भारतीय तत्वज्ञान - भाग १०
मागील भागात आपण वेदांत दर्शनाचा किंचित आढावा घेतला. याभागात आपण वेदांतदर्शनावरील शांकरमताचा आढावा घेउ. शांकर मत हेच परंपरेने अद्वैतमत असे संबोधले जाते. हे मत केरळातील शंकर नामक लहान वयातच संन्यास घेतलेल्या संन्याशाने ज्याला जग आद्य शंकराचार्य म्हणून ओळखते त्याने मांडले आहे.
शांकरमतानुसार ब्रह्म हेच काय ते एकमेव सत्य असुन इतर सर्व मिथ्थ्या आहे. दृश्य विश्व हे दृश्य स्वरुपात सत्य नसुन त्याच्या मागे नित्य असलेले ब्रह्म सत्तारुपाने असुन जे विविध रुपे, आकार भासमान होतात ती ब्रह्माची शक्ती माया आहे. जीवात आणि ब्रह्मामधे तत्वदृष्ट्या काहीही फरक नाही. अज्ञानामुळे जीवाला ते समजत नाही. हे अज्ञान कसे असते हे समजावुन सांगण्यासाठी सर्परज्जु दृष्टांत दिला आहे. ज्याप्रमाणे अंधारात दोरीला पाहुन साप असल्याच्या कल्पनेने मनुष्याची गाळण उडते, तो पळुन जातो किंवा सापाला मारायला प्रवृत्त होतो परंतु नीट पाहिल्यावर दोरी असुन साप नसल्याची जाणीव झाल्यावर भिती निघुन जाते अशा प्रकारे संसाराचे मिथ्थ्यापण समजल्यावर ब्रह्मज्ञान होते. इथे मिथ्थ्या म्हणजे खोटे किंवा असत्य अशा अर्थाने घेउ नये.
मिथ्थ्या म्हणजे ज्याचे यथार्थ स्वरुप समजणे अवघड आहे असे. जसे अंधारात एखादा खांब पाहुन प्रियकराला प्रेयसी उभी आहे असा भास होतो, चोराला शिपाई उभा आहे असे वाटते, मरायला टेकलेल्याला यमदुत आला असे वाटते, अशा प्रकारे विविध व्यक्तींना हे भ्रममुलक दर्शन होते ते मिथ्थ्या. प्रत्यक्ष खांब हे सत्य होय परंतु त्याठिकाणी दुस-या वस्तुची कल्पना करणे/होणे/भासणे हे मिथ्थ्या होय. तिथे खांब नसतांना सुद्धा जर कल्पना केली असती तर ते असत्य ज्ञान, परंतु खांब असुन त्याच्या जागी वेगळे काही तरी समजणे हे मिथ्थ्या ज्ञान, आणि हे असे समजले जाणे हाच अध्यास होय. अध्यासामुळे ब्रह्माचे अस्तित्व असुन सुध्दा लोक नाकारतात आणि विश्वाला सत्य समजतात हा मिथ्थ्याभास असुन हे मायेमुळे होते असे शांकरमत प्रतिपादन करते.
शांकरमतानुसार सुख दु:खाला कारण देह असुन आत्मा अलिप्त आहे. परंतु अध्यासामुळे देह म्हणजेच आत्मा असे समजल्याने जीव सुखी अथवा दु:खी होतो. हा भ्रम दुर झाला की जीव आनंदमयी ब्रह्म भावात लीन होतो. जीवनाचा उद्देश आनंद प्राप्त करणे असा असुन जीव ब्रह्म एकच आहेत हे ज्ञान प्राप्त होणे हीच मुक्ती होय. हे सगळे जरी पारमार्थिक दृष्ट्या सत्य असले तरी जीवाला जगतांना मायेतच जगायचे असल्याने मायेला टाळता येणे शक्य नाही. त्यामुळे मायेतच राहुन जीवाला कर्मे ही करावीच लागतात. अशा प्रकारे लौकिक जगात वावरण्यासाठी सामान्य लोकांसाठी ब्रह्माला साकार रुपात कल्पुन त्याचे पूजन करुन ज्ञानाच्या सहाय्याने हळुहळू मायेचा अंमल कमी करण्यासाठी स्मृतीमान्य धर्माची आवश्यकता शांकर मत प्रतिपादन करते. मात्र त्याचबरोबर कर्मे आणि ज्ञान यांचा काहीही संबंध नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे.
अशा प्रकारे आपण शांकरमत किंवा अद्वैतमताचा आढावा घेतला. पुढील भागात रामानुजमत

.jpg)
हजर..
हजर..
मस्तं. शेवटी काय ब्रम्ह सत्य
मस्तं. शेवटी काय ब्रम्ह सत्य जगन्मिथ्या काय?
-पुण्याचे पेशवे
याच ओघात
नाना,
भारतीय तत्वज्ञानाचा संक्षिप्त परिचय वाचतो आहे.
याच ओघात पुढे पांचही आचार्यांच्या (शंकर, निंबार्क, वल्लभ, रामानुज, मध्व)
प्रस्थानत्रयीवरील भाष्याचाही परिचय करून द्यावा - द्वैत ते अद्वैत अश्या संपूर्ण
स्पेक्ट्रम च्या प्रत्येक दृष्टिकोनातून होणारे तत् चे दर्शन !
अवांतर १: मीही शांकराद्वैतमतानुयायी आहे. (त्यामुळे मी कोणाशी भांडू शकत नाही !
अवांतर २: ब्रह्म - माया चर्चेत कोणाला आचार्य अत्रे यांच्या गाजलेल्या नाटकासंदर्भात
या ओळी आठवतात कां?
ब्रह्म तेथे माया |
वृक्ष तेथे छाया |
बुवा तेथे बाया |
मुक्तसंग: अनहंवादि
मस्त...
लिही पुढचा भाग!