तू नसताना होतं काय????

0
0

तुझं उमलणं, तुझं बहरणं,
तुझ्या डोळ्यांत माझं हरवणं...
हेच माझं विश्व म्हणत,
अवती-भवती तुला धुंडाळणं...
माझ्यापाशी राहिलं काय?
माझं असं होतं काय?
कसं सांगू तुला आता... तू नसताना होतं काय??

उन्हातलं चांदणं, चांदण्यातलं ऊन,
यातला फरक कळतो काय?
बुध्दीची ओरड, मनाची हुरहुर....
अन् विजय मनाचाच होतो काय?
नको विचारूस पुन्हा मला, तू नसताना होतं काय?

नुकतंच दूर गेल्यावरही,
वर्षांचा भास होतो काय?
गोड आठवणी, मृदू भावना,
ओढ यांची लगते काय?
कसं सांगू तुला आता, तू नसताना होतं काय??

आपलं माणूस जवळ असावं,
भावना हट्टी होते काय?
येण्याच्या तुझ्या वाटेकडे,
नकळत डोळे लागतात काय?
नको विचारूस पुन्हा पुन्हा तू नसताना होतं काय???

ऑ ! हे मकने

ऑ ! हे मकने लिहिले आहे ???

अवघड आहे.

का रे??

दुष्ट माणसा....
यात अवघड ते काय आहे रे????

दुष्ट

दुष्ट माणसा....

Sad

मकीच्या

मकीच्या लिखाणाने डोळ्यँ पाणावाले.



-पुण्याचे पेशवे

अरे वाह

अरे वाह सुरेख !!!!

छान आहे गं कविता...

आपलं माणूस जवळ असावं,
भावना हट्टी होते काय?
येण्याच्या तुझ्या वाटेकडे,
नकळत डोळे लागतात काय?
नको विचारूस पुन्हा पुन्हा तू नसताना होतं काय???

न कळत डोळे पाणावले.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बापरे हे

बापरे हे वाचुन चक्कर येवुन पडलो.
मक बरी आहेस ना???
काय झाले तुला??
मला कधी बोलली नाहिस ह्या "तु" बद्दल



-निखिल

दोस्ती मैं

दोस्ती मैं दरार...

मला पण न सांगितलेस गं ... मके ?

मग लाडू कधी मिळणार wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लाडू???

बारसे असो.. लग्न वा मर्तिक.... तुला खाणं सोडून काहीच सुचत नाही का???

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ....

खाणे महत्वाचे़॒



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हा हा हा...

ढूंढते रह जाओगे... wink

चाळशी

तुझ्या डोळ्यांत माझं हरवणं...
हेच माझं विश्व म्हणत,
अवती-भवती तुला धुंडाळणं...
माझ्यापाशी राहिलं काय?

आणि

उन्हातलं चांदणं, चांदण्यातलं ऊन,
यातला फरक कळतो काय?

ह्या ओळी वाचून ही कविता कवयित्रीने आपल्या हरवलेल्या चष्म्याला उद्देशून लिहिली आहे की काय अशी शंका येते wink

माझा चष्मा...???

मी लेन्सेस वापरते... हास्य

धन्यवाद

खुलाश्याबद्दल धन्यवाद. मालक किंवा संपादक वरील प्रतिसादात योग्य तो बदल करतील काय? तसदीबद्दल दिलगीर आहे.

जबरा फोटो

जबरा फोटो नंदन भौ...
तुम्ही कवितचे रसग्रहण करावे ही विनंती.



-निखिल

:(

एका उदयोन्मुख कवयित्रीला नाउमेद करण्याचे हे प्रयत्न आहेत...

;(
;(
;(
;(

+१

सहमत



-निखिल

ह्म्म्म.

ह्म्म्म.

उदयमुख कवियत्रीस आम्ही मिमा भुषण हा पुरस्कार देत आहोत, रोख ११ रु. एक सुपारी असे बक्षिसाचे स्वरुप असून, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये येऊन तत्काल आपले बक्षिस कवियत्रीने घेऊन जावे अशी विनंती.

धन्यवाद,

निवेदन संपले.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नंदन राव

नंदन राव तुमच्या कडुन ह्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.
एवढी चांगकी संधी मावशींना छळायची तुम्ही वाया घालवली
असो,



-निखिल

सावकाश

अहो, नवीन दशकाचा पहिलाच दिवस आहे. घाई काय आहे? हास्य

आहो हाफ

आहो हाफ वॉली आहे...
पहिला दिवस असो का शेवटचा सोडायचा नाहि..
छे!!! तुम्ही पण ना



-निखिल

हम्म

आता अंमळ नववर्षाच्या स्वागताच्या गडबडीत आहे. विडंबनस्वामी पुपेश्री आज गप्प का आहेत? त्यांनी नेहमीप्रमाणे ह्या शुभकार्यात पुढाकार घ्यावा अशी सामान्य जनतेतर्फे त्यांना मी णम्र विणंती करतो.

तुम्ही

तुम्ही रसग्रहण टाका हो wink
ते विडंबनाच बघतील



-निखिल

मस्त लिहिलय....

प्रतिभेला असेच कोंब, धुमारे वगैरे फुटत राहोत अन आम्हाला अशीच वाचन मेजवानी परत परत मिळत राहो.

