भारतीय तत्वज्ञान - भाग १२
मागील भागात आपण रामानुजमताचा आढावा घेतला. या भागात वल्लभमत म्हणजेच शुद्धाद्वैत किंवा पुष्टीमार्गाचा विचार करु,
वल्लभमतानुसार विश्व जीव आणि जड अशा दोन विभागात आहे. जीव आणि जड यांचा संयोग हाच सृष्टीचे प्रमुख कारण असुन वस्तुमात्र काही काल दिसुन नाहीशे होते. मात्र ते संपुर्ण नष्ट होत नाही तर त्याचे रुपांतर होते. संपुर्ण विश्वातील वस्तु कधीही नाहीशा होत नाही त्याएकमेकांत बदलतात. सृष्टीचा मायेशी काहीही संबंध नसुन ही केवळ ईश्वराची लीला आहे. ईश्वर शुद्ध असल्याने त्यात मायेसारखा अशुद्धपणा असणार नाही असे वल्लभमत मानते. त्यांच्या नुसार जे काही दिसते तसेच अदृश्य आहे ते सर्व शुद्ध ईश्वराचा आविष्कार आहे. जीव हा ईश्वराचा अंश असुन भक्तीद्वारा समर्पण केल्याने मुक्ती मिळते असे वल्लभमत मानते.
वल्लभमतानुसार संन्यासमार्गाला फारसे महत्व नसुन उपासनेला अतिशय महत्व दिलेले आहे. जीव जरी ईश्वराचा अंश असला तरी हे साधर्म्य अग्नीतुन उडणा-या ठिणग्यांप्रमाणे आहे असे सांगुन ठिणगी म्हणजे अग्नी नव्हे परंतु योग्य स्थान मिळताच ती ठिणगी अग्नीत परिवर्तित होते. अशा प्रकारे जीवाने भगवत्भक्तीच्या सहाय्याने आपला उद्धार करुन घ्यावा आणि ईश्वर स्वरुपाशी लीन वा एकरुप व्हावे असे वल्लभमत सांगते. परमेश्वराचा अशा प्रकारचा अनुग्रह प्राप्त करुन घेणे हे पोषण पुष्टी करणे अशा अर्थाने असल्याने याला पुष्टीमार्ग असे संबोधतात. विष्णू भक्ती हे या मताचे प्रमुख वैशिष्ट आहे.
अशा प्रकारे या भागात वल्लभमत पाहिले. पुढील भागात भास्करमत.

.jpg)
सुरेख
सुरेख रे अवलिया!!
हजर.. असंच येउ दे रे बाबा
हजर..
असंच येउ दे रे बाबा लवकर लवकर.. सलगता येते वाचताना त्यामुळं..
सुरेख रे अवयलिया. शांकरमत पटत
सुरेख रे अवयलिया. शांकरमत पटत असले तरी व्यवहारात वल्लभमताचा पुरस्कार करावासा वाटतो.
-पुण्याचे पेशवे