एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.
हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्या शेतात असणार्या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.
एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय... एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! " कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार "!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !
पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं... ! पिल्लू बाहेर येईना.
मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, " पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. " तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !
आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, " पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! " अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. " खूपच हट्टी दिसतंय पिल्लू " असं म्हणून बसून राहिली.
थोड्या वेळाने तिला वाटले," किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. " मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ' पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. " पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.
अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्या दिवशी पण अंडे तस्सेच !
कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.
सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. " सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? " कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. 
छान...गोष्टीतुन मुलांना
हॅ हॅ हॅ
अग्गं बाई, 'धडे' देणे टाळायचे म्हणून तर या कथा निवडल्या. प्रत्येक गोष्टीला बोध असलाच पाहिजे का ???
असो. तुला काय शिकवण मिळाली या गोष्टीतून ??
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
कोंबडी वेळ वाया घालवत
कोंबडी वेळ वाया घालवत नसे.....
कोंबडी कशासाठी वेळ वाया घालवत
कोंबडी कशासाठी वेळ वाया घालवत नसे?
(निरागस चेहरा करुन प्रश्न विचारला आहे)
नाना अरे तिला कित्ती छंद
नाना अरे तिला कित्ती छंद होते.....तर मग वेल वाया कसा जाअईल?
तु पन ना
अच्छा अच्छा छंद काय.. मी तसा
अच्छा अच्छा छंद काय.. मी तसा थोडा मंदच आहे.
खुलाशाबद्दल धन्यवाद.
(विषय दिलेला नाही)
मला कळलेला भावार्थ. ज्या
मला कळलेला भावार्थ.
ज्या कोंबडीला आई व्हायचे असेल तिने आपल्या छंदांकडे दुर्लक्ष करुन बाळासाठी वेळ दिला पाहिजे.
आईला वैयक्तिक आयुष्य राहत नाही वगैरे...
(खातंय मार आता काकवांचा)
तात्पर्ये
१. आईने कितीही प्रयत्न केला तरी ते अत्रंगी कार्ट त्याला हवे तेव्हाच बाहेर येणार.
२. कोंबडीला आवश्यक तेच छंद नसावेत अन्यथा पिलू कसे बाहेर येते हे तिला ठाउक असते.
आणखी काही आहेत पण सध्या बॅटन पुढे पास करतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
३. कोंबडीला चांगला स्वैपाक
३. कोंबडीला चांगला स्वैपाक येतो!
४. कोंबडीला बालकथा मात्र तितक्याशा चांगल्या सांगता येत नाहीत.
५. घरात कितीही सोफे, खुर्च्या, मऊ बिछाने वगैरे असले तरी आईच्या पांघरूणाची ऊब मिळाल्याशिवाय पिल्लं अंड्यांतून बाहेर पडत नाहीत.
कैच्या कै
कैच्या कै
तुम्ही कोंबडी का अंडे?
तुम्ही कोंबडी का अंडे?
ना कोंबदी ना अंदे .....मी तर
ना कोंबदी ना अंदे .....मी तर हाय माणुस....
होत असतात असे भास... होशील
होत असतात असे भास... होशील बरी लवकरच
भास अॅब्नोर्मल माणसांना
भास अॅब्नोर्मल माणसांना व्हतात नानासाहेब......तुमास्नी डोक्टरांकडे घिउन जाउ बरका....काही दिसात सम्द ठिक व्हैल
पहिला आमचा मुद्दा खोडुन न
पहिला आमचा मुद्दा खोडुन न काढता तो आमच्यावरच चालवला त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा
परंतु तुमचा मुद्दा हा केवळ आमच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणुन असल्याने त्यात दम नाही
आणि तरीही समजा तुमचा मुद्दा धरला तर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते नाही झालं तर... डॉक्टरची जबाबदारी घेता तुम्ही ?
हो.......१००% अवांतर : अरे
हो.......१००%
अवांतर : अरे तुरे केल तरी चाल्त....तुम्ही वैग्रे ऐकल की उग्गीच वयस्कर झाल्यागत वाटत
अवांतर : अरे तुरे केल तरी
अवांतर : अरे तुरे केल तरी चाल्त....तुम्ही वैग्रे ऐकल की उग्गीच वयस्कर झाल्यागत वाटत Big smile
छ्या छ्या आपण लहान आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न... असले प्रयत्न संस्थळाचे मालक चालवुन तरी कसे घेतात..
मी ल्हान हाय याला पुरावा
मी ल्हान हाय याला पुरावा हाइथे
बर्रं.. मग? लहान आहात तर काय
बर्रं.. मग?
लहान आहात तर काय इथे याडव्हान्टेज मिळत नाय हां.. सर्वांना समान न्याय..
काय हो मालक, बरोबर ना?
मेव्या तुझ्या आधीची नानाची
मेव्या तुझ्या आधीची नानाची पोस्ट वाच म्हण्जे संदर्भ लागेल
त्याला पुरावा म्हणत नाहीत.
त्याला पुरावा म्हणत नाहीत. मागील वर्षी एक ७२ वर्षांचा माणुस बीए झाला. सबब असले पुरावे कुचकामी असुन योग्य तो पुरावा देणे अन्यथा आजपासुन प्रिमो वय वर्शे ८८ समजले जाईल
डुम डुम दुमाक
मागे एका सदस्याने पुरावा
मागे एका सदस्याने पुरावा म्हणून उपक्रमावरचा एका सदस्याचा (तोही ऐकीव माहीतीवरचा) प्रतिसाद लिंकवला होता. नेमकी त्याची आठवण झाली.
-पुण्याचे पेशवे
नाना
नाना
हा पुरावा नाही.. पर्यासारखं
हा पुरावा नाही.. पर्यासारखं त्या मार्कलिस्ट चं स्क्यान करून फोटू लावा बघू......
हट्ट.....
हट्ट.....
कोंबदी व अंदे हे दोन शब्द
कोंबदी व अंदे हे दोन शब्द वाचून गेले ५ मिनीटे

आता पोट दुखायला लागलंय...
प्रिमो, तू माणूस आहेस? मला
प्रिमो,
तू माणूस आहेस? मला वाटत होते तू बाईमाणूस आहेस.
-पुण्याचे पेशवे
पुपे हे समजुन घ्याय्च
पुपे हे समजुन घ्याय्च अस्त......
नाना
(एकतर तीला नानाछंद) "सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली." .

पण गोष्ट आवडली
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
इतकी सुंदर गोष्ट आहे पार वाट
इतकी सुंदर गोष्ट आहे पार वाट लावलीत तिची.
आता मितानला बहुतेक प्रत्येक गोष्टीचा आर्थ पण लिहावा लागेल.
कोण मितान?
कोण मितान?
मितान = मैत्रीण
मितान = मैत्रीण
गंमतीशीर गोष्ट
गंमतीशीर गोष्ट.
जाता जाता: धागा आधी की काश्मीर आधी?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
धागा
धागा आधी हो, पण अखेर सगळे नमस्कार केशवम् गच्छति(संस्कृत पंडित नाना/मेवे/मनमेघ विभक्तीप्रत्यय दुरूस्त करा) तसे सगळे धागे शेवटी काश्मीरलाच जातात.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>>सगळे धागे शेवटी काश्मीरलाच
>>सगळे धागे शेवटी काश्मीरलाच जातात.
हे बाकी खरंय तुमचं, अर्थात इतकी डोकं फुटीरतावादी मंडळी असताना दुसरं काय होणार.
अर्धवट
अध्यक्ष.
पीपल्स धागाकाश्मीर पार्टी
केशवम गच्छन्ति| मलाही थोडफार
केशवम गच्छन्ति|
मलाही थोडफार संस्क्रुत येत हे सांगितल की नाय
बाबौ
हाणतंय मेव्या.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आजोबा प्रतिसाद का दिलत? मला
आजोबा प्रतिसाद का दिलत? मला अॅडीट कराय्च व्हत....
मुली
आयुष्यात फेरविचार करण्याच्या संधी फार थोड्या असतात, म्हणून विचारपूर्वक कृती करावी.
(डंबलडोर) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ह्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म
हे अस आहे...केशवं गच्छन्ति
हे अस आहे...केशवं गच्छन्ति
अरेरेरेरेरेरेरेरेरेरे.....
कुठून बुद्धी झाली नि मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली..
ही प्रीमो नि नाना
जयपालदा, ती कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली कुठंय रे ??
च्यायला, प्रतिसादांच्या संख्येवरून तरी मनात आलंच की बालकथा वाचायला शाळा का भरलीय...!
ह्ल्क्त अच्र्त बव्ल्त आहेत सगळे.
आता गोष्टच नाही सांगत ज्जा !
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
हा हा हा! आता तुलाच एखादी
हा हा हा! आता तुलाच एखादी इसापनीतितली गोष्ट सांगायला लागणार वाटतं. "आपण प्रतिसादांची चिंता न करता लिखाण करत राहायचं" या धर्तीवरची!
ही प्रीमो नि नाना जयपालदा, ती
ही प्रीमो नि नाना
जयपालदा, ती कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली कुठंय रे ??
टिआरपी दिला वाढवुन त्याच काही कौतुकच नाही.. जा आता प्रतिसादच देणार नाही तुमच्या धाग्याला
वाह!
समय से पहले, नसीबसे ज्यादा ....
सब्र का फल मिठा होत है
हॅव पेशंस वगैरे वगैरे
मस्त
गोष्ट मस्त आहे.

उगाच चिडून लिहणं बंद करु नकोस्...लिही पुढची गोष्ट!
आवडेश.
आवडेश.
माव्ची, हे सग्ले सग्ले
माव्ची,
हे सग्ले सग्ले येले(....) आयेत. तो नको लक्स देऊ त्यंच्याक्ले. तू चान गोत्त शांग्ते. आन्की कूप कूप चांग....
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
छान आहे गोष्ट ! योग्य गोष्ट
छान आहे गोष्ट !
योग्य गोष्ट योग्य वेळी व योग्य कार्य केल्यावरच मिळते.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मी कशीए व्च्लिइ नाही हि गोस्त