अवांतरः पण हे कुण्या विशिष्ठ व्यक्तीला उद्देशुन लिहिलय का? असेल तर नवीन वर्षात सर्व मनोकामना पुर्ण होवोत.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+१

प्रसन्नदांशी सहमत आहे.

हॅ हॅ हॅ....

हॅ हॅ हॅ....

+ १ सहमत. पण

+ १ सहमत.

पण मनोकामना हिच्या होतील हो, पण तो बिचारा न जाणे कोण असेल... एकदम कळत नकळत प्रयोग शाळेत पडणार आहे अलगद..... Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

इन्शाल्ला

इन्शाल्लाह Big smile

म.क.
तु आणि अदितीनं नव्या वर्षात प्रतिमा बदलण्याचा चंग बांधलाय की काय गो?
दोघीहीजणी एकदम दक्षिणध्रुवावरुन उत्तरध्रुवावर आल्यासारख्या वाटताय हास्य

बाकी, कवितेबद्दल बोलायचं तर आम्ही पामर त्यात काय बोलणार? छान आहे इतकंच म्हणेन हास्य

मके, कविता

मके, कविता आवडली गं ... पण नंद्याचा द्वारपाल जयपाल कसा झालं हे कळत नाही आहे.

धन्स गं!!!

धन्यु....

>>>पण नंद्याचा द्वारपाल जयपाल कसा झालं हे कळत नाही आहे.

हा हा हा.. चालायचंच!!!!

काय हो....

हे काय? नव्या वर्षाचे नवे संकल्प वगैरे नाहीत ना?
हाफ व्हॉली आहे. कोण घेतोय ते पहायचं आता...

हाफ व्हॉली

हाफ व्हॉली आहे. कोण घेतोय ते पहायचं आता...
घेतला असता पण तुम्हीच नंतर करवादता ... असो, बदलायचं पाहून घेईन.

घे...

घे.. हा घे. उगाच येईल त्या चेंडूवर धावा काढण्यापेक्षा असा एखादा हाफव्हॉली घेऊन भिरकावून द्यावा हे बरं.

छान कविता.

छान कविता. खर्‍या कवयित्रीचे नाव टाकले असते तर फारच छान वाटले असते. असो.

या

या प्रतिसादातून अंमळ जळजळ व्यक्त होत आहे. हे घ्या इनो:

हा काय

हा काय प्रकार आहे? आम्हाला या कवितेची माहीती आहे म्हणून आम्ही असे लिहिले. भोचकपणाचा निषेध.

(संतप्त) - बिका

हा काय प्रकार आहे????

तुम्हाला या कविते बद्दल माहिती आहे त्यामुळे असे काही तुम्ही लिहाल अशी तुमच्याकदून अपेक्षा नव्हती....

(व्यथित) मस्त कलंदर

हीहाहाहाहा

खरी कवयित्री? हीहाहाहाहाहाहा..... चालू द्या पालथे धंदे!!!

?

>>चालू द्या पालथे धंदे!!!

पालथ्या धंद्यांना प्रोहत्सान देणार्‍या मराठी संस्थळद्वेष्टी *.प्रेमी सदस्यांना ब्लॉक करणेत यावे!

एक

एक मिनीट...

जरा पाणी पितो....

हां आता जरा बर वाटतय...

काही नाही जरा भोवळल्याटाईप वाटल रे !!

हे काय?

३१डिसें चा स्टॉक संपला की त्याला उद्देशुन दिसतेय..

चालू द्या. हास्य

अहो

अहो सहज,

कवीयत्री चे नाव वाचा ना आधी स्पष्ट wink

ते काम आमच्या सारख्यांचे.... !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चष्मा बदला राजे

समानतेचा जमाना आहे.

नुकतंच

नुकतंच दूर
नुकतंच दूर गेल्यावरही,
वर्षांचा भास होतो काय?
गोड आठवणी, मृदू भावना,
ओढ यांची लगते काय?
कसं सांगू तुला आता, तू नसताना होतं काय??

किती सुंदर ओळी लिहल्या आहेत तुम्ही.
आवडली कविता तुमची.
मी पण लिहते कविता कधी कधी पण अशी जमत नाही चांगली मला हास्य

+१

.

फालतु

फालतु कविता...
अस्ल्या चावट कवितांचे महाचावट विडंबन लवकरच आमच्या ब्लॉग वर

तरीच म्हटलं...

इथं अजून कसे नाही आलात तुम्ही?
या स्वागत आहे!!!
इतिहास चुकांसह पुन्हा घडत असतो याचा अनुभव देत अशल्याबद्दल धन्यवाद!!!

अच्छा

अच्छा अच्छा तुमचा ब्लॉग आहे काय? आम्हाला वाटलं ... जाऊ द्या!

चांगली

चांगली कविता. पुकशु.

मक्स...

मक्स...कविता नक्की कोणासाठी आहे?
कविता छान आहेच...
एकदम कवितेच्या प्रांतात कसे काय गेलात?



राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

मस्त जमली आहे कविता. आवडली.

मस्त जमली आहे कविता. आवडली.

छान कविता आहे तुमची. भावना

छान कविता आहे तुमची. भावना पोहोचल्या.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही