तो एक प्रवास या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले. सौरकंदीलाच्या उजेडात ही आदिवासी वाडी उजळून निघाली आणि आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलून गेले. 
आंबिवली गणी आदिवासी वाडीच्या प्रवासानंतर याबाबत वृत्तपत्रातून आदिवास्यांच्ता व्यथा मी मांडल्या .माझ्या या प्रयत्नाला यशही आले.या वृत्ताची दखल घेत गोरेगाव( जि.रायगड) येथील शेअर संस्थेने तातडीने या वाडीची माहिती घेतली. शेअरचे महाड विभागाचे कार्यकर्ते विजय रानमाळे, गणेश मुरगुडे व अमोल शिरगावकर यांनी या वाडीला भेट दिली. प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व शेअरच्या संचालिका निकोला मॅन्टेरो यांनी वाडीवर विजेची समस्या सोडविण्यासाठी 17 कुटुंबांना सौरकंदील प्रकल्प मंजूर केला. महाडचे नवनियुक्त तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या हस्ते या आदिवासींना सौरकंदीलांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला.
JPGआदिवासींनी या वेळी तहसीलदारांना आपल्या अडचणी सांगितल्या. तुषार इनामदार यांनी सौरकंदील वापरण्याची माहिती आदिवासींना दिली. या कार्यक्रमाला सरपंच प्रतिमा गायकवाड, उपसरपंच रमेश पवार, शेअरचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.पाणीटंचाईबाबत शेअर प्रयत्न करणार आहे. गणी आदिवासीवाडीवर जाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते.मीही अशी डोंगरावरून पायपीट करत गणीच्या व्यथा मांडल्या .माझी पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद मला वाटतो.
अभिनंदन... असेच यश आपल्या
अभिनंदन... असेच यश आपल्या सगळ्या कष्टांना येवो.
पायपीट व्यर्थ गेली नाही याचा
पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद झाला... शिवाय जसा भोतिक प्रकाश दिलात.. तसा ज्ञानरुपी प्रकाशही त्याच्या घरावर आपल्या प्रय्त्नांनी पडो ही सदिच्छा...
+१ अगदी असेच म्ह्णतो
+१
अगदी असेच म्ह्णतो
सुनीलभौ, शक्यतो आधीच्या लेखाचा उल्लेख करताना त्याचा दुवा दिलात तर बरं. म्हणजे तोही लेख शोधावा लागणार नाही.
+२
असेच म्हणतो.
-पुण्याचे पेशवे
बाडिस
बाडिस
(विषय दिलेला नाही)
तो एक प्रवास
तो एक प्रवास
+ १०० असेच म्हणतो.
+ १००
असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
धन्यवाद
शेखर आभरी आहे.
अभिनंदन
अभिनंदन
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
जबरदस्त काम
पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिनंदन.
अभिनंदन.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
तुमच्या कष्टाचे चीज झाले
तुमच्या कष्टाचे चीज झाले !
अभिनंदन
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."