खंडग्रास चंद्रग्रहण

0
0

आज पौर्णिमा आहे आणि आज खंडग्रास चंद्रग्रहणही दिसणार आहे. चंद्रग्रहण बघण्यासाठी काही स्पेशल तयारी करावी लागत नाही. तेव्हा रात्री जागून "थर्टी फर्स्ट" साजरा करणारेही (ढग नसल्यास) भारतातून चंद्रगहण पाहू शकतात. चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या तुलनेत, काही खास दिसतं असं नाही, पण तरीही लालसर चंद्र बघायला मलातरी आवडतं. ग्रहणाच्या वेळा:
छायाकल्प ग्रहण सुरू होण्याची वेळः २२:४६ (३१ डिसें)
दाट छायेत चंद्र जाण्याची वेळ: ०:२२ (१ जाने)
जास्तीत जास्त ग्रहण (८%) दिसण्याची वेळः ००:५४ (१ जाने)
खंडग्रास ग्रहण सुटण्याची वेळ: ०१:२५ (१ जाने)
छायाकल्प ग्रहण सुटण्याची वेळः ०३:०१ (१ जाने)

कठीण शब्दांचे अर्थः
१. छायाकल्प ग्रहण - penumbral eclipse
२. खंडग्रास ग्रहण - partial eclipse in umbral shadow

या सर्व वेळा मुंबईसाठी आहेत. इतर भागांसाठी या वेळांत काही मिनीटांचा फरक पडेल.

बर्‍याचदा चंद्र आणि सूर्यग्रहणे लागोपाठ येतात. येत्या १५ जानेवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातूनही दिसणार आहे. सध्या जिवंत असणार्‍या लोकांपैकी अनेकांच्या आयुष्यात आलेलं आणि भारतातून दिसणारं पहिलंच कंकणाकृती ग्रहण दक्षिण भारतातून दिसेल. त्याचा नकाशा:
http://xjubier.free.fr/en/site_pages/solar_eclipses/ASE_2010_GoogleMapFu...

{अरे वाह}

1

अरे वाह !

छान माहीती.


Hope is a good thing...

{अदितीजी}

2

अदितीजी आपण छान माहीती पुरवली आहेच.
असो छायाकल्प ग्रहण - penumbral eclipse
खंडग्रास ग्रहण - partial eclipse in umbral shadow
ह्या वैज्ञानिक संज्ञा आम्हाला समजावुन सांगितल्या तर खुप उपकार होतील.


-निखिल

{उत्तम}

3

उत्तम माहिती.

{माहीतीबद्}

4

माहीतीबद्दल धन्यु..

{वा}

5

वा वा...

>>जास्तीत जास्त ग्रहण (८%) दिसण्याची वेळः ००:५४ (१ जाने)
म्हणजे आम्ही हे पाहु शकतो तर हास्य ग्रहण एकदम टैमात लागल्यालं है हास्य

अदिती, खुप खुप धन्यवाद.
असेच खगोलशास्त्रासंबंधीच्या माहितीचे स्त्रोत तुझ्याकडुन नेहमी येवोत अशी इच्छा.

आता येत्या कंकणाकृती सुर्यग्रहणाबद्दलही लिही बरं का.

{पाहून आले}

6

पाहून आले की डैरेक्ट फोटोच टाकेन, कसें?

{चोक्कस!! सो}

7

चोक्कस!!

सोबत माहिती+वर्णन असेल तर आम्हा वेड्याबागड्यांना जास्त उमजेल्/आनंद घेता येइल असे वाटते.

{+१ सहमत}

8

+१ सहमत


-निखिल

{चंद्रग्रह}

9

चंद्रग्रहणा संबधी एक बातमी वाच्ली तीच ईथे टाकत आहे.
मटा दिवसेंदिवस...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5399012.cms


-निखिल

{बरं मग?}

10

बरं मग?

{धन्यवाद अदिती}

11

पंचांग शोधायचा कंटाळा आला म्हणुन ग्रहणाची माहिती घ्यायला ऑनलाईन आलो तर हा धागा दिसला. छान माहिती दिलीस. अशीच अजुन इतर बाबतीत अ‍ॅस्ट्रॉनॉमीकल/ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सची माहिती दिलीस/ देत राहिलीस तर बरं होईल.
प्रसन्न


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{फोटो}

12

कालच्या ग्रहणाचा एका मित्राने काढलेला फोटो. फोटोची माहिती या लिंकवरच आहे.

http://indussky.com/viewphoto.php?pcid=5&cid=61&pid=37

{फनटाष्टिक}

13

फनटाष्टिक फटू... साईट पण एकदम मस्त.

{+१}

14

सहमत. हास्य


मी टोळ हास्य

{वाह!}

15

अजुन फोटो पहायला मजा आली असती.

धन्यु!

{+१}

16

हेच म्हणतो.

मी टोळ / चेटूक करणे माझा खेळ. Laughing out loud


मी टोळ हास्य

{फोटो}

17

फोटो काढणार्‍यांपर्यंत तुमचा निरोप पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल.

{नीळा चंद्रपण...}

18

माहीतीपूर्ण लेख!

बाकी कालच्या महीन्यात (डिसेंबर मधे) दोन पौर्णिमा आल्याने कालचा चंद्र नीळापण होता ना? thinking


विकास देशपांडे

{येत्या १५}

19

येत्या १५ जानेवारीला ग्रहणाचे फोटो दाखवा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही