नेत्रशिबीर आणि जनसहभाग
नेत्रशिबीर आणि जनसहभाग
माझ्या विषयात "प्रायमरी हेल्थ केअर" अर्थात "प्राथमिक आरोग्य सेवा" या संकल्पनेची तोंडओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. आरोग्य सेवांचे न्याय्य वाटप, आरोग्य सेवांव्यतिरिक्त इतर विभागांशी समन्वय, देशास अनुरूप असे तंत्रद्न्यान आणि जनसहभाग या चार खांबांवर ही संकल्पना उभी आहे. जनसह्भाग असेल तर आरोग्यसेवांची परिणामकारकता वाढते असां आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. प्रत्यक्षात त्याचा प्रत्यय आल्याचा हा किस्सा.
भारत सरकारने "राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन" कार्यक्रमात जनसहभाग वाढावा, त्यात स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे म्हणून एक योजना सुरू केली होती. त्यानुसार या संस्थांनी नेत्रशिबीरे आयोजित केल्यास आर्थिक अनुदान मिळत असे. पैठणला रोटरी क्लबच्या सहभागाने दर वर्षी एक नेत्रशिबीर एक नेत्रशिबीर आयोजित केले जात असे. (आता अन्य काही संस्थांच्या सहभागाने दर महिन्याला असे शिबीर आयोजित केले जाते). अनुदानातून रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करणे अपेक्षीत असे. तेंव्हा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर पेशंटला एक आठवडा शिबीरात ठेवावे लागे. (आता त्याच दिवशी किंवा फारतर दुसर्या दिवशी घरी जाता येते) पहिले दोन दिवस द्रव आहार (प्रामुख्याने दूध), नंतर दोन दिवस द्रव-घन आहार आणि शेवटचे तीन दिवस नेहेमी प्रमाणे जेवण असा कार्यक्रम असे. सगळे करण्या साठी मनुष्य्बळ आणि त्याचे व्यवस्थापन रोटरी क्लबने पुरवावे तर तांत्रिक बाबी पैठणच्या हेल्थ युनिटने आणि औरंगाबादच्या मेडीकल कॉलेजने पुरवायच्या अशी व्यवस्था होती. त्या वर्षी चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. दीडशेच्या आसपास शस्त्रक्रिया झाल्या. पहिले तीन दिवस गेले आणि चौथ्या दिवशी सकाळीच निरोप आला की काही समस्या उद्भवली आहे. मी पेशंटना ठेवले होते त्या ठिकाणी गेलो. सगळे चिंताग्रस्त दिअसत होते. कळले ते असे...
रोटरी क्लबने जेवणाची व्यवस्था ज्यांचे कडे दिली होती ती सर्व मंडळी अचानक आणि काहीही पूर्वकल्पना न देता अचाहनक आपले चंबूगबाळे उचलून चालती झाली होती आणि आता सकाळच्या नाष्ट्याचा आणि जेवणाचा प्रश्न उद्भवला होता. इतक्या अल्प कालावधीत दीडशे माणसांच्या जेवणाची सोय करायची होती. लागणारी सर्व सामग्री होती, पण स्वयंपाकीचे काय? अन्नवाटपाचे काय? मोठाच प्रश्न होता.
