हा कुठला बरे आजार/विकार?

0
0

हा कुठला बरे आजार/विकार?

वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा,कादंबरी,कविता,गज़ल,लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
पण....
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.

कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचांराशी, भुमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार,भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फ़ेकून देतो.

तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता आवडते कारण त्यात जे श्रावण महिण्याचे वर्णन आले ना, ती केवळ कवीकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सूरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे" हे दृष्य केवळ त्याच महिण्यात पहायला मिळते. इतर महिण्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार.
अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो, तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.

पण ना.धो.महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्‍तुंग लोकप्रियता लाभलेली पण ग्यानबाला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. समजा नभाने आराधना स्विकारली आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे,सुर्य आणि चंद्र जरी लागलेत तरी कोणतेही सरकार चांदणे,सुर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टीकोनातून बघणार आणि या सुर्य,चंद्र तार्‍यांना "भजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपुर व्यवस्था करणार.
कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानीत किंमतीत सुर्य,चंद्र तारे उपल्ब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, नालीच्या काठावर, कचरापेटीत सुर्य,चंद्र,तार्‍यांचे ढिगारे साचलेले दिसतील.
पण......
ज्या शेतकर्‍यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर.... त्याची दरिद्री आहे तशीच राहणार. त्या ऐवजी कविने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससुर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नाही का? कवी बिगर शेतकरी असता तर ग्यानबाची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तुरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभिर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हाताने फ़ेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखिल भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
पण ग्यानबाला भुरळ पडेल तर तो ग्यानबा कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्‍याचे घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्‍यांच्या वेदना विकून मोठ्ठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण.... शेतकर्‍याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफ़ार थांबावे आणि त्याला (कविला देखिल) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे व्हावे यासाठी पुढे मग काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थीती उदभवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्‍यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दुर भिरकावून देतो.
"बारोमास"कार सदानंद देशमुख असो की आणखी कोणी. त्याचं सदैव एकच तुणतुणं.
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
कुठला आजार/विकार म्हणावे याला?
.
गंगाधर मुटे

हं

1

मुटे भौ आजार गंभीर आहे, मी शेतकरी नाही अन कवी तर अजिबातच नाही. तेव्हा आता काय बोलावे यावर? बाकी "तो" काडीकचरा डोक्यात कोंबण्याचा आजार मलाही आहे.उपाय सापडला तर सांगा.

>>कधी कधी तो पुस्तक घेतो,

2

>>कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये.

नेहेमीप्रमाणेच नि:शब्द..

आमचे परममित्र रमताराम व नुसतेच मित्र सातारकर (त्यांच्याशी काही दिवसांपुर्वी झालेल्या ह्याच अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या संदर्भामुळे) यांना या लेखावर प्रतिक्रिया देण्याची जाहीर विनंती करत आहोत.

हम्म

3

मला वाटते या संवेदनशील विषयाबाबत बोलावे इतके हे व्यासपीठ परिपक्व आहे असे मला वाटत नाही. वडाची साल पिंपळाला लावणार्‍या अपरिपक्व प्रतिक्रियांमुळे धागा काश्मीरला नेण्याऐवजी मुटेसाहेब नि निवडक लोकांना माझे मत घरून व्य. नि. करेन.

व्यनीची वाट बघत

4

व्यनीची वाट बघत आहे..
सातारकरांना पुन्हा पाचारण करत आहे..

माझे वाचन कधीच होत नाही याचे

5

माझे वाचन कधीच होत नाही याचे हेच कारण असावे काय? कदाचित होय.


-पुण्याचे पेशवे

खरं आहे. (ग्यानबा)

6

खरं आहे.

(ग्यानबा)

मुटेसाहेब,तुमच्या भावना

7

मुटेसाहेब,तुमच्या भावना समजल्या पण तरीसुध्दा ह्या आजाराला ग्यानबाचे नैराश्य म्हणतायेईल.मनोरंजनात्मक,कलात्मक आणि आशयात्मक मुल्याशिवाय इतर काही गोष्टींची अपेक्षा पुस्तकापासून करता येत नाही. लेखकाच्या वैयक्तीक आचरणाचा संबंध पुस्तकाच्या आशयाशी लावणे आणखीनच चुकीचे.अहो, लेखक ही तुमच्या माझ्यासारखा माणूसच असतो. एखाद्या क्षणी, एखाद्या किलकिल्या फ़टीतून त्याला तुमच्या माझ्या पेक्षा जास्त दिसते एवढेच.त्या क्षणाचा अपवाद वगळता तो ही सर्वसामान्यच असतो.दास कॅपिटल लिहिणारा कार्ल मार्क्स घरच्या नोकरांना व्यवस्थित पगार देत नसे.टॉलस्टाऑय च्या घरी शेतमजूरांचे तांडे राबत असत.त्यांच्या पुस्तकाच्या आशयाशी हे विसंगत आहे. पण त्यामूळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, त्यातील विचारांचे मूल्य कमी होते का?मूळातच विचाराकडे “निव्वळ विचार “ म्हणूनच बघितले पाहिजे. त्याला सामाजिक, अध्यात्मिक, धार्मिक अशी लेबले सुध्हा लावणे गरजेचे नाही. मेंदुची वैयक्तीक संवेदना इतक्याच अर्थाने विचार ह्या शब्दाचा अर्थ घेतला पाहीजे. तो विचार लेखकाने जगलाच पाहीजे हा अट्टाहास नको.
तर मुटेसाहेब,ग्यानबाला पुस्तके वाचायला सांगा. भरपूर वाचायला सांगा.वड्याचे तेल वांग्यावर न॔को.


..............................................................

....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....

....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....

+ १ उत्तम प्रतिसाद.

8

+ १

उत्तम प्रतिसाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एक बाजू.

9

आषकजी, तुम्ही म्हणता ही एक बाजू आहेच.
तरी ग्यानबाची कायम उपेक्षा हेही शोभादायक नाहीच.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

>>तरी ग्यानबाची कायम उपेक्षा

10

>>तरी ग्यानबाची कायम उपेक्षा हेही शोभादायक नाहीच.

अगदी सहमत... मूळ दु:ख तेच आहे..