विकांताची खादाडी : वाटाण्याच्या अक्षता..आपल हे..वाटाण्याची चटणी !!

0
0

टीप : भरुन ठेवा..सॉरी सॉरी...ज्यांना वाटाणे आवडतात पण मटर-पणीर किंवा आलु-मटर खाताना चपातीतुन सटकतात अशी तक्रार असणार्‍या सर्व वाटाणे लव्हर्सना आमच्यातर्फे दिस पाकृभेट !!

साहित्य :

अर्थातच वाटाणे,लसुण
मोहरी,
मिरच्या,
कांदे,
टमाटे,
तेल,
तवा,
कढई, पळी ई.ई.

कृती :

सर्वात पहिले वाटाणे तेलकट तव्यावर भाजुन घ्या.जास्त भाजायचे नाही.
त्यानंतर मिरची+मोहरी+लसुण ह्यांना एकत्र कुटा, आमच्या कडे मिक्सर नाही वगैरै बहाणे चालणार नाहीत, सरळ ग्लास घ्यायचा आणी लाटण्याने कुटायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे दुसर्‍या ग्लास मध्ये वाटाणे कुटुन घ्या.(आमच्या त्या ग्लासची काळजी करू नये,त्यासाठी आमच्या कडे पेश्शल ग्लास आहे)असो.वाटाण्याचा अगदीच भुगा करायचा नाही.

step1

step2

टमाट्याचा खिमा करा,कांदे बारिक चिरुन घ्या.

step 3

आता मुख्य कृती कडे राईट टर्न घेऊयात,
कांदे लाल होईपर्यंत तळुन घ्या, अरे हो, नेहमीच्या जज्जमेंटपेक्षा तेल जरासे जास्त घ्या,मग टमाटे टाका नंतर मोहरी+लसुण्+मिरच्यांचा जो कुट आहे तो टाका. चांगले हलवुन मिश्रण एकजिनसी होऊ द्यात.

step 4

सरतेशेवटी वाटलेले वाटाणे, 'एक्जिन्सी' होईपर्यंत हलवुन घ्या.

step 5

गरमा-गरम वाटाण्याची चटणी तयार !! (वाढताना वरतुन कोंथबिंर किंवा बीटाचे काप टाका मस्त चव येते आणी छानही दिसते,नेमक फोटु काढताना आमच्याकडे ह्यापैंकी काही नव्हत.)

step6

{लई भारी...तोंडाला पाणी सुटलं}

1

लई भारी...तोंडाला पाणी सुटलं बे.

अवांतर: कांदा छान कापलाय!

{छान}

2

छान दिसतेय फोटोततरी.
करायला हवी अर्थात वेळ मिळाल्यावर.
हास्य

{मस्त कलरफुल चटणी दिसतेय.}

3

मस्त कलरफुल चटणी दिसतेय.

{हेच}

4

हेच म्हन्ते.

{अत्यंत टुकार पाककृती. पण}

5

अत्यंत टुकार पाककृती. पण हल्ली सुहाशाच्या पाकृंना वा चान चान म्हणायची पद्धत असल्याने आणि सुहास हा आयटी हसबंड असून स्वैपाकही चान करत असल्याने त्याला चान चान म्हणत आहे.
या पाकृची चव कळल्याशिवाय आम्ही त्याला चान म्हणणार नाही हे सुहास यांनी लक्षात ठेवावे.


-पुण्याचे पेशवे

{अय्या !! ईतके चान चान}

6

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

अय्या !! ईतके चान चान प्रतिसाद कसे हो सुचतात तुम्हाला ?

{मस्त..}

7

कोथिंबिर,बीटाचे काप इ. गोष्टींची सजावट नसतानाही टेम्प्टिंग दिसते आहे,मस्तच..
स्वाती

{बकवास !! (का ते माहित असावे}

8

बकवास !!

(का ते माहित असावे )

{बकवास}

9

माननिय अवलियाशास्त्री,
काय बकवास? आपला प्रतिसाद की सुहासरावांनी बनवलेली रेसिपी?

{मस्तच पहिल्यांदाच बघती आहे}

10

मस्तच
पहिल्यांदाच बघती आहे मटाराची चटणी
वेग्ळाच प्रकार , नक्की करुन पहाणार Big smile

{मस्त रे}

11

मस्त रे

{मस्त रंगीबेरंगी दिसतेय, करून}

12

मस्त रंगीबेरंगी दिसतेय, करून पहायलाच हवी.

वाटाणे म्हणजे वाटाणे (ड्राय) की मटार ?


पुष्करिणी

{मस्त रे सुहाश्या.. जबरा}

13

मस्त रे सुहाश्या.. जबरा !

तुझ्याकडे राहण्यासाठी यावे लागेल बॉ काही दिवस wink


Hope is a good thing...