स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने.....

0
0

अलिकडेच आपला ६३वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. आता स्वातंत्र्यदिनालाच प्रजासत्ताक दिन समजणारे काही तुरळक गावठी आमदार-खासदार सोडले (तेच ते! स्वतःचा पगार ३००% वाढवून घेणारे!!) तर उर्वरीत भारतभर आणि भारताबाहेरही हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो.....

टीव्हीवर इंडियन चॅनलवर स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेली परेड बघत होतो....
हां, पण ही दिल्लीची परेड नाही नाही हां!!! एकतर दिल्लीची परेड १५ ऑगस्ट्ला नसून २६ जानेवारीला असते.....
ही इथल्या न्यू जर्सीमधली परेड....
त्या परेडची सुरस आणि चमत्कारिक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे!!!!

सगळ्यात महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही स्वातंत्र्यदिनाची परेड १५ ऑगस्टला नव्हतीच मुळी!!!!
ह्याला म्हणतात दणका!! आहे की नाही सुरस आणि चमत्कारिक कथा!!!!

अमेरिकेत सगळे व्यवहार वीकेंडला धरून चालत असल्याने आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाची इथे पेशल सुट्टी नसल्याने ही परेड १५ ऑगस्ट ज्या सप्ताहात येतो त्याच्या आधल्या वीकांताला होती......

आता यात भारताबद्दल अनादर वगैरे काही नाही. इथे खुद्द अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन जरी विकांताला (शनिवार-रविवार) आला तरी त्याची सुट्टी मग त्यानुसार शुक्रवारी किंवा सोमवारी दिली जाते!!! इथे वीकांत महत्वाचा, स्वातंत्र्यदिन वगैरे सगळं नंतर!!!! अर्थात इथे भरमसाठ सुट्ट्या नसल्याने (वर्षाला १० फक्त!!!) ते सहाजिकही आहे!!!

आणि भारताचा स्वातंत्र्यदिन आधल्या वीकांताला तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन (१४ ऑगस्ट) नंतरच्या वीकांताला साजरा केला जातो! आपल्याकडल्या पाकद्वेष्ट्या जाज्वल्य मंडळीना समाधान लाभावं म्हणून सहज सांगितली ही वस्तुस्थिती!!!!

पण नाही म्हणजे परेड तर झकासच झाली!! जवळजवळ चार साडेचार तास मिरवणूक चालली होती. न्यू जर्सी आणि न्यू यॉर्कमधल्या झाडून सार्‍या सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांनी त्या परेडमध्ये भाग घेतला होता हे त्यांच्या फ्लोटसवरून सिद्ध होत होतं....

अगदी न्यू जर्सी मराठी मंडळाचाही, सगळ्यात कमी सजवलेला का होईना, पण फ्लोट होता!!!! मला मनापासून आनंद झाला!!!

आता "न्यू-जॉयशी" म्हणजे अमेरिकेचं महागुजरात!!! इथे गुजराती नुसते बुजबुजले आहेत!!!
त्यामुळे बहुतेक सगळे फ्लोट गुजराती बिझीनेसचे! आणि मिरवणुकीमध्ये सामील झालेले लोकंही ब्रव्हंशी गुजराती समाजाचे!! त्यामुळे मिरवणुकीत हलकल्लोळ होणे हेही सहाजिकच!!!!

पण या गुज्जु लोकांच्या इव्हेंन्ट मॅनेजमेंट स्किलला मात्र दाद द्यायलाच हवी.....
या वर्षी या परेडची प्रमुख पाहुणी कोण होती माहितीये का?
चक्क मल्लिका शेरावत!!!!!
आता काय बिशाद आहे की अनिवासी भारतीय मंडळी परेडला गर्दी न करतील!!!!

नाही म्हणजे ती अगदी बॉलीवूड फिल्लममध्ये दिसते तशीच तिथे अर्धवस्त्रांकित आली नव्हती, सगळी व्यवस्थित पंजाबी ड्रेस वगैरे घालून सालंकॄतच होती....
पण तरीही,
"काका, जो!! आ जो मल्लिका शेरावत!!"
"हां डिकरा, एक्दम चोक्कस डिकरी लागे छे! पैसो वसूल!!!!"!"
हा संवाद मी बॅकङ्राऊंडवर की हो ऐकला!!!!!!!!

