-

{येक बी प्रतिसाद नाय? }

1

लोकांची कमाल झाली म्हणायची.
असल्या सुंदर धाग्याला येक बी प्रतिसाद नाही?

पाषाणभेद का दगडफोड्या ते काय... तुम्ही इश्काची लई झ्यांक कविता लिव्हली हाय.
इश्काची इंगळी जणू हिथं कोणाला बी डसल्यागत वाटत नाय. आगदी ह्या संकेतस्थळाच्या मालकाला बी नाय.
मर्दाचं लक्षण हाय प्रेम करणं. आन् आसं गावभर बोभाटा करुन सांगायला लई जिगरबाज काळीज लागतंया बघा...

आरं मर्दानो कधी काळी कोणा गिर्रेबाज पोरीवर आणि सौदामिनींनो कधी काळी कोणा मनाच्या राजकुमारावर पिरती केली आसल तर द्या की समद्यांनी प्रतिसाद?

का दगडफोड्याला डोके फोडायला लावताय. एवढं सुंदर कवन केलं बगा त्यानं आणि प्रतिसाद नाय? काय वाटंल त्याला याचा इचार करा की म्यां म्हणतो हास्य

{दूरदर्शीभौ, आपुलकीबद्दल}

2

दूरदर्शीभौ, आपुलकीबद्दल धन्यवाद धन्यवाद.तुम्हाला कविता आवल्डी ना? मंग झालं तर. तुमचा योकच प्रितीचासाद १०० प्रतिसादांसारका हाये. आगदी शिवाजीम्हाराजांच्या मावळ्यावानी बगा. एकच मावळा १० शत्रुंच्या बराबर व्हता का नाय?

माझ्यावाल्या कविता आसल्या आडवाटंच्या आसत्यात. कायकाय डायरेक घुसत्यात डोकश्यात. त्यामुळं लोकं लाजत्यात प्रतिसाद द्यायला. आवं प्रतिसाद दिला म्हंजी नाव येतं ना.

बाकी सर्व वाचकांना कविता आवडली अन त्ये त्या कवितेच्या मुडप्रमाणे हसले किंवा अंतर्मुख झाले किंवा मोकळे झाले तर तीच माझी वसूलीची पावती. बाकी दुसरा कोणता कर आपण कवितावाचनावर आकारत नाही.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{एकच मावळा १० शत्रुंच्या बराबर}

3

एकच मावळा १० शत्रुंच्या बराबर व्हता का नाय?
आगदी झ्यांक बोल्लात. आवं म्हाराजांचे मावळे बेधडक घुसायेचे कुठं बी. आमी बी त्येच करतो wink

माझ्यावाल्या कविता आसल्या आडवाटंच्या आसत्यात. कायकाय डायरेक घुसत्यात डोकश्यात. त्यामुळं लोकं लाजत्यात प्रतिसाद द्यायला. आवं प्रतिसाद दिला म्हंजी नाव येतं ना.

खरं हाय भाऊ तुम्चं. डोसक्यात डायरेक्शान घुसत्यात कविता तुम्च्या. पन कर नाय त्येला डर कशाला म्हंतो म्यां. आमाला काय कोनाची फिकीर नाय. तवां ज्याचं त्येनी बघावं. कसं हास्य
ओठांत येक आन् प्वाटांत येक आप्ल्याला नाय बा जमत. आपन आसंच बेधडक आहोत.

{अकाउंटचे असती करंट, लोन,}

4

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?

वा.. सुंदर कल्पना..!

तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?

हे तर फारच सुरेख..!

आपला,
(परत आलेला धनादेश) तात्या.


{पॉलिशी}

5

इथे आयुर्विमा पॉलिसी असा एक प्रकार पण असतो. आधी खूप प्रिमियम भरावा लागतो, एकदा मॅच्युअर झाली की मग मरेपर्यंत पेन्शन चालू. विचारा प्रभोला.

अवांतरः विषय कवितेत बसला नाही नीट. पत्रलिखाण म्हणून लिहिले असते तर थोडे अधिक स्वातंत्र्य घेता आले असते आणि असे अवघडल्यासारखे नसते वाटले असे वाटते.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{हॅहॅहॅ.......सहमत आहे.}

6

हॅहॅहॅ.......सहमत आहे.

{ररा --> आयुर्विमा पॉलिसी चा}

7

ररा --> आयुर्विमा पॉलिसी चा उल्लेख कुठे केला आहे कवितेते?
बाकी मोठे लेख लिहायला वेळच नाही हो सध्या. त्यामुळे असले प्रयोग करावे लागतात.
-------------------------
बर्‍याचशा बँका होम कॅश सर्वीस देतात म्हणून माझ्या बँकवालीला मी 'प्रेम धनाची होम डिलीव्हरी' करशील काय हा सवाल केला.
अन 'तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?' हे तात्यांना चांगले समजले आहे. अडचण असणार्‍यांनी तात्यांना विचारावे.
हास्य



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{आमीबी}

8

ररा --> आयुर्विमा पॉलिसी चा उल्लेख कुठे केला आहे कवितेते?
आमीबी तेच म्हंतोय, का केला नाही? हॅ हॅ हॅ. जाऊ द्या होत तुमाला नाय कळायचं. त्ये प्रभूदेवाचे नि आमचे क्रिप्टिक हाय.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{घ्या अजुन थोडे: प्रेमाचा कोरा}

9

घ्या अजुन थोडे:

प्रेमाचा कोरा चेक माझा, दामदुप्पट मिळेल का?
जिवनातील दुखः आपल्या, बुडीत खात्यात जमा करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये अकाउंट माझे उघडशील का? ||५||

{सँडी भाय बोत सेंटी किया रे!}

10

सँडी भाय बोत सेंटी किया रे!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{मस्त रे.}

11

मस्त रे.


Hope is a good thing...

{पाषाणा लै भारी रे}

12

यकदम खत्रुड कविता

bank


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{सही}

13

एकदम खत्रा प्रतिसाद.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)