(ढोकळे गिळू द्या)

0
0

हा कच्चा माल ...

नकोत ओझी पथ्याची, ढोकळे गिळू द्या
कधी तरी खवय्यांनाही ढोकळे गिळू द्या

उगाच सीमा प्रांतांच्या घालता कशाला ?
कशास त्या अमुच्या माथी, ढोकळे गिळू द्या

असोत, जर गोडाचे वावडे ही खरोखर
अम्हास बेसनाचे आणि ढोकळे गिळू द्या

दिसून यावा फोडणीवरिल लोभ जिव्हेचा
असे घटक आणती पाणी, ढोकळे गिळू द्या

असो मुखी यवनी अथवा चायनीज खाद्ये
सोकावले फोडणीसाठी ढोकळे गिळू द्या

हे विडंबन(?) आमचे खास दुश्मन श्री. रा. रा. निखीलजी देशपांडे यांना समर्पित

{निषेध!!!}

1

मराठी संस्थळावर गुजराथी पक्वांनाचा उदो उदो करणार्‍या या धाग्याचा, विडंबनकर्तीचा नि हा धागा समर्पित केलेल्यांचा त्रिवार निषेध!!!!!

{+१}

2

तथाकथित विडंबन वाचून आलेला राग गिळला. तद्दन फालतू.

{ह्म्म्म ! +१}

3

ह्म्म्म !

+१


Hope is a good thing...

{+२}

4

तथाकथित विडंबन वाचून आलेला राग गिळला. तद्दन फालतू.
सहमत.

मी टोळ हास्य


मी टोळ हास्य

{एका (जग!)}

5

एका (जग!) प्रसिद्ध प्रतिक्रियेची आठवण झाली. क्यालिफोर्नियाधीशांच्या कीबोर्डातून ती कालच बाहेर आली होती. असो. चालायचंच!

{आज सकाळी}

6

आज सकाळी सकाळी ढोकला खाल्लास की काय???
असो विडंबन आम्हाल समर्पीत केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
आता विडंबन चांगले झाले असे म्हणावेच लागेल.


-निखिल

{वा}

7

वा वा....
ह्या विडंबनाने आमच्या काही ढोकळदेशीच्या नाजुक आठवणी दाटुन आल्या हास्य
जखमा कश्या सुगंधी.... वगैरे वगैरे....
च्छ्या:...ह्या ढोकळ्याला..हे आपलं..अदितीला एक नको तेव्हा नको त्या कविता करायच्या असतात Sad

{हा हा हा}

8

हा हा हा

{कसबी}

9

कारागिरी!!!

{छानच आहेत}

10

छानच आहेत ढोकळे



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{जियो}

11

खमण ढोकळा मस्तच, पण पाकृ व फोटो पाहीजे होता.