याला मी देव मानने ह्यावर विश्वास ठेवत नाही.
Hope is a good thing...
{कृष्ण काय किंवा राम काय देव}
कृष्ण काय किंवा राम काय देव होते यावर माझाही विश्वास नाही...कदाचित त्याकाळी ते desirable मेन असतील...आताही आहेत म्हणा..
पण दैवी शक्ती वगैरे होत्या मी मानत नाही...पण तो आपला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे हे मी जरूर मान्य करते...नव्हे मला अभिमान आहे.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{बरोबर ! पण त्याच बरोबर कोणी}
बरोबर !
पण त्याच बरोबर कोणी थोडाफार पुरावा मागीतला तर तो आपल्याकडे हवा ना ?
माझ्या माहिती प्रमाणे भारतात सर्वात जूने आपल्याला ज्ञात असलेले व ज्याचा पुरावा आहे असे २-३ बीसी मधील आहे
Hope is a good thing...
{कृष्णाबद्दल देखील माझे ठाम मत}
कृष्णाबद्दल देखील माझे ठाम मत आहे की एक राजा होता !
कृष्ण नावाचा कुणीही राजा महाभारतात नाही.
{सहज ! छान लिहितोस रे तु, }
सहज ! छान लिहितोस रे तु,
म्हणुन तर मी नेहमी म्हणतो पुरावे मागणा-यांना फाट्यावर मारा ! विषय संपला !! मग कुणी असहिष्णु म्हणॉ किंवा अंसंस्कृत!!
{वेल}
फाट्यावर मारणे हा थिअरीमधला प्रकार समजतो हो. पण होते असे की एक बाजु आम्ही म्हणतो तेच खरे व कट्टरता घेउन येतात. मग त्याचे सांस्कृतीक दहशवाद, तालीबनाझेशन कधी होते तेही कळत नाही. दोन्ही टोकाच्या भुमीका नको वाटतात. एक झुंडशाही होउन कायदा हातात घेउ पहातात त्यापेक्षा मग कट्टर अश्रद्ध (जोवर कायदा हातात घेत नाही) तोवर तो बरा वाटतो किमान त्यांच्या युक्तीवाद 'नाही मानत गेलास उडत' म्हणत फाट्यावर मारता येतो व तो अश्रद्ध फारतर आपल्या बुद्धीची कीव करतो पण ते ठीक आहे, परवडते. मी ही म्हणु शकतो की हो बाबा आम्ही अल्पमती. पण कुठला तरी जमाव धर्माच्या नावाने घोषणा देत जाळपोळ करत फिरतो तो जास्त माथेफीरु वाटतो. तो मान्य नाही.
{टाळी एका हाताने वाजत नसते..}
टाळी एका हाताने वाजत नसते.. दोन्ही बाजु कमीजास्त प्रमाणात दोषी आहेत.
(वेळ पडल्यास जाळपोळ करावी या पक्षाला माझे समर्थन नाही पण करुच नाही असे नाही. तो वेगळा विषय)
{(विषय दिलेला नाही)}
<+ 1
Hope is a good thing...
{पास}
तुमच्या उप-प्रतिसादात नि माझ्या मूळ प्रतिसादात मला काही संगती दिसत नाही. तुमचा मुद्दा वेगळाच आहे ज्यावर चर्चा करण्याची माझी इच्छा नसल्याने मूळ धाग्यालाही प्रतिसाद दिलेला नाही. सबब पास.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{केवळ पुरुषोत्तम}
विषय भारी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा कृष्ण म्हणा. आमच्या दृष्टीने तो केवळ एक पुरुषोत्तम आहे. कित्येक शतकांत श्रीकृष्णासारखा पुरुषोत्तम जगाच्या इतिहासात देखील पाहिला नाही. राजकारणाचे एवढे सखोल ज्ञान असलेला हा भव्य दिव्य पुरुष त्याच्या जीवनातील आश्चर्यकारक कृतींनी देवत्त्वाला जाऊन पोहोचतो. महाभारताचे युद्धच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचे राजकारण ढवळून काढणारा पुरुषोत्तम मानतो आम्ही त्याला. गीतेचा अर्जुनाला केलेला उपदेश तर केवळ अद्वितीयच.
{शक्यतो त्यांना काय सांगायचे}
शक्यतो त्यांना काय सांगायचे आहे हे मला समजत नाही आहे.
