प्रगती आणि विकास
दिवसेंदिवस
भस्म्यासुराप्रमाणे
आयुष्य कुरतडुन जाळणारी
महागाई शेकडा चाळीस ते पन्नास टक्क्यांनी
वाढत असतांना
वाढत आहेत आपोआप
जीडीपीचे आकडे आठ ते दहा टक्के दराने
आणि
वाजत आहेत
कौतुकाच्या टाळ्या
विचारवंतांच्या ट्वेंन्टी ट्वेंटी महफिलीत
प्रगतीपथावर नेणारा द्रष्टा नेता.
खरंय...
आता मुर्दाड जनतेनेच
पुढाकार घेवुन
त्यांच्याकडे पाठ करुन
विनयाने पुढे वाकुन
आपल्या पार्श्वभागावर थापटुन
सांगायला हवं
जहांपन्हा तुस्सी ग्रेट हो.. तोहफा कबुल हो !!!!

.jpg)
छान ...
छान ...खरचं ह्याच्या पार्श्व भागावर हाणायला पाहिजे....
जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...
हम्म
महागाई शेकडा चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढत असतांना
म्हणजे नक्की काय हो? ही टक्केवारी कोणी काढलीये. आम्ही आपले उगाचच वार्षिक महागाईचा निर्देशांक १३-१४ टक्के झाला तेव्हा धसकलो होतो. हा चाळीस-पन्नास पर्यंत गेलाय हे ठावक नवते. असेल, नानाला आतल्या गोटातल्या बातम्या असतात असे ऐकून आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>नानाला आतल्या गोटातल्या
>>नानाला आतल्या गोटातल्या बातम्या असतात असे ऐकून आहे.
अहो आख्खा नानाच आतल्या गोटातला आहे..
अहो डाक्टरसाहेब, 'महागाई
अहो डाक्टरसाहेब, 'महागाई शेकडा ४० ते पन्नास टक्क्यांनी वाढत असताना' असं म्हटलंय नानाने! तुम्ही म्हणताय तोच, वार्षिक महागाईचा निर्देशांक.. तोच तो! पण तुम्ही त्याची किंमत पाहिलीत, किती वाढ झालीहे ते नाही पाहिलंत! जुलै २००९ मध्ये भारतात 'इन्फ्लेशन रेट' होता ९.२९% तर जुलै २०१० मध्ये होता १३.७३% म्हणजे महागाईत जवळपास ४७% वाढ झालेली आहे!
ह्या एवढ्या विचारान्ती नानाने ते वाक्य लिहिलं होतं याची मी ग्यारंटी घेत नाय हा पण
ओ दादा
आमी थोडंसं गणित शिकलोय राव. हे चाळीस-पन्नास टक्के किती काळात असा प्रश्न आहे राव.
पण तुम्ही त्याची किंमत पाहिलीत, किती वाढ झालीहे ते नाही पाहिलंत! जुलै २००९ मध्ये भारतात 'इन्फ्लेशन रेट' होता ९.२९% तर जुलै २०१० मध्ये होता १३.७३% म्हणजे महागाईत जवळपास ४७% वाढ झालेली आहे!
हे लई डेंजर गणित हाय ब्वॉ. महागाई निर्देशांक हा महागाई वाढीचा निर्देशांक असतो. म्हणजे तुम्ही जे लिहिता आहात ते असे लिहायला हवे 'महागाईच्या वाढीच्या वेगामधे ४७ टक्के वाढ झाली आहे' 'महागाईमधे' नव्हे. दोन्हीतला फरक लक्षात येतोय का? म्हणजे सेन्सेक्स दरवर्षी कितीने वाढला याचा डेटा ५%, १०%, २०% असेल दर वर्षीच वाढीचा वेग दुप्पट होतोय याचा अर्थ सेन्सेक्स दुप्पट झाला असा होतो का? मुळात वाढीचा वेग हा Y-on-Y मोजतात तर प्रत्यक्ष वाढ ही तुम्ही ठरवाल त्या काळासाठी मोजता येते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
येस सर! तुमचं म्हणणं अगदी
येस सर! तुमचं म्हणणं अगदी बरोबर! मीही 'इन्फ्लेशन रेट' कुठून कुठे गेला हेच सांगितलं आहे की! पण हे ही मान्य की मी "महागाई वाढीत साधारण ४७% वाढ झाली आहे असं मांडायला हवं होतं."
बाकी तुमच्या गणिती ज्ञानाबद्दल शंकाच नाही आणि म्हणूनच तुमचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटलं ना राव! सुरुवातीला तुम्ही किती काळात असा प्रश्नच कुठे उपस्थित केला होतात? बाकी ते सेन्सेक्सबद्दलचं उदाहरण पटलं पण त्याचा इथे संबंध लावता येत नाहीये असंही वाटतंय. नानाने "महागाई शेकडा चाळिस ते पन्नास टक्क्यांनी" असा उल्लेख केला आहे. यात आलेला 'शेकडा आणि टक्के' हा रिडण्डडन्सी एरर आहे असं वरकरणी वाटेलही पण तो नक्कीच नाही आहे. याचा अर्थ महागाई चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढली = इन्फ्लेशन रेट ४०% झाला असा त्या ओळीचा अर्थ नाहीच आहे. हे आपलं माझं मत! कविनेच प्रकाश टाकलेला उत्तम!
आवो
आमी लिवलं त्येला इनडायरेक्ट मेथड मंत्यात. आपणच चुकीचे विदान करायचे की समोरचा लगीच तुमची चूक सुदारतो नि आपल्याला फुक्टात त्याचा खुलासा भेटतोय (पर नाना लै बेरकी मानूस, आजून गप हाय)
आम्ही मुद्दामच महागाई निर्देशांकाचा उल्लेख केला - जो महागाई मोजण्याचा सरकारी मापक आहे - जो गेल्या काही महिन्यात उच्चांकी १५ टक्क्याला जाउन आला. आता त्यामुळे ४०% हा उल्लेख त्याबद्दल असणे शक्य नाही, मग तो कशाबद्दल आहे याचा खुलासा - मोजमापाचे माप नि काळ दोन्ही- करणे अपेक्षित होते. जो अजूनही केला गेलेला नाही. असो. आमच्यापुरता विषय संपला. नाहीतर आता नाना कवितासुद्धा वाचनमात्र टाकायला सुरवात करेल.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मस्त रे नाना !
मस्त रे नाना !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
विचार करायला लावणारे लिखाण
विचार करायला लावणारे लिखाण आहे. खर्पोखरच वाईट परिस्थितीस्थि, त्यातल्यात्यात सामान्य माणासालसाकोणीच विचारत नाही हेच दु:ख आहे