झेक लोकांसाठीचे पवित्र तीर्थ - कैलाश – ह्रीप.

0
0


झेक लोकांसाठीचे पवित्र तीर्थ - कैलाश – ह्रीप.


Hota or Hill Rip

ह्रीप तीर्थ

ऑटा रायटींगचा उद्भव
जणू कोणाच्या भेटीची ओढ लागल्याप्रमाणे जात होतो. मनात काही वादळ
आल्याचे वाटले. रस्ता फक्त काही पावलांवरचे दिसेल असा. भुरुभुरु पावसाच्या सरी आल्या. अंग गारव्यात सुखावले. काय होतय कळत नव्हते.

तो दिवस होता १6 जून. पहिल्यादाच आम्ही प्रागच्या बाहेर पडणार होतो.
दोन गाड्यातून आम्ही निघालो. एका गाडीत पावेल, शिवा, पलनी व रवी दुसऱ्या गाडीत फिल्म तयार करणारा जॉन त्याची मैत्रिण मीशा व मी.
प्रागची देखणी व्लाटवा नदी, नवे होऊ घातलेले रेल्वे स्टेशन, मोठी मोठी मॉल्स, हॉटेल्स मागे पडत गेली. शहराबाहेर आल्यावर चित्र एकदम बदलले. हिरवी गार झाडी, लांबलर पसरलेले शेतमळे, छोटी कौलारु घरे. तुझे का माझे यावरून कोर्टात लढणारे व बांधांचे तट घालून शेत जमिनीचे तुकडे तुकडेचे करून आयुष्ष्यभर भांडणारे आपले शेतकरी आठवून मन खिन्न झाले. मनात आले की मोठमोठ्या शिवारात उतरून जाऊन लोळावे. करता करता वाटेत एका पेट्रोल पंपावर कॉफी पितापिता गप्पा मारायला लागलो. जॉनने आत्तापर्यंत काही फिल्म्स तयार केल्या होत्या. त्याचे खुप कौतुक ही झाले होते. त्यानेच पुढाकार घेऊन ही फिल्म करायचे ठरवले होते. आज त्याने आम्हाला एका ठिकाणी नेण्याचे ठरवले होतेन. कुठे असे विचारता डोळे मिचकावत कळेल नंतर असे म्हणून माझी उत्सुकता ताणली.
१४०-१५० वेगात आम्ही विविध रस्ते उपरस्ते करत ७० -८० किमी. आलो. वाटेत मला असा आभास होऊ लागले की मी य़ेथे आलेलो आहे. तसे मी जॉनला बोलूनही दाखवले. व त्यानंतर माझी चित्त प्रवृत्ती बदलली. सफाईदार वळणे घेत गाडी एका उंच टेकाडापाशी आली. हिरव्यागार झाडीने गच्च भरलेले ते ठिकाण तसे निर्मनुष्य होते. एके ठिकाणी झेक भाषेत पाटीवर काही लिहिलेले होते पण वाचता आले नाही. मागे राहिलेले पॉवेल व मंडळींची गाडीही आली. तोवर दुपारचे तीन झाले होते. ७-८ जणांचे टोळके हळू हळू तोढायला लागले. चढ चांगलाच उभा होता.
गोल इमारतीचा दरवाजाडोंगर माथा
मी एकदम अबोल झालो. पावेलला मी लिहायला कागद मागितला. तो त्याने दिला. मी वर चढत राहिलो बाकीचे फार मागे पडले. मी झपझप पावले टाकत जणू कोणाच्या भेटीची ओढ लागल्याप्रमाणे जात होतो. मनात काही वादळ आल्याचे वाटले. रस्ता फक्त काही पावलांवरचे दिसेल असा. भुरुभुरु पावसाच्या सरी आल्या. अंग गारव्यात सुखावले. काय होतय कळत नव्हते.
गोल इमारत
एक गोल इमारत दिसली. दरवाजा बंद वाटला. मी तेथेच बसकण मांडले. ताठ पाठ झाली. डोळे मिटलेले झाले. काही वेळ गेला असेल. मी हातात पेन घेतले. पानावर टेकवले. गोलगोल हात वळत गेला. अक्षरे उमटत गेली....
.... हातातले पेन गळून पडले. ... ऑटो रायटिंग सुरु झाले...

