झोळीचा खांब

0
0

टिंग टिंग

बेल मारुन बस निघाली. बसच्या आवाजात आणि धुराळ्यात परत डोळे मिटुन घेतले. पुढला स्टॉप बुरुडगाव. तिथे उतरुन परत पुढे सहा सात किलोमीटर जायचे. मी विचार करत असतो. गाडी चालत असते. तेवढ्यात वेग ह्ळु हळु कमी होतो. गावात गाडी शिरल्याची जाणीव होते. डोळे उघडतो. बाहेर पहातो. गाडी स्टँडला लागते. पानी बोटल, समोसे, शेंगा गरम आवाज यायला लागतात. सॅक उचलतो. खाली उतरतो. जवळपास दहा वर्षांपुर्वी आलो होतो. फारसा काही बदल नाही. तीच गर्दी तोच गोंगाट. माणसं अजुन वाढलेली. स्टँड तेवढाच. कॅन्टीनकडे गेलो. चहा डोनट पोटात टाकला, बाहेर येउन पानपट्टीवरुन सिगारेट पाकीट घेतलं. धुर सोडत पुढे काय करायचं विचार करु लागलो.

चौकशीच्या खिडकीत डोकावुन आलो. भैरोबाच्या वाडीची बस सकाळी सात आणि दुपारी पाच. सकाळची बस कधीच गेलेली. सहा सात तास वाट पहाण्यापेक्षा दुसरं काही साधन पहावं म्हणुन बाहेर आलो. रिक्षा लागलेल्या होत्या. दहा रुपये सीट. एकंदर अवतार पाहिला. एका रिक्षात तीन नाहीतर जास्तीत जास्त चार माणसं. माझं शहरी गणित मार खात होतं. तीन चार वेळेला मोजुनही आतली माणसे किती हे समजेना. मोजण्याचा नाद सोडला. केव्हा निघणार? तुम्ही आणि अजुन दोन झाले की निघु हे उत्तर ऐकुन रिक्षा नको असे म्हणुन पुढे गेलो. काळीपिवळी उभी होती. बंद झाली तर परत चालु होणार नाही की काय म्हणुन चालुच ठेवली होती. गणित परत मार खाणार हे कळलं. येवढ्या गर्दीत हात पाय शाबुत राहतील की नाही असा विचार करुन सहा सात किलोमीटर काही फार अंतर नाही असा विचार करुन चालु लागलो.

लहानपणी आईबरोबर येत असे. दर मे महिन्यात. भैरोबाची वाडी मामाचं गाव. महीनाभर आई आधी मामाला कळवायची. मामा ठरलेल्या दिवशी सकाळी मोटारसायकल घेवुन यायचा. तेव्हा सुद्धा सकाळी आणि संध्याकाळीच बस असायची. पत्र मिळाले नाही किंवा मामा विसरला तर सहा सात तास वाट पहायची. तेव्हा गावात रिक्षा नव्हत्या. एक दोन टांगे होते. असले तर अवाच्या सवा पैसे मागायचे. आई कधी वाट पहायची कधी टांगा करायची. बहुधा जवळ किती पैसे आहेत यावर ते ठरायचे. आई सांगायची लहानपणी तिला पायी यावे लागायचे. पावसाळ्यात फार त्रास व्हायचा. मातीचा रस्ता. चिखल तुडवत जायचे. तेव्हा कळत नसायचे. आज जाणवत आहे किती वेगळे आणि खडतर आयुष्य असेल.

मुख्य रस्त्यावरुन वाडीच्या रस्त्यावर आलो. आजुबाजुला हिरवीगार शेती पसरली होती. पावसाळा चालु असल्याने पायी चालायला काही वाटत नव्ह्ते. रस्त्यावर मधे मधे पाण्याचे थारोळे होते. कधी काळी डांबरी करण केलेला रस्ता मात्र त्याचे अवशेष आता भग्न पुराणवास्तुप्रमाणे आ करुन आभाळाकडे डोळे लावुन पडले होते. मधुनच वर आलेला दगड पायाने लाथाडत मी चालत होतो. कधी मान खाली घालुन कधी इकडे तिकडे पहात रमत गमत चुकुन कुणी मोटार सायकलवाला आला तर जावु त्याच्या मागे बसुन असा विचार करत होतो. एखाद दुसरा समोरुन येत होता. मी पुढे चाललो होतो.

आजुबाजुला पाहीले. दहा वर्षांत काही फारसा बदल झाला नव्हता. दोन चार नवी घरे दिसत होती. काही दिसेनाशी झाली होती. दोन चार नव्याने रंगवली होती. दोनचार रंगाची वाट पहात होती. बघता बघता तास दीड तास कसा गेला कळालं नाही. एक दोन ठिकाणी थांबुन अखेर वाडीला येउन पोहोचलो. मामाच्या घरी गेल्यावर बहुधा भुत पाहिल्याप्रमाणेच त्यांना वाटलं असावं. कित्येक वर्षांपासुन ये ये म्हणत असतांना गेलो नाही आणि अचानक असा समोर आल्यावर ते तरी काय बोलणार. पण त्यांच्या डोळ्यातुन बहुधा बरं वाटलं असावं असंच वाटत होतं. माणुस कितीही निगरगट्ट असला तरी रक्ताची नाती तुटता तुटत नाहीत हेच खरं. जेवण करुन लवंडलो. चालुन चालुन थकलो होतो. पटकन झोप लागली.

क्रमशः

शप्पथ आईच्या गावाची आठवण

1

शप्पथ आईच्या गावाची आठवण झाली. पुढे रे काय?

+१ मला पण गावाची, आजोळची आठवण

2

+१
मला पण गावाची, आजोळची आठवण आली.
पुढे लिहा लवकर.


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

आईच गाव अस्तच छानःड

3

तुझ्या आईच्या गावी हे अस आहे का रे मेव्या? thinking

आहे. पुढे?

4

आहे. पुढे?

कुठे आहे हो तुम्च्या आईचा

5

कुठे आहे हो तुम्च्या आईचा गाव?

तुम्हाला कशाला हो

6

तुम्हाला कशाला हो चांभारचवकश्या?

सहज..चांभार्चवकष्या का

7

सहज..चांभार्चवकष्या का कर्तात? तेच कारण Big smile

मला काय माहिती सहजराव

8

मला काय माहिती सहजराव चांभारचवकश्या का करतात ते?

सहजकाका, सरासर बदनामी!

डोळे नीट चेकुन घे हो

9

डोळे नीट चेकुन घे हो मेव्या.......सहज म्हंजे असच , नन्तर पॉज आहे आणि त्यानन्तर तुझ्यासाठी प्रश्न आहे....आता दे उत्तर त्या प्रश्नाचे

अवांतर पुरे. खरडवहीचा वापर

10

अवांतर पुरे. खरडवहीचा वापर करावा.

आज मला नानाने लिहिलेले

11

आज मला नानाने लिहिलेले काहितरी आवडलेय Big smile .

णाणाच्या लिखानाचे आज सार्तक

12

णाणाच्या लिखानाचे आज सार्तक जाले.........!!!


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

+१

13

असेच म्हणतो.

सुरेख

14

सुरेख कथा रे अवलिया!!

मस्तं रे गावच्या रस्त्याची

15

मस्तं रे गावच्या रस्त्याची आठवण मस्तंच. अजून आमच्या गावी जायचं तर नक्की आणि आपल्या सोयीनुसार जायचा मार्ग म्हणजे गोवा महामार्गावरील तरळ्यात्(खरे नाव तळेरे)उतरून. तिथून विजयदुर्गकडे जाणारी गाडी पकडायची. पाट गावात उतरायचं आणि ५ किमीची घाटी उतरून जायचं. हास्य मस्तं. तळेरे ते विजयदुर्ग मार्गावरील एस्टीची वारंवारीता चांगली असल्याने कुठल्याही आडवेळेला गेलात तरी एसटी पकडायची पाटगावात उतरून चालत जायचं. हास्य


-पुण्याचे पेशवे

आयला ५ किमी घाटी पायी

16

आयला ५ किमी घाटी पायी उतरायची? लै भारी रे पुप्या.. गावाचं नाव रे काय?

बाकी ते तरळा-तळेरे चा झोल आजवर समजला नाय आपल्याला..

मिमंवर अन्यत्र शोधाशोध केलीस

17

मिमंवर अन्यत्र शोधाशोध केलीस तर माझ्या गावाचं नाव सहज कळेल. :)साल्यानो अभ्यास करा अभ्यास.


-पुण्याचे पेशवे

तांबडी माती. ठाऊक आहे. पण

18

तांबडी माती. ठाऊक आहे. पण शोधत कोण बसेल म्हणून तुला विचारलं. फुकट स्वतःच्या लिखाणाची जाहिरात करण्याची स्टाईल आवडली!

प्रभोकृपा.

19

प्रभोकृपा. हास्य


-पुण्याचे पेशवे

आता विषय निघालाच आहे तर

20

आता विषय निघालाच आहे तर सांगतोच..

"डिस्क्लेमरः कथेतील नावे आणि गावे काल्पनिक आहेत."

हे आपणच लिहिलं आहेत कथेच्या शेवटी! हास्य

हा हा हा. असे लिहायची पद्धत

21

हा हा हा. असे लिहायची पद्धत आहे जालावर. पण एका लेखात फोटूसकट माहीती आहे. सच्ची सच्ची नावानी.


-पुण्याचे पेशवे

मस्त रे नान्या... उगाच वेळ

22

मस्त रे नान्या...
उगाच वेळ लावू नको क्रमशः ला..

असेच म्हणते...

23

वेळ लावू नको.
लिही, चांगली झालीये कथा!
हास्य

यु द्या लौकर!

24

यु द्या लौकर!

खरोखर सुंदर लेखन नाना !

25

खरोखर सुंदर लेखन नाना !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."