सर्वात आधी तीन कृष्ण होते असा एक मत प्रवाह आहे त्या बद्दल उल्लेख कोठ्च येत नाही व एक द्वारका ती पण समुद्रात बुडालेली सोडली तर कारण त्यांने सिध्द होऊ शकत नाही की तीच कृष्णाची द्वारका बर बाकी महाभारतात उल्लेखलेल्या अनेक राजांच्या, राज्यांच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा कोठेच सापडत नाही हे कसे ? भारतीय भुखंड असा नियमित उलटा पालटा होणारा व निसर्गाचा कोप असलेला नक्कीच नाही आहे की त्यामुळे सर्व पुरावे नष्ट झाले. ज्याला आपण पुरातन / पौराणिक कथा म्हणतो तेथे आपण विश्वास ठेवतो अथवा नाही पण तेथे पुरावा इत्यादीच्या देखील आपण मागे पडत नाही पण जेव्हा महाभारत झाले होतेच असे ठामपणे म्हणतो तेथे पुरावे गरजेचे होतात.
फक्त आकाशातील तारे व नक्षत्र ह्यांची त्यावेळी अशी अवस्था होती व त्यावरून हे सिध्द होते म्हणणे जरा पटण्यासारखं नाही आहे.
Hope is a good thing...
{राजे उद्या पुण्यात येत आहे.}
राजे उद्या पुण्यात येत आहे. तुझे खापरपणजोबा त्यांच्या काळात धोतर नेसत असणारच. मला ते धोतर दाखव नाहीतर तुझे खापरपणजोबा नव्हते असे सिद्ध व्हायला हरकत नसावी.
{हॅ हॅ हॅ ! उत्तर देणे शक्य}
हॅ हॅ हॅ !
उत्तर देणे शक्य नसल्यावर अशी वाक्य सुचताना तुम्हाला.
येथे प्रश्न करोडो लोकांच्या आस्थेचा आहे म्हणून पुरावा मागितला जात आहे, हे चुकीचे आहे असे होते का ?
Hope is a good thing...
{अजिबात नाही. पुरावा म्हणजे}
अजिबात नाही. पुरावा म्हणजे नक्की काय हवं? घरं? शहरे? अवघ्या १०० वर्षांपुर्वी सदाशिवपेठेत असलेले वाडे आज नाहीत म्हणजे नव्हतेच ? इथे आस्थेचा प्रश्नच नाही.
{अरे चीन मध्ये १०,०००}
अरे चीन मध्ये १०,००० वर्षापुर्वीचा ममी सापडतो, इजिप्त मध्ये हजारो वर्षापुर्वीचा इतिहास सांगणारे बाधकाम / ममी इत्यादी दिसतं, ५०००-६००० वर्षापुर्वीच्या माया संकृतीमध्ये तयार झालेले बांधकाम टिकते. व आपण तर लाखो वर्षापासून म्हाणाला ज्ञान आहे असे जगभर बोंब मारतो तर आपल्या त्या ज्ञानाच्या अस्तित्वाचा पुरावा म्हनून आपल्याकडे काहीच कसे नाही ?
* पुण्यात आधी लाकडी वाडे असायचे म्हणे.
Hope is a good thing...
{ज्ञान असणे आणि ममी सापडणे या}
ज्ञान असणे आणि ममी सापडणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.
भारतीय मनोवृत्ती आणि इतर मनोवृत्तीत प्रचंड फरक आहे. बाप मेला तरी जाळुन निशाणी संपवली जाते. जतन केली जात नाही. जीवन हे सतत वाहणारे असुन बदल हाच त्यातला स्थायीभाव आहे ही मनोधारणा असल्याने इतरांना जे आकर्षणाचे विषय वाटतात ते भारतीयांना वाट्त नाहीत. त्यामुळे इतिहासात राजे आले गेले कोण मोजदाद ठेवणार?
>>>* पुण्यात आधी लाकडी वाडे असायचे म्हणे.
तुम्हाला लाकुड कुजुन नष्ट होते हे ज्ञान आहे का?
असो. बोलु तितके कमी. कामात आहे. चर्चेतुन अंग बाहेर काढत आहे.
