रस्ता

0
0

अचानक
गर्दी दिसली
म्हणुन पूढे गेलो
तर दिसले रस्त्यावर
गाडीच्या चाकाखाली चिरडुन
ठार झालेल्या
कुत्र्याचे प्रेत.

चुकचुकत
गर्दी विरळ होत गेली
रस्त्यावर गाड्या
परत धावु लागल्या
बघता बघता
रस्ता आणि प्रेत
एकजीव होउन गेला.

किती तरी वेळ
असाच तंद्रित
विचार करता करता
भान विसरुन रस्त्याच्या मधे गेलो
आणि
मागुन आलेल्या
ट्रकने उडवले
तेव्हा पुन्हा
गर्दी जमु लागली
तशीच जशी
आधी जमली होती.

गेला मेला असे आवाज
ऐकु यायला लागले
शांतपणे लांबुनच
पहात होतो
किती वेळ लागतो
रस्त्याशी एकजीव व्हायला.

कुठे गेली कविता? दिसत नाही

1

कुठे गेली कविता? दिसत नाही ......


आपला स्नेहांकित...
-अशोक

कुठे गेली कविता? दिसत नाही

2

कुठे गेली कविता? दिसत नाही ......


आपला स्नेहांकित...
-अशोक

कविता उत्तम आहे.. 'जन पळभर

3

कविता उत्तम आहे..

'जन पळभर म्हणातील हाय हाय' ची आठवण झाली

मस्त

4

मस्त.

माझा रिप्लाय कुठेय

5

Angry माझा रिप्लाय कुठेय

नानबा तुला आवडली आणि

6

नानबा तुलना आवडली आणि पटली.

जगाचा आपल्याकडे बघण्याचा दॄष्टीकोन दाखवायचा प्रयत्न भावला हास्य कटू पण सत्य.

सुंदर आहे कविता. सत्य

7

सुंदर आहे कविता.
सत्य स्पष्टपणे मांडण्याची हातोटी आहे तुमची

बघा

8

कसला हा सोस? कुठली ही हौस?

धन्यवाद! कविता

9

धन्यवाद! कविता प्रसिध्दल्याबद्दल.

अफलातुन!

अर्र्तेज्यायला ! हा नाना

10

अर्र्तेज्यायला ! हा नाना प्रकाशक आहे होय ? मग ह्या कवितेचा लेखक कोण आहे ?

छान लिहीले आहे!

11

छान लिहीले आहे!

नाना

12

तुम्ही पूर्वग्रहरहित विचार कराल अशा अपेक्षेने लिहितोय. तुमचे लिखाण सुरवातीला विदारक वगैरे वाटत होते, पण आता चक्क निराशावादी वाटू लागले आहे. ज्याचा त्याचा प्रश्न हे खरे, पण निदान एका सभासदाला हे असे वाटते हे नोंदवावेसे वाटले इतकंच. विदारकता हे वास्तव समोर येण्याची गरज आहेच पण वारंवार विदारकताच समोर येऊ लागली तर माणसे मुर्दाड होण्याची शक्यताच अधिक असते. मग त्याला 'मुंबईचे स्पिरीट' वगैरे नावे देतात मीडीयावाले. खरेतर ती हतबलता असते नि मुर्दाडपणाही.

हे खरे की अनेकदा निराशा/हतबलता येते, पण सतत रडगाणी गाण्याने प्रश्न सुटत नाहीत, फारतर समदु:खी एकत्र येऊन सामूहिक रडण्याचा कार्यक्रम करू शकतात नि रडण्याला तात्त्विक अधिष्ठान देऊ शकतात, त्याने परिस्थिती बदलत नाही, बदलायची असेल तर आपापल्या बुद्धीच्या मर्यादेत का होईना काही उपाय शोधावे लागतात, सांगावे लागतात ते अंमलात आणायचे यथाशक्ती प्रयत्न करावे लागतात. अपयश आलेच तर चुका शोधून पुढील प्रयत्न करताना उपयुक्त ठरेल असे ज्ञान/माहिती त्यातून मिळवून पुढे जायचे असते. आकाशातला बापही रडणार्‍यांच्या पाठीशी राहतो की झगडणार्‍यांच्या याचे उत्तर प्रत्येकाने आपापले शोधावे.

नानासारख्या माणसाने आपली बुद्धी अशा लिखाणात खर्चावी याची खंत वाटली म्हणून हा प्रतिसादप्रपंच. क. लो. अ.

बास आता.. तुम्ही परत संपादित

13

बास आता.. तुम्ही परत संपादित करण्याआधी कुलुपच ठोकतो..

आरं बाबा

14

मुद्दा नेमका करायला जरा थोडे इकडे तिकडे करावे लागते. जरी पीडीपी(रेठरे बु.) अद्यक्ष असलो म्हणून सगळ्या धाग्यांचे काश्मीर करत नाही. एखादे वाक्य काश्मीरला नेईल असे वाटले तर वगळावे लागते. जरा वैतागाने घाईत प्रतिसाद दिला म्हणून नी एकदा लाईन ब्रेक साठी एंटर मारल्यावर चुकून आधीच प्रकाशित झाला म्हणून पुन्हा संपादन करावे लागले. असो. कुलूप ठोकल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅ हॅ हॅ.

हॅ हॅ हॅ.. नान्याला बहुतेक

15

हॅ हॅ हॅ..

नान्याला बहुतेक आधिच कळलय काय म्हणायचंय तुम्हाला ते.. तेवढा नक्की विश्वास आहे आपला सगळ्यांचा नानावर.. बाकी तुमचा वैताग अगदी रास्त आहे..
कदाचित म्हणुनच ती कविता आधी त्यानं अप्रकाशित केली होती.. आम्ही काही लोकांनी आग्रह केला म्हणुन परत टाकली त्यानं..

तुमचं निरिक्षण पण बरोबर जुळतंय म्हणायचं.. ह्या आठवड्यात नाना जरा नन्नाच झालाय..
असो, बाकि नाना आहे म्हणुन तळमळ, हे पण बरोबर आहे म्हणा..