बाकी परेडमध्ये भाग घेणारे बहुतेक लोकं भारतीय असले तरी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून हातातला तिरंगा फडकावणारे अनेक अमेरिकन्सही पाहिले आणि या देशाच्या उदारमतवादी नागरिकांबद्दल आदर वाटला!!!!
उद्या जर भारतात अशी नेपाळची किंवा बांगला देशाची अशी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिरवणूक निघाली तर आपली प्रतिक्रिया खरंच इतकी मनमोकळी राहील?

असो! तर सगळी परेड अगदी छान पार पडली...

पण मनात आणखी एक विचारभुंगा...
इथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक आदल्या वीकांताला, पाकिस्तानची मिरवणूक नंतरच्या वीकांताला पार पडते, सगळं सगळं ठीक आहे...
पण मग बांगला देशाचा स्वातंत्र्यदिन कधी असेल?
१४ ऑगस्ट्ला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं तो......
की नंतर कधी १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवलं तो?

दोन्हीपैकी काहीही एक उत्तर असलं तरी ते अंमळ अडचणीचंच की!!!!

उद्या जर भारतात अशी नेपाळची

1

उद्या जर भारतात अशी नेपाळची किंवा बांगला देशाची अशी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिरवणूक निघाली तर आपली प्रतिक्रिया खरंच इतकी मनमोकळी राहील?

टाळी एका हाताने वाजत नसते.
पिडा तुमच्या बद्दल (अजुनही) आदर आहेच तो (असाच) राहु द्यावा येवढीच नम्र विनंती (मानलीच पाहिजे असे नाही)
बाकी चालु द्या.

प्रकाटाआ

2

चुकीच्या जागी पडल्यामुळे प्रतिसाद काढला आहे.

व्वा! छानच झालेला दिसतोय

3

व्वा! छानच झालेला दिसतोय कार्यक्रम!

>>"हां डिकरा, एक्दम चोक्कस डिकरी लागे छे! पैसो वसूल!!!!"!
पटेशभाई!

फोटो पण टाकायचे होते! wink

>>उद्या जर भारतात अशी नेपाळची

4

>>उद्या जर भारतात अशी नेपाळची किंवा बांगला देशाची अशी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिरवणूक निघाली तर आपली प्रतिक्रिया खरंच इतकी मनमोकळी राहील?

नाही राहाणार ब्वॉ.. कशाला राहील.. आणि कशाला रहायला पाहिजे.

धन्यवाद!

5

नाही राहाणार ब्वॉ.. कशाला राहील..
प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!
मी जेंव्हा माझ्या मनाला हा प्रश्न विचारला तेंव्हा मला हेच प्रामाणिक उत्तर मिळालं होतं!!!हास्य
आणि म्हणूनच मला त्या लोकांविषयी विशेष आदर वाटला!!!!

खरय तुमचं काका.. पण त्यांनी

6

खरय तुमचं काका.. पण त्यांनी आपल्या रॅलीला आक्षेप न घेण्यामागे भारताचा अनाक्रमणाचा इतीहासही आहेच की...

उद्या इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, इराणच्या रशियाच्या स्वातंत्र्यदिनी अशी मिरवणुक निघाली अमेरिकेत तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल ब्वॉ (वरील उदाहरणात राजकारणाची चर्चा करण्याचा हेतू नसुन दोन देशांमधील ताणलेले संबंधच फक्त लक्षात घेतलेले आहेत.)