{तीन कृष्णांची केवळ कल्पना आहे}
सर्वात आधी तीन कृष्ण होते असा एक मत प्रवाह आहे त्या बद्दल उल्लेख कोठ्च येत नाही
याचे कारण हा अगदी तकलादू मतप्रवाह आहे. उगाच गोंधळ निर्माण करणार्या काही विध्वंसक मेंदूंची ती उपज आहे. सुदैवाने श्रीकृष्णाला देवत्व दिल्यामुळे व भारतीय जनमानसांत त्याची प्रगाढ श्रद्धा निर्माण झाल्यामुळे एकापेक्षा अनेक कृष्णाचा मतप्रवाह वाहून गेला म्हणणेच योग्य होईल तीन कृष्ण कोणते ते तरी कोणी सांगू शकेल का?
एक मतप्रवाह असा आहे की : गीता सांगणारा श्रीकृष्ण हा वेगळा आहे आणि अर्जुनाच्या हातून धनुष्य गळून पडल्यावर कृष्णाने केलेल्या उपदेशामध्ये महर्षी व्यासांनी ही गीता घुसडून दिली.
(येथे हे ध्यानी घेतले पाहिजे की व्यास हे प्रकांड ज्ञानी होते, महाभारतासारखे जटील आणि गुंतागुंतीचे लेखन करणारा ज्ञानी ऋषि दुसर्याच्या रचना स्वतःच्या महाकाव्यात का घुसवेल? आणि ज्या काळात महाभारत घडले त्याकाळात लेखनात एक प्रज्ञा होती, एक प्रामाणिकपणा होता. तेव्हा ही कपोलकल्पित कल्पनाच ठरते दुसरे काही नाही)
दुसरा मतप्रवाह असा आहे की: मथुरेपासून जरासंधाच्या भीतीने द्वारकेला पलायन करणारा कृष्ण आणि महाभारतातला कृष्ण आणि भगवद्गीता रचणारा कृष्ण वेगवेगळे आहेत.
(जो कृष्ण आयुष्यभर पळतच राहिला तो काय महाभारत घडवणार असे म्हणणारे लोक आहेत. पण कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजे याचे सखोल ज्ञान कृष्णाला होते, तेव्हा ही देखील एक भ्रामक कल्पनाच ठरते)
अजून एक मतप्रवाह असा आहे की: एक कृष्णद्वैपायन हा श्रीकॄष्णाच्या समकालीन होता त्यामुळे हा कृष्णद्वैपायनच गीतेचा रचनाकार आहे. ( या कल्पनेला इतिहासातही कोणताच आधार नाही)
तसेच भारताच्या इतिहासात महाभारताला दिशा दिल्यानंतरही श्रीकॄष्ण नावाचे कित्येक राजे होऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या काही कथा महाभारतकालीन कृष्णाला काळाच्या प्रवाहात जोडल्या गेल्या आहेत असाही एक तर्क आहे. ( हे काही प्रमाणात शक्य आहे पण यामुळे कृष्ण तीन होते असे नाही वाटत)
(दुर्दैवाने मला आता काही संदर्भ ग्रंथ देता येत नाहियेत, १५ वर्षांपूर्वी एका आगीत आमच्या कडील बराच मोठा ग्रंथसंग्रह जळून गेला त्यात हे सर्व ग्रंथ होते. पण दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या महाभारतकालीन संशोधनावरचे साहित्य महाभारताच्या कृष्णावर एक वेगळा प्रकाश टाकते)
मायाजालावर कृष्णाबद्दल थोडी माहिती इथे मिळेल
{भारतीय भुखंड असा नियमित उलटा}
भारतीय भुखंड असा नियमित उलटा पालटा होणारा व निसर्गाचा कोप असलेला नक्कीच नाही आहे की त्यामुळे सर्व पुरावे नष्ट झाले. ज्याला आपण पुरातन / पौराणिक कथा म्हणतो तेथे आपण विश्वास ठेवतो अथवा नाही पण तेथे पुरावा इत्यादीच्या देखील आपण मागे पडत नाही पण जेव्हा महाभारत झाले होतेच असे ठामपणे म्हणतो तेथे पुरावे गरजेचे होतात.
मोठी गंमत वाटली. तुम्ही भूगर्भ शास्त्रज्ञ आहात काय? मग नक्कीच नाही असे कसे म्हणता? एक सुनामी आली होती आपल्या पाहण्यात किती लोकं मेली त्यात? जगभरात? किंव आशियात. अशीच एक सुनामी १३व्या शतकातही आली होती. त्यात कोकण किनारपट्टीवरची अनेक गावे धुतली गेली. याचा फिजिकल पुरावा आमच्या केळशीला वाळूच्या डोंगराच्या रूपाने अस्तित्वात आहे. आणि अशा किती ठीकाणी उत्खनन केले गेले हो? किती ठीकाणी उत्खनन केले आहे हे आपणास माहीत आहे? मग ह्या प्रस्तुत म्हणण्याला आधार काय? जिथे करोडोनी जनता विश्वास ठेऊन आहे तिथे छटाक नवटाक लोकांनी पुरावे मागितले म्हणून ते देण्यासाठी वृथा खटपट करू नये. त्यांना म्हणावं हवं तर तुम्ही शोधा. विश्वास ठेवायला पुराव्याची गरज तुम्हाला आहे आम्हाला नाही.
-पुण्याचे पेशवे
{सविस्तर प्रतिसाद नतंर}
सविस्तर प्रतिसाद नतंर देतो.
प्रतिसादाच्या निम्या भागाशी ( शेवटच्या) सहमत.
Hope is a good thing...
{आज तरी मी कृष्ण हे सत्य आहे असे मानतो}
Myth= a false story moving around supernatural characters अर्थात पॉराणिक कथेतील कथित शक्तीमान पात्र...
Mythology=Study of myths अर्थात पॉराणिक साहीत्याचा अभ्यास..
(संदर्भः अंगेजी- हिंदी शब्द्कोश)
याचा अर्थ असा नव्हे की ती पात्रच अस्तीत्वात नव्ह्ती... महाभारत; रामायण वा अन्य पॉराणिक काळातील ही पात्र (केवळ हिंदुच धर्म नव्हे तर अन्य धर्माही अशी शक्तीमान पात्रे आपणास (supernatural characters) आढ्ळ्तात.) ती तशी निश्चीत नाही पण ती नाही असे म्हणने योग्य होणार नाही. ज्यावेळी त्यांच character लिहलं(त्यापेक्षा सांगीतलं; कारण मॉखिक शिक्षण पध्दती होती) गेलं त्यावेळी ते असं नसेल... पण या शिक्षंणपध्दतीमुळे त्यात वेगवेगळ्या उपमा व विशेषणांची भर पड्ली.. त्यातुन हया साहीत्यातुन ही पात्रे supernatural characters अधिक भड्क होत गेली. "मदर तेरेसा यांचे चमत्कार" यावर लोकांनी त्यांना इत़क्या supernatural powers बहाल केल्या की त्या उद्या वा अनेक वर्षानंत्र कोणी वाचले, तर तो म्हणेन हे सत्य नाही. कारण सारं काही विज्ञानाच्या चेष्म्यातुन वा पुराव्याच्या आधारे वा वैज्ञानिक उपकर्णातुन तपासुन पहायची आपल्याला सवय लागली आहे आणि आपण ती भावी पिढीलाही लावत आहोत ही चांगली बाब आहे त्यामुळे नव संशोध्न उदयास येते. पण याचा अर्थ असा नव्हे की ते सशोधनातुन माहीती,सिध्द्ता (सत्य),पुरावे येत नाही तोपर्यत्त हे सारे " असत्य" आहे असे मानने चुकीचे आहे....
कृष्णाच्या विचारातुन कैक पिढ्याचे संस्कार आणि संस्कुती जपलेत......
जर आपंण अनेक नव संशोधन वाचले तर आपणास महाभारत वा रामायणाचे स्पष्ट पुरावे सापड्तात.. मी सर्वाना माहीत असलेल्या पुस्तकाच्या शेवटी दिलेला पुरावा सांगतो... शिवाजी सांवत लिखित मृत्युंजय याच्या शेवट्च्या पानावर दिलेले पुरावे....
अशी अभ्यासपुर्ण बरीच पुस्तके आहेत...
त्यामुळे हे आज तरी मी कृष्ण हे सत्य आहे असे मानतो.....
(यातुन माझ्या आस्तीक वा नास्तीकचा वा माझ्या धार्मिक अधार्मिक असल्याचे संशोधन होऊ नये ही अपेक्षा)
{राजे यांच्या उत्तराची मी वाट पहातो आहे... }
राजे यांच्या उत्तराची मी वाट पहातो आहे...
{मी असत्य आहे असे कुठे ही}
मी असत्य आहे असे कुठे ही म्हणालो नाही आहे पण अस्तित्वाचे जे मुद्दे ग्राह्य मानले जातात ते कुठे आहेत हा एकच माझा प्रश्न आहे.
Hope is a good thing...