पनीर मसाला

0
0

र्रॉडधारी 'नळी'श्चंद्र बाबा आणी आफ्रिकन अर्धवट राव यांना फक्त आणी फक्त आणी फक्तच जळवायच्या उद्देशाने 'पनीर मसाला' ही पाककृती टाकण्यात येत आहे...... wink कॅलरी मोजणार्‍यानी बघितली नाही तरी चालेल.... Big smile

PM

साहित्य:

१. पनीर - पाव किलो - साधारण एक बाय एक इंचाचे तुकडे करून
२. एक मोठा कांदा - चिरून
३. दोन मध्यम टोमॅटो - चिरून
४. अर्धा-पाउण चमचा - लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला
५. मीठ
६. तेल, हिंग, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची - फोडणीसाठी
७. आलं लसूण पेस्ट
८. एक चमचा दही
९. दोन चमचे लोणी
१०. अर्धा चमचा हळद

कृती:

एका तव्यावर थोडंस तेल टाकून त्यावर पनीरचे तुकडे खरपूस तांबूस भाजून घ्या.

एका कढईत तेल तापवायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, कडिपत्ता आणी २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या फोडणीस टाका.
जिरे तडतडले की त्यात कांदा टाकून मस्त गुलाबी होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो टाकून शिजे पर्यंत परता.
मिश्रण शिजलं की त्यात मीठ , हळद , आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालून एकजीव करा.

आता त्यात शॅलो फ्राय केलेले पनीर टाका. अर्धी वाटी पाणी टाकून कढई झाका. तीन चार मिनीट मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.
त्यात दीड चमचा लोणी आणी एक मोठा चमचा दही टाका. मिश्रण एकजीव करून अजून पाच मिनीटे उकळी येऊ द्या. तयार आहे मस्त चमचमीत पनीर मसाला....

सर्व्ह करताना वरून उरलेले अर्धा चमचा लोणी घाला आणी लुफ्त लुटा.....

PM

राजे आणी अर्धवटरावांना टुक टुक...

PM

तोंडाला पाणी सुटल मस्त दिसतेय

1

तोंडाला पाणी सुटल मस्त दिसतेय रेसिपी...... पण मी जळणार नाही कारण मला करता येते Big smile

>>र्रॉडधारी 'नळी'श्चंद्र बाबा आणी आफ्रिकन अर्धवट राव यांना फक्त आणी फक्त आणी फक्तच जळवायच्या उद्देशाने 'पनीर मसाला' ही पाककृती टाकण्यात येत आहे.....

Laughing out loud =)) ह ह पु

माझी पण =)) =))

2

माझी पण Laughing out loud Laughing out loud Laughing out loud =)) Laughing out loud Laughing out loud =)) Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud =)) Laughing out loud Laughing out loud

जबरा रे !

3

जबरा रे !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नोंद घेतलेली आहे. योग्य वेळी

4

नोंद घेतलेली आहे. योग्य वेळी प्रतिसाद फेकुन मारण्यात येतील. Crying

फाउल

5

प्रतिसाद फेकून मारणे हे डिपारमेंट (हा शब्द बोली भाषेतला आहे, व्याकरणाची चूक काढू नये, फाट्यावर मारण्यात येईल) आमचे आहे. तुम्ही धागे फेकून मारा बरं, रॉडधारींना मारले तसे.

गप रे.... नो आगलावी

6

गप रे.... नो आगलावी wink

मस्तं रे. यात झालंच तर थोडा

7

मस्तं रे. यात झालंच तर थोडा गरम मसाल्याची पूड टाका. लज्जत वाढते. हास्य


-पुण्याचे पेशवे

टाकलीय की... साहित्य क्र. ४

8

टाकलीय की...
साहित्य क्र. ४ बघ.. Big smile

करेक्ट. (पनीरप्रेमी)पेशवे

9

करेक्ट. हास्य
(पनीरप्रेमी)पेशवे


-पुण्याचे पेशवे

असे न वाचतो प्रतिसाद दिले की

10

असे न वाचतो प्रतिसाद दिले की होतं कधी कधी wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा वा तुमचा प्रतिसाद वाचून

11

वा वा तुमचा प्रतिसाद वाचून डोळे पाणावले. वरिष्ट होता प्रतिसाद. `


-पुण्याचे पेशवे

>>असे न वाचतो प्रतिसाद दिले

12

>>असे न वाचतो प्रतिसाद दिले की होतं कधी कधी

आपण आणि असे म्हणता... आम्ही धन्य जाहलो

च्च् च्च्

13

साहित्य नाही रे मित्रा 'सामुग्री' किंवा 'सामग्री' (आमची जित्याची खोड...)

'सामान' चालेल का?

14

'सामान' चालेल का? wink

विषयाशी संबंध नसलेले शब्द

15

विषयाशी संबंध नसलेले शब्द वापरु नयेत ही विनंती

घ्या.. विषयाशीच तर संबंध

16

घ्या.. विषयाशीच तर संबंध असलेले शब्द वापरतो आहे..

मस्त..

17

मस्त दिसतो आहे पनीर मसाला,
सूचना- बॅचलर स्वयंपाक्यांकडे मिक्सर नाहीये का? जर असेल आणि किंचित कष्ट घ्यायची तयारी असेल,wink तर पनीर टाकायच्या आधी सगळे मिश्रण वाटून घेतले तर स्वाद अजून वाढेल..
स्वाती

खरंय...पण काल मिक्सर लावायचा

18

खरंय...पण काल मिक्सर लावायचा कंटाळा आल्याने राहून गेला तो पार्ट... हास्य

:)

19

च्यायला प्रभ्या लैच पेटलाय रे आजकाल!

प्रभो मस्त यार....

20

प्रभो मस्त यार....

धन्यवाद मंडळी.

21

धन्यवाद मंडळी.

खरं सांग.. फोटो कूणी दिले?

22

खरं सांग.. फोटो कूणी दिले?

क्यामेरा नी

23

क्यामेरा नी wink

मस्तच; पनिर मला प्रचंड आवडतं,

24

मस्तच; पनिर मला प्रचंड आवडतं, अमलात आणायला हवीच ही पाकॄ. फोटोपण चमचमीत आलेत.


पुष्करिणी

पाणी सुट्ले तोंडाला

25

लय भरी

मस्त..

26

मस्त..हास्य


लै भारी...

27

लै भारी...

लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैल

28

लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलै भारी...

लैलैलैलै भारी...

29

करुन बघतो विकांताला.

अशक्य!

30

प्रभ्या तू एवढा एक्सपर्ट कधी झालास?


-----------------------------------------------------------------------------------------------------------

चिंगी