जॉन-मीशा कॅमेरा-माईक लाऊन माझे ऑटोरायटिंगचे चित्रिकरण करत होते. जवळ येऊन माझ्या समोरील कागदावरील चित्रे, मजकूर आवाज व करता टिपण्यात रंगले होते. मला हाताने काय आहे हे विचारत काही प्रश्न विचारु का असे म्हटले. मी त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली ती रेकॉर्ड झाली. परदेशात प्रथमच ऑटोरायटिंग असे उघड्याजागेवर अनेक संकेत न पाळता झालेले.


.... आज्ञा असे आगमनाची

ओढ असे तव चरणांची

आणविलेस अवचित दूरी

कारण असे पुर्व संचिताचे

घडविण्या अनेक नियोजितांचे

पंख लाऊन ज्ञानचे पुढले कार्य

कष्टाचे, साधावे कर्म त्वरिताने.

असो द्यावी मनी धारणा

करुणावळीची, प्रेमाची, श्रद्धेची

न ठेवी मनी जनांच्या मतांची

अगस्तीन तो एक संतात्मा

बोलावले तुजला भेटाया,

शोध घेता मिळेल प्रत्ययाला.

जाहली द्विसहस्त्रे

आता कळले तव उद्देशाला.

हा भाग असे पुर्वीच्या जन्माचा

कधी बसशी असा तपाला

येती साधू जन ज्ञानार्जनाला

तव ज्ञानाने संतोषती,

पावित्र्याने जाणती आत्मतत्वाला.

परतावे कार्य बहुकष्टाचे

साधावे मित्र समविचाराचे

करिती सहाय अनपेक्षेने

न करावा अव्हेर

आज्ञा असे अगस्तीनची....

आशीर्वाददर्शक करमुद्रा. फुलांची वृष्टीचे चित्र

एका पाणखळाच्या जागेचा व एकदम उताराच्या वाटेचा आभास होईल असे चित्र.

दि १६ जून २०१०
संध्याकाळ चार नंतर

बाकीचे लोक आले. मी माझ्या तंद्रीत होतो. त्याठिकाणचे महत्व सांगणारी काही माहिती मिळाली. त्यात म्हटले होते...
...४५५ मीटर उंची वरील रिप किंवा झेक उच्चार ऱ्हीप ही जागा त्यांच्या राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा सांगणारी आहे. जणू त्याच्या करिता ऱ्हीप पवित्र मक्का. काही हजार वर्षापुर्वी त्या भूमीत दुध-मधाने फळफळलेला प्रदेश म्हणून लोकांनी आनंदाने वसाहती करायला सुरवात केली. अशा आख्याय़िका आहेत. त्यात प्रमिस्लाईड वंशाचे सेंट जॉर्ज व त्यांचे गुरू सेंट अडलबर्ट यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात...

...शिवाने अनेक ठिकाणी एनर्जीची ध्यानात मापने घेतली. त्यावर बरीच चर्चा घडली, पुढील वास्तव्यात शिवाने या ठिकाणाला पुन्हा भेट देऊन एक मंत्राचे यंत्र करवले. त्यातील महत्वाचे ठिकाण असा गौरव केला.
....मला पुढील कार्याची दिशा द्यायला मानसिक आधार मिळाला. समविचाराचे मित्र मिळाले. मिळालेल्या आभासांना पुर्वजन्मात मी भेट दिल्याचे कारण होते. ...
एका अर्थआने ऱ्हीपने मला झेक ला येण्याचा उद्धेश सांगितला. पुर्वआठवणींसाठी ऑटोरायटिंग करवले.
नंतर एकदा प्रागच्या वास्तव्यात ऑटो रायटिंगची तलफ आली. वो किस्सा फिर कभी...

काही झेपलं नाही ब्वा ! लेखाला

1

काही झेपलं नाही ब्वा ! लेखाला काही आगा पीछा नसल्या सारखा वाटतंय.


(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)