जवळ्च हेल्थ युनिटचे एक वरिष्ठ कर्मचारी होते. त्यांनी मला एका बाजूला घेतले आणि अणि ते म्हणाले: " सर, मी एक सांगू? आपण पेशंटच्या नातेवाइकांना विचारू या कां?" मी चमकलोच. आम्हाला कुणालाच हा विचार सुचला नव्हता. त्यांना सगळ्यांना हे कळले तर काय हाच विचार उलट आम्हाला सतावत होता. आम्ही २०-२५ नातेवाइकांना बोलावले. त्यांना परिस्थिती समजावून सांगितली आणि मदतीची मागणी केली. गंमत म्हणजे त्यातले एक दोघे म्हणाले:" हात्तिच्या ! एव्हढंच व्हंय. आमाला वाटलं काय झालं !" त्या दोघांना अशा कामाचा चांगलाच अनुभव होता. नातेवाइकांच्या लग्न कार्यात ते नेहेमीच ही आघाडी सांभाळायचे. त्यांनी मला "बिनघोर रहावा." असे सांगून खरोखरच बिनघोर केले. त्यांनी लगोलग कामाचा ताबा घेतला. थोड्याच वेळात पेशंटना सकाळचा चहा मिळाला आणि जास्त नाही पण नियोजित वेळेच्या फक्त तास दीड तास उशीरा त्यांना जेवण मिळाले. त्या ग्रामस्थांनी व्यवस्थापन शास्त्रातले किचकट शब्द वापरेले नाहीत. पण त्यांची अंमलबजावणी मात्र एखाद्या कसलेल्या व्यवस्थापन तद्न्यालाही अभिमान वाटेल अशीच होती. कामाचे वाटप, वेळेचे नियोजन आणि अन्नसामग्रीचा कांटकसरीने पण पुरेपूर वापर या गोष्टी खूप काही शिकवून गेल्या. पेशंटच्या नातेवाइक स्त्रीया गाणी म्हणत स्वयंपाक करत आहेत हे एक अनोखे दृष्य होते. नंतरच्या दिवशी तर सगळे काही वेळेवर आणि जरा जास्त शिस्तीत झाले. शेवटच्या दिवशी त्या मंडळीच्या आग्रहास्तव मी पण त्या जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाला आगळीच चव होती.
शिबीराच्या समारोप कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख झाला. जनसहभागाचे उदाहरण म्हणून माझ्या ते कायम स्मरणात राहिले आहे. ऑपरेशन झालेल्या एका पेशंटने शिबीरातल्या घरच्या सारख्या आणि चवदार जेवणाचे आवर्जून कौतुक केले. फक्त चौथ्या दिवसापासून आपली बायको रोज सकाळ-संध्याकाळ काही वेळ कुठे जात असे ते कळत नव्हते असे म्हटले मात्र. बर्याच जणांनी त्याला ती सर्वांचे जेवण तयार करत असे ओरडून सांगितले. तो प्रसंगही अविस्मरणीयच होता.

.jpg)
छान
लेख आवडला.
सुंदर लेखन. नेत्रदानाच्या
सुंदर लेखन. नेत्रदानाच्या जागृतीविषयी काही माहिती http://netradaan.blogspot.com/
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
खुप महत्वाचे काम ! सर, सध्या
खुप महत्वाचे काम !
सर, सध्या पुण्यात कुठे आहे का अश्या प्रकारचे डोळेचे कार्य करणारे कोणी आहे का ?
मुफ्त मध्ये ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान
राजे, डॉ. मधूसूदन झंवर आणि डॉ. सतीश देसाई यांच्या पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान तर्फे अशी नेत्रशिबीरे गेली कित्येक वर्षे आयोजित केली जात आहेत. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी रुग्णाकडून नाममात्र ११ रू (आता १०१ झाले असावेत) घेऊन शस्त्रक्रिया, एक वेळचे जेवण नि त्या पश्चात आवश्यकता असल्यास चष्मा हे प्रतिष्ठानतर्फे पुरवले जाते. मी स्वत: या प्रतिष्ठानचा नियमित देणगीदार आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आयला मस्तंच हो.. तुमचे लेख
आयला मस्तंच हो.. तुमचे लेख एकदम सच्चे असतात ब्वॉ.. कसलाही अभिनिवेश नसलेलं लेखन आहे हे.. सरळ स्वच्छ पारदर्शी..
अर्धवट शी
पुर्णसहमत
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
राजे... राष्ट्रीय अंधत्व
राजे...
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कोणत्याही ग्रामीण (उपजिल्हा) रुग्णालयात किंवा जिल्हा रूग्णालयात मोफत केली जाते. हजारो पेशंट याचा फायदा घेतात
आपला स्नेहांकित...
-अशोक
धन्यवाद. पुण्यात कुठे आहे
धन्यवाद.
पुण्यात कुठे आहे ह्याचा शोध घेतो आहे सध्या.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान मस्तं अनुभव. या ठिकाणी
छान मस्तं अनुभव. या ठिकाणी अशा प्रकारचे प्रोजेक्त ९८ ते २००२ पर्यंत चालवून अनेक दृष्टीहिनांना दृष्टीचा लाभ करून देण्यात आला होता. त्या प्रकल्पाची आठवण झाली.
-पुण्याचे पेशवे
धन्यवाद
धन्यवाद सर्वांचे !!
आपला स्नेहांकित...
-अशोक
छान लेख
छान लेख
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही