भारतीय तत्वज्ञान - भाग १३
मागील भागात आपण वल्लभ मत पाहिले. या भागात निंबार्क आणि मध्व मत पाहुया.
निंबार्काने प्रवर्तित केलेले मत द्वैताद्वैत अशा नावाने ओळखले जाते. निंबार्क मतानुसार वैष्णव संप्रदायाला मान्यता दिली असुन, निंबार्क संप्रदाय असे नाव सुद्धा आहे. निंबार्कमतानुसार जीव, जगत, ईश्वर यांचे स्वतंत्र अस्तित्व नसुन हे तीनही ईश्वरेच्छेवर अवलंबुन आहेत. ईश्वरातच जीव आणि जगत ही तत्वे सुक्ष्मरुपाने सामावलेली असुन ईश्वराच्या इच्छेनेच जीव आणि जगत साकार रुपात अस्तित्वात येतात आणि परत त्याच्यातच विलीन होतात. वेदांतसुत्रांचा असा अर्थ होतो हे सिद्ध करण्यासाठी भाष्याचा आधार घेवुन आपले मत निंबार्काने मांडले.
जीव आणि जगत हे जरी द्वैत असले तरी ईश्वराशी असलेल्या एकरुपतेमुळे ते अद्वैत अशा अर्थाने द्वैताद्वैत असे नाव या मताला पडले आहे. यानंतर आपण मध्वमताचा विचार करु
मध्वमतानुसार माया, ब्रह्म इत्यादी खरी नसुन वासुदेवाच्या भक्तीनेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होईल असे मानले जाते. जीव आणि परमेश्वर हे कुठल्याही पद्धतीने एक असणे शक्य नसुन हे दोन्ही पुर्णपणे भिन्न आहेत असे मध्वमत मानते. हेच द्वैत मत होय. या मतानुसार जगाच्या उत्पत्तीपुर्वी कोणताही देव नव्हता. फक्त नारायणाचेच अस्तित्व होते. नारायण वा विष्णुपासुन सर्व जग निर्माण झाले. हाच विष्णु सर्वांचा रक्षक असुन अंती त्याच्यामुळेच प्रलय होतो. जीव हा विष्णुचा सेवक असल्याने त्याच्याशी कधीही एकरुप होणार नाही. मात्र विष्णुचे जे परमधाम वैकुंठ तिथे राहुन विष्णुशी जवळिक साधता येते. मध्वमतानुसार हाच मोक्ष होय, या मतामुळे शाळीग्राम आणि विष्णुपूजा प्रचारात आली.
मध्वमतानुसार विष्णुस प्रसन्न करुन घेण्यासाठी अंगावर चंदन किंवा तापलेल्या सळईने विष्णुची आयुधे रंगवणे ज्याला अंकन असे म्हणतात, तसेच मुलांची नावे विष्णुची ठेवणे आणि विविध प्रकारे भजन करणे हे उपाय केले जातात. मध्वमत जगाला सत्य मानते. विष्णुची लीला मानते.
अशाप्रकारे आपण सहावे दर्शन वेदांत त्यावरच्या महत्वाच्या मतांची (शांकरमत, रामानुजमत, वल्लभमत, निंबार्कमत, मध्वमत ) नोंद घेउन आढावा घेतला. वेदांतावर अनेक मान्यवरांनी आपापली मते मांडली असली तरी वेदांताचा गाभा अद्वैत शांकरमतानुसार जास्त चांगल्या रितीने प्रकट होतो.
याठिकाणी आपण सहा दर्शनांचा आढावा पुर्ण केला (वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत). ही सहा दर्शने परंपरेने हिंदू दर्शने मानली जातात. परंतु नीट पाहीले तर लक्षात येईल की ही सहाच्या सहा दर्शने आपली मते अतिशय भिन्न त-हेने मांडतात. इतकेच काय वेदांतावर तर अतिशय वेगळी मतमतांतरे मांडली गेली आहेत. प्रत्येकाची जीवाची कल्पना वेगळी. ईश्वराची कल्पना वेगळी. कुणी देव मानतात कुणी मानत नाहीत. कुणी स्वतःलाच देव मानतात तर कुणी स्वतःला देवाचा सेवक मानतात. हाच भारताच्या विविधतेचा पाया असे म्हटले तर चुक ठरणार नाही. असो.
परंपरेने हिंदू मानली गेलेली अनेक दर्शने अजुन आहेत. पण त्यांचा मुळ पाया वरील सहा दर्शने आणि त्यावरची मते यांवरच असल्याने त्यांना वेगळे दर्शन असे न म्हणता संप्रदाय असे म्हटले जाते. यापुढील भागात आपण बौद्ध, जैन, इत्यादी मतांचा आढावा घेउ. या भागात आता इतके पुरे.

.jpg)
हजर..
हजर..
पटकन लिही
बौद्ध, जैन, इत्यादी मतांचा आढावा घेउ.
पटकन लिही, यांची मतं वाचायची आहेत.
मस्त्च
अवलिया, मस्तच रे!!
मस्त रे
मस्त रे
कडक रे नाना! मध्ये खंड पडला
कडक रे नाना! मध्ये खंड पडला होता. आत्ता सगळे वाचले. लौकर लिही!
खरंच, हे सगळं समजुन घ्यायला
खरंच, हे सगळं समजुन घ्यायला मेंदुवरचा गंज काढायला हवा आहे.
नानाची ही लेखमाला मी वाचायला
नानाची ही लेखमाला मी वाचायला दिली आहे अनेकांना
उत्तम लिहीत आहे नाना.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लेखमाला
एवढे लिहिण्यासाठी वेळ मिळतो कसा ??????
मीमवरील सर्वात मस्त व उपयोगी
मीमवरील सर्वात मस्त व उपयोगी लेखमाला.
काल व आज हेच लेखन वाचत होतो, सर्व भाग वाचले.
आवडले देखील.
पुढील भाग कधी रे?
पुढील भाग कधी रे?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे,
धागा वर काढलाच आहात तर एक शंका इच्चारून टाक्तो.
ह्ये आव्लिया साय्बाण्णी ते 'चालता फिरता समंध' नावाचा फ्यांटम इंद्रजाल कॉमिक्ष चा अवतार म्हून काब्रं निवड्लाये?
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.