दहा वर्ष
दार उघडून शरयू आत शिरली. आज तिलाच दार बंद करायचं होतं. समोरच्या घरातल्या काकूंची चाहूल लागली तसे तिने डोळे कोरडे केले, पण घाईघाईत दार लावून घेतलं. आत्तातरी कोणाशीही बोलावं असं तिला वाटत नव्हतं. पहिल्यांदा ती जेव्हा एकटीच घरी आली होती ...
आज पहिल्यांदाच ती या घरात एकटी शिरत होती. लग्नाआधी किती दिवस, आठवडे, महिने ती घरी एकटी रहायची पण कधीच त्याचं काही वाटलं नव्हतं. पण लग्नानंतर या घरात आली आणि निस्सीमशिवाय घरात कधी शिरली असं झालंच नाही. लिफ्टमधे असतानाच किल्ल्या काढून ठेवायची तिची सवय, त्यामुळे दार तिने उघडायचं आणि त्याने मागून आत शिरून दार लावायचं. तिने एक क्षण थांबून विचार केला, तिला आठवलंच नाही तिने कधी आतून दार लावून घेतलं नव्हतंच.
संध्याकाळी साडेचारला ऑफिसच्या मित्र-मैत्रीणींबरोबर ती चहा प्यायला जायची, तेव्हाच निस्सीमचा फोन आला. "शरू, मिलींदचा शेवटचा आठवडा आहे इथला. आज संध्याकाळी सगळे मित्र/कलीग्ज बाहेर जाणार आहेत जेवायला..." पुढचं काहीही न ऐकता ती म्हणाली, "मग तू पण जा. आणि एक काम कर, ऑफिसच्या शेजारी केकचं दुकान आहे, तिथून त्याच्यासाठी काहीतरी घेऊन या. नाहीतर तुम्ही पोरं असं काही करणार नाही." "तुला कसं कळतं गं मला काय म्हणायचं आहे ते?" "..... कळतं. माझ्या जेवणाची काळजी नको करूस."
घरी एकटीच स्कूटरवरून जाताना तिला काहीतरी विचित्रच वाटलं. दार स्वतःच बंद केलं तेव्हा डोळ्यांत पाणी आलं होतंच, पण ती स्वतःच हसली. "दोन-चार तासातच येईल तो परत! एवढं काय त्याचं?" आणि तसंच झालं, तिचं जेवण होतंय ना होतंय तोच फोन वाजला. "आत्ताच मिलिंदनी मला गेटपर्यंत सोडलं, आता दोन मिनीटात पोहोचतोच आहे मी घरात!" निस्सीमला बेल वाजवायची गरज पडलीच नाही. "मिलींद म्हणत होता, "आत्ताच तर तुमचं लग्नं होतंय, वर्ष पूर्ण होऊ देत मग काय ती तुझ्या फोनची वाट पहात बसणार नाही.", निस्सीम न विचारताच सांगत होता. ""आमचं लग्नं होऊन दीड वर्ष उलटून गेलंय .... " मग काही बोलला नाही तो." दोघंही हसले आणि शरयूने त्याला संध्याकाळी डोळ्यात पाणी येण्याबद्दल सांगितलं. निस्सीम तिच्याकडे पाहून फक्त हसला आणि तिला जवळ घेतलं.
शरयू पुन्हा वर्तमानात आली, पुन्हा डोळ्यांचा कडा ओल्या झाल्या. आत्ताच ती विमानतळावरून परत येत होती. आता पंधरा दिवस एकटीनेच रहायचं ... आणि तिला अचानक काही आठवलं. आई गेली तेव्हा ती स्वतःशीच विचार करत होती, "मलाच का हे सगळं सहन करावं लागतं?" रात्री सामसूम झाल्यावर हा विचार करताना ती कित्येकदा ओल्या उशीवरच झोपली होती. आता मात्र तिला आईबद्दल खूप वाईट वाटलं "... ती तर दहा वर्ष राहिली, फक्त माझ्यासाठी .... "
.jpg)
{अदितिबै}
अदितिबै खुप दिवसांनी तुम्ही गद्य काही तरी लिहिलय असे वाटते.
