अलिकडेच सनिवेलला झालेल्या एका हळदीकुंकवाला आम्ही गेलो होतो. (हळदीकुंकवाला आम्ही कसे असले फालतू प्रश्न विचारू नये. इथे बेबी शॉवरलापण बाप्यांना बोलावतात आणि बायामान्सं प्यार्टीत पुरुषांच्या खांद्याला खांदा (आणि ग्लासाला ग्लास) लावून असतात) तिथे काही उखाणे कानावर पडले ते देत आहे. होतकरूंनी लाभ घ्यावा.
नुकत्याच अमेरिकेत आलेल्या एका ताईंनी सुरुवात केली.
व्हिसात व्हिसा, एच्वन्बी व्हिसा,
आली हिरवी गंगा, ...रावांनी भरून घेतला खिसा
थोड्याशा निबर बाईंनी म्हटले.
आली आली मंदी... तंतरली जगभर
रंग विरला हिरवा, ...राव बेंचवर
पतिपत्नी दोघेही वेगवेगळ्या शहरात काम करत असलेल्या (आणि त्यामुळे जेवणाची भयंकर आबाळ होत असलेल्या) एका बाईंनी उसासा टाकला.
...राव शिनशिनाटीत, मी डलासला,
हाटेलात खाऊन, जीव लई तरासला
कोपऱ्यात खिन्नपणे बसलेल्या तरूण मुलीने वेगळाच सूर लावला.
खोल खोल विहीर, भोवती हिरवळ दाट
पोहरा पोचेना तळाशी, ...राव मायक्रोसॉफ्ट
पुढच्या बाईंनी म्हटले.
साइटवर जाती ...राव हजार वेळा
कुणा सांगू दुःख माझे, तुंबला की बोळा
एका टकटकीत, आणि चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असलेल्या आंटींनी समारोप केला.
आली आयटीची ट्रेन, ...राव बनले संगणक हमाल
गेले क्लायंट साईटवर, आता ...पंतांबरोबर धमाल
* * * * * * * * *
हाण्ण तिच्या
हाण्ण तिच्या
एक नंबर..
एक नंबर..
ही ही
मस्तच हो पेंडसे.सुंदर कल्हई केली आहे.
हा हा हा मस्तंच. पेंडसे तयार
हा हा हा मस्तंच. पेंडसे तयार दिसतात.
-पुण्याचे पेशवे
'तयार'हा शब्द काळजाला भिडला.
'तयार'हा शब्द काळजाला भिडला.
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
हा हा हा
लै भारी!
असेच म्हनतो..
असेच म्हनतो..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हम्म
कमल हसनचा दशावतार चित्रपट पाहिला आहे का रे कोणी? नाही म्हणजे बघण्याजोगा आहे का ते विचारायचं आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
शि बै...
(विषय दिलेला नाही)
जबरा रे. आणखी उखाणे घ्या.
जबरा रे. आणखी उखाणे घ्या.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हा हा हा लगे रहो...
हा हा हा
लगे रहो...
लै भारी!
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)