रेशीमबंध...

0
0

इशा की नमाज संपली, सौदी अरेबिया तील अल जुबैल गावातली दुकाने पुन्हा एकदा उघडली. इशा म्हणजे दिवसाची शेवटची नमाज, पहाटे चार साडेचारच्या सुमारास पहिली फज्र ची नमाज, मग दुपारी साडेअकरा-बारा वाजता दहुर ची नमाज, दुपारी चारचे सुमाराला अशर ची नमाज, सायंकाळी साडेपाच सहाला मगरिब ची अन शेवटी रात्री आठ साडेआठ ला इशा ची नमाज अशी पाच नमाजची वेगवेगळी नावे आहेत. इथे हा कायदाच आहे नमाज च्या वेळी सगळी दुकाने बंद! "सला टाइम, सला, सला" म्हणत सरळ गिर्‍हाइकाला बाहेर काढतात Crazy . दुकानातील नोकर मंडळी नमाज पढायच्या निमित्ताने टाइमपास करतात. अर्ध्या तासाने वेळ संपली की परत दुकाने उघडतात

असेच बिग वर्ल्ड हे दुकान ही उघडले. बाहेर हवेत फार उष्मा होता घामाच्या चिकचिकाटाने पार वैतागलो होतो.
( आठवा, पुलंचा १००% पेस्तनकाका: साला ग्घाम ने ग्घाम ने ग्घाम!!)
दुकान उघडले अन अमाप उत्साहाने Party माझी सौ. आत शिरली ( मी किती उत्साहाने ते सांगायलाच हवे का? pray ) दुकानातल्या एसी मुळे जरा बरे वाटले.
दुकान कसले महादुकानच म्हणायला हवे. चायनीज मालाने ओसंडून वाहणार्‍या या दुकानात काय मिळत नाही? पेन पेन्सिली, रंगकांड्या, रंगपेट्या, वह्या, डायर्‍या, खेळणी, झुंबर, दिवे, लॅम्पशेड्स, घड्याळे, सजावटीचे सामान, नाना तर्‍हेच्या भेटवस्तु , प्लास्टिक च्या वस्तू, चाकु सुरे, सुया, कात्र्या, कपबशा,क्रॉकरी, स्वैपाकाची साधी व नॉन स्टिक भांडी, चादरी, गालिचावजा तुर्कस्तानी सतरंज्या, पायपुसणी, नकली दागिने, क्लिपा,पिना, रिबिनी, अत्तरे,सौंदर्यप्रसाधने, साबण एक ना दोन अक्षरशः शेकडो वस्तु. अर्थातच अल जुबैल मधे आलेली कोणाची ही बायको या दुकानात गेली नाही तर तिचे जीवन व्यर्थ आहे...इत्यादि इत्यादि असे इतर महिला वर्गाचे मौलिक मत! तर खिसा बर्‍यापैकी हलका होणार आहे या मानसिक तयारीने मी ही सौ. बरोबर दुकानात शिरलो. मुलगा खेळणी भागात, सौ. नकली दागिने/ सौंदर्यप्रसाधने/ पिना-क्लिपा इ. विभागात अन मी रिकामटेकडा निरुद्देश कुठेही फिरू लागलो.

बराच वेळ गेला, माझ्या समोरून दोघे जण आले. वेषावरून पाकिस्तानी वाटत होते. एक जरा जाडासा मध्यम उंचीचा होता. त्याची बुरखाधारी बायको कुठुन तरी उगवली. बायको बरोबर खरेदी ला आलेल्या कोणत्याही नवर्‍या सारखा तो ही कंटाळला होता.

"चलेंगे अब?" त्याने बायकोला विचारले.

" जी नही, अभी तो भैय्याके लिये कुछ लेना बाकी है, आप भी ढुंढने मे मदद नही करते हो, मै ही कुछ देखती हु अब." असे म्हणून ती पुन्हा एकदा नव्या उत्साहाने दुकानात फिरायला निघून गेली.

या माणसाचा मित्र हसुन म्हणाला " कमसे कम एक घंटा और लगेगा. अब तो सारी खुदाई वाला मामला है."

"हां भाई, सारी खुदाई एक तरफ! और जोरु का भाई एक तरफ. अब तो अल्लाह ही बचाये." असा चाललेला त्यांचा संवाद एकून साहजिकच माझ्या चेहर्‍यावर हसु उमटलेले त्यांनी पाहिले.

"इंडियासे?" त्यानी हसुन विचारले.

"हां" आम्ही शेकहॅण्ड केला, या माणसाच्या मित्राशी मी जरा भीत भीतच हात मिळवला अन अपेक्षे प्रमाणे माझ्या हाताच्या हाडांचा भुगा झाला.

"आप कहासे?" ओळखले होते तरी काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले.

"हम दोनो पाकिस्तान से. अब क्या कहे भाई ये औरते एक बार दुकान मे घुसी की पुछो मत. बडी मुश्किलसे बाहर निकलती है."

मी ही हसुन म्हटले "हा और अब तो मामला भी नाजुक है." ते दोघे ही हसु लागले.

"हमारे मराठी मे भी ऐसीही एक कहावत है जरा नॉन व्हेज है Big smile इस लिये यहा नही बता सकता."
असे मी म्हटले मात्र या माणसाचा मित्र ( ती म्हण माहीत असल्याने असेल ) एकदम गडगडाट झाल्या सारखा हसला.

"आप इंडियामे कहा से महाराष्ट्र से?"