रॅलीला आक्षेप न घेण्यामागे

7

रॅलीला आक्षेप न घेण्यामागे भारताचा अनाक्रमणाचा इतीहासही आहेच की...
पण मग पाकिस्तानचीही रॅली निघतेच की!! त्यामुळे अनाक्रमणाच्या इतिहासाचा डायरेक्ट संबंध असेल असं वाटत नाही...
उद्या इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, इराणच्या रशियाच्या स्वातंत्र्यदिनी अशी मिरवणुक निघाली अमेरिकेत तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल ब्वॉ
इंटरेस्टिंग थॉट!!
मला वाटतं की इराणच्या पारंपारिक महत्वाच्या दिवशी काही मिरवणूक निघाली तर तिला पाठिंबाच मिळावा! कारण यांचं शत्रूत्व फक्त सद्ध्याच्या राजवटीविरूद्ध आहे, जनरल इराणी लोकांविरूद्ध नाही....
बाकी इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन आणि रशियाच्या मिरवणुकींबद्दल काय भूमिका आहे ते जाणून घ्यायला आवडेल!!! मी कधी त्यांच्या मिरवणुका पाहिलेल्या नाहीत. कदाचित ते लोकं इतक्या मोठ्या संख्येने (मिर॑वणुका भरवण्याइतक्या) इथे नसतील...
पण ताणलेल्या संबंधांचाच मुद्दा लक्षात घ्यायचा झाला तर इथे चिन्यांच्या मिरवणुका अगदी जबरदस्त जोरदार निघतात!!
मग काय निष्कर्ष काढायचा?
हास्य
(वरील उदाहरणात राजकारणाची चर्चा करण्याचा हेतू नसुन दोन देशांमधील ताणलेले संबंधच फक्त लक्षात घेतलेले आहेत.)
आय अंडरस्टेंन्ड! नो वरीज!!!
हास्य

बाकी मुद्दे पटेश.. पण >>पण मग

8

बाकी मुद्दे पटेश.. पण

>>पण मग पाकिस्तानचीही रॅली निघतेच की!! त्यामुळे अनाक्रमणाच्या इतिहासाचा डायरेक्ट संबंध असेल असं वाटत नाही...

हा नाही पटला कारण, पाकिस्ताननं अमेरिकेवर कुठं केलय आक्रमण.. त्या अर्थानं अनाक्रमण म्हणतोय मी.. (तसंही इतर कुणी आक्रमण क्वचितच करतं म्हणा अमेरिकेवर.. wink )

ह्म्म्म ! छान चर्चा. वाचली

9

ह्म्म्म !

छान चर्चा.

वाचली नव्हती !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उद्या इराक, अफगाणिस्तान,

10

उद्या इराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, इराणच्या रशियाच्या स्वातंत्र्यदिनी अशी मिरवणुक निघाली अमेरिकेत तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल ब्वॉ

हेच विचार मनात घोळत होते. मला वाटते अमेरिकन सरकार (त्यांच्यासाठी)"त्रासदायक" अशा देशांच्या मिरवणुकांना परवानगी देणारच नाही आणि दिली तरी (सर्व पध्दतींनी)प्रचंड विरोध होणार.

पण मग पाकिस्तानचीही रॅली निघतेच की!! त्यामुळे अनाक्रमणाच्या इतिहासाचा डायरेक्ट संबंध असेल असं वाटत नाही...
अमेरिकेला अजुनही पाकिस्तान महत्वाचा ('मित्र')देश वाटतो, अगदी भारतापेक्षाही महत्वाचा.

छान विचार

11

मुक्तक आवडले.

अमेरीकेला इमिग्रंट्स नेशन असे म्हणतात. युरोपातुन अनेक देशाचे, विविध भाषा बोलणारे नागरीक येउन स्थाईक झाले व त्यांच्या परंपरा, सण, उत्सव या माध्यमातुन आपली ओळख टिकवत राहीले. आता परिस्थिती तितकीशी ठावूक नाही पण आधी हे वेगवेगळे समुदाय एकमेकांना घट्ट धरुन होते, त्यांच्या अश्या वस्त्या, वाड्या होत्या.

अमेरीकेने (निदान लिबरल समजल्या जाणार्‍या) नव्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे व वर विविध देशांचे हे स्वातंत्र्यदिन ह्या "उत्साहसोहळ्याचाच" एक भाग आहे असे मला वाटते.

व तिथे हे असे घडू शकते त्याबद्दल मलाही आदर वाटतो.

वा

12

आवडला हो लेख आणि उदारमतवादी अमेरिकन्सपण.दुसर्‍या देशात जावून स्वतःच्या देशाची केलेली थेर मला तरी व्यक्तिशः पटत नाहीत.असो. अमेरिकन लोकांना चाल्तय तर काही प्रॉब्लेम नाही.

आम्हाला तर पाकिस्तानात पूर

13

आम्हाला तर पाकिस्तानात पूर आल्याबद्दल लई आनंद झाला बॉ. साल्यांनो पाप्यांनो आम्हाला छळलंत ना इतके दिवस आता भोगा आपल्या कर्माची फळं.


-पुण्याचे पेशवे

भारतात

14

उत्तर प्रदेश बिहार मध्ये मोठे अपघात होवून माणसे दगावतात तेव्हा आपणास लोकसंख्या कमी झाल्याबद्दल आनंद होतो का?
भारत्प्रेमी प्रिया

नाही. ते भारतीय आहेत ना!

15

नाही. ते भारतीय आहेत ना! हास्य
लोकसंख्या कमी व्हावी पण विश्वाची, भारताची नव्हे. असे सोयिस्कर उदारमतवादाचे तत्व मी स्विकारले आहे.


-पुण्याचे पेशवे

>>उत्तर प्रदेश बिहार मध्ये

16

>>उत्तर प्रदेश बिहार मध्ये मोठे अपघात होवून...
अर्रे! मला तर वाटत होते भारतात 'सर्वत्र' मोठे अपघात होतात. wink

चला आता पाकिस्तानचं लष्कर कुठल्यातरी "विनाशक" नव्हे तर "विधायक" कामात गुंतल्याने थोडी शांतता तरी मिळेल.

भारताची आपतकालीन मदत स्विकारल्याबद्दल पाकिस्तान सरकारचे आभार.

काय गरज होति मदतिची....अरे

17

Crazy काय गरज होति मदतिची....अरे किति मुले जन्माला घालतात ते लोक्स घाबरगुंडी आमदनी अठन्नी न खर्च्या रुपय्या. Big smile अल्लाची देन म्हणे....एकात समाधान माना की Laughing out loud

हाच

18

हाच नियम भारतातल्या त्या धर्माच्या लोकांना लावणार का ग तू चुचु?

प्रिया तु मला काहीही म्हण

19

प्रिया तु मला काहीही म्हण ...पण एवधे होउनही त्यान्चा माज जात नाहिये.
६०% पाक लोकांमधे मी वावरतेय.

भारताने केलेली मदत ही

20

भारताने केलेली मदत ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग होता म्हणुनच तर पाकिस्तान सरकार या मदतीमुळे इतके दिवस बुचकळ्यात पडले होते. अखेर अमेरिकेने ढुसणी दिल्यावर त्यांनी स्विकार केला.

बाकी मुलांच्या बाबत असे बोलु नये, मुले ही देवाघरची फुले असतात. त्यांचे गुच्छ केले तरी त्यांचं मुल्य थोडेच कमी होतं?

सॅन्ड्या...बाजारात जा एक फुल

21

सॅन्ड्या...बाजारात जा एक फुल घे व एक गुच्छ घे....कय स्वस्त पडते ते सान्ग Laughing out loud

गजराच स्वस्त पडतो...

22

गजराच स्वस्त पडतो... Laughing out loud

तुला पाक मधे पाठवायला हवे

23

Sick तुला पाक मधे पाठवायला हवे

मी इतकाही "पाक" नाही पाक

24

मी इतकाही "पाक" नाही पाक मध्ये जायला आणि स्वत:ला ना"पाक" करुन घ्यायला Tired
(पिडांकाका मारतील, पळा आता)

मस्त लिहिले आहे..

25

Big smile मस्त लिहिले आहे..

मुक्तक

26

आवडले. अर्थात सामान्यीकरण करणे कठीण आहे म्हणा (सध्याचा इस्लामिक सेंटरवरून झालेला वाद लक्षात घेता).

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात

27

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवयार्कात जेवायला गेलो असताना पाहिलेली डॉमिनिकन रिपब्लीकची रॅली आठवली.. हास्य

+१

28
उद्या जर भारतात अशी नेपाळची किंवा बांगला देशाची अशी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिरवणूक निघाली तर आपली प्रतिक्रिया खरंच इतकी मनमोकळी राहील?

सहमत.