निस्सिम नवर्यावर असीम प्रेम करणार्या शरयुची कथा.
१५ दिवस नवर्यापासुन दुर राहाण्याची व्यथा फार छान मांडली आहे.
"... ती तर दहा वर्ष राहिली, फक्त माझ्यासाठी .... "
हे वाक्य खुप काही सांगुन गेले.
-निखिल
{मला पण}
{मस्त लेख}
मस्त लेख
{क्या बात}
क्या बात है अदिती बर्याच काळानंतर तुझा गद्य वाचनात आला..
छान लिहिलयस.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{क्या बात}
क्या बात है... सुरेख.
आवडली.
Hope is a good thing...
{सुरेख काय????}
कथा कळाली का की नुसतं म्हणायचं म्हणून सुरेख????
{कळाली व}
कळाली व भावार्थ पण समजला
Hope is a good thing...
{छान लेखन.}
छान लेखन.
{छान ..}
छान ..
{ओह्ह}
दुसऱ्यांदा वाचावी लागली. तेव्हा समजली...!
प्रतिक्रिया: कस आहे! याच धाटणीचे बरेच लिहू शकतेस हे दिसते!
{एय्य?}
३.१४ वेळा वाचल्यानंतरही काही कळ्ळं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते!
{ह्या...}
"दम आहे. असं आणखी लिहू शकतीस."
स्वगत: उगाच तशीच ती विडंबनं करत बसण्यात फारसं काही नाही.{ही ही ही ...}
ही ही ही ... म्हणजे आता विडंबनं पाडणं थांबवून अशा स्टाईलचं (याला जे काही म्हणतात) ते पाडायचं का?
(ही&ही) अदिती
{सारखं}
सारखं सारखं नको..
नायतर तुला आम्ही योगिनी जोगळेकरांची परंपरा पुढे चालवणारी तरल कविमनाची लेखिका असा मी-गौरव पुरस्कार जाहीर करु.
{गुड}
गुड हेवन्स.....
अदिती???? हे तु लिहिलंयस???
शप्पथ, विश्वास नाही बसत. तू आणि ह्या/अशा विषयांवर???
च्यायला, इतकं चांगलं लिहिता येतं तर मग लिहित का नाहीस गं?
{मस्ती}
Hope is a good thing...
{+ १}
धम्याशी सहमत. मस्त लिहिल आहेस. खर सांगायचं तर हे मला उतार्यांपेक्षा आवडल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{वल्लाह!!!}
वल्लाह!!!
{+१}
सुभानल्लाह!
'लेकीच्या माहेरासाठी गं माय सासरी नांदते' ची आठवण करून देणारे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{+२}
सहमत.
मी टोळ
{ह्म्म}
चला गुंतवुन घ्या लवकर "आईने" घेतले होते तसे.....
{+१}
सहमत !!!
{+२}
सहमत.
मी टोळ / चेटूक करणे माझा खेळ.
मी टोळ
{वेगळे लिखाण }
वेगळे लिखाण उत्तमाय
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{अपुर्ण वाटली}
कथेचा फ्लो सुंदर आहे पण अपुर्ण वाटली. हे माझ मत.
पुढील लेखनास शुभेच्छा.
{सुरुवात छान आहे, पण रंगत जाता}
सुरुवात छान आहे, पण रंगत जाता जाता मध्येच तुटल्या सारखी वाटली.
हर्षद.
हि तर सुरुवात आहे - http://harshad-gaaanikha.blogspot.com/
{आपण असं काही लिखाण सरावानं नक्कीच लिहु शकतात. बाकी छान आहे. शुभे}
दोन वेळा वाचावी लागल्यानंतर ती छान आहे असे सांगावेसे वाटते. पण आपण असं काही लिखाण सरावानं नक्कीच लिहु शकतात. बाकी छान आहे. शुभेछा
{अरे वा!}
अदिती, मस्त लिहितेस ग!
*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल
{मस्त.}
आवडले.
--मनोबा