"हा महाराष्ट्र से, मुंबई के पास से"

"लो भाई सत्तार, ये भी तुम्हारे ही मुलक वाले निकले. मै न कहता था? यहा जुबैल मे काफी सारे है तुम्हारे मुलक वाले."

"मी अब्दुल सत्तार!! मूळचा चिपलून जवलचा."पुन्हा एकदा शेकहॅण्ड अन या वेळी अधिकच प्रेमाने पुन्हा एकदा माझ्या हाताच्या हाडांचा भुगा!!

महंमद अब्दुल सत्तार, वय बरेच आहे हे फक्त पांढर्‍या विरळ केसांमधुन दिसणार्‍या टकला वरून जाणवेल, ताडमाड सव्वा सहा फूट तरी उंची,अन त्या उंची ला शोभेल असा व्यायामाने कमावलेला मजबूत आडवा बांधा.

"मी पाकिस्तान आर्मीत होता, पंधरा वर्स. नंतर रिटायर जाला . आत्ता काही दिवस झाला इथे सिक्युरीटीचा नोकरी मिलाला तर आलो."

"हो का अरे वा छान. तुम्ही आर्मी वालेच असणार , शेकहॅण्ड केला तेव्हाच मी ओळखलं ते. मी पण आधी कोकणात अलिबाग ला होतो आता एक वर्ष झाले इथे सौदित आलो."

अन मग आपल्या मोडक्या तोडक्या मराठी मधे सत्तारभाई जो सुरु झाला तो नॉन स्टॉप पाउण तास बोलतच होता. खूप दिवसांनी मराठी बोलायला मिळालय त्याचा आनंद त्याच्या चेहर्‍या वरून अगदी ओसंडून वहात होता.मीही तो आनंद बघुन त्याला बोलते ठेवण्या पुरते प्रश्न विचारत होतो.
"खूप दिवसानी मराठी बोलाला मिल्ला आज"
"आमचा घर होता, शेत पन होता बघा तिथे. आता काका लोक बघते कि विकला ते पन माहित नाही. बटवाराचे वेली माजा वालिद आमाला घेउन पाकिस्तान ला आला. मी तेव्हा खूप छोटा होता पन मला अजून सगलं याद आहे. आमचं नातेवाईक हाय अजुन तिकडे. लय वाटते बघा कधी तरी एक टाइम तरी चिपलून ला जाव, माजा गाव, गावचा समुंदर मुलांना दाखवाव. पन काय करनार वीसा मिलत नाही ना गरीबाला, त्यात मी पाकिस्तान आर्मी वाला."
इतके आयुष्य उलटून गेले तरी माय मराठीचा, मायभूमी चा रेशीमबंध सत्तार भाईच्या मनाला अजुनही घट्ट बांधलेला होता, आता आपल्याला कधीच तिथे जाता येणार नाही Santa म्हणून काहीसा काचत ही होता.

आजही जुबैलच्या बाजाराच्या गर्दीत सत्तारभाईना मी दिसलो की किमान पंधरावीस मिनीटे आपल्या अफाट मराठीतनं बोलण्याची हौस सत्तारभाई माझ्याशी बोलून भागवून घेतात.

"इफ्तारसाठी येत्या शुक्रवारी नक्की याचे बर का"

"हो हो नक्की येणार, शीर कुर्मा कोणी सोडेल का? "मी ही होकार देतो.

सत्तार भाई घाईघाईने आपल्या घराकडे निघतात नी मी आपल्या घराकडे.

जल्ला कसला येकेक अनभव

1

जल्ला कसला येकेक अनभव नाय..

दोला पानावता असा काय आयकला की.. कुनाचा मूळ कुठ जुळला आसन बघा..

+१ असेच म्हण्तो.

2

+१

असेच म्हण्तो.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+२

3

बाडिस

+३

4

अनिल बर्वेंच्या ('थँक्यू मि. ग्लाड' वाले) 'युद्धविराम' ची आठवण झाली. जमिनीवर रेघ ओढल्याने विलग झालेल्या नि दोन्ही देशांच्या राजकारणात फरफट झालेल्या कुटुंबाची कहाणी. इथे निदान निरोपावेळी 'आल इज वेल' तरी होते, तिथे...

रेशीम धागे

5

जबरी अनुभव.

आपल्या मातीच प्रेम कळायला दूरच जायला लागत बहुतेक... Sad


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

दुर जाणे गरजेचे नाही आवड

6

दुर जाणे गरजेचे नाही आवड महत्वाची Innocent


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मातीचे प्रेम..

7

मातीचे प्रेम मनात असतेच हो, दूर गेलं की जास्ती जाणवते असे म्हणा हवेतर.

हे पण खरं आहे म्हणा...

8

हे पण खरं आहे म्हणा...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ऑफिसातला एक ड्राइव्हर आहे.

9

ऑफिसातला एक ड्राइव्हर आहे. त्याला पाकी असल्याने भारतात यायला मिळणार नाही म्हणुन खुप वाईट वाटतेय.
तो त्याच्या लहानपणी येउन गेलाय. त्याला मुम्बईचे अफाट आकर्श्ण आहे.

मुंबई....

10

हो इथे जुबैल मधेही मुंबई जवळ रहातो म्हटले की पाकी अगदी खुलतात अन बॉलीवूड बद्दल फार क्रेझी असतात. मला एकाने विचारले फिर आपने तो सलमान, शाहरुख को देखा होगा? मी म्हटले उनकी ऐसी तकदीर कहा जो मुझसे मिलते.... हास्य

सुंदर

11

सुंदर

मस्त !!

12

मस्त !!