भारतीय तत्वज्ञान - भाग ११

0
0

मागील भाग

मागील भागात आपण शांकरमताचा अभ्यास केला. या भागात रामानुजाच्या रामानुजमत किंवा श्रीमताचा विचार करु.

रामानुजमतानुसार सर्वसामान्य लोक कायम संसाराच्या जाळ्यात गुरफटलेले असल्याने सर्व जण विरागी अथवा संन्याशी होणे शक्य नसते. मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली त्याग भावना आणि मनावर संयम सर्वानाच साधणे शक्य नसते. याकरता त्यांचे आचरण नीट रहावे यासाठी त्यांना सोपा मार्गच दाखवणे आवश्यक आहे. रामानुजमतामुळे अवघड असा ज्ञानमार्ग (अद्वैत तत्वज्ञान) भक्तीरसात (भागवत तत्वज्ञान) मिसळुन सर्वांसाठी सुलभ तत्वज्ञान सांगितले गेले.

श्रीमताच्यानुसार विश्व जीव, जगत आणि ईश्वर अशा तीन तत्वांत विभागले गेले आहे. ईश्वरापासुनच जीव आणि जगत निर्माण होते. ब्रह्म हे अद्वैत असले तरी ते केवलाद्वैत नाही. त्यात दोन भेद आहेत जीव आणि जगत. (चैतन्य आणि जड). सर्व जीवांच्या अंतर्यामी ब्रह्म (ईश्वर) असला तरीही तो जीव आणि जड यांच्यापेक्षा वेगळा आहे. जीव, जगत आणि ईश्वर आपापल्या ठिकाणी एकच (अद्वैत)) असुन परस्परांहुन मात्र भिन्न आहेत अशा रीतीने विश्व अद्वैत असले तरी विशिष्ट पद्धतीने अद्वैत आहे म्हणुन या मताला विशिष्टाद्वैत असेही नाव आहे.

रामानुजमतानुसार ईश्वराचे सानिध्य प्राप्त होणे आणि जवळिकता लाभणे हाच मोक्ष होय. त्यासाठी त्या ईश्वराची भक्ती करणे आवश्यक मानले असुन त्याच्या अवतारांची आराधना करावी, पूजा करावी. कारण ईश्वर किंवा विष्णु हाच सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान असुन जगताचा नियंता आहे, ईश्वर किंवा विष्णु आपल्या भक्तास आपल्या स्वरुपात लीन करुन घेतो त्यासाठी त्याला अनन्य भावाने शरण जावे असे श्रीमत प्रतिपादन करते. श्रीमताच्या उपदेशामुळे राम, कृष्णाची उपासना चालु झाली.

अशा प्रकारे आपण थोडक्यात रामानुजमताचा आढावा घेतला. पुढिल भागात वल्लभमत.

हजर..

1

हजर..

हा भाग.

2

हा भाग जरा बर्‍यापैकी समजला.
पुढचा लिही.
हास्य

सुरेख

3

सुरेख रे अवलिया!!