दहा लाखाची लॉटरी
दहा लाखाची लॉटरी
आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.
हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.
बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.
त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. मी दहा लाखाचे काय करू? जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.
.
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.
गंगाधर मुटे
.jpg)
हिंदी मधून बोलत होते का ? +९२
हिंदी मधून बोलत होते का ?
+९२ हा पाकिस्तानचा डायल कोड आहे.
+९२३४ Germany Neusorg City चा सांगत आहे गुगल.
पण ह्या नंबरने सुरु होणारे सर्व फोन फ्रॉडसाठीच वापरले जात आहेत हे नक्की !
येथे पहा http://www.qatarliving.com/node/441086
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुमच्या कडुन असा भ्रमनिरास
तुमच्या कडुन असा भ्रमनिरास अपेक्षीत नाही.
असो पण आता धागा उघडलाच आहे तर सांगतो. ५०% देत असाल तर ठरवू पुढं काय करायचं ते.
हिंदी
होय. हिंदीमधूनच. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
पाकि होते मग नक्कीच.
पाकि होते मग नक्कीच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मालकांच्या नादी लागु नका
मालकांच्या नादी लागु नका मुटेसाहेब. त्ये तसलंच हाय. कुनाला पैसे मिळणार म्हणलं की पार बुडाला आग लागल्यागत बोंबलतय..
तुमी आपलं टक्केवारीचं बोला बघू
हॅ हॅ हॅ ! मुटे साहेब
हॅ हॅ हॅ !
मुटे साहेब संभाळून... ह्यांनेच कॉलवला असेल तुम्हाला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुमचे माझे जावू द्या. ६०-४०
तुमचे माझे जावू द्या. ६०-४० टक्क्यात मिटवून टाका. (६० माझे ४० तुमचे. रिक्स मी घेतोय ना.)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मला नकोच.
मला पैसे नकोच. घरात जागा नाहीये. उगीच बैल बांधायला अडचन व्हायची.
तुम्ही आणि अर्धवटजी आपसात वाटून घ्या.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
+ १ उगाच गुरा-ढोरांना का
+ १
उगाच गुरा-ढोरांना का म्हणूनश्यानं त्रास द्यायचा
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बघा.. मी काय सांगितलं
बघा.. मी काय सांगितलं मघाशी.. जरा कुणाला पैसे मिळणार म्हणलं की भंजाळतय त्ये.
अर्धवट राव पैसा अडका लै वंगाळ
अर्धवट राव पैसा अडका लै वंगाळ गोष्ट असते असल्या गोष्टी स्वतः जवळ नाय ठेवायच्या... द्या बघून इकडे म्या संभाळतो
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बोगस रेशन कार्ड
हे बोगस रेशन कार्ड वाल्यांचं / बांग्लादेशींचं रॅकेट असू शकतं का?
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
असु शकते.. ही शक्यता फार मोठी
असु शकते.. ही शक्यता फार मोठी आहे.
कारण नवीन राशनकार्डे लगेच ओळखली जातात व जुने एकादं मिळाले तर सोने पे सुहागा असा त्यांचा विचार असावा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे वाचा.
हे वाचा.
मला पण
मला पण अशाच एका +९२ नंबर वरुन मिस्ड कॉल आला होता.( तुम्हाला पण मिस्ड कॉलच आला असेल मुटे साहेब) मी कॉल बॅक केला तर म्हण्तो 'आप जो ये एअरटेल का नंबर युज कर रहे है उसे २५ लाख की लॉटरी लगी है. मी त्याला झाडुन फोन बंद केला. मग मी माझ्या पाकिस्तानातील मित्रांना फोन करुन त्या नंबर ची चौकशी करायला लावली. एका मित्राने त्या फोन करणार्याला पोलीसवाला बनुन इतका झापला की त्याने सरळ सरळ सगळे सांगीतले की आम्ही असे मासे पकडुन त्यांना डिश टीव्ही चे रीचार्ज कार्ड मागतो.
कधी वेळ मिळाला तर इथे डोकाऊन बघा... http://www.amolmendhe.co.cc
आम्ही असे मासे पकडुन त्यांना
आम्ही असे मासे पकडुन त्यांना डिश टीव्ही चे रीचार्ज कार्ड मागतो.
येल्लो! खोदा पहाड और...
काय कल्ल नाय
>>आम्ही असे मासे पकडुन त्यांना डिश टीव्ही चे रीचार्ज कार्ड मागतो.
मंजे